नमस्कार मित्रांनो, आशिया कप 2025 ची सुरुवात लवकरच होत असून आपल्याला आशिया कप मधील बरेच रेकॉर्ड्स आणि खेळाडूंची माहिती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल असे मला वाटते म्हणून मी आज तुमच्यासाठी आशिया कप मधील टॉप 5 बॉलर्स आणि त्यांची कामगिरी या लेखात आपल्यासमोर मांडणार आहे. चला तर मग लगेच सुरू करूया. ( Top five Bowlers in Asiya cup )
तसे पाहायला गेले तर आशिया कप मध्ये बॅटसमन चाच डंका वाजत आलेला आहे असे प्रथमदर्शनी आपल्याला दिसते. परंतु तसे नसून बॉलरानीही सुरेख अशी कामगिरी केली आहे. अशा पाच बॉलरांची यादी दिली आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने आशिया कपला एका खास उंचीवर नेऊन ठेवले आहे. पण यात श्रीलंकन बॉलर्स चा दबदबा आपणास जास्त दिसतो.
Top Five Bowlers in Asiya Cup
१) लसिथ मलिंगा (श्रीलंका) २००४ – २०१८

आशिया कप मधील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून लसिथ मलिंगा ओळखला जातो. लसिथ मलिंगा आतापर्यंत सहा वेळा आशिया कप खेळला असून त्यात त्याने १५ सामन्यात ३३ बळी घेतले आहेत. शिवाय एका डावात ५ बळी त्याने तब्बल तीन वेळा घेतले आहेत. आपल्या विचित्र अँक्शन व हेअर स्टाईल मुळे हा गोलंदाज नेहमीच चर्चेत असायचा. त्याचा टो-क्रशिंग यॉर्कर फलंदाजांच्या मनात नेहमी धडकी भरवत असे. त्याच्या या भन्नाट कामगिरीच्या जोरावर च श्रीलंकेने २००४ व २०१४ चा आशिया कप आपल्या नावावर केला होता.
लसिथ मलिंगा ची आशिया कप मधील कामगिरी
- सामने – १५
- विकेट – ३३
- ओव्हर – १३२.१
- धावा – ५९६
- इकॉनॉमी – ४.७०
- सरासरी – २०.५५
- बेस्ट बॉलिंग – ५/३४
- ४ बळी – २ वेळा
- ५ बळी – ३ वेळा ( सर्वाधिक )
२) मुथय्या मुरलीधरन ( श्रीलंका) १९९५ – २०१०

श्रीलंकन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून मुरलीधरन ओळखले जातात. आशिया कप मध्ये मात्र ते सर्वाधिक बळीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. थोडा विचित्र बॉलिंग ॲक्शन व विचित्र अपील करणारे मुरलीधरन यांच्यावर ऑस्ट्रेलिया कडून ‘ चोकर्स’ म्हणजेच ‘ फेकरा ‘ अशी वारंवार टिप्पणी केली गेली परंतु त्यांना न जुमानता मुरलीधरन यांनी आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले. त्यांचे चेंडू हातभर वळत असे. म्हणूनच तर भले भले फलंदाज त्यांना घाबरत असे. काचेवर सुद्धा चेंडू वळवण्याची धमक त्यांच्या मनगटात होती. म्हणूनच तर संपूर्ण क्रिकेट विश्वात ८०० बळींचा टप्पा पूर्ण करणारे लेजेंड गोलंदाज अशी त्यांची ओळख आहे.
मुथय्या मुरलीधरन ची आशिया कप मधील कामगिरी
- सामने – २४
- विकेट – ३०
- ओव्हर – २३०.२
- धावा – ८६५
- इकॉनॉमी – ३.७५
- सरासरी – २८.८३
- बेस्ट बॉलिंग – ५/३१
- ४ बळी – १
- ५ बळी –
३) अजंता मेंडिस (श्रीलंका ) २००८-२०१४

अजंता मेंडिस हा श्रीलंकेचा ‘ मिस्ट्री स्पिनर ‘ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला तो जेंव्हा आला होता त्यावेळी त्याचे चेंडू फलंदाजाना कळायंचेच नाही.म्हणूनच की काय त्याने आशिया कप च्या आठच सामन्यात तब्बल २६ बळी घेतले. २००८ च्या फायनल मध्ये तर त्याने भारताला परेशान करून सोडले. त्या सामन्यात त्याने फक्त १३ धावा देवून ६ बळी मिळवले व एकतर्फी सामना जिंकून दिला. तो जर आणखी सामने खेळला असता तर कदाचित सर्वाधिक बळी त्याच्या नावावर झाले असते.
अजंता मेंडिस ची आशिया कप मधील कामगिरी
- सामने – ८
- विकेट – २६
- ओव्हर – ६८
- धावा – २७१
- इकॉनॉमी – ३.९८
- सरासरी – १०.४२
- बेस्ट बॉलिंग – ६/१३
- ४ बळी – २ वेळा
- ५ बळी – १ वेळा
४) सईद अजमल ( पाकिस्तान ) २००८-२०१४

पाकिस्तान हा जलदगती गोलंदाजांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु सईद अजमल हा ऑफ स्पिनर असूनही त्याने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. आशिया कप मध्ये पाकिस्तानकडून त्याने सर्वाधिक २५ बळी मिळवले आहेत. एका षटकात कमीत कमी धावा देण्याचा व फलंदाजांना जखडून ठेवण्याचा त्याचा मानस असे. २०१४ च्या आशिया कप मध्ये ११ बळींसह मलिंगासोबत तो संयुक्त सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.
सईद अजमल ची आशिया कप मधील कामगिरी
- सामने – १२
- विकेट – २५
- ओव्हर – ११५
- धावा – ४८५
- इकॉनॉमी – ४.२१
- सरासरी – १९.४०
- बेस्ट बॉलिंग – ३/२३
- ४ बळी – ०
- ५ बळी – ०
५) चामिंडा वास ( श्रीलंका ) १९९५-२००८

श्रीलंकेचा आतापर्यंत चा डाव्या हाताचा सर्वोत्तम जलदगती गोलंदाज म्हणून चामिंडा वास ओळखला जातो. दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्याची कला या गोलंदाजाला अवगत होती पावरप्ले मध्ये कमीत कमी धावा देवून जास्तीत जास्त बळी मिळवण्याकडे त्याचा कल होता. म्हणूनच तर त्याच्याविरुद्ध भले भले महारथी सावध खेळत.
चामिंडा वास ची आशिया कप मधील कामगिरी
- सामने – १९
- विकेट – २३
- ओव्हर – १५२.३
- धावा – ६३९
- इकॉनॉमी – ४.१९
- सरासरी – २७.७८
- बेस्ट बॉलिंग – ३/३०
- ४ बळी – ०
- ५ बळी – ०
एकंदरीत आशिया कप मध्ये श्रीलंकन गोलंदाजांचा दबदबा आहे असे आपल्याला पाहायला मिळते. भारताचा विचार केला तर रवींद्र जडेजा याने भारताकडून सर्वाधिक २२ बळी घेतले आहेत. येणारा काळ हा भारतासाठी चांगला जावो व आपलेही गोलंदाज या यादीत लवकरच यावीत अशीच अपेक्षा करूया.
