ISPL च्या इतिहासातील पहिला फायफर. करण अंबाला ने रचला इतिहास.

ISPL च्या इतिहासातील पहिला फायफर. करण अंबाला ने रचला इतिहास.

आयएसपीएल सीझन तीन मध्ये माझी मुंबई संघ आणि अहमदाबाद लायन्स यांच्यात एक रोमांचक सामना झाला. या सामन्यात माझी मुंबई संघाने 27 धावांनी विजय मिळवला. परंतु या विजयाचा खरा हिरो ठरला तो माझी मुंबई संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अभिषेक कुमार दलहोर म्हणजेच करण अंबाला. करण अंबालाने आयएसपीलच्या इतिहासातील पहिला फायफर  म्हणजेच एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याच्या या भीम पराक्रमामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाला.

करन अंबाला ने घेतले एका सामन्यात पाच बळी

आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी फक्त विकी भोईर ने एका सामन्यात चार बळी घेतले होते. परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाने एकाच सामन्यात पाच बळी घेतले नव्हते. परंतु आजच्या सामन्यात करन अंबाला ने सर्व विक्रम मोडून काढत त्याच्या दोन षटकात फक्त तीन धावा देऊन तब्बल पाच बळी मिळवले. आय एस पी च्या इतिहासातील एकाच सामन्यात पाच बळी मिळवणारा तो एकमेव गोलंदाज बनला आहे.Ispl Season 3 Match 1 : Majhi Mumbai vs Shrinagar ke Veer

माझी मुंबई संघाने 27 धावांनी जिंकला सामना

माझी मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना दहा षटकात 90 धावा बनवल्या होत्या. 91 धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला फक्त 64 धावा जमवता आल्या. अशा रीतीने मुंबई संघाने हा सामना 27 धावांनी जिंकत अंकतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला.

दर्शन बांदेकर ची बेधडक फलंदाजी

मूळचा कोकणातून आलेला आणि सध्या माझी मुंबई संघाकडून पदार्पण करणारा दर्शन बांदेकर ने आज आपल्या मजबूत फलंदाजीचा नमुना सादर केला. दर्शन बांदेकर ने फक्त 14 चेंडूत 28 धावांची आतिशबाजी केली . त्यात त्याने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये 1 चौकार 1 षटकार आणि 1 नवकार अशा एकूण 18 धावा वसूल केल्या. त्यामुळे माझी मुंबई संघाला अधिकच्या नऊ धावा अश्या एकूण या षटकात 27 धावा मिळाल्या. त्यामुळे माझी मुंबई संघाने दहा षटकात 90 धावांचा पल्ला गाठला.

विजय पावले चे महत्वाचे योगदान

माझी मुंबईचा शांत आणि संयमी कर्णधार विजय पावले हा आपल्या टीम साठी नेहमी महत्त्वाचे योगदान देत असतो. आज विजय पावले ने आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले आहे. अहमदाबाद लायन्स कडून विजय पावलेला फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये चॅलेंज करण्यात आले. परंतु विजय पावलेने या षटकात एक विकेट घेताना फक्त चारच धावा दिल्या. त्यामुळे अहमदाबाद लायन्स या संघाला दहा धावांचे टार्गेट पूर्ण करता आले नाही. शिवाय त्यांना दोन धावांची पेनल्टी ही लागली. विजय पावल्याने आपल्या दोन षटकात 13 धावा देऊन तीन बळी घेतले शिवाय फलंदाजीत ही योगदान दिले. फील्डिंग करताना सुंदर कॅच ही पकडला.

करन अंबाला ने इतिहास घडवला

करण अंबाला हा आयएसपीएलच्या इतिहासातील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. मागील दोन सीझन मधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. सीजन दोन मध्ये तो मॅन ऑफ द सिरीज ही होता. परंतु या सीझनमध्ये फलंदाजीत त्याने आतापर्यंत साजेशी कामगिरी केलेली नाही. पण आजच्या सामन्यात त्याने 9 चेंडूत 14 धावांची खेळी केली. पण आजच्या सामन्यात चमकला तो त्याच्या गोलंदाजीमुळे . आजच्या सामन्यात त्याने आपल्या दोन षटकात फक्त तीन धावा देऊन पाच बळी घेतले. आयएसपीएलच्या इतिहासातील एखाद्या गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाला.

ISPL Season 3 Match No.3 : चेन्नई सिंघमची दमदार सुरुवात. कोलकत्ता विरुद्ध 44 धावांनी जिंकला सामना. 

