त्याची उंची साधारण पाच साडेपाच फूट, वाढलेली दाढी आणि भला मोठा पोट घेऊन तो मैदानात आला आणि बघता बघता त्याने बॉल मैदानाबाहेर भिरकावून द्यायला सुरुवात केली. 8 षटकात 158 धावा चेस करताना या वाघाने फक्त 28 बॉलमध्ये शतक झळकावत चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला व सामना एक हाती जिंकून दिला. त्या खेळाडूचे नाव होते उस्मान पटेल. टेनिस क्रिकेट मधील सर्वात विध्वंसक फलंदाज आणि ज्याला रायगड का टायगर ( Raygad ka tiger 🐯)म्हणून ओळखले जाते त्या खेळाडूचा संपूर्ण जीवन प्रवास आपण या ब्लॉग द्वारे जाणून घेऊया.
परिचय

नाव : उस्मान पटेल
जन्म : 19 सप्टेंबर 1990
गाव : तळोजा (रायगड) महाराष्ट्र ,भारत
बॅटिंग स्टाईल : उजव्या हाताने फलंदाजी
टोपण नाव : रायगड का टायगर
टेनिस क्रिकेटची सुरुवात
उस्मान पटेल ला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळे तो बहुतेक वेळा शाळा सोडून मैदानात खेळायला जात असे. या गोष्टीसाठी त्याला घरातून नेहमी ओरडा खावा लागत असे. उस्मानचा जन्म हा रायगड जिल्ह्यातील तळोजा या गावी झाला. त्याकाळी तळोजा मध्ये यंग स्टार तळोजा ही बेस्ट टीम म्हणून ओळखली जायची. त्याकाळी रायगड मध्ये विश्वास पाटील हे सर्वोत्तम खेळाडू होते. एका मॅच मध्ये उस्मान पटेल ने विश्वास पाटील यांच्या ओव्हरमध्ये दोन चौकार एक षटकार खेचला होता. त्याच्या या खेळीने प्रभावित होऊन यंग स्टार तळोजा या टीम ने त्याला आपल्याकडून खेळण्याची ऑफर दिली. तेव्हापासून उस्मान पटेलच्या टेनिस कारकीर्दीला सुरुवात झाली. उस्मान पटेल ला क्रिकेट खेळण्यासाठी त्याच्या घरचा खूप सपोर्ट होता. त्याने फक्त क्रिकेटवरच लक्ष द्यावे असे त्याच्या कुटुंबीयांना वाटत असे. त्यामुळे उस्मानने आपला पूर्ण फोकस क्रिकेटवर केला. कामोठा येथील स्पर्धेत 6 बॉल ला 6 चौकार तसेच केसीएम ट्रॉफी खारघर येथे 25 बॉल मध्ये 106 धावा बनवल्या. तेव्हापासून त्याच्यातील खरा क्रिकेटर जागा झाला व लोक त्याला ओळखू लागले व आपल्या संघाकडून खेळण्यासाठी बोलावू लागले.
परदेशात खेळणे

विशितला उस्मान पटेल त्याकाळी भलत्याच फॉर्मात होता. त्यावेळी उमर इलेव्हन मुंबई या संघाने गुजरात मध्ये त्याला खेळायला बोलावले होते. तिथे उस्मान ने खूप चांगला खेळ केला होता. संतोष नाणेकर आपल्या कॅमेऱ्याने ती मॅच लाईव्ह दाखवत होता. त्यामुळे खूप सार्या लोकांनी उस्मानचा खेळ पाहिला होता. उस्मानची अफलातून बॅटिंग पाहून बऱ्याच जणांचे फोन त्याला येऊ लागले. उमर भाई आणि हकीम भाई यांच्यामुळे उस्मान पटेलला कतारला जाण्याची संधी मिळाली. तिथेही त्याने खूप चांगला खेळ केला नंतर उस्मानला दुबई ,कतार, श्रीलंका आणि नेपाळ यासारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट खेळायला मिळाले.
