सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंड आणि भारतीय फलंदाजांचा धबधबा राहिला. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना 669 धावा फटकावल्या. तर भारताने पहिल्या डावात 358 धावा आणि दुसरा डावात 425 धावा बनवल्या. खास करून इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना 600 हून अधिक धावा केल्या. शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमरा यांनी 100 हून अधिक धावा दिल्या. जसप्रीत बुमराने तर आपल्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच एका डावात शंभरहून अधिक धावा दिल्या. कोणत्याही संघाचा वेगवान गोलंदाज हा कणा मानला जातो. क्रिकेट विश्वात एकापेक्षा एक मातब्बर वेगवान गोलंदाज होऊन गेलेत आणि काही जण आजही खेळत आहेत. पण काही वेळा अशा गोलंदाजाला ही मार खावा लागतो. चला तर पाहूया काही अश्या गोलंदाजांना ज्यांनी कसोटीत एका डावात 100 हून अधिक धावा दिल्या आहेत.
शंभरहून अधिक धावा देणारे वेगवान गोलंदाज
1) कपिल देव ( भारत )
Image source IMDb.com
1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार असलेले कपिल देव हे भारतातील एक सर्वोत्तम ऑल राऊंडर खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी 131 कसोटी सामने खेळलेले असून त्यात त्यांनी 434 बळी घेतलेले आहेत. कपिल देव यांच्या करिअरमध्ये बऱ्याच वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत. कपिल देवयानी आपल्या टेस्ट करिअरमध्ये सर्वाधिक 25 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.
2)मिचेल जॉन्सन(ऑस्ट्रेलिया )
Image source google.com
ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनने 2007 मध्ये कसोटी मध्ये पदार्पण केले होते. त्याने 73 सामन्यातील निश्चित 313 विकेट मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या डाव्या हाताचा हा गोलंदाज बाऊन्सर आणि स्लेजिंग साठी प्रसिद्ध होता. बऱ्याच वेळा त्याने या अस्त्राचा वापर करून खूप विकेट्स मिळवले आहेत. पण मी चेंज जॉन्सन ने कसोटीत एकूण 24 वेळा 100 हून अधिक धावा दिलेले आहेत.
3) इमरान खान ( पाकिस्तान )
Image source Pinterest.com
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि 2022 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले इमरान खान हे आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्याने एकूण 88 सामने खेळले व त्यात 362 विकेट मिळवले. पण इमरान खान यांनी कसोटीत एकूण 21 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिले आहेत.
4) चामिंडा वास ( श्रीलंका )
Image source sky sports.com
श्रीलंकेचा आतापर्यंतचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा चामिंडा वास यांनी 1994 मध्ये कसोटीत पदार्पण केले. 1994 ते 2009 पर्यंत त्यांनी एकूण 111 कसोटी सामने खेळले व त्यात 355 विकेट घेतल्या. पण या वेगवान डावखुऱ्या गोलंदाजांनेही कसोटीत एकूण 20 वेळा एका डावा शंभर पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.
5) ईशांत शर्मा ( भारत )
Image source google.com
ईशांत शर्मा हा भारताचा एक शानदार वेगवान गोलंदाज होता. ईशांत शर्माने 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले त्याने आपल्या कसोटीत रिकी पाँटिंग सारख्या फलंदाजाला जखडून ठेवले होते. त्याने 105 कसोटी सामन्यात 311 विकेट मिळवले आहेत. पण ईशांत शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 19 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.
6) जेम्स अँडरसन ( इंग्लंड )
Image source google.com
इंग्लंडचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसनला ओळखले जाते. जेम्स अँडरसन मध्ये इन स्विंग आणि आऊट स्विंग करण्याची अनोखी ताकद होती. 2024 मध्ये जेम्स अँडरसन ने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. पण त्यापूर्वी त्याने 188 सामन्यात तब्बल 704 विकेट्स मिळवले. जेम्स इन द सेना हा सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. पण त्याने तब्बल 18 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.
7) जवागल श्रीनाथ ( भारत )
Image source google.com
90 च्या दशकातील भारताचा सर्वोत्तम वेगवान गोविंदाचा एक असलेले जवागल श्रीनाथ हे आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 157 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने गोलंदाजी केली होती. त्याने एकूण 67 सामने खेळलेले असून त्यात 236 विकेट मिळवलेले आहेत. पण त्याने 17 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.
