Transgender Cricketer : Denielle Mcgahey

Transgender Cricketer: Denielle Mcgahey    सध्या संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर हा चर्चेत आहे. कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 23 वर्षीय आर्यन बांगर हा आता अनया बांगर म्हणून ओळखली जाईल. अनया बांगर ने हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी(HRT) 2023 मध्ये करून घेतली. सध्या अनया बांगर युके मध्ये क्रिकेट खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपण आतापर्यंत पुरुष, महिला, अपंग आणि अंध खेळाडूंचे क्रिकेट पाहिलेले आहे.पण एखाद्या Transgender ( तृतीयपंथीं ) खेळाडूंचे क्रिकेट कोणी क्वचितच पाहिलेले असणार आणि तेही आतंरराष्ट्रीय स्तरावर हे मात्र दुर्मिळच असावे. इंग्लंडची मॅक्सीन ब्लिथिन ही २६ वर्षीय खेळाडू विश्वातील पहिली Transgender cricketer म्हणून ओळखली जाते. इंग्लंडच्या घरेलु सामन्यात खेळताना या उजव्या हाताच्या खेळाडूने एकूण १५ सामन्यात २०० हून अधिक धावा बनवल्या. २०१९ मध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावर तिला ‘ प्लेअर ऑफ द इअर ‘ म्हणून गौरविण्यात आले.

ही झाली विश्वातील प्रथम transgender खेळाडूची गोष्ट. पण आता २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एक transgender खेळाडू जी महिला वर्ल्डकप मध्ये खेळताना दिसली. तिने आपल्या उत्तम कामगिरी ने सर्वांची मनेही जिंकली. पण आयसीसीच्या एका नियमाने तिचे छोटेसे क्रिकेट करियर संपुष्टात आले.चला तर मग ती कोण खेळाडू होती ते  जाणून घेऊया.Transgender Cricketer: Denielle Mcgahey.

 

डॅनिअल मॅक हे

Transgender Cricketer : Denielle Mcgahey 

Transgender cricketer
Credit: webduniya.com

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये भाग घेणारी पहिली transgender क्रिकेटर म्हणून डॅनिअल मॅक हे हीने इतिहास घडवला आहे. २०२४ च्या महिला वर्ल्डकप मध्ये तीने कॅनडा कडून खेळताना हा पराक्रम केला. मॅक हे ही मूळची ऑस्ट्रेलियाची आहे. लहानपणापासूनच तिला क्रिकेटची खूप आवड होती. तिचा जन्म 14 एप्रिल 1994 साली ऑस्ट्रेलिया मध्ये झाला. फेब्रुवारी २०२० मध्ये तिने कॅनडा मध्ये स्थलांतर केले. तिने नोव्हेंबर २०२० मध्ये मेल टू फिमेल असे रूपांतरण केले.

 

डॅनिअल मॅक हे ची कामगिरी 

आतापर्यंत कोणतीही  ट्रान्स जेंडर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना दिसलेली नव्हते. परंतु प्रत्यक्षात असे चित्र आपणास पहावयास  मिळाले आहे. डॅनिअल मॅक हे ही लॉस एंजेलिस येथे झालेल्या पात्रता फेरीत कॅनडा कडून खेळताना दिसली. २०२४ मध्ये बांगलादेश मध्ये  महिला टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी ही पात्रता फेरी होती.त्या पात्रता फेरीत कॅनडा संघाने अर्जेंटिना,अमेरिका व ब्राझील शी दोन हात केले होते. डॅनिअल मॅक हे ने आता पर्यंत कॅनडा साठी 6 सामने खेळले असून त्यात 118 धावा बनवल्या आहेत. तसेच 2023 मध्ये नॅशनल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत कॅनडाकडून सर्वाधिक 237 धावा ही बनवल्या होत्या. त्यात तिचा एका शतकाचा ही समावेश होता.

AUS Vs SA 3rd ODI : 36 चौकार, 18 षटकार. 431 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या गोलंदाजांना फो फो फोडले.

मेल टू फीमेल पात्रता निकष –

सायकलिंग ,पोहणे, आणि रग्बी सारखे ॲथलेटिक्स खेळ अजूनही transgender महिलांना मोठ्या स्पर्धेत भाग घेण्यास प्रतिबंध करतात. आयसीसीने मात्र मॅक हे ला क्रिकेट खेळण्यासाठी पात्र मानले आहे. त्यासाठी आयसीसीने काही निकष लावले आहेत ते पुढीलप्रमाणे.

निकष –

  •  महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी एका transgender महिलेने हे सिध्द केले पाहिजे की , किमान १२ महिन्यांसाठी तिच्या रक्तातील टेस्टोस्टेरोन चे प्रमाण हे ५ nmol/L१ पेक्षा कमी असावे.
  •  त्या व्यक्तीने क्रिकेटमधील सहभागा दरम्यान हीच पातळी कायम राखली पाहिजे.
  •  मेल टू फिमेल transgender खेळाडू ने लिखित व सही केलेले शपथ पत्र आयसीसीला देणे बंधनकारक आहे.
  •  संबंधित खेळाडू ही स्त्री असल्याची खात्री आयसीसी च्या नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यास पटली पाहिजे.

 

डॅनिअल मॅक हे काय म्हणाली?

डॅनिअल मॅक हे ही वरील चाचण्या जवळपास दोन वर्षे देत आहे. तिच्या तृतीयपंथी समूहाचे एवढ्या मोठ्या स्टेज वर प्रतिनिधित्व करणे याचा तिला अभिमान आहे व ती यासाठी सज्ज असल्याचे ही आवर्जून सांगते. शरीरातील टेस्टोस्टेरोन चे प्रमाण निश्चित करण्यासाठी ती दोन वर्षापासून दर महिन्याला रक्ताची तपासणी करत आहे. ती कोणाविरुद्ध खेळली व किती धावा काढल्या याचाही तिला पाठपुरावा करावा लागतो .

डॅनियल मॅक हे ने घेतला संन्यास 

Transgender cricketer ban

आयसीसी ने वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय समिती यांच्या सल्ल्याने आणि नऊ महिने पाठपुरावा करून हा कठोर निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे इथून पुढे कोणताही ट्रान्स जेंडर खेळाडू ही महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. त्यांच्या नवीन नियमानुसार कोणतीही अशी खेळाडू जी पुरुष होती व नंतर ती स्त्री झाली किंवा तिने जे आवश्यक असलेले निकष पूर्ण केले असतील अशी कोणती खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेऊ शकणार नाही. आयसीसीच्या या नवीन नियमानुसार डॅनियल मॅक हे ला इथून पुढे क्रिकेट खेळता येणार नाही त्यामुळे तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जड अंत:करणाने संन्यास घेतला आहे.

निष्कर्ष 

Transgender ( तृतीयपंथी ) ही सुध्दा मानवी जात आहे. बऱ्याचदा यांच्याकडे हीन नजरेने पाहिले जाते.परंतु २१ व्या शतकात सर्वच क्षेत्रात transgender जोमाने पुढे जात आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा डॅनिअल मॅक हे च्या रूपाने एक चांगली खेळाडू आपणास पहावयास मिळाली आहे.आगामी काळात तिचा खेळ बहरत जावो व तिला पाहून आणखी खेळाडू तयार होवोत ही कामना करूया. परंतु ट्रान्स जेंडर खेळाडूवर घातलेली बंदी ही योग्य आहे की अयोग्य आहे कमेंट करून नक्की सांगा.

एकंदरीत हा लेख कसा वाटला ते कमेंट करून कळवा. व शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद.!

 

Leave a Comment