क्रिकेट मध्ये इतिहास घडला. एकाने ठोकल्या 1000 धावा आणि संघाने बनवल्या 1400 धावा.

सध्याचे क्रिकेट हे खूप फास्ट झाले आहे. बरेच जण म्हणतात की सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये फलंदाजांचा धबधबा असतो हे जरी खरे असले तरी एखाद्या खेळाडूला सामन्यात शतक, द्विशतक आणि त्रिशतक ही झळकावताना आपण पाहिले आहे. त्यामध्ये त्यांची मेहनतही पाहिली आहे पण असे धावांचे डोंगर उभारणे ही काही सोपी गोष्ट नाही. आपल्याला माहीतच आहे की कसोटीत ब्रायन लारा ने नाबाद 400 धावा तसेच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात नावात 501 धावा बनवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मग आपल्या सर्वांना असा प्रश्न पडतो की, क्रिकेट विश्वात सर्वाधिक वैयक्तिक धावा किती येणे कोणी काढल्या असतील ? सांगू ? त्याचे नाव आहे प्रणव धनवडे. या मुंबईकर खेळाडूने एका डावात एक नाही दोन नाही तर तब्बल दहा शतके ठोकली होती. चला तर त्याच्या या विश्व-विक्रमाबद्दल जाणून घेऊया.

 323 चेंडू आणि नाबाद 1009 धावा  (1009 runs in just 323 balls) 

आज आम्ही तुम्हाला अशा एका विश्वविक्रमी खेळी बद्दल सांगणार आहोत की जे वाचून आपल्याला आश्चर्याचा धक्का दर बसेलच शिवाय अभिमानही वाटेल. नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये क्रिकेट विश्वात एक आश्चर्यकारक घटना घडली क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने एकट्याने एका डावात एक हजार धावा बनवल्या. 15 वर्षीय प्रणव धनवडे नावाच्या खेळाडूने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)यांच्या वतीने आयोजित भंडारी कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत दरम्यान ही अद्भुत कामगिरी केली होती.  प्रणव धनवडे ने 312 च्या स्ट्राईक रेटने 323 चेंडूत तब्बल नाबाद 1009 धावा ठोकल्या. त्यात 129 चौकार आणि 59 षटकारांचा समावेश होता. त्यात 870 धावा तर त्याने फक्त चौकार आणि षटकारांनीच वसूल केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती एका डावात सर्वाधिक धावा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू बनला होता.

कोण आहे प्रणव धनवडे ?

प्रणव धनवडे

प्रणव धनवडे चा जन्म 13 मे 2000 रोजी एका गरीब कुटुंबात झाला प्रणव चे वडील प्रशांत धनवडे हे रिक्षाचालक तर आई मोहिनी धनवडे ही एका कॅन्टीनमध्ये काम करायची. प्रशांत धनवडे यांचे प्रणवची  मुंबईच्या रणजी टीम मध्ये निवड व्हावी असे स्वप्न होते. त्यासाठी ते प्रणवला खूप प्रोत्साहित करत. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या प्रणवनेही आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आणि अशी विश्वविक्रमी खेळी करून दाखवली.