8) ब्रेट ली ( ऑस्ट्रेलिया )
Image source google.com
ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेला ब्रेट ली याने एकूण 76 कसोटी सामने खेळलेले असून त्यात त्याने 310 विकेट्स मिळवलेले आहेत. 2005 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्याने 161.1 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने चेंडू टाकला होता. हा कसोटी मधील सर्वाधिक वेगवान चेंडू ठरला होता. पण या वेगवान गोलंदाजानेही आपल्या कारकिर्दीत एकूण 15 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.
9) डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका )
Image source Pinterest.com
दक्षिण आफ्रिकेची’ स्टेन गन ‘म्हणून ओळखला जाणारा डेल स्टेन हा दक्षिण आफ्रिकेचा आतापर्यंतचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तसेच क्रिकेट विश्वात सर्वोत्तम बॉलिंग ॲक्शन साठीही हा गोलंदाज ओळखला जातो. तसेच कसोटी मध्ये 2343 दिवस नंबर एक चा गोलंदाज म्हणून त्याने विक्रम प्रस्थापित केला होता. त्याने 93 कसोटी सामन्यात 439 विकेट्स मिळवल्या आहेत. इतक्या भारी गोलंदाजांनेही 15 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.
10)मिचेल स्टार्क(ऑस्ट्रेलिया )
Image source jagaran.com
सध्याच्या घडीतील सर्वोत्तम डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख असावी स्टार्क याने नुकताच 100 वा कसोटी सामना खेळला. त्यात त्याने 400 विकेट्स पूर्ण केलेत. या यादीतील हा एकमेव सक्रिय खेळाडू आहे मिचेल स्टार्क ने 2011 मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. परंतु या गोलंदाजानेही एकूण 14 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.
पाकिस्तानचा स्विंग किंग म्हणून ओळखला जाणारा वसीम अक्रम याने 1985 मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. 2002 पर्यंत त्याने 104 सामन्यात 414 विकेट मिळवल्या होत्या. संपूर्ण क्रिकेट विश्वात The King of Swing अशी त्याची ओळख होती. पण त्यानेही कसोटीत एका डावात एकूण बारा वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेल्या आहेत.
12)शोएब अख्तर(पाकिस्तान )
Image source google.com
बालपणी पायाने चालू ही न शकणारा शोएब अख्तर क्रिकेटमधील सर्वात घातक आणि वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला गेला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत फक्त 46 कसोटी सामने खेळले परंतु त्यात 178 विकेट मिळवल्या. त्याने कसोटी मधील 161.3 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने चेंडू टाकून ब्रेट ली चा विक्रम मोडला होता. शोएब अख्तर चा रन अप आणि स्पीड पाहून भले भले फलंदाज त्याच्या गोलंदाजीला घाबरत. तरी शोएब अख्तर ने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 7 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिले आहेत.
निष्कर्ष ( cunclution)
क्रिकेटमध्ये कितीही मोठा गोलंदाज असो जर का त्या दिवशी त्याचा दिवस नसेल तर तो हमखास धावा खर्च करतो. आपण पाहिलेले यादीत एका पेक्षा एक भारी गोलंदाज असतानाही त्यांनी कसोटीच्या एका डावात 100 पेक्षा जास्त धावा बऱ्याच वेळा दिलेले आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय घडून जाईल हे सांगता येत नाही आणि क्रिकेटच सगळ्यांपेक्षा मोठा असतो याची प्रचिती आपल्याला यातून येते. माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका.
सध्याचे क्रिकेट हे खूप फास्ट झाले आहे. बरेच जण म्हणतात की सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये फलंदाजांचा धबधबा असतो हे जरी खरे असले तरी एखाद्या खेळाडूला सामन्यात शतक, द्विशतक आणि त्रिशतक ही झळकावताना आपण पाहिले आहे. त्यामध्ये त्यांची मेहनतही पाहिली आहे पण असे धावांचे डोंगर उभारणे ही काही सोपी गोष्ट नाही. आपल्याला माहीतच आहे की कसोटीत ब्रायन लारा ने नाबाद 400 धावा तसेच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात नावात 501 धावा बनवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मग आपल्या सर्वांना असा प्रश्न पडतो की, क्रिकेट विश्वात सर्वाधिक वैयक्तिक धावा किती येणे कोणी काढल्या असतील ? सांगू ? त्याचे नाव आहे प्रणव धनवडे. या मुंबईकर खेळाडूने एका डावात एक नाही दोन नाही तर तब्बल दहा शतके ठोकली होती. चला तर त्याच्या या विश्व-विक्रमाबद्दल जाणून घेऊया.
