ICC women’s world cup final 2025 : ‘भारत बनला विश्व चॅम्पियन. अंतिम सामन्यात दिली दक्षिण आफ्रिकेला मात. शेफाली आणि दिप्ती ठरल्या हिरो. ‘ 

ICC women’s world cup final 2025 : ‘भारत बनला विश्व चॅम्पियन. अंतिम सामन्यात दिली दक्षिण आफ्रिकेला मात. शेफाली आणि दिप्ती ठरल्या हिरो. ‘ 

ICC women's world cup final 2025

ICC women’s world cup final 2025 : डी वाय पाटील स्टेडियम मुंबई येथे खेळवले गेलेल्या आयसीसी विश्वचषक च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला. पावसामुळे थोडा उशीर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु स्मृति मंधना  आणि शेफाली वर्माने शतकी भागीदारी करत भारताला दमदार सुरुवात करून दिली परंतु दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करताना भारताला 298 धावांवर रोखले. दक्षिण आफ्रिका कडून लोरा वोलवर्ड ने एकाकी झुंज देताना शतकी खेळी केली परंतु इतर इतर फलंदाजाची तिला साथ न मिळाल्याने दक्षिण आफ्रिका 246 धावांवर ऑल आउट झाली. अशा रीतीने भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकले.

Test Twenty Cricket Format

भारताची दमदार शतकी सलामी भागीदारी 

पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनल सामन्याला पावसामुळे थोडासा उशीर झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय भारतीय सलामीवीरांनी सपशेल व्यर्थ ठरवताना 111 चेंडूत 104 धावांची दमदार शतकी भागीदारी केली. त्यात स्मृती मांधना ने 58 चेंडूत 45 धावा बनवल्या. त्यात 8  चौकारांचा समावेश होता. तर शेफाली वर्मा ने दमदार 78 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 87 धावा बनवल्या. या दोघांच्या शतकी भागीदारीने भारताने मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.

दक्षिण आफ्रिकेचे दमदार कमबॅक 

स्मृती मांधना आणि शेफाली वर्माने शतकी भागीदारी करून भारताला एका मजबूत स्थितीत आणून ठेवले होते. एक वेळ भारत सहज साडेतीनशे चा टप्पा पार करेल असे वाटले होते. परंतु स्मृतीच्या  विकेट नंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी धावसंख्येवर अंकुश ठेवण्यात यश मिळवले. भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली परंतु मोठ्या सरासरीने त्यांना खेळता आले नाही. त्यामुळे भारताला आपल्या निर्धारित 50 षटकात 7 बाद 298 धावा बनवता आल्या. आफ्रिकेकडून खाका ने 9 षटकात 58 धावा देऊन 3 बळी टिपले. तर इतर गोलंदाजांची ही तिला उत्तम साथ लाभली.

दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरुवात 

भारताने दिलेल्या 299 गावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वुल्वर्त आणि ब्रिटस यांनी आफ्रिकेला सावध पण मजबूत सुरुवात करून दिली.या दोघींनी पहिल्या विकेटसाठी  9 षटकात 51 धावा जोडल्या.

भारतीय कर्णधाराची मास्टर खेळी 

दक्षिण आफ्रिकेची दोन्ही सलामीवीर सावध पण उत्तम  खेळत होती. भारताच्या प्रमुख गोलांदाजाना त्यांनी उत्तम रित्या खेळून काढत धावफलक हलता ठेवला. त्यामुळे भारतीय कर्णधार हरमन प्रीत कौर ने एक डाव खेळला. तिने शेफाली वर्माकडे चेंडू सोपवला. या संधीचे सोने करत शेफाली ने काप ला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर तिच्या दुसऱ्या षटकात ही तिने चांगली फलंदाजी करत असलेल्या लुस ला स्वतःच झेलबाद करून दक्षिण आफ्रिकेला बॅक फूट वर ढकलले. अश्या रीतीने भारतीय कर्णधाराची मास्टर खेळी यशस्वी झाली.

लोरा वोलवर्ड ची जिगरबाज शतकी खेळी व्यर्थ

लॉरा वोल्वर्ड

संपूर्ण विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा बनवणाऱ्या लॉरा वोलवर्ड हिने अंतिम सामन्यात जिगरबाज शतकी खेळी करून आपल्या संघाला विजया जवळ नेले होते.परंतु इतर फलंदाजांची साथ तिला मिळाली नाही. त्यामुळे तिची शतकी खेळी दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देवू शकली नाही. लॉरा ने 98 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारांचा सहाय्याने 101 धावांची खेळी केली.

दीप्ती शर्माची मॅजिक 

भारताची अव्वल दर्जाची फिरकीपटू दीप्ती शर्माने या सामन्यात 9 षटकात 39 धावा देत तब्बल 5 बळी टिपले. तिच्या या धारदार गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जकडून ठेवले.त्यामुळे लॉरा वोलवर्ड व्यतिरिक्त इतर कोणतीही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि भारताने हा सामना 52 धावांनी जिंकून इतिहास रचला. तिच्या या कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

दीप्ती शर्मा ठरली मालिकावीर

संपूर्ण विश्वचषकात आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी ने कमाल करणाऱ्या भारताच्या दीप्ती शर्माला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज घोषित करण्यात आले.दिप्ती ने फलंदाजीत 215 धावा काढल्या.तर गोलंदाजीत विश्वचषकात सर्वाधिक 22 विकेट्स मिळवल्या.

भारत पहिल्यांदाच बनला चॅम्पियन 

भारताने आतापर्यंत तीन वेळा फायनल प्रवेश केला होता परंतु त्याला चॅम्पियन बनता आले नाही. 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताला फायनल मध्ये पराभव स्वीकारला होता. तर 2017 मध्ये इंग्लंड कडून भारताने पराभव स्वीकारला होता.परंतु 2025 च्या विश्वचषकात भारताने मागील सर्व कसर भरून काढत पहिल्यांदाच फायनल जिंकत विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. आयसीसीलाही तब्बल 25 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला.

भारतीय संघावर होणार बक्षिसांचा वर्षाव 

आपले पहिले पहिले विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर सर्व क्षेत्रातून बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. कारण आयसीसी ने विश्वचषक विजेत्या संघाला बक्षीस रुपी रक्कम ही  जवळपास 40 कोटीच्या घरात असणार आहे. कोणत्याही विश्वचषकातील ही सर्वाधिक बक्षीस आहे. शिवाय जर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तर Bcci  कडून भारतीय संघाला तब्बल 51 कोटी चे विशेष बक्षीस म्हणून दिले जाईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय संघावर जणू पैशाचा पाऊस पडणार आहे.

Leave a Comment