Vijay Pavale : The Sangli Express Biography

क्या भागता है, क्या गती है और क्या गेंदबाजी करता है. गजब है भाई !”  हे आकाश चोपडा यांच्या कॉमेंट्रीतून निघालेले गौरवोदगार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एका धगधगत्या वादळाविषयीचे. आणि त्या वादळाचे नाव आहे विजय जयसिंगराव पावले. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे ब्रँड अँबेसीडर असलेला विजय पावले. आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने भल्या भल्यांच्या दांड्या गुल करणारा विजय  सध्याच्या घडीतील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. MPL म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीग ही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा तसेच ISPL म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही  टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा  विजय पावलेने खऱ्या अर्थाने गाजवली. आणि पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा साऱ्या भारतभर सुरू झाली. सांगली एक्सप्रेस, रफ्तार का राजा, टेनिस क्रिकेटचा डेल स्टेन अशा टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या विजय पावले चा म्हणजेच आपल्या विजू भाऊंचा संपूर्ण जीवन प्रवास आपण आता जाणून घेऊया.

Vijay Pavale : The Sangli Express Biography

विजय पावले यांचा परिचय 

Vijay Pavale : The sangali Express

  • पूर्ण नाव – विजय जयसिंगराव पावले 
  • जन्मतारीख – 16 ऑगस्ट 1989. ( 36 वर्षे ) 
  • गाव – मांगले , ता – हातकणंगले , जि – सांगली. 
  • प्राथमिक शिक्षण – जिल्हा परिषद शाळा ,मांगले.
  • माध्यमिक शिक्षण – श्री मंगलनाथ विद्यामंदिर, मांगले.
  • उच्च माध्यमिक शिक्षण – विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा. 
  •  पुणे युनिव्हर्सिटी मधून डिफेन्स                       आणि  स्ट्रेटीजिक स्टडीत रिसर्च केला          आहे आणि नक्षलवाद व समाज यावर काम केले आहे.
  • पेशा – क्रिकेटर 
  • नोकरी – 1. बॉश कंपनीत क्वालिटी इंजिनियर                 2. ओप्पो कंपनीत ट्रेनर.
  • टोपण नाव – रफतार का राजा, सांगली एक्सप्रेस.
  • आयडियल टीम – डिंग डाँग पुणे, तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे.
  • सर्वोत्तम स्पर्धा – सुप्रीमो ट्रॉफी , रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, ISPL, MPL. 

Krishna Satpute : The God of Tennis Cricket

विजय पावले यांचा जन्म 16 ऑगस्ट 1989 साली सांगली जिल्ह्यातील मांगले या छोट्याशा खेडेगावात झाला. यांचे पूर्ण नाव विजय जयसिंगराव पावले आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा – मोरणा नद्यांच्या संगमावर असलेले मांगले हे गाव पुर्वीपासून सधन म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव पावले तसेच आईचे नाव उषाताई पावले होते. तसेच त्याला एक भाऊ ही राहुल पावले. तो ही त्याच्या गावाच्या टीम मधून क्रिकेट खेळतो. मांगले गाव जरी पूर्वी पासून सधन असले तरी पावले कुटुंबीयांची घरची परिस्थिती हालाखीची होती. छोट्या शेतीत हे पावले कुटुंब कसेबसे गुजराना करत असे. त्यांच्याकडे दुभती जनावरे होती. दूध विक्री करून ते उदरनिर्वाह करत असे. भाऊंना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. पहाटे उजाडल्या नंतर सायंकाळी अंधार पडेपर्यंत फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच असा त्यांचा दिनक्रम असे. त्यामुळे त्यांना खूप बोलणीही खावी लागत असे. परंतु लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्यातच काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्येच पुढे जाण्याचे ठरवले. शालेय जीवनातच त्यांनी आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवण्यास सुरुवात केली होती. गोलंदाजी आणि फलंदाजी ते चांगल्या पद्धतीने करत होते. परंतु ग्रामीण भागातून असल्याकारणाने त्याकाळी त्यांना फारशी संधी मिळाली नाही.  घरची परिस्थिती हालाखीची असल्याकारणाने मिळेल ते काम करून त्यांनी घराला हातभार लावला. पण त्यातही क्रिकेट खेळणे हे सुरू होते. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले. विजय पावले यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून डिफेन्स आणि स्ट्रेटीजिक स्टडीत रिसर्च केला आहे आणि नक्षलवाद व समाज यावर काम केले आहे.

https://www.instagram.com/reel/DJ54046zC9U/?igsh=N2x4ZXR4OGZ0cjE1

लहानपणापासूनच क्रिकेटसाठी काय पण 

विजय पावले यांना लहानपणापासून शिक्षणाबरोबरच क्रिकेट या खेळाची प्रचंड आवडत होती. ही आवड जपण्यासाठी बऱ्याच वेळा त्याला मोल मजुरी सुद्धा करावी लागली. तो शाळा सुटल्यानंतर गावातीलच एका किराणा मनाच्या दुकानात काम करत असेल तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी गवंडीच्या हाताखाली काम करत असे तसेच शेतात मोल मजुरी म्हणजेच मिळेल ते काम करून शिक्षणाबरोबर खेळायची आवड तो जोपासत होता. तसेच आपला स्वतःचा खर्चही भागवत असे.