323 चेंडू आणि नाबाद 1009 धावा (1009 runs in just 323 balls)
आज आम्ही तुम्हाला अशा एका विश्वविक्रमी खेळी बद्दल सांगणार आहोत की जे वाचून आपल्याला आश्चर्याचा धक्का दर बसेलच शिवाय अभिमानही वाटेल. नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये क्रिकेट विश्वात एक आश्चर्यकारक घटना घडली क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने एकट्याने एका डावात एक हजार धावा बनवल्या. 15 वर्षीय प्रणव धनवडे नावाच्या खेळाडूने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)यांच्या वतीने आयोजित भंडारी कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत दरम्यान ही अद्भुत कामगिरी केली होती. प्रणव धनवडे ने 312 च्या स्ट्राईक रेटने 323 चेंडूत तब्बल नाबाद 1009 धावा ठोकल्या. त्यात 129 चौकार आणि 59 षटकारांचा समावेश होता. त्यात 870 धावा तर त्याने फक्त चौकार आणि षटकारांनीच वसूल केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती एका डावात सर्वाधिक धावा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू बनला होता.
कोण आहे प्रणव धनवडे ?
प्रणव धनवडे चा जन्म 13 मे 2000 रोजी एका गरीब कुटुंबात झाला प्रणव चे वडील प्रशांत धनवडे हे रिक्षाचालक तर आई मोहिनी धनवडे ही एका कॅन्टीनमध्ये काम करायची. प्रशांत धनवडे यांचे प्रणवची मुंबईच्या रणजी टीम मध्ये निवड व्हावी असे स्वप्न होते. त्यासाठी ते प्रणवला खूप प्रोत्साहित करत. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या प्रणवनेही आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आणि अशी विश्वविक्रमी खेळी करून दाखवली.
असा घडला विश्वविक्रम
2016 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने Under 16 ही भंडारी अंतर शालेय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. के.सी.गांधी स्कूल आणि आर्य गुरुकुल स्कूल यांच्यात सामना खेळवला जाणार होता. पण आर्य गुरुकुलचे 11 खेळाडू होत नव्हते. दहावी ची परीक्षा असल्यामुळे शाळेने दहावीच्या मुलांना खेळण्यास मज्जाव केला. तर त्यांच्या एका प्रमुख खेळाडूला घरातून खेळण्यास पाठवले गेले नाही. तरीही आर्य गुरुकुलच्या प्रशिक्षकांनी शक्कल लढवून 11 खेळाडू कसेबसे मैदानात उतरवले. मैदान हे फारसे मोठे नव्हते. त्याची सीमारेषा ही फक्त 30 यार्ड पर्यंत होती. आर्य गुरुकुल चा पहिला डाव फक्त 31 धावांवर आटोपला. त्यानंतर के.सी. गांधी स्कूल ने पहिल्या दिवशी 1 बाद 956 धावांचा डोंगर उभारला. त्यात प्रणवने एकट्याने तब्बल 652 धावा बनवत मुंबईच्या शालेय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला पूर्वी हा विक्रम पृथ्वीच्या शॉ च्या नावावर होता. पृथ्वी शॉ ने 546 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी प्रणवणे नाबाद 1009 धावा बनवत सारे विक्रम मोडीत काढले. प्रणवणे आपल्या या खेळीत 395 मिनिटे क्रीज वर थांबत 323 चेंडूत 1009 धावा बनवल्या. त्यात 129 चौकार आणि 59 षटकारांचा समावेश होता.
