चेपॉकवर चेन्नईच भारी ! चेन्नईचा मुंबईवर धमाकेदार विजय.

आयपीएल 2025 च्या पहिल्या डबल हेडर वीक मधील दुसरा ब्लॉकबस्टर सामना चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. त्यात चेन्नई सुपर किंग धमाकेदार खेळ करत मुंबई इंडियन्स वर चार विकेट ने  विजय मिळवला. या विजयात त्यांच्या यंग ब्रिगेडने मोलाची कामगिरी बजावली.कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचीन रवींद्र यांची अर्धशतके तर नूर अहमद आणि खलील अहमद यांची सुंदर गोलंदाजी केली.

सी एस के ची धमाकेदार सुरुवात

चेन्नई सुपर किंग्ज ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या खालील अहमद ने यशस्वी करून दाखवला. त्याने चाचपडत खेळत असलेल्या रोहित शर्माला शिवम दुबे च्या हाती झेलबाद करून शून्य धावांवर माघारी धाडले. त्यानंतर सी एस के च्या इतर गोलंदाजांनीही कसून गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना जखडून ठेवले. हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादव 29,  तिलक वर्मा 31 आणि शेवटी चेन्नईतून मुंबईत खेळायला गेलेल्या दीपक चहर ने 28 धावांचे योगदान दिले. त्यामुळे त्यामुळे मुंबई इंडियन्स आपल्या निर्धारित 20 षटकात नऊ बाद 155 धावाच करू शकली.156 धावांचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईची ओपनिंग जोडी रचीन रवींद्र आणि राहुल त्रिपाठी मैदानात उतरली. परंतु वैयक्तिक दोन धावांवर राहुल त्रिपाठी बाद झाला. त्याला दीपक शहर ने यष्टीरक्षक रायान रिकल्टन द्वारे झेलबाद केले. पण तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या कर्णधार ऋतुराज गायकवाड ने एक बाजू सांभाळात धमाकेदार खेळी केली. त्याने वैयक्तिक 26 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी केली त्यात सहा चौकार आणि तीन षटकारांचा होता. पण कोणताही डोमेस्टिक लेवल च सामना न खेळलेला शिवाय आयपीएल पदार्पण करणारा नवखा विघ्नेश पुथुर ने प्रथम ऋतुराज गायकवाडला बाद केले त्यानंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यात शिवम दुबेला फसवले त्यानंतर दीपक उडाला झेलबाद करून चेन्नईच्या ताफ्यात खळबळ माजवून दिली. पण हे कामगिरी करत असताना मुंबई इंडियन्सच्या हातातून हा सामना पूर्वीच निसटला होता शेवटी चेन्नई सुपर किंग ने हा सामना चार गडी राखून जिंकला. 

सामन्याचे खास आकर्षण –

1) विघ्नेश पुथुर ची अफलातून कामगिरी – 

 Credited by – image search downloder.

कदाचित आयपीएलमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नसेल. अशी कामगिरी या पट्ट्याने घडवून आणली. त्याचे झाले असे की, आयपीएल खेळणारा एखादा खेळाडू हा कोणी साधासुधा नसतो कारण त्याने घरेलू क्रिकेट आणि डोमेस्टिक लेव्हलवर बरेचसे क्रिकेट खेळलेले असते. पण विघ्नेश पुतुर हा आतापर्यंत कोणताही डोमेस्टिक लेवल चा सामना खेळलेला नाही. मुंबई इंडियन्सने त्याला एका क्लब कडून खेळताना पाहिले होते. त्याची गोलंदाजाची शैली व फिरकी वरची पकड पाहून मुंबई इंडियन्स ने त्याला आपल्या सोबत प्रॅक्टिस शेषन ला बोलावले. त्याचा विमानाचा संपूर्ण खर्च मुंबई इंडियन्सने उचलला. मागच्या वर्षी त्याला आपल्या टीम मध्ये  नेट बॉलर म्हणून घेतले होते. पण यावर्षी त्याला पहिल्याच सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळण्यासाठी संधी दिली गेली आणि त्याने संधीचे सोने केले. सी एस के विरुद्ध खेळताना त्यांनी प्रथम ऋतुराज गायकवाड याला बात केले. त्यानंतर त्याने शिवम दुबे ला माघारी पाठवले. आणि शेवटी त्याने दीपक  हूडाला बाद करून सणसणाटी सुरुवात केली. विघ्नेश हा रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा असून सामना संपल्यानंतर खुद्द एम एस धोनी कडून त्याला शाबासकी मिळाली.