स्पर्धात्मक क्रिकेट आणि कोकणची साथ 

विजय पावले यांच्या व्यावसायिक क्रिकेटची खऱ्या अर्थाने सुरुवात कोकणच्या मातीतून झाली आहे. लहान वयातच विजय पावले यांचा बहारदार खेळ सर्वांना प्रभावित करत होता. त्यात त्यांना पहिली संधी मिळाली ती कोकणच्या लांजा तालुक्यातील शिपोशी गावातील महाराष्ट्राच्या अंडर 19 समर कॅम्प मार्फत. या संधीचा फायदा उचलत विजय पावलेनी  आपला बहारदार खेळ दाखवून सर्वांना मंत्र मध्ये केले.  पुढे त्यांचा खेळ पाहून उमेश पटवाल सरांनी त्यांना पुण्यात PDPL ( पुणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ) खेळण्यास आमंत्रित केले. परंतु ऑक्शन मध्ये  विजय ला कोणी घेतले नाही. ते थोडेसे निराश झाले. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना एका जखमी खेळाडूच्या बदली संघात घेण्यात येणार होते.  विजय पावले नी कोणताही विचार न करता सरळ पुण्याकडे धाव घेतली. मांगले ते पुणे असा संपूर्ण रात्रीचा प्रवास त्यांनी ट्रक द्वारे केला. शेवटी भुकेने व्याकूळ होऊन ते स्टेडियम जवळच झोपी गेले. ‘खेळाविषयी किती प्रेम  आणि आपुलकी.’ या स्पर्धेत त्यांनी एकूण 16 बळी घेऊन आपली निवड सार्थ असल्याचे सिद्ध करून दाखवले.

विजय पावले यांच्या व्यावसायिक टेनिस क्रिकेटची सुरुवात चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावातील तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे या संघापासून झाली.  त्याकाळी तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे हा खूप मजबूत संघ होता आणि त्यात संजय वाखरे सचिन वाखरे यांच्या साह्याने विजय ला खेळायची संधी मिळाली. त्याकाळी पुण्याची डिंग डॉंग ही टेनिस विश्वातील सर्वोत्तम टीम होती आणि याच टीम बरोबर मंडणगड मध्ये तिरुपती सावर्डे यांची मॅच झाली. ही मॅच डिंगडॉंग टीमने जरी जिंकली असली तरी विजय पावलेने मात्र या मॅच मध्ये सर्वांची मने जिंकली. कारण या मॅच मध्ये विजयने दोन षटकात फक्त 3 धावा देऊन तब्बल 6 बळी मिळवले होते. त्यावेळी या कामगिरीची दखल साऱ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाने घेतली. नंतर विजय काही काळ दौंड संघाकडून खेळले शेवटी त्यांच्या खेळाच्या जोरावर त्यांना डिंगडॉंग च्या संघाने आपल्या संघात बोलावून घेतले. आणि आज ते त्या संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. परंतु आजही ते तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे या संघाला विसरले नाहीत.  कोणतीही मोठी स्पर्धा असो जर तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे हा संघ त्यात असला तर विजय पावले हे त्या संघाकडून हमखास खेळताना आपल्याला दिसतात. माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याने आपले पाय जमिनीवरच ठेवावे याचे हे उत्तम उदाहरण आहे.

RAYGAD KA TIGER : USMAN PATEL BIOGRAPHY

कोकण ते शारजा असा प्रवास :

कोकणातून सुरू झालेला प्रवास विजय पावलेंच्या प्रभावी कामगिरीमुळे दुबई, शारजा, कतार पर्यंत जाऊन पोहोचला होता. एकेकाळी स्थानिक लेवल वर खेळणारे  विजय आंतरराष्ट्रीय खेळाडू झाले.  पुढे शारजा, दुबई येथे होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. त्यांच्या अफलातून कामगिरीमुळे भारताने हा सामना सुद्धा जिंकला. पुढे त्यांना बऱ्याच देशात जसे की कतार, कुवेत, दुबई येथे खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले.