सामन्याचा निकाल काय लागला
Imege source from Google
प्रणव धनवडे ने प्रथम आकाश सिंग सोबत पहिल्या विकेटसाठी 546 धावांची भागीदारी केली. नंतर सिद्धेश पाटील सोबत 531 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे के.सी.गांधी स्कूलने 3 बाद 1465 धावांवर आपला डाव घोषित केला. आर्य गुरुकुल स्कूलचा संघ पहिल्या डावात फक्त 31 धावांवर आटोपला. के.सी. गांधी संघाला 1434 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही आर्य गुरुकुल स्कूलचा संघ फक्त 52 धावा च करू शकला. अशा तऱ्हेने के.सी.गांधी स्कूल ने हा सामना एक डाव आणि 1382 धावांनी जिंकला आणि इतिहास घडवला. के.सी. गांधी स्कूलने काढलेल्या 1465 धावा या एका डावातील सर्वाधिक धावा होत्या.
पूर्वी यांच्या नावावर होता हा विक्रम
प्रणव धनवडे च्या नाबाद 1009 धावांच्या खेळीमुळे अनेक विक्रमांना गवसणी घातली गेली. मुंबईच्या शालेय स्पर्धेत पृथ्वी शॉ ने 546 धावा बनवल्या होत्या. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 1899 मध्ये इंग्लंडच्या आर्थर कॉलिंनसने 628 धावा बनवल्या होत्या. त्या सर्वोच्च मानल्या जात होत्या. परंतु 2016 मध्ये खेळलेल्या प्रणवच्या या खेळीने 116 वर्षांपूर्वीचा विक्रम ही मोडीत निघाला आणि अविश्वसनीय आणि कदाचित कधीही न मोडला जाणारा विक्रम प्रस्थापित झाला.
प्रणव धनवडे वर कौतुकाचा वर्षाव
प्रणव धनवडे च्या नाबाद 1009 या खेळीमुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक क्रिकेटर आणि राजकारण्यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्याच्या या खेळीची दखल भारतातच नव्हे साता समुद्र पार परदेशातही घेतली गेली. खुद्द सचिन तेंडुलकर यांनी त्यांची स्वाक्षरी असलेली बॅट त्याला भेट दिली. तर एम एस धोनी आणि अजिंक्य रहाणे यांनी त्याच्या खेळीचे कौतुक केले होते. अजित वाडेकर यांनी त्याला क्रिकेटचे किट भेट दिले होते. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला दरमहा 10000 रुपयांची स्कॉलरशिप दिली होती. तर तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रणवचा पुढील शिक्षणाचा खर्च सरकार करेल असे घोषित केले होते.
प्रणव धनवडे ला काय काय मिळाले ?.
गरीब कुटुंबातील प्रणव धनवडे हा क्रिकेटच्या एका गावात 1000 धावा बनवणारा एकमेव खेळाडू आहे. त्याच्या या अजरामर खेळीचे सर्व स्तरातून कौतुक होत होते. शिवाय त्याच्या या खेळीची दखल बऱ्याच जणांनी घेतली तसेच त्याला पुरस्कार मिळाले होते ते पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहेत.
NDTV ने प्रणवला ‘ इंडिया ऑफ द इयर’ ( India of the Year ) हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
त्याच्या या खेळीची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ‘मध्ये नोंद झाली.
एमसीए कडून त्याला दरमहा दहा हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळाली.
प्रणवणे घेतला पोलिसांशी पंगा
ही काय फारशी मोठी गोष्ट नव्हती. त्याचे झाले असे की प्रणव ज्या मैदानात सराव करत असे त्या मैदानात एका मंत्र्याचे हेलिकॉप्टर उतरणार होते. त्यामुळे सर्व खेळाडूंना मैदानाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. परंतु प्रणवला मैदानातून बाहेर जाण्यासाठी थोडा उशीर झाला होता. त्यामुळे पोलिसांनी प्रणवला फटकारले. प्रणवणे पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे त्याला थेट पोलीस चौकीत नेण्यात आले. विषय काय फार मोठा नव्हता. पण यावर चर्चा मात्र जोरदार झाली होती.
पुढे प्रणवचे काय झाले ?
