म्हणतात ना क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षण काहीही घडू शकते. रोज नवनवीन रेकॉर्ड्स हे बनत असतात आणि काही रेकॉर्ड हे बदलत आणि तुटत असतात. क्रिकेटमध्ये कधीकधी असे काही घडू शकते की जे पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. पूर्वी क्रिकेट हे खूप संथ गतीने खेळली जात असे. पूर्वी वनडे सामने हे 50 ते 60 षटकांचे व्हायचे. तरी जेमतेम 250 ते 300 धावाच व्हायच्या. परंतु आताच हे क्रिकेटचे युग खूप फास्ट झाले आहे. आत्ताच्या टी 20 च्या जमान्यात क्रिकेटमध्ये 20 षटकात 250 प्लस धावा सहज बनवल्या जातात. तसेच त्या चेसही केल्या जातात. वनडे सांगण्यात द्विशतके बरीच झालेली आहेत. परंतु त्रिशतक अजूनही झालेले नाही आणि त्याची आपण सर्व आतुरतेने वाटही पाहत आहोत. परंतु आज आम्ही तुमच्यासमोर अशी माहिती सादर करणार आहोत की ती वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. ‘एका वनडे सामन्यात बनवल्या गेल्या 700 प्लस धावा आणि एका खूंखार बॅट्समन ने बनवले नाबाद 400 धावा.’ हो , बसला ना आश्चर्याचा धक्का!.’
मित्रांनो मी कोणत्याही क्रिकेट गेम बद्दल सांगत नसून ही खरी रियालिटी आहे. क्रिकेटमध्ये ही घटना बांगलादेश मध्ये गर्दी असून तिथे एका मान्यताप्राप्त वनडे सामन्यात मुस्तकीम हौलादार नावाच्या खेळाडूने हा कारनामा करून दाखवला आहे. त्याने 170 चेंडूचा सामना करताना तब्बल नाबाद 404 धावा बनवल्या. त्याने 237.64 च्या सरासरीने धावा बनवल्या. त्याने तब्बल पन्नास चौकार आणि 22 षटकार मारले. चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया.
क्रिकेट विश्वात खळबळ

2025 हे वर्ष खूप उलथा-पालथीचे राहिले आहे. क्रिकेट क्षेत्रातही बरेचसे चढ-उतार राहिले आहेत. त्यात मार्च 2025 मध्ये घडलेली घटना क्रीडा विश्वाला आश्चर्यचकित करणारी ठरली. बांगलादेश मधील ढाका येथील ढाका युनिव्हर्सिटी सेंट्रल ग्राउंड वर केंब्रियन स्कूल अँड कॉलेज आणि सेंट ग्रे गोरी स्कूल अँड कॉलेज यांच्यात हा वनडे सामना खेळवला गेला. या सामन्यात सेंट ग्रे गोरी स्कूल विरुद्ध खेळताना मुस्तकीम हौलादार नावाच्या खेळाडूने वीस फोटो खेळी करताना फक्त 170 चेंडू तब्बल 404 धावा बनवल्या. त्यात तब्बल 50 चौकार आणि 22 षटकार यांचा समावेश होता. म्हणजेच 404 पैकी 332 धावा त्याने 72 चेंडूत चौकार आणि शेतकऱ्यांच्या सहाय्याने बनवल्या. त्याच्या या खेळीने संपूर्ण क्रीडा विश्वात एकच खळबळ माजली आहे.
वनडेत 770 धावांचा डोंगर
केंब्रियन स्कूल आणि ग्रे गोरी स्कूल यांच्यात खेळवला गेलेला वनडे सामना हा शालेय स्तरावरील असून तो जिल्हास्तरावर खेळवला गेला होता. त्यामुळे तो अधिकृत मानला गेला नाही परंतु मुस्तकीम हौलादार च्या या अजब खेळीमुळे हा सामना नेहमी लक्षात राहील. मुस्तकीम ने 170 चेंडूत नावात 404 धावा बनवल्या तर सोआद परवेज ने 124 चेंडूत 256 धावा बनवल्या या दोघांनी 699 धावांची भागीदारी केली या दोघांनी मिळून एकूण 82 चौकार आणि 35 षटकार मारले. या दोघांच्या विस्फोटक खेळीमुळे केंब्रियन स्कूलने 50 षटकात तब्बल 770 धावांचा डोंगर उभारला.
बेधडक दे धडक मुस्तकीम हौलादार
(170 चेंडूत 404 धावा. )404 runs in just 170 balls.

- Image source – Google downloder
नववीत शिकणाऱ्या पुस्तके हवालदार ने 260 मिनिटात 237 च्या सरासरीने 170 चेंडूत तब्बल नाबाद 404 धावा बनवल्या त्यात 50 चौकार आणि 22 षटकारांचा समावेश होता नववीतल्या या पोराने न भूतो न भविष्यती अशी खेळी केली. सेंट ग्रेगोरी स्कूलच्या प्रत्येक गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेतला. सेंट ग्रेगोरी च्या प्रत्येक गोलंदाजाचा इकॉनोमी हा 16 धावांच्याही पुढे होता.
738 धावांनी विशाल विजय
मुस्तकीम आणि परवेज यांच्या विध्वंसक खेळीमुळे केंब्रियन स्कूलने 50 षटकात तब्बल 770 धावा बनवल्या. या अशक्य प्राय आव्हानाचा पाठलाग करताना सेंट ग्रेगोरी स्कूल च्या फलंदाजानी अक्षरशः नांग्या टाकल्या. त्यांचा संपूर्ण संघ हा 11 षटकात फक्त 32 धावांवर ऑल आउट झाला. अशा तऱ्हेने कॅम्ब्रीयन स्कूल ने हा सामना तब्बल 738 धावांनी जिंकला.
निष्कर्ष
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. मग तो शालेय स्तरावरील असो किंवा इंटरनॅशनल स्तरावरील असो. रोज नवनवीन विक्रम हे होतच राहतात.मुस्तकीम हौलादार च्या नाबाद 404 धावांची खेळी ही वनडे सामन्यातील आजवरची सर्वोच्च खेळी आहे. हे निश्चितच मान्य करावे लागेल. ही अद्भुत माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व शेअर करायला विसरू नका.
हे ही नक्की वाचा –