गावकऱ्यांची साथ
उस्मान पटेल ला क्रिकेट खेळताना त्याच्या गावकऱ्यांची आणि मित्रांची खूप साथ लाभली. उस्मान पटेल वेळोवेळी त्यांचे आभार नेहमी मानत असतो. उस्मानची जर मॅच एखाद्या ठिकाणी असेल तर गावकऱ्यांकडून त्याविषयी विचारपूस केली जाते. काही वेळा ते मॅच च्या ठिकाणी उपस्थिती दाखवून उस्मान चे प्रोत्साहन वाढवताना दिसतात. त्याचे मित्र मुददसिर, साद, अब्बास, अरबाज हे नेहमी त्याच्यासोबत असतात. ज्यावेळी उस्मानने पर देशात जाऊन प्रभावी कामगिरी केली होती त्यावेळी त्याचा रायगड वासियानी भव्य दिव्य असा सत्कार केला होता. तसेच पुरस्कार देऊनही सन्मानित केले होते. अशाप्रकारे उस्मान पटेलला आपल्या गाववासीयांची खूप मोलाची साथ मिळत आहे.
रायगड का टायगर अशी ओळख Raygad ka tiger 🐯

एका मॅच मध्ये उस्मान पटेल ने 16 बॉल मध्ये 53 धावा करून सामना आपल्या टीमला जिंकून दिला होता त्यावेळी मच्छिंद्र पाटील यांनी पहिल्यांदाच ‘ ये तो सही टायगर हे’ असे म्हटले होते. त्यावरूनच उस्मान पटेलला’ रायगड का टायगर ‘असे म्हटले जाऊ लागले.
सर्वात मोठी फॅन फॉलोइंग
उस्मान पटेल हे टेनिस क्रिकेट मधील खूप मोठे नाव आहे. टेनिस क्रिकेट मध्ये उस्मान पटेल हा सर्वाधिक फॅन फॉलोइंग असलेला खेळाडू आहे. त्याचे इंस्टाग्राम वर दीड लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तसेच पुढील काही कारणामुळे किंवा घटनांमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग आपल्याला दिसून येतो.
- सचिन तेंडुलकर ज्यावेळी आऊट व्हायचा त्यावेळी टीव्ही बंद केले जायचे. तसेच उस्मान पटेल ज्यावेळी आऊट होतो त्यावेळी स्टेडियम खाली केली जातात असे म्हटले जाते.
- जर एखाद्या सामन्यात उस्मान पटेल शून्यावर बाद झाला तर त्याचे फॅन हे त्याला असे – तसे खेळण्याचे सल्ला द्यायचे तसेच हे सल्ले तो नम्रपणे ऐकून त्यावर अंमल करत असे.
- एकदा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अशी घटना घडली की उस्मान पटेल साठी चालू सामना हा अर्धा तास थांबवण्यात आला. गाडीतून मैदानापर्यंत उस्मान ला आणण्यासाठी सहा-सात बाउन्सर लावले गेले. एवढी प्रचंड गर्दी त्यावेळी उस्मानाला पाहण्यासाठी आली होती. एवढी इज्जत पैसे देऊनही विकत घेता येत नाही हे तो नेहमी सांगत असतो.
- क्षेत्ररक्षण करत असताना उस्मान पटेल ज्या साईडला जाईल त्या साईडला पब्लिकांची गर्दी चे प्रमाण जास्त वाढत असे.
उस्मान पटेल आणि समस्या
टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा बॅकग्राऊंड म्हणा किंवा घरची आर्थिक परिस्थिती म्हणा ही म्हणावी तितकी साजेशी नसते. त्यामुळेच कदाचित एखादा चांगला क्रिकेटर सुद्धा मागे पडतो. पण उस्मान पटेल त्या बाबतीत नशीबवान असावा. कारण उस्मान पटेलचे वडील व त्याचा भाऊ त्याच्या मागे खंबीरपणे नेहमी उभे असत. परंतु तळोजा गावात ग्राउंडची कमतरता नेहमी भासत असे. त्यामुळे उस्मान पटेल ला म्हणावं तितका सराव करता येत नसे. शिवाय कालांतराने त्याचा फॉर्म आणि फिटनेसही त्याला राखता आला नाही. या काही समस्या उस्मान भाई ला नेहमी जाणवत राहिल्या.