2) एम एस धोनी ची लाईटनिंग स्टॅम्पिंग – 

                  Lightaning stumping by MSD.

वय वर्ष 43, सगळेजण म्हणतात की हा त्याचा शेवटचा हंगाम असेल , पण म्हणतात ना, “चिते की चाल, बाज की नजर और धोनी की स्टंपिंग पर संदेह नही करते ! ” असेच काहीसे या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाले. त्याचे झाले असे की, अकराव्या षटकात नूर अहमद हा अफगाणी फिरकीपटू गोलंदाजी करत होता. त्याच्या शतकातील तिसरा चेंडू त्याने टाकला. त्यावेळी सूर्यकुमार यादव  स्ट्राइकवर होता. पण सूर्यकुमार यादवला हा चेंडू काही कळलाच नाही. त्यानंतर डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत एम एस धोनीने सूर्यकुमार यादवच्या स्टंप उघडल्या होत्या. ही स्टंपिंग 0.12 मिली सेकंद इतक्या कमी वेळेत करण्यात आली होती. यावरून असे दिसून आले की टायगर अभी जिंदा है. सूर्यकुमार यादव च्या विकेट ने मुंबईच्या धाव गतीवर अंकुश ठेवण्यात चेन्नईला यश आले.

मॅच समरी थोडक्यात –

मुंबई इंडियन्स – 155/9 . (20)

फलंदाजी – 

  • सूर्य कुमार यादव – 29 ( 26 ) 4×2 , 6×1
  • तिलक वर्मा – 31 ( 25 ) 4×2 , 6×2 .
  • दीपक चहर – 28 ( 15 ) 4× 2, 6×2    –

गोलंदाजी – 

  • विघ्नेश पुथुर –  4 – 0 – 32 – 3.

चेन्नई सुपर किंग – 158 /6. (19.1).

फलंदाजी

  • ऋतुराज गायकवाड – 53 (26) 4×6, 6×3.
  • रचीन रवींद्र – 65 (45) 4×2, 6×4.

गोलंदाजी –

  • नूर अहमद – 4 – 0 – 18 – 4
  • खलील अहमद – 4 – 0 – 29 – 3

मॅन ऑफ द मॅच – नूर अहमद.

The biggest Rivalry of the IPL 2025: CSK vs MI कोण होणार महामुकाबल्याचा बाहुबली?

 

 

 

 

The biggest Rivalry of the IPL 2025: CSK vs MI कोण होणार महामुकाबल्याचा बाहुबली?

टाटा आयपीएल 2025 ची सुरुवात ही जरी 22 मार्चपासून होत असली तरी खरी सुरुवात ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग च्या सामन्यानेच होईल असे वाटते. कारण या प्रतिस्पर्ध्यांची गोष्ट निराळी आहे ज्या ज्या वेळी एम आय आणि सीएसके यांची मॅच होणार असते त्यावेळी मैदानावर आणि मैदानाबाहेरही माहोल हा निराळाच होऊन जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसे की भारत आणि पाकिस्तान यांची मॅच असते त्यावेळी जो उत्साह असतो तसाच उत्साह एम आय आणि सीएसके यांच्या सामन्यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. आणि असाच काहीसा उत्साह आणि जोश यावेळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक 23 मार्च 2025 म्हणजेच येत्या रविवारी एमआय विरुद्ध सीएसके हा महा मुकाबला चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियम येथे ठीक साडेसात वाजता खेळवला जाणार आहे.

चॅम्पियन विरुद्ध चॅम्पियन

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स यांच्याकडे पाहिले जाते या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. मुंबई इंडियन्स यांनी 2013 2015 2017 2019 आणि 2020 मध्ये विजेते पद मिळवले होते. तर चेन्नई सुपर किंग्स यांनी 2010 2011 2018 2021 आणि 2023 मध्ये असे एकूण पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे.

एम आय आणि सीएसके यांच्यातील सामन्याला El Clasico असे का म्हणतात ?