ISPL Season 3 Match No.3 : चेन्नई सिंघमची दमदार सुरुवात. कोलकत्ता विरुद्ध 44 धावांनी जिंकला सामना. 

ISPL 2026 मधील तिसरा सामना हा चेन्नई सिंघम आणि टायगर्स ऑफ कलकत्ता यांच्या दरम्यान खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई सिंघम ने तब्बल 44 धावांनी विजय मिळवला. Ispl Season 3 Match 1 : Majhi Mumbai vs Shrinagar ke Veer

चेन्नई सिंघम ने केली शंभरी पार 

चेन्नई सिंघम हा संघ यावर्षीचा निर्धारित 10 षटकात शंभर धावा पूर्ण करणारा पहिला संघ ठरला आहे. चेन्नई सिंघमने आपल्या दहा षटकात आठ गडी गमावून 102 धावा बनवल्या होत्या. चेन्नई सिंघम तर्फे सरफराज खान ने 24 चेंडूत 4 चौकार 1 षटकार आणि 1 नवकार अशा एकूण 45 धावा कुठल्या. शेवटी संभाजी पाटील म्हणजेच बबलू पाटील यांनी दोन षटकार खेचून चेन्नई सिंघम ला शंभरी पार करून दिले.

सरफराज खान चमकला 

सरफराज खान

चेन्नई सिंघम तर्फे बाहुबली सरफराज खानला यावेळी पहिल्याच मॅचमध्ये वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले गेले. याचा पुरेपूर फायदा घेताना सर्फराज खानने दमदार फलंदाजी केली. सुरुवातीला सावधपणे खेळणाऱ्या सर्फराज ने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये भावेश पवार विरुद्ध 27 धावा बनवले. त्यात दोन चौकार एक षटकार आणि एक नवकार यांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे चेन्नई सिंघमने दहा षटकात 102 धावा बनवले. त्याच्या या खेळीमुळे सरफराज खान ला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

भावेश पवार ने दिल्या एकावर ओवर मध्ये 40 धावा 

चेन्नई सिंघमने फिफ्टी-फिफ्टी ओवर साठी लेफ्ट आर्म गोलंदाज भावेश पवार याची निवड केली होती. सातव्या षटकात फिफ्टी-फिफ्टी ओवर टाकण्यासाठी आलेल्या भावेश पवारने पहिला चेंडू सुंदर टाकला होता. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती. परंतु सरफराज खान ज्यावेळी फलंदाजीसाठी आला त्याने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्याने पुढील पाच चेंडूत तब्बल 27 धावा कुटल्या. त्यात एक षटकार दोन चौकार आणि एक नवकार यांचा समावेश होता. चेन्नई सिंघमने या षटकात तब्बल 27 धावा बनवल्या. शिवाय त्यात 13 धावांची भर पडून या षटकात तब्बल 40 धावा चेन्नई सिंघम ला मिळाल्या

विवेक शेलार ठरला कोलकत्याचा हिरो 

एकीकडे चेन्नई ने कोलकात्याच्या सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. परंतु त्यांचा प्रमुख गोलंदाज विवेक शेलार यांने उत्तम गोलंदाजी करताना आपल्या दोन षटकात 15 धावा खर्च करून तीन बळी मिळवले. शिवाय एक उत्कृष्ट कॅच ही पकडला. या कॅच साठी त्याला बेस्ट कॅच ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला.

कोलकात्याचे फलंदाज फेल 

10 षटकात 103 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजानी सपशेल नांग्या टाकल्या. त्यांनी आपल्या दहा षटकात फक्त 56 धावाच बनवल्या. त्यांचे बहुतेक प्रमुख फलंदाज या सामन्यात लयीत खेळताना दिसली नाहीत. सागर अली आणि सरोज परमानिक सारखे फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे टायगर ऑफ कोलकाता ने हा सामना तब्बल 44 धावांनी गमावला.

फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये ठरले विजयाचे अंतर 

ISPL मध्ये फिफ्टी-फिफ्टी ओवर हा गेम चेंजर म्हणून ओळखला जातो. याचाच उत्तम नमुना या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे सरफराज खानच्या बहारदार खेळीमुळे फिफ्टी फिफ्टी ओवर मध्ये चेन्नई ने 27 प्लस 13 अशा एकूण 40 धावा बनवल्या. तर दुसरीकडे कोलकत्ता ने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये फक्त 6 च धावा बनवल्या. त्यामुळे त्यांच्या 3 धावा कमी झाल्या. त्यामुळे फिफ्टी-फिफ्टी ओवर हे या मॅच मध्ये चेन्नईच्या विजयाचे कारण बनले.