क्रिकेटच्या मैदानावर 14 वर्षांच्या पोराचं वादळ! 2025 मध्ये गाजला फक्त वैभव सूर्यवंशी; वाचा त्याने केलेले सर्व रेकॉर्ड्स आणि बरेच काही.
Vaibhav Suryavanshi Records In 2025: वैभव सूर्यवंशीने 2025 हे वर्ष खऱ्या अर्थाने गाजवले. वयाच्या 14 व्या वर्षी पोरगं शाळेत असतं आणि मजा मस्ती करत शाळा शिकत असतं. पण या 14 वर्षाच्या पोराने मात्र क्रिकेटच्या मैदानावर भल्या भल्यांना घाम सोडायला लावले आहे. जाणून घ्या त्याने या वर्षात केलेले सर्व रेकॉर्ड्स.

vaibhav suryavanshi
गूगल सर्च मध्ये राहिला नंबर वन !
वैभव सूर्यवंशी, हे नाव २०२५ मध्ये तुफान चर्चेत राहिलं. वर्तमानपत्र, टीव्ही किंवा सोशल मीडिया, पाहाल तिथे वैभव सूर्यवंशीच झळकत होता. क्रिकेटचं मैदान असो की गुगल सर्च, वैभव पहिल्या क्रमांकावर टिकून राहिला. कोणीतरी १४ वर्षांचा पोरगा आहे, खूप मोठे फटके मारतो. हा पोरगा आहे तरी कोण? हे शोधून काढण्यासाठी लोकांनी गुगलवर भरभरून सर्च केलं. गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत तो भारतात पहिला, तर जगात सहाव्या क्रमांकावर राहिला. वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएल पदार्पण करून वेगवान शतक झळकावून दणक्यात सुरूवात करणाऱ्या वैभवने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १९० धावांची खेळी करून वर्षाचा शेवट केला आहे. दरम्यान वाचा वैभवने २०२५ या वर्षात कोणते कोणते विक्रम केले आहेत. ते आपल्याला पुढे दिले आहेत.
Vaibhav Suryavanshi Records in 2025 :
बिहारकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीला आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात स्थान दिलं. राजस्थानने त्याच्यावर १.१ कोटींची विक्रमी बोली लावली व आपल्या संघात घेतले होते. या संधीचे सोने करत वैभव सूर्यवंशी ने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
1)वयाच्या १३ व्या वर्षी लिलावात बोली लागणारा आणि वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएल स्पर्धेत पदार्पण करणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला होता.
2)आयपीएल पदार्पण मध्ये पहिल्याच चेंडूवर त्याने खणखणीत षटकार खेचला होता. यासह तो आयपीएलच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा सर्वात युवा फलंदाज ठरला होता.
3) त्यानंतर गुजरात टायटन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात वैभवने कहरच केला. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने अवघ्या 35 चेंडूत वेगवान शतक झळकावले होते. यासह या स्पर्धेत वेगवान शतक झळकावणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला होता.याआधी भारताचा माजी फलंदाज यूसूफ पठाणच्या नावे देखील 35 चेंडूत शतक झळकावण्याची नोंद होती. तर सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 30 चेंडूत शतक झळकावले होते.
Ispl season 3 Auction 2025 : मराठमोळा विजय पावले ठरला Ispl मधील सर्वात महागडा खेळाडू.
4) या खेळीदरम्यान वैभवने 11 षटकार खेचले होते.यासह त्याने एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुरली विजयच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
5) वैभवने अंडर 19 आशिया कप स्पर्धेत फलंदाजी करताना एकूण 20 षटकार मारले. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसचा विक्रम मोडून काढला.
6) तो एकाच बहूराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज ठरला. यूएईविरूद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने 95 चेंडूंचा सामना करत त्याने 171 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने 14 खणखणीत षटकार मारले होते.
7) यासह अंडर-19 आशिया कप स्पर्धेत तो 20 षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला.
8) विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये वैभव सूर्यवंशी ने शतक झळकावत लिस्ट ए क्रिकेट स्पर्धेत शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीचा पहिलाच दिवस ठरला रेकॉर्ड ब्रेकिंग! याआधी असं कधीच घडलं नव्हतं
वैभव विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बिहार संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. अरूणाचल संघाविरूद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने 84 चेंडूत 190 धावांची खेळी केली. यासह तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. या खेळीदरम्यान त्याने 15 षटकार मारले.
मूर्ती लहान पण कीर्ती महान
वैभव सूर्यवंशी हा आता फक्त 14 वर्षाचा आहे. या वयातच त्याने अनेक किर्तीमान आपल्या नावावर केले आहेत. कमीतकमी चेंडूत जास्तीत जास्त धावा बनवण्याचे ध्येय मनाशी बाळगून फलंदाजी करणाऱ्या या वैभव सूर्यवंशी चे भविष्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही. पूर्वीच्या काळी वीरेंद्र सेहवाग आणि ॲडम गिलख्रिस्ट, ख्रिस गेल सारखेच फलंदाज आक्रमक खेळी साठी प्रसिद्ध होते. पण आताच्या फास्ट क्रिकेट च्या जमान्यात वैभव ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्याचा विचार करूनच बीसीसीआयने त्याच्यावर under – 19 World Cup च्या आधीच त्याच्यावर कॅप्टन शिप ची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. 2025 मध्ये ज्याप्रकारे त्याने अफलातून खेळ दाखवला त्याच प्रमाणे पुढेही आपल्याला त्याचा हा खेळ दाखवेल अशीच अपेक्षा करूया.