प्रणव धनवडे याने खेळलेल्या विश्व विक्रमी खेळीमुळे त्याच्याकडून सर्वांच्या खूप अपेक्षा वाढल्या होत्या. काही जण तर त्याला पुढील सचिन तेंडुलकर समजू लागले होते. अपेक्षा आणि दबावामुळे प्रत्येक सामन्यात त्याच्यावर दबाव वाढत गेला त्याची कामगिरी पूर्वीसारखी राहिली नाही. खराब फॉर्म आणि कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे त्याला वेस्ट झोनच्या Under 16 च्या टीम मध्ये स्थान मिळाले नाही. कारण वय बसत नव्हते शिवाय तो मुंबईकडूनही खेळलेला नव्हता. पुढे खराब कामगिरीमुळे त्याला मुंबईच्या Under 19 संघातही संधी मिळाली नाही. इकडे अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली यावरही बरेचसे प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु प्रणवणे स्वतः आपल्या खराब कामगिरीमुळे Under 19 संघात घेतले नसल्याचे कबूल केले होते.त्याच्या वडिलांनी नंतर एमसीए कडून मिळालेली स्कॉलरशिप ही परत केली.
प्रणव धनवडे सध्या काय करतोय?
सततच्या खराब कामगिरीनंतर 2022 मध्ये प्रणव धनवडे सहा महिन्याच्या करारावर क्रिकेट खेळण्यासाठी युनायटेड किंगडम येथे गेला. त्याने नॉर्थ विथ क्रिकेट क्लब कडून खेळताना एक शतक आणि चार अर्धशतके झळकावताना एकूण 715 धावा बनवल्या. शिवाय आपल्या घराला आर्थिक हातभार ही लावला. सध्या प्रणव धनवडे हा 25 वर्षाचा असून तो मुंबईच्या लोकल स्पर्धा खेळत आहे.
निष्कर्ष
एकंदरीत क्रिकेटमध्ये चार अंकी धावसंख्या बनवणारा जगातला पहिला फलंदाज प्रणव धनवडे ने जर आपल्या कामगिरीत सातत्य राखले असते तर आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत आपण त्याला खेळताना पाहिले असते असो प्रणवला आपण त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवूया .प्रणवची ही खेळी आपल्याला आवडली असेल आणि हे वाचून त्याच्या खेळीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले असेल तर लगेच कमेंट करून शेअर करायला विसरू नका.
म्हणतात ना क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षण काहीही घडू शकते. रोज नवनवीन रेकॉर्ड्स हे बनत असतात आणि काही रेकॉर्ड हे बदलत आणि तुटत असतात. क्रिकेटमध्ये कधीकधी असे काही घडू शकते की जे पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. पूर्वी क्रिकेट हे खूप संथ गतीने खेळली जात असे. पूर्वी वनडे सामने हे 50 ते 60 षटकांचे व्हायचे. तरी जेमतेम 250 ते 300 धावाच व्हायच्या. परंतु आताच हे क्रिकेटचे युग खूप फास्ट झाले आहे. आत्ताच्या टी 20 च्या जमान्यात क्रिकेटमध्ये 20 षटकात 250 प्लस धावा सहज बनवल्या जातात. तसेच त्या चेसही केल्या जातात. वनडे सांगण्यात द्विशतके बरीच झालेली आहेत. परंतु त्रिशतक अजूनही झालेले नाही आणि त्याची आपण सर्व आतुरतेने वाटही पाहत आहोत. परंतु आज आम्ही तुमच्यासमोर अशी माहिती सादर करणार आहोत की ती वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. ‘एका वनडे सामन्यात बनवल्या गेल्या 700 प्लस धावा आणि एका खूंखार बॅट्समन ने बनवले नाबाद 400 धावा.’हो , बसला ना आश्चर्याचा धक्का!.’
मित्रांनो मी कोणत्याही क्रिकेट गेम बद्दल सांगत नसून ही खरी रियालिटी आहे. क्रिकेटमध्ये ही घटना बांगलादेश मध्ये गर्दी असून तिथे एका मान्यताप्राप्त वनडे सामन्यात मुस्तकीम हौलादार नावाच्या खेळाडूने हा कारनामा करून दाखवला आहे. त्याने 170 चेंडूचा सामना करताना तब्बल नाबाद 404 धावा बनवल्या. त्याने 237.64 च्या सरासरीने धावा बनवल्या. त्याने तब्बल पन्नास चौकार आणि 22 षटकार मारले. चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया.