असा घडला विश्वविक्रम

             2016 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने Under 16 ही भंडारी अंतर शालेय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. के.सी.गांधी स्कूल आणि आर्य गुरुकुल स्कूल यांच्यात सामना खेळवला जाणार होता. पण आर्य गुरुकुलचे 11 खेळाडू होत नव्हते. दहावी ची परीक्षा असल्यामुळे शाळेने दहावीच्या मुलांना खेळण्यास मज्जाव केला. तर त्यांच्या एका प्रमुख खेळाडूला घरातून खेळण्यास पाठवले गेले नाही. तरीही आर्य गुरुकुलच्या प्रशिक्षकांनी शक्कल लढवून 11 खेळाडू कसेबसे मैदानात उतरवले. मैदान हे फारसे मोठे नव्हते. त्याची सीमारेषा ही फक्त 30 यार्ड पर्यंत होती. आर्य गुरुकुल चा पहिला डाव फक्त 31 धावांवर आटोपला. त्यानंतर के.सी. गांधी स्कूल ने पहिल्या दिवशी 1 बाद 956 धावांचा डोंगर उभारला. त्यात प्रणवने  एकट्याने तब्बल 652 धावा बनवत मुंबईच्या शालेय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला पूर्वी हा विक्रम पृथ्वीच्या शॉ च्या नावावर होता. पृथ्वी शॉ ने 546 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी प्रणवणे नाबाद 1009 धावा बनवत सारे विक्रम मोडीत काढले. प्रणवणे आपल्या या खेळीत 395 मिनिटे क्रीज वर थांबत 323 चेंडूत 1009 धावा बनवल्या. त्यात 129 चौकार आणि 59 षटकारांचा समावेश होता.

सामन्याचा निकाल काय लागला 

Score card
Imege source from Google

                 प्रणव धनवडे ने प्रथम आकाश सिंग सोबत पहिल्या विकेटसाठी 546 धावांची भागीदारी केली. नंतर सिद्धेश पाटील सोबत 531 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे के.सी.गांधी स्कूलने 3 बाद 1465 धावांवर आपला डाव घोषित केला. आर्य गुरुकुल स्कूलचा संघ पहिल्या डावात फक्त 31 धावांवर आटोपला. के.सी. गांधी संघाला 1434 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही आर्य गुरुकुल स्कूलचा संघ फक्त 52 धावा च करू शकला. अशा तऱ्हेने के.सी.गांधी स्कूल ने हा सामना एक डाव आणि 1382 धावांनी जिंकला आणि इतिहास घडवला. के.सी. गांधी स्कूलने काढलेल्या 1465 धावा या एका डावातील सर्वाधिक धावा होत्या.

पूर्वी यांच्या नावावर होता हा विक्रम 

             प्रणव धनवडे च्या नाबाद 1009 धावांच्या खेळीमुळे अनेक विक्रमांना गवसणी घातली गेली. मुंबईच्या शालेय स्पर्धेत पृथ्वी शॉ ने 546 धावा बनवल्या होत्या. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 1899 मध्ये इंग्लंडच्या आर्थर कॉलिंनसने 628 धावा बनवल्या होत्या. त्या सर्वोच्च मानल्या जात होत्या. परंतु 2016 मध्ये खेळलेल्या प्रणवच्या या खेळीने 116 वर्षांपूर्वीचा विक्रम ही मोडीत निघाला आणि अविश्वसनीय आणि कदाचित कधीही न मोडला जाणारा विक्रम प्रस्थापित झाला.

प्रणव धनवडे वर कौतुकाचा वर्षाव 

                प्रणव धनवडे च्या नाबाद 1009 या खेळीमुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक क्रिकेटर आणि राजकारण्यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्याच्या या खेळीची दखल भारतातच नव्हे साता समुद्र पार परदेशातही घेतली गेली. खुद्द सचिन तेंडुलकर यांनी त्यांची स्वाक्षरी असलेली बॅट त्याला भेट दिली. तर एम एस धोनी आणि अजिंक्य रहाणे यांनी त्याच्या खेळीचे कौतुक केले होते. अजित वाडेकर यांनी त्याला क्रिकेटचे किट भेट दिले होते. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला दरमहा 10000 रुपयांची स्कॉलरशिप दिली होती. तर तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रणवचा पुढील शिक्षणाचा खर्च सरकार करेल असे घोषित केले होते.

प्रणव धनवडे ला काय काय मिळाले ?.

