The Divices used by the Umpires in the cricket.

पूर्वीचे क्रिकेट आणि आजचे क्रिकेट यामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये खेळाडू सोबतच पंचांसाठी सुद्धा बरेचसे Divices आलेली आहेत.पंच हे खेळातील जणू देवच असतात. त्यांच्या एका निर्णयावर सुध्दा  टीमची हार – जित अवलंबून असते.  त्यामुळे आताच्या टेक्नॉलॉजीचा जमान्यात पंचांना निर्णय घेण्यास सुलभता यावी यासाठी बरीचशी उपकरणे बाजारात  उपलब्ध झालेली आहेत. याचा वापर करून पंच निर्णय देताना अचूकता राखण्याचा प्रयत्न करतात. चला तर आजच्या लेखात पाहूया अशी काही उपकरणे जी पंच मैदानात असताना वापरताना दिसतात.

The Divices used by the Umpires in the cricket. 

1] The Counter – काउंटर मशीन.

The Counter machine

‘ काउंटर मशीन ‘ हे छोटेसे उपकरण पंचांसाठी खूप उपयुक्त आहे. याचा वापर क्रिकेटमध्ये पंचांकडून किती ओव्हर झाल्या? किती  विकेट गेल्या आणि किती बॉल झाले यांचे मोजमाप करण्यासाठी केला जातो. पूर्वी क्रिकेटमध्ये अशी  उपकरणे नव्हती. त्यावेळी सगळे काही हातानेच मोजले जायचे आणि लक्षतही ठेवले जायचे. पण आताच्या डिजिटल युगात खूप सारी उपकरणे बाजारात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे डिजिटल उपकरणांद्वारे बॉल, विकेट आणि ओव्हर किती झाले यांचे मोजमाप या उपकरणाद्वारे सहज केले जाते.

द काउंटर मशीन हे उपकरण कसे काम करते ?

ज्यावेळी एखादा बॉलर ओव्हर टाकत असतो त्यावेळी त्याने किती बॉल टाकले ? किती विकेट घेतली आहे ? तसेच एकूण किती ओव्हर झाल्या याचे मोजमाप पंच करत असतात. एखादा बॉल टाकल जातो किंवा एखादी विकेट जाते किंवा एखादी ओव्हर पूर्ण होते त्यावेळी पंच उपकरणांमध्ये असलेले बटन दाबून त्याची माहिती या उपकरणांमध्ये साठवत असतात.

2] Bat Gauge – बॅट गेज

Bat Gauge

2025 च्या आयपीएल मध्ये या उपकरणाचा वापर करताना बंद झाला पण बऱ्याच वेळा पाहिलेले आहे जर का एखाद्या बॅट्समन ची बॅट ही नियमानुसार अधिक जाड किंवा रुंद असेल तर ती बॅट ग्राह्य धरली जात नाही आणि त्या बॅट्समन ला त्या बॅट ने खेळू दिले जात नाही. बॅट गेज या उपकरणाद्वारे बॅटची जाडी आणि रुंदी तपासली जाते. जर ती योग्य असेल तर त्या बॅटने त्या बॅट्समनला खेळू दिले जाते.

बॅट विषयीचे नियम –

  • बॅट ची face width ही 4.25 इंच असावी.
  • बॅटची blade width ही 2.64 इंच असावी
  • बॅटची Edge width ही 1.56 इंच असावी.

याचे मोजमाप करण्यासाठी एका पंचाची नेमणूक केली जाते. हे पंच टीमच्या डग आऊट  मध्ये जाऊन किंवा प्रत्यक्षात मैदानात जाऊन बॅटचे मोजमाप करतात जर का बॅट खेळण्यास योग्य असेल तर त्या खेळाडूला त्या बॅटने खेळू दिले जाते.अन्यथा  दुसऱ्या बॅटचा वापर करण्यास सांगितले जाते.

3] Ball Gauge – बॉल गेज

Ball Gauge

या उपकरणाद्वारे पंच हे बॉलच्या शेप नुसार तो खेळण्यास योग्य आहे की नाही याची पाहणी करतात.  या उपकरणात दोन रिंग दिलेल्या असतात एक रिंग ही दुसरी पेक्षा थोडी मोठी असते. ज्यावेळी पंचांना बॉल चा आकार थोडा बदललेला आहे असे वाटते. त्यावेळी बॉल गेज या उपकरणाचा  वापर केला जातो. यात बॉल हा प्रथम लहान रिंग मधून तर नंतर तो मोठ्या रिंग मध्ये  चेक केला जातो. या चाचणीत जर का तो  बॉल फेल होत असेल तर पंच नवीन बॉल चा वापर करण्याची परवानगी देऊ शकतात.