            EL Clasico. Credited by – Google.com

 

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग हे दोन्ही दिग्गज संघ एकमेकांसमोर खेळतात त्यावेळी या सामन्याला खूप महत्त्व प्राप्त होते . त्यांच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणी असते. पण चेन्नई आणि मुंबई यांच्यातील हा सामना एका खास नावाने ओळखला जातो आणि हे नाव कशामुळे पडले हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यातील सामन्याला El Clasico हे खास नाव देण्यात आले आहे अल क्लासिक हे स्पॅनिश शब्द आहे. फुटबॉल मधील रियल माद्रिद आणि बारसोलीना हे दोन दिग्गज संघ ज्यावेळी एकमेकांविरुद्ध खेळतात त्यावेळी हा शब्द वापरला जातो. कारण या दोन्ही संघांचे फॅन्स हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि काहीशी अशीच परिस्थिती MI आणि CSK यांच्या मॅचच्या वेळी असते. म्हणून हा शब्दप्रयोग या सामन्यासाठी वापरला जातो. 2025 मध्ये तर मागील सर्व सीजन प्रमाणे यावर्षी खूप रंगतदार सामने होणार यात शंका नाही.

पहिल्या सामन्यातून हार्दिक पांड्या OUT –

2025 च्या आयपीएल मध्ये बऱ्याचश्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत. त्यातील स्लो ओवर रेट मुळे कर्णधारावरील एका सामन्याची बंदी हा नियम हटवण्यात आला. याचा फायदा हार्दिक पांड्याला मिळणार होता परंतु मागील पर्वात हार्दिक पांड्याला तीन मॅचेस मध्ये स्लो ओव्हर रेट चा फटका  बसला होता. त्यामुळे यावर्षी मुंबईच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळताना दिसणार नाही हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.

हेड टू हेड कामगिरी –

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात एकूण 39 सामने खेळले गेले आहेत त्यात मुंबई इंडियन्स ने 21 सामन्यात विजय मिळवला असून चेन्नईने 18 सामन्यात विजय मिळवला आहे मात्र मुंबई इंडियन्सने चेन्नईला फायनल मध्ये तीन वेळा तर चेन्नईने मुंबईला फक्त एकच वेळा फायनलमध्ये हरवले आहे पण 2025 ची कामगिरी कशी होते हे पाहणे रोचक  ठरणार आहे.

एम ए चिदंबरम स्टेडियम पिच रिपोर्ट आणि आकडेवारी

23 मार्च 2025 रोजी चेन्नई आणि मुंबईमध्ये महा मुकाबला खेळवला जाणार आहे हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम येथे खेळवला जाईल या स्टेडियमला  चेपॉक म्हणूनही ओळखले जाते. यावर्षी चापॉक मैदानावर एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत हे सामने दिल्ली हैदराबाद कोलकाता आणि पंजाब या विरुद्ध असतील या मैदानावर आतापर्यंत एकूण 85 सामने खेळवले गेले आहेत. त्यात प्रथम फलंदाजी करताना 49 वेळा आणि प्रथम गोलंदाजी करताना 36 वेळा विजय मिळवला गेला आहे या आकडेवारीवरून असे दिसून येते की प्रथम फलंदाजी करताना संघाला फायदा होतो कारण चेपॉक मैदानाची खेळपट्टी ही संथ असते याचा फायदा फिरकी गोलंदाजांना होतो त्यामुळेच कदाचित प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर जास्त सामने जिंकले गेले आहेत चेन्नईचा तर हा होम ग्राउंड आहे या मैदानावर फिरकीपटू आणि प्रेक्षक या दोघांची साथ चेन्नईला मिळत असते. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या ही 246 असून ती चेन्नईने राजस्थान विरुद्ध 2010 मध्ये बनवली होती तर सर्वात कमी धावसंख्या ही 70 असून ती आरसीबीने 2019 मध्ये बनवली होती.

आयपीएल 2025 मुंबई इंडियन्स संघ –

हार्दिक पांड्या ( c ) , सूर्य कुमार यादव , रोहित शर्मा, तिलक वर्मा, नमन धीर जसप्रीत बुमराह , ट्रेन बोल्ट, रॉबिन मिंज, कर्ण  शर्मा ,दीपक चहर, रायन रिकल्टन, मुजीब उर रहमान, विल जॅक्स, अश्विन कुमार, मिचेल सेंटनर, कृष्ण राजे, रिस टॉपले, जेकल्स, अर्जुन तेंडुलकर, विघ्नेश पुथुर कॉर्बीन बॉश.

आयपीएल 2025 चेन्नई सुपर किंग संघ –

ऋतुराज गायकवाड ( c ) , एम एस धोनी, शिवम दुबे, रचीन रवींद्र, डेवोन कोन्वे, राहुल त्रिपाठी, रवींद्र जडेजा, सेम करण, आर अश्विन, नूर अहमद, मथिषा पथिराणा, खलील अहमद, अंशुल कम्बोज, आंद्रे सिद्धार्थ.