उस्मान पटेल चा फिटनेस
उस्मान पटेल ला फिटनेस च्या बाबतीत बऱ्याच समस्या उद्भवल्या होत्या. परंतु उस्मान पटेल ने या समस्येचा आपल्या जीवनात समावेश करून बरेच सामने गाजवले. उस्मान पटेल मॅच च्या वेळी जेवत नाही. तो फक्त साधे पाणी किंवा कोल्ड्रिंकस यावरच पूर्ण दिवस खेळत राहतो. शिवाय बाहेरचे काहीही खात नाही.फक्त तो घरचे जेवण जेवत असतो. त्याच्या मित्रांच्या मते तो एकाच वेळी चार ते पाच मॅचेस खेळू शकतो. शिवाय 50 ओव्हरचे सामने तो सहज खेळून काढतो.
उस्मान पटेल चे रेकॉर्ड
- देवांश ट्रॉफी मध्ये 158 धावांचा पाठलाग करताना 34 चेंडूत नाबाद 131 धावांची खेळी केली. त्यात 16 षटकार आणि 7 चौकार मारले होते.
- सहा बॉल ला सहा षटकार.
- दुबईमध्ये T10 स्पर्धेत 16 बॉल मध्ये 50 धावा.
- 24 बॉल मध्ये 104 धावा करत टेनिस क्रिकेटमध्ये फास्टेस्ट सेंच्युरी बनवण्याचा रेकॉर्ड.
उस्मान पटेल ने जिंकलेले पुरस्कार
- उस्मान पटेल ने आतापर्यंत चार पेक्षा जास्त कार जिंकलेले आहेत.
- खासदार चषक 2021 मध्ये मॅन ऑफ द सिरीज.
उस्मान पटेल ने खेळलेल्या प्रमुख स्पर्धा
- यूएई मध्ये T 10 स्पर्ध्ये दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात भारताचे प्रतिनिधी केले.
- रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सातत्याने सहभाग घेतला.
- एल ए एम ट्रॉफी 2023 भोपाळ येथे उपविजेतेपद मिळवले.
- सुप्रीमो ट्रॉफी आणि रतन बुवा ट्रॉफीत दिमाखदार कामगिरी केली.
- दुबई, कतार ,ओमान आणि श्रीलंका या देशात जाऊन क्रिकेट खेळण्याचा अनुभव.
ISPL मध्ये उस्मान पटेल Unsold
आयपीएलच्या धर्तीवर BCCI आणि बॉलीवूड कलाकार यांच्या साह्याने ISPL नावाची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा भरवण्यात आली. यात टेनिस क्रिकेट मधील खूप मोठे मोठे खेळाडू आपल्याला खेळताना दिसले परंतु एक नाव त्यातून दिसून आले नाही. उस्मान पटेल हा ISPL चे दोन्ही सीजन खेळू शकला नाही. त्याच्यावर बरेच तर्कवितर्क लावण्यात आले. परंतु त्याचे खरे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ISPL च्या पहिल्या सीजनमध्ये रमजान महिना असल्याकारणाने शिवाय फिटनेस ची समस्या असल्या मुळे उस्मान पटेल ने फॉर्म भरला नव्हता. गेल्या दोन वर्षापासून उस्मान पटेल ने व्यावसायिक क्रिकेट खेळणे कमी केले होते. तर त्याला वेळोवेळी फिटनेस ची समस्या जाणवत होती. तसेच त्याचा फॉर्मही कमी झाला होता. याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर दिसून येत होता. उस्मान पटेल ने दुसऱ्या सीजन ला फॉर्म भरला होता. त्याचे नावही ऑक्शन मध्ये आले होते. परंतु तो अनसोल्ड राहिला.
उस्मान पटेल ची लॉयल्टी Loyalty of Usman Patel

उस्मान पटेल यांनी कधीही क्रिकेट खेळताना पैशाची मागणी केली नाही. त्याने जर एखाद्या टीमला किंवा व्यक्तींना वचन दिले तर तो त्याच टीमकडून खेळतो. हीच त्याची खरी लॉयल्टी त्याला एक मोठा खेळाडू बनवते. कोणी एका व्यक्तीने जर ज्यादा पैसे देऊन त्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला स्पष्ट नकार देतो त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये शब्दांना खूप किंमत असते. त्यामुळे जो त्याला सर्वप्रथम सांगेल त्याच टीमकडून तो आजवर खेळत आला आहे.
उस्मान पटेल चा नवोदित खेळाडूंना मोलाचा सल्ला
- एखाद्या खेळाडूला जर खरंच पुढच्या लेवलवर क्रिकेट खेळायचे असेल तर त्याने रोज प्रॅक्टिस करणे खूप आवश्यक आहे .