4] Stump Gauge – स्टंप गेज

Stump Gauge

क्रिकेटमध्ये यष्टी म्हणजेच स्टंप ला खूप महत्त्व आहे. एखादा खेळाडू बाद होण्याचे ते प्रमाण मानले जाते. जर का स्टंप उध्वस्त झाले तर तो खेळाडू त्रिफळा बाद म्हणजेच क्लीन बोल्ड किंवा यष्टीचीत म्हणजेच स्टम्पिंग,धाव बाद म्हणजेच रन आउट समजला जातो.  स्टंप ची रुंदी क्रिकेट नियमानुसार नऊ इंच असावी लागते. त्यासाठी stump Gauge या उपकरणाचा वापर केला जातो. मैदानात तीन समान होल पाडून स्टंप साठी योग्य ते माप घेतले जाते.

5] Walki – Talki – वोकी टोकी

वॉकी - टोकी

क्रिकेटमध्ये एखाद्यावेळी मैदानात पंचाकडून दिले गेलेल्या निर्णयावर पुढील टीम सहमत नसेल तर तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जाते. वोकि – टॉकी या उपकरणाद्वारे तिसरे पंच त्या निर्णयाची शहानिशा करून योग्य निर्णय कळवतात. जर का मैदानी पंचाचा निर्णय योग्य असेल तर तो वोकी – टॉकी द्वारे निर्णय कायम ठेवण्यास सांगितले जाते जर का निर्णय चुकला असेल तर तो निर्णय बदलण्यास सांगितले जाते.

6] Snick – O – meter – स्निक – ओ – मीटर

Snick o meter

स्निक ओ मीटर हे क्रिकेटमध्ये वापरले जाणारे आणखी एक प्रभावी उपकरण आहे. याचा उपयोग बॅटला बॉलचा संपर्क झाला की नाही हे तपासण्यासाठी केला जातो. स्निक ओ मीटर मधील आवाजाच्या तीव्रतेवरून बॅट्समन आऊट किंवा नॉट आऊट आहे पंच ठरवतात.

स्निक ओ मीटर म्हणजे काय ?

स्निक म्हणजे चेंडू बॅटला घासून जाणे आणि त्याची आवाजाची तीव्रता मोजण्याचे साधन म्हणजे स्निक ओ मीटर होय. हे उपकरण बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यावर जो आवाज होतो ते मोजण्यासाठी पंचाकडून वापरले जाते. हा आवाज मोजण्यासाठी ओसीलोस्कोप नावाच्या उपकरणाचा वापर केला जातो. स्निक ओ मीटर मध्ये बॅट जवळ असलेले सेंसर बॉल बॅटचा आणि बॉलच्या संपर्कातील आवाज मोजतात. यामुळे पंचांना योग्य तो निर्णय घेण्यास मदत होते.

7] Light – O – Meter – लाईट ओ मीटर

Light o meter

RAYGAD KA TIGER : USMAN PATEL BIOGRAPHY

क्रिकेट सामन्यात मैदानावरील प्रकाशाचे म्हणजेच उजेडाचे प्रमाण कितपत आहे किंवा अंधाराची पातळी किती आहे. हे मोजण्याचे प्रमाण म्हणजेच लाईट ओ मीटर होय.  जर एखाद्या सामन्यात अंधुक प्रकाश असेल आणि जर खेळ होऊ शकणार नसेल तर पंच तो सामना मध्येच थांबवू शकतात. लाईट मीटरच्या सहाय्याने प्रकाशाचे मोजमाप करून त्याची तीव्रता मोजली जाते व पंच पुढील योग्य तो निर्णय घेतात.

8] The Protective shield – प्रोटेक्टिव शिल्ड

Protective shield

आगामी काळात क्रिकेटमध्ये हे उपकरण पंचांसाठी वरदान ठरले आहे. कारण खेळाडूंना आपण बॉल पासून बचावासाठी पॅड, ग्लोज ,गार्ड , हेल्मेट यासारखे उपकरण वापरताना पाहिलेले आहे. पण पंचांसाठी एखादे संरक्षणात्मक उपकरण वापरताना आपण कधी पाहिले ना पाहिलेले नाही पण हल्ली क्रिकेटमध्ये पंचांना प्रोटेक्टिव्ह शिल्ड वापरताना आपण पाहिले आहे.

मग मित्रानो कशी वाटली ही माहिती ते आम्हाला. नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला यातील कोणते उपकरण माहीत होते तेही सांगा. आणि शेअर करायला विसरू नका.

 

 

Leave a Comment