BCCI Announced India’s Squad For 2026 ICC Men’s T20 World Cup : भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या ICC टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने शनिवारी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली.
7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत-श्रीलंकेतील मैदानात टी- 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिके सह टी- 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली.
मुंबई त पार पडली सभा

संघ निवडीची घोषणा करण्यासाठी BCCI च्या मुंबईतील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या उपस्थितीत बीसीसीयचे संयुक्त सचिव देवजीत सैकिया यांनी संघाची घोषणा केली. शुभमन गिलचा पत्ता कट झाला असून अक्षर पटेलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय ईशान किशनलाही संघात स्थान देण्यात आले आहे.गेल्या काही काळापासून भारतीय टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग आणि उपकर्णधार असलेला शुभमन गिलला 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही.गिलला संघातून बाहेर काढल्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे, परंतु त्याचे खराब प्रदर्शन हे यामागचे मुख्य कारण मानले जात आहे.
शुभमन गिल ला खराब फॉर्म मुळे वगळले

शुभमन गिलसाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन टी – 20 मालिका अत्यंत निराशाजनक ठरल्या. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 5 सामन्यांत फक्त 132 धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांत केवळ 32 धावा केल्या आहेत. सलग फ्लॉप ठरत असल्यामुळे निवड समितीने त्याला डच्चू देण्याचा कडक निर्णय घेतला. गिल उपकर्णधार असल्यामुळे त्याला संघातून काढले जाणार नाही असा अंदाज होता, मात्र बीसीसीआयने (BCCI) गुणवत्तेला प्राधान्य देत घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
कोणाचा झाला पत्ता कट ?
संघातील इतर खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास, उपकर्णधार शुभमन गिलवर पण टांगती तलवार होती. त्यालाही या वर्षात टी20 आंतरराष्ट्रीयत एकही अर्धशतक करता आलेले नाही. त्याच्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग-11 बाहेर बसावे लागले, तर यशस्वी जैस्वालला तर स्क्वॉडमध्येही जागा मिळत नाहीये. त्यामुळे टी – 20 वर्ल्ड कप चे स्कोड मधून त्याचे नाव वगळण्यात आले आहे. त्याच्याबरोबर यशस्वी जयस्वाल ला ही बेंचवर बसवण्यात आले आहे. मात्र संजू सॅमसन आणि सध्या तुफान फॉर्म मध्ये असलेल्या ईशान किशन ला संघात स्थान देण्यात आले आहे.
सोशल मीडियात बरीच तर्क -वितर्क लावण्यात आले
सोशल मीडिया मध्ये भारतीय संघावर बरेच तर्क-वितर्क लावण्यात आले होते. जसे की, सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवले जाईल का? निवड समिती काही धक्कादायक निर्णय घेणार का? हार्दिक पांड्याला पुन्हा नेतृत्वाची संधी मिळणार का, ज्याने या मालिकेत बॅट आणि बॉल दोन्हीने जबरदस्त पुनरागमन केले ? किंवा शुभमन गिल आहे तसा संघात निवडला जाईल असे बरेच विचार मांडण्यात आले होते. परंतु या सर्व विचारांना बाजूला ठेवून अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1:30 च्या सुमारास मुंबई येथे भारतीय संघाची टी -20 वर्ल्ड कप साठी 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली. तसेच सूर्य कुमार यादव यालाच कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
राखीव खेळाडूंशिवाय टीम इंडियाची घोषणा
बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघ बांधणीसाठी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजित साकिया यांनी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. यावेळी देवजित साकिया यांनी राखीव खेळाडूंची निवड न करण्यामागचं कारणही स्पष्ट केले आहे.2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलसह रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान हे राखीव खेळाडूच्या रुपात होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांचे नाव राखीव खेळाडूंच्या यादीत होते. पण यावेळी भारतीय संघाने राखीव खेळाडूंशिवायच भारतीय संघाची घोषणा केली. यासंदर्भात देवजित साकिया म्हणाले की, टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा ही घरच्या मैदानातच खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे राखीव खेळाडूंची नावे आता जाहीर करण्याची गरज नाही. आयसीसी स्पर्धा जर परदेशात असेल तर त्यांना आयत्या वेळी तिकडे पाठवणे शक्य नसते. त्यामुळे आधीच राखीव खेळाडूसंदर्भात माहिती दिली जाते. आगामी स्पर्धेत गरज पडल्यास त्यावेळी बदली खेळाडूच्या रुपात योग्य तो निर्णय घेतला जाईल.
ICC टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ –
कप्तान: सूर्यकुमार यादव
उपकप्तान: अक्षर पटेल
विकेटकीपर: 1)संजू सॅमसन
2)ईशान किशन
बॅट्समन –
1) अभिषेक शर्मा
2) तिलक वर्मा
3) रिंकू सिंग
ऑलराउंडर्स –
1) हार्दिक पांड्या
2) शिवम दुबे
3) वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज –
1) जसप्रीत बुमराह
2)हर्षित राणा
3) अर्शदीप सिंग
4) कुलदीप यादव
5) वरुण चक्रवर्ती
अशारीतीने भारतीय संघात 4 भक्कम फलंदाज , 4 ऑलराउंडर्स आणि 5 गोलंदाज तसेच 2 विकेट कीपर अश्या 15 खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार ५ सामन्यांची टी-२० मालिका
पहिला टी-२० सामना- २१ जानेवारी, नागपूर
दुसरा टी-२० सामना – २३ जानेवारी, रायपूर
तिसरा टी-२० सामना – २५ जानेवारी, गुवाहाटी
चौथा टी-२० सामना – २८ जानेवारी, विशाखापट्टणम
पाचवा टी-२० सामना – ३१ जानेवारी, तिरुवनंतपुरम
टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारतीय संघाचे वेळापत्रक
भारत विरुद्ध अमेरिका – ७ फेब्रुवारी, मुंबई
भारत विरुद्ध नामिबिया – १३ फेब्रुवारी, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १५ फेब्रुवारी, कोलंबो
भारत विरुद्ध नेदरलँड्स – १८ फेब्रुवारी, अहमदाबाद