- आपले जे कोणतेही कौशल्य असेल ते हेरून दिवसभरात किमान दोन तास क्रिकेटसाठी देणे आवश्यक आहे.
- वयाची 17 ते 22 या पाच वर्षात आपल्याला नेमके काय करायचे आहे हे पक्के करावे.
- आपल्याबरोबर चार ते पाच नवीन पोरांना तयार करून आऊट न होता रोज शंभर बॉल खेळण्याचा प्रयत्न करावा.
- नवोदित खेळाडूंनी घरच्यांची रिस्पेक्ट करा आणि त्यांना वेळ द्या कारण अडचणीच्या वेळी तेच कामाला येतात असे उस्मान पटेल चे म्हणणे आहे.
उस्मान पटेल चे स्वप्न
उस्मान पटेल हे टेनिस क्रिकेट मधील खूप मोठे नाव आहे. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने खूप नाव केले.त्याचबरोबर त्याला लेदर क्रिकेटची खूप आवड होती. लेदर बॉल क्रिकेटमध्ये तो श्रीलंका व नेपाळला खेळण्यासाठी गेला होता व तिथेही त्याने उत्तम कामगिरी केली होती. हैदराबाद येथे कॅम्प मध्ये त्याची निवड झाली होती परंतु दुसऱ्या राऊंड नंतर फिटनेस प्रॉब्लेम मुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्याचे टीव्हीवर झळकण्याचे तसेच आयपीएल खेळण्याचे स्वप्न आहे.
FAQ
- उस्मान पटेल चा क्रिकेट मधील सर्वात आवडता खेळाडू कोण आहे?
उत्तर – विरेंद्र सेहवाग
- उस्मान पटेल च्या मते टेनिस क्रिकेट मधील बेस्ट बॅट्समन कोण आहे ?
उत्तर – कृष्णा सातपुते
Krishna Satpute : The God of Tennis Cricket
- उस्मान पटेल च्या मध्ये टेनिस क्रिकेट मधील सर्वात कठीण गोलंदाज कोण आहे ?
उत्तर – विजय पावले ( स्लोवर वन ओळखणे कठीण )
Vijay Pavale: The Sangli Express Biography
- उस्मान पटेल चा सर्वात आवडता शॉट कोणता?
उत्तर – कव्हर ड्राईव्ह, उडी मारून शॉट मारणे, रिव्हर्स शॉट.
- उस्मान पटेल ला रायगड का टायगर हे नाव कोणी दिले?
उत्तर – मच्छिंद्र पाटील
- उस्मान पटेल ची आवडती स्पर्धा कोणती?
उत्तर – सुप्रीमो ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, रतन बुवा ट्रॉफी.
- उस्मान पटेल च्या मध्ये आताच्या घडीतील टेनिस क्रिकेटमधील तीन बेस्ट ऑल राऊंडर कोण आहेत ?
उत्तर – 1] विजय पावले
2] करण अंबाला
3] विश्वजीत ठाकूर.
निष्कर्ष
एकंदरीत या ब्लॉग द्वारे आपल्याला स्पष्ट होते की उस्मान पटेल हा टेनिस क्रिकेटमधील खूप मोठा खेळाडू आहे तसेच चांगला माणूस आहे. आयपीएलच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिल्ली आणि अहमदाबाद दोन नव्या संघाची भर पडणार आहे. त्यामुळे ISPL पासून वंचित राहिलेल्या बऱ्याच ⭐ खेळाडूंना तिसऱ्या सिझनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर का उस्मान पटेल ने आपल्या फिटनेस वर काम केले तर तो ISPL चा पुढील सीजन नक्कीच खेळू शकतो यात शंका नाही. शिवाय त्याचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न आहे तेही लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही आपल्या सर्वांची इच्छा असणार आहे. यासाठी आपण सर्वांनी उस्मान पटेलला शुभेच्छा देऊया. उस्मान पटेल विषयी माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा ब्लॉग उस्मान पटेल च्या सर्व चाहत्यांपर्यंत नक्की पोहोच वण्यास विसरू नका.
धन्यवाद.
हे ही वाचा.जरूर आवडेल.
क्रिकेट मध्ये इतिहास घडला. एकाने ठोकल्या 1000 धावा आणि संघाने बनवल्या 1400 धावा.