क्रिकेट विश्वात खळबळ
Imege source – Google downloder
2025 हे वर्ष खूप उलथा-पालथीचे राहिले आहे. क्रिकेट क्षेत्रातही बरेचसे चढ-उतार राहिले आहेत. त्यात मार्च 2025 मध्ये घडलेली घटना क्रीडा विश्वाला आश्चर्यचकित करणारी ठरली. बांगलादेश मधील ढाका येथील ढाका युनिव्हर्सिटी सेंट्रल ग्राउंड वर केंब्रियन स्कूल अँड कॉलेज आणि सेंट ग्रे गोरी स्कूल अँड कॉलेज यांच्यात हा वनडे सामना खेळवला गेला. या सामन्यात सेंट ग्रे गोरी स्कूल विरुद्ध खेळताना मुस्तकीम हौलादार नावाच्या खेळाडूने वीस फोटो खेळी करताना फक्त 170 चेंडू तब्बल 404 धावा बनवल्या. त्यात तब्बल 50 चौकार आणि 22 षटकार यांचा समावेश होता. म्हणजेच 404 पैकी 332 धावा त्याने 72 चेंडूत चौकार आणि शेतकऱ्यांच्या सहाय्याने बनवल्या. त्याच्या या खेळीने संपूर्ण क्रीडा विश्वात एकच खळबळ माजली आहे.
वनडेत 770 धावांचा डोंगर
केंब्रियन स्कूल आणि ग्रे गोरी स्कूल यांच्यात खेळवला गेलेला वनडे सामना हा शालेय स्तरावरील असून तो जिल्हास्तरावर खेळवला गेला होता. त्यामुळे तो अधिकृत मानला गेला नाही परंतु मुस्तकीम हौलादार च्या या अजब खेळीमुळे हा सामना नेहमी लक्षात राहील. मुस्तकीम ने 170 चेंडूत नावात 404 धावा बनवल्या तर सोआद परवेज ने 124 चेंडूत 256 धावा बनवल्या या दोघांनी 699 धावांची भागीदारी केली या दोघांनी मिळून एकूण 82 चौकार आणि 35 षटकार मारले. या दोघांच्या विस्फोटक खेळीमुळे केंब्रियन स्कूलने 50 षटकात तब्बल 770 धावांचा डोंगर उभारला.
बेधडक दे धडक मुस्तकीम हौलादार
(170 चेंडूत 404 धावा. )404 runs in just 170 balls.
Image source – Google downloder
नववीत शिकणाऱ्या पुस्तके हवालदार ने 260 मिनिटात 237 च्या सरासरीने 170 चेंडूत तब्बल नाबाद 404 धावा बनवल्या त्यात 50 चौकार आणि 22 षटकारांचा समावेश होता नववीतल्या या पोराने न भूतो न भविष्यती अशी खेळी केली. सेंट ग्रेगोरी स्कूलच्या प्रत्येक गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेतला. सेंट ग्रेगोरी च्या प्रत्येक गोलंदाजाचा इकॉनोमी हा 16 धावांच्याही पुढे होता.
738 धावांनी विशाल विजय
मुस्तकीम आणि परवेज यांच्या विध्वंसक खेळीमुळे केंब्रियन स्कूलने 50 षटकात तब्बल 770 धावा बनवल्या. या अशक्य प्राय आव्हानाचा पाठलाग करताना सेंट ग्रेगोरी स्कूल च्या फलंदाजानी अक्षरशः नांग्या टाकल्या. त्यांचा संपूर्ण संघ हा 11 षटकात फक्त 32 धावांवर ऑल आउट झाला. अशा तऱ्हेने कॅम्ब्रीयन स्कूल ने हा सामना तब्बल 738 धावांनी जिंकला.
निष्कर्ष
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. मग तो शालेय स्तरावरील असो किंवा इंटरनॅशनल स्तरावरील असो. रोज नवनवीन विक्रम हे होतच राहतात.मुस्तकीम हौलादार च्या नाबाद 404 धावांची खेळी ही वनडे सामन्यातील आजवरची सर्वोच्च खेळी आहे. हे निश्चितच मान्य करावे लागेल. ही अद्भुत माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व शेअर करायला विसरू नका.
फलंदाजी करणाऱ्या संघाला एक ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 23 धावा हव्या होत्या. आव्हान तसे खूप कठीण होते परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला आपण जिंकू शकतो याची जणू खात्रीच होती कारण हे तसेच होते. कारण फलंदाजी करणारा फलंदाज ही तