Top Five Batsman in Asiya Cup : आज आपण पाहणार आहोत आशिया कप मधील एकदिवसीय व टी- २० फॉरमॅट मधील टॉप ५ बॅटसमन ची कामगिरी आणि त्यांच्या काही अप्रतिम खेळी. चला तर मग वेळ न घालवता लगेच चालू करूया.
Top Five Batsman in Asiya Cup
एकदिवसीय आशिया कप
१९८४ पासून सुरू झालेल्या आशिया कपचे स्वरूप हे २०१८ पर्यंत एकदिवसीय च होते. त्यात खालील पाच बॅटसमन नी मैदान गाजवले.
१) सनथ जयसुर्या (श्रीलंका)

सनथ जयसूर्या हा श्रीलंकेचा डावखुरा शैलीदार फलंदाज होता. वनडे असो किंवा कसोटी ताबडतोड फलंदाजी करण्यात हा पटाईत असायचा. हा जोपर्यंत क्रीज वर असायचा समोरील टीमची फिल्डींग सारखी बदलवून कॅप्टन मात्र हैराण होत असे. आशिया कप मध्ये तर याने कमालच केली आहे. त्याच्या दोन अप्रतिम खेळींचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. त्या पुढील प्रमाणे –
१) १२५ धावा विरुद्ध भारत, कराची २००८.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका ६६ वर ४ अशा स्थितीत होती. तिथून जयसुर्या ने शांत व संयमी खेळ करून फक्त ११४ चेंडूत १२५ धावा कुटल्या. त्यात ९ चौकार व ५ खणखणीत षटकार होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २७३ धावांचा डोंगर उभारला. डोंगरच होता तो ! , कारण पुढे अजंठा मेंडिस च्या १३ धावा देवून ६ बळी या मॅजिक स्पेलने भारताला १७३ धावांवरच रोखले. व श्रीलंकेने तब्बल १०० धावांनी हा सामना जिंकला.
२) १३० धावा , विरुद्ध बांगलादेश, कराची, २००८.
आशिया कपमधील जयसूर्या ची ही सर्वोत्तम खेळू होती. त्याने फक्त ८८ चेंडूत १३० धावा कुटल्या.त्यात १६ चौकार व ६ उत्तुंग षटकार होते. लवकर धावा काढण्याच्या नादात तो २८ व्या षटकात बाद झाला. नाहीतर कदाचित वनडे तील पाहिले द्विशतक त्याच्या नावावर झाले असते. पुढे बांगलादेश १७४ धावांवर बाद झाला व श्रीलंकेने हा सामना १५८ धावांनी जिंकला.
कामगिरीचा आढावा
- मॅच – २५
- इनिंग – २४
- धावा – १२२०
- सर्वोच्च धावा – १३०
- सरासरी – ५३.०४
- स्ट्राईक रेट – १०२.५२
- शतक – ६
- अर्धशतक – ३
- चौकार – १३९
- षटकार – २३
२) कुमार संगकारा ( श्रीलंका)

श्रीलंकेचा आतापर्यंत चा सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कुमार संगकारा चा उल्लेख करावासा वाटतो. शांत, संयमी व शैलीदार फलंदाज म्हणून त्याची ओळख होती. सामना शेवटपर्यंत नेवून जिंकून देण्याची ताकद या फलंदाजामध्ये होती.
कामगिरीचा आढावा
- मॅच – २६
- इनिंग – २४
- धावा – १०७५
- सर्वोच्च धावा – १२१
- सरासरी – ४८.८६
- स्ट्राईक रेट – ८४.५१
- शतक – ४
- अर्धशतक – ८
- चौकार – १०७
- षटकार – ७
३) सचिन तेंडुलकर ( भारत )

क्रिकेट विश्वातील सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही आशिया कप मध्ये वेगळी अशी छाप सोडली आहे. आशिया कप ची वेगळीच ओळख आपल्या सर्वांच्या लक्षात राहील ती म्हणजे सचिन तेंडुलकर यांनी त्यात आपले ‘ शतकांचे शतक ‘ म्हणजेच १०० वे आंतरराष्ट्रीय शतक लगावले. बांगलादेश विरुद्ध खेळताना त्यांनी २०१२ मध्ये १४७ चेंडूत ११४ धावांची संयमी खेळी करून भारताला २८९ धावांपर्यंत पोहचवले. परंतु या सामन्यात भारताचा पराभव झाला. पराभव झाला असला तरी हा माईलस्टोन आपल्या कायम स्मरणात राहील.
कामगिरीचा आढावा
- मॅच – २३
- इनिंग – २१
- धावा – ९७१
- सर्वोच्च धावा – ११४
- सरासरी. – ५१.१०
- स्ट्राईक रेट – ८५.४७
- शतक – २
- अर्धशतक – ७
- चौकार – १०८
- षटकार – ८
४) शोएब मलिक (पाकिस्तान )

शोएब मलिक हा पाकिस्तानच्या मधल्या फळीतील भरवश्याचा फलंदाज होता. शिवाय तो गोलंदाजी ही उत्तम करायचा. याची बॅट आशिया कप मध्ये चांगलीच तळपायाची. भारताविरुद्ध तर तो नेहमी चांगलीच बॅटिंग करायचा. २००८ च्या आशिया कप मध्ये त्याने खेळलेली नाबाद १२५ धावांची खेळी ही अविस्मरणीय होती. पण या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता.
कामगिरीचा आढावा
- मॅच – १७
- इनिंग. – १५
- धावा – ७८६
- सर्वोच्च धावा – १४३
- सरासरी – ६५.५०
- स्ट्राईक रेट – ९०.६५
- शतक – ३
- अर्धशतक – ३
- चौकार – ७६
- षटकार – ८
५) विराट कोहली ( भारत)