आयपीएल कॅम्प आणि नेट बॉलर :

विजय पावलेनी बॉश कंपनीत क्वालिटी इंजिनियर तर ओपो कंपनीत ट्रेनर म्हणून काही काळ नोकरी केली. परंतु त्यांचे क्रिकेट खेळणे हे चालूच होते. सकाळी नोकरी आणि संध्याकाळी सराव चालूच होता. त्यांच्या करिअरमध्ये सर्वात मोठा ट्रेनिंग पॉईंट म्हणजे आयपीएलचा कॅम्प. त्यांच्यातील गुणवत्ता पाहून रोहन पाटे सरांनी त्यांना मुंबई इंडियन्सच्या कॅम्प मध्ये एज ए नेट बोलर म्हणून पाठवले. तिथे त्यांनी रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांसारख्या दिग्गजांना गोलंदाजी केली शिवाय शोन पोलाक आणि मुनाफ पटेल यांच्याकडून गोलंदाजीचे धडे ही गिरवले. याचा फायदा त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये झाला. कारण आतापर्यंत फक्त जोर जोरात गोलंदाजी करणारा विजय व्हेरिएशन करून अधिक घातक गोलंदाज बनला होता. बॅक ऑफ द हँड स्लॉवर , यॉर्कर आणि डेडली स्पीड यांचा सुरेख संगम साधत त्यांनी भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या.

MPL मधील कामगिरी : 

Vijay Pavale performance in MPL 2024

आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्रातील खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ मिळावे यासाठी MPL म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीगची स्थापना करण्यात आली. या लीग मध्ये 20000 च्या बेस प्राईज वर रत्नागिरी जेट्स संघाने विजय पावले ना आपल्या संघात घेतले. या संधीचा फायदा उचलत विजय पावलेंनी स्पर्धेत 9.41 च्या इकॉनोमीने 7 बळी मिळवले. पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही परंतु अंतिम सामन्यातील विजय पावलेनी केदार जाधवची घेतलेली विकेट मात्र कायम लक्षात राहिली. पॉइंट टेबल मध्ये अव्वल असल्याकारणाने रत्नागिरी जेट्स हा संघ विजेता घोषित करण्यात आला. लेदर क्रिकेटचा फारसा अनुभव नसतानाही उत्तम कामगिरीने विजयने मात्र सर्वांचे मन जिंकले. याचीच पोचपावती की काय त्यांना महाराष्ट्राच्या रणजी संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी 2023 मध्ये झारखंड विरुद्ध पदार्पण केले.

ISPL मधील कामगिरी :

Vijay Pavale got man of the match in ISPL 2024.

आपल्या देशात टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या खूप जास्त आहे. त्यांच्यात टॅलेंटही खूप आहे. परंतु त्यांना एखादे मोठे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. हे BCCI ने  हेरून अशा गुणवान खेळाडूंसाठी ISPL म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ची 2024 मध्ये स्थापना केली. सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, रितिक रोशन,सैफ अली खान, राम चरण यांसारख्या मंडळींनी संघ खरेदी केले. त्यात विजय पावले यांना अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या माझी मुंबई संघाने  आपल्या ताफयात घेतले. ही निवड सार्थ ठरवताना विजयने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर माझी मुंबई संघाला फायनल पर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला.ISPL च्या पहिल्या सीझन मध्ये त्यांनी बेस्ट फिल्डर  (एकूण 15 झेल) हा पुरस्कार पटकावला.  माझी मुंबई हा संघ हा फायनल सामना जिंकू शकला नसला तरी विजय भाऊंची कामगिरी मात्र उल्लेखनीय राहिली.

ISPL सीजन 2 च्या  मुंबई ने विजय पावले साठी RTM  चा वापर केला व त्यांना 13.75 लाख रक्कम मोजून आपल्या टीम मध्ये कायम ठेवले. शिवाय आपल्या टीमचे कर्णधार पदही त्यांना दिले. ही जणू त्यांच्या मागील सीझन मधील कामगिरीची पोचपावती असावी.आपली निवड सार्थ ठरवताना त्यांनी दिमाखदार नेतृत्व शैलीचे प्रदर्शन केले आणि मोक्याच्या क्षणी फायनल मध्ये 9 चेंडूत 22 धावा करून सामना एक हाती फिरवला व आपल्या टीमला चॅम्पियन बनवले. आतापर्यंत विजय पावलेंनी ISPL चे एकूण 19 सामने खेळलेले आहेत त्यात फलंदाजी करताना 109 धावा बनवले असून त्यात त्यांचा स्ट्राइक रेट 155 चा राहिला आहे.  शिवाय गोलंदाजी करताना त्यांनी 11.59 च्या इकॉनोमीने तब्बल  20 बळी ही टिपले आहेत.