           गरीब कुटुंबातील प्रणव धनवडे हा क्रिकेटच्या एका गावात 1000 धावा बनवणारा एकमेव खेळाडू आहे. त्याच्या या अजरामर खेळीचे सर्व स्तरातून कौतुक होत होते. शिवाय त्याच्या या खेळीची दखल बऱ्याच जणांनी घेतली तसेच त्याला पुरस्कार मिळाले होते ते पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहेत.

  • NDTV ने प्रणवला ‘ इंडिया ऑफ द इयर’ ( India of the Year ) हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. 
  • त्याच्या या खेळीची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ‘मध्ये नोंद झाली.
  • एमसीए कडून त्याला दरमहा दहा हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळाली. 

प्रणवणे घेतला पोलिसांशी पंगा 

            ही काय फारशी मोठी गोष्ट नव्हती. त्याचे झाले असे की प्रणव ज्या मैदानात सराव करत असे त्या मैदानात एका मंत्र्याचे हेलिकॉप्टर उतरणार होते. त्यामुळे सर्व खेळाडूंना मैदानाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. परंतु प्रणवला मैदानातून बाहेर जाण्यासाठी थोडा उशीर झाला होता. त्यामुळे पोलिसांनी प्रणवला फटकारले. प्रणवणे पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे त्याला थेट पोलीस चौकीत नेण्यात आले. विषय काय फार मोठा नव्हता. पण यावर चर्चा मात्र जोरदार झाली होती.

पुढे प्रणवचे काय झाले ? 

            प्रणव धनवडे याने खेळलेल्या विश्व विक्रमी खेळीमुळे त्याच्याकडून सर्वांच्या खूप अपेक्षा वाढल्या होत्या. काही जण  तर त्याला पुढील सचिन तेंडुलकर समजू लागले होते. अपेक्षा आणि दबावामुळे प्रत्येक सामन्यात त्याच्यावर दबाव वाढत गेला त्याची कामगिरी पूर्वीसारखी राहिली नाही. खराब फॉर्म आणि कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे त्याला वेस्ट झोनच्या Under 16 च्या टीम मध्ये स्थान मिळाले नाही. कारण वय बसत नव्हते शिवाय तो  मुंबईकडूनही खेळलेला नव्हता. पुढे खराब कामगिरीमुळे त्याला मुंबईच्या Under 19 संघातही संधी मिळाली नाही. इकडे अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली यावरही बरेचसे प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु  प्रणवणे स्वतः आपल्या खराब कामगिरीमुळे Under 19 संघात घेतले नसल्याचे कबूल केले होते.त्याच्या वडिलांनी नंतर एमसीए कडून मिळालेली स्कॉलरशिप ही परत केली.

प्रणव धनवडे सध्या काय करतोय? 

             सततच्या खराब कामगिरीनंतर 2022 मध्ये प्रणव धनवडे सहा महिन्याच्या करारावर क्रिकेट खेळण्यासाठी युनायटेड किंगडम येथे गेला. त्याने नॉर्थ विथ क्रिकेट क्लब कडून खेळताना एक शतक आणि चार अर्धशतके झळकावताना एकूण 715 धावा बनवल्या. शिवाय आपल्या घराला आर्थिक हातभार ही लावला. सध्या प्रणव धनवडे हा 25 वर्षाचा असून तो मुंबईच्या लोकल स्पर्धा खेळत आहे.

निष्कर्ष 

           एकंदरीत क्रिकेटमध्ये चार अंकी धावसंख्या बनवणारा जगातला पहिला फलंदाज प्रणव धनवडे ने जर आपल्या कामगिरीत सातत्य राखले असते तर आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत आपण त्याला खेळताना पाहिले असते असो प्रणवला आपण त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवूया .प्रणवची ही खेळी आपल्याला आवडली असेल आणि हे वाचून त्याच्या खेळीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले असेल तर लगेच कमेंट करून शेअर करायला विसरू नका.

हे ही वाचा.

वनडेत 170 चेंडूत 404 धावा. सारे रेकॉर्ड उद्ध्वस्त