सध्याच्या घडीतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराट कोहली चा उल्लेख केला जातो. आशिया कप मध्ये विराट कोहली ची बॅट नेहमी तळपलेली असते. २०१२ च्या आशिया कप मध्ये मिरपूर येथे पाकिस्तान विरुद्ध त्याने १८३ धावा १४८ चेंडूत बनवल्या होत्या. ही त्याची सर्वोत्तम खेळी होती .शिवाय आशिया कप मधील ही आतापर्यंत ची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. ३३० धावांचा पाठलाग करताना त्याने ही कामगिरी केली होती. म्हणून त्याला चेस मास्टर म्हणतात.
कामगिरीचा आढावा
- मॅच – १६
- इनिंग – १६
- धावा – ७६६
- सर्वोच्च धावा – १८३
- सरासरी – ६३.८३
- स्ट्राईक रेट – ९७.१४
- शतक – ३
- अर्धशतक – २
- चौकार – ८०
- षटकार – १२
टी -२० आशिया कप
२०१६ मध्ये ACC ने आशिया कप च्या फॉरमॅट मध्ये बदल करून तो टी २० स्वरूपाचा करण्यात आला. आता आपण टी २० स्वरूपातील टॉपच्या पाच फलंदाजांची कामगिरी पाहूया
१) विराट कोहली (भारत)

सध्याच्या टी २० फॉरमॅट मध्ये ही कोहलीची किंग आहे असे आपणास दिसते सचिन तेंडुलकर नंतर एकमेव व्यक्ती जी आऊट होण्याची वाट विरूद्ध टीम पाहत असते. आशिया कप मध्ये १२२ या सर्वोच्च धावसंख्येसह सर्वाधिक धावा ही कोहलीच्या नावावर आहेत.
कामगिरीचा आढावा
- मॅच – १०
- इनिंग – ९
- धावा – ४२९
- सर्वोच्च धावा – १२२*
- सरासरी – ८५.८०
- शतक – १
- अर्धशतक – ३
- साल – २०१६- २०२२
२) मोहम्मद रिजवान ( पाकिस्तान )

मोहम्मद रिजवान रिजवान हा पाकिस्तान चा गुणवान खेळाडू आहे. कामरान अकमल नंतर संघात बरेचसे विकेट कीपर बॅटसमन आले पण रिजवान सारखा कोणी नव्हता. कारण रिजवान हा निडर व आक्रमक फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने आशिया कप २०२२ चा टी २० फॉरमॅट खेळला आहे. व त्यात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे
कामगिरीचा आढावा
- मॅच – ६
- इनिंग. – ६
- धावा – २८१
- सर्वोच्च धावा – ७८
- सरासरी – ५६.२०
- शतक – ०
- अर्धशतक – ३
३) रोहित शर्मा( भारत )

रोहित शर्मा म्हणजेच ‘ रो – हीट मॅन शर्मा ‘ याने टी २० फॉरमॅट चे आतापर्यंत दोन सीजन खेळले असून सर्वाधिक धावांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी २० फॉरमॅट मधील दशकातील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक असलेला रोहित शर्मा येणाऱ्या काळात आशिया कप गाजवेल यात शंका नाही.
कामगिरीचा आढावा
- मॅच. – ९
- इनिंग – ९
- धावा – २७१
- सर्वोच्च धावा – ८३
- सरासरी – ३०.११
- शतक – ०
- अर्धशतक – २
४) बाबर हयात( हाँगकाँग )

बाबर हयात हा हाँगकाँग चा प्रतिभावान खेळाडू आहे. या ३१ वर्षीय खेळाडूचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. परंतु तो हाँगकाँग कडून खेळतो. २०१६ च्या आशिया कपच्या टी २० फॉरमॅट मध्ये ओमान विरुद्ध खेळताना ६० चेंडूत १२२ धावा केल्या होत्या. ह्या धावा विराट कोहली च्या नाबाद १२२ धावांचा साथीने संयुक्त सर्वोच्च धावा म्हणून गणल्या जातात.
कामगिरीचा आढावा
- मॅच – ५
- इनिंग – ५
- धावा – २३५
- सर्वोच्च धावा – १२२
- सरासरी – ४७
- शतक – १
- अर्धशतक – ०
५) इब्राहिम जद्रान ( अफगाणिस्तान )

आशिया कप मध्ये अफगाणिस्तान तर्फे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू इब्राहिम जद्रान आहे. विशेष म्हणजे त्याचे वय फक्त २१ वर्षे असून भारताविरुद्ध त्याने ६४ धावांची बहारदार खेळी केली होती. येणारा काळ हा अफगाणिस्तान व इब्राहिम जद्रान साठी महत्त्वाचा असणार हे नक्की.
कामगिरीचा आढावा
- मॅच – ५
- इनिंग -५
- धावा – १९६
- सर्वोच्च धावा – ६४
- सरासरी – ६५.३३
- शतक – ०
- अर्धशतक – १
अशा तऱ्हेने आपण आशिया कप मधील टॉप पाच बॅटसमन ची कामगिरी पहिली. कशी वाटली ते नक्की कॉमेंट करा.