वडिलांचे स्वप्न विजयने पूर्ण केले 

लहानपणापासूनच विजयला क्रिकेटची प्रचंड आवड होती. शाळा सूटल्यानंतर विजय हमखास क्रिकेट खेळताना मंगलनाथ विद्यालयाच्या मैदानावर सर्वाना दिसायचा. परंतु काही लोकांना ते बघवत नसे. ते विजयच्या वडिलांना त्याच्याबद्दल नेहमी टोमणे मारत. विजयच्या वडिलांना कधीकधी वाईटही वाटत असे. परंतु आपला विजय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावणार असा ठाम विश्वास त्यांना होता. हे विजयने आपल्या खेळाने वेळोवेळी सार्थ करून दाखवले होते. पण विजयने भारतातील टेनिस क्रिकेट मधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच ISPL जिंकून त्यांच्या वडिलांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केले असे म्हणावे लागेल. तो ज्यावेळी गावात आला त्यावेळी त्याची अख्ख्या गावाने जंगी मिरवणूक काढली. त्याच्यासाठी हे स्वप्नवत होते.परंतु हे सर्व पाहण्यासाठी त्याचे वडील हयात नव्हते. मागच्या जुलै महिन्यात त्यांचे निधन झाले. ते या जगात जरी नसले तरी विजयच्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद हे नेहमीच  राहतील यात शंका नाही.

विजय पावलेचा फिटनेस मंत्र :

https://www.instagram.com/reel/DHwWicqRlid/?igsh=NTNvYndubjZjOTVj

विजय पावले हा सध्याच्या घडीतील टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी आहे.  तसेच फिटनेस बाबतही तो नेहमी जागृत असतो. दस्तरखुद्द सचिन तेंडुलकर यांनी विजय पावले यांच्या फिटनेसचे कौतुक केले आहे तसेच मुनाफ पटेल आणि शॉन पोलॉक या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विजयच्या गोलंदाजी चे कौतुक केले होते.  विजय पावलेनी नवोदित खेळाडूंना फिटनेस चा कानमंत्र दिला आहे.  हा मूलमंत्र जर कोणी दररोज अमलात आणला तर तो खेळाडू  नक्कीच यशस्वी होऊ शकतो असा त्यांचा विश्वास आहे.  त्यांचा फिटनेसचा फंडा पुढील प्रमाणे आहे.

  • खेळाडूंनी योग्य आहार आणि डाएट याची सांगड घालावी .
  • योग्य आणि पुरेसा व्यायाम करावा.
  • सकाळी लवकर उठावे आणि रात्री लवकर झोपावे.
  • सायकलिंग करणे, रनिंग करणे आणि स्प्रिंट मारणे इ.
  • नवोदित गोलंदाजांनी फक्त स्पीडवर लक्ष न देता वेरिएशनवर लक्ष द्यावे. फलंदाजाला ओळखून यॉर्कर , स्लोवर बॉल, बॅक ऑफ  द हॅन्ड ,कटर यांसारखी व्हेरिएशन्स आपल्या गोलंदाजीत आणावीत.
  •   सर्वात महत्त्वाचे गोलंदाजांनी फलंदाजीवरही लक्ष द्यावे.

हे होते सांगली एक्सप्रेस विजय पावले अर्थात आपले विजुभाऊ . घरची परिस्थिती हालाखीची असतानाही मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर सामान्य कुटुंबातील माणूस असामान्य बनू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. आणखी कोणत्या खेळाडूचा जीवनप्रवास आपणास पाहायला आवडेल हे नक्की कळवा आणि आपल्या विजुभाऊ च्या पुढील वाटचालीसाठी त्यांना कमेंट द्वारे भरपूर शुभेच्छा देऊया.

धन्यवाद !.

FAQ –

1) विजय पावले यांची टेनिस क्रिकेट मधील सर्वात आवडती टीम कोणती आहे?

उत्तर – प्रतीक इलेव्हन डिंग डॉंग पुणे आणि तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे.

2) विजय पावलेनी गाजवलेल्या प्रमुख स्पर्धा कोणत्या?

उत्तर –  सुप्रिमो ट्रॉफी, ISPL , T10pl, एम पी एल, नजिमुल्ला ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी.

3) विजय पावलेंची सर्वात आवडती स्पर्धा कोणती?

उत्तर – सुप्रीमो ट्रॉफी ( टेनिस क्रिकेटचे वर्ल्ड कप )

4) २०२५ मध्ये विजय पावले यांना कोणता पुरस्कार मिळाला ?

उत्तर – ऑल राऊंडर ऑफ द इयर ( All Rounder Of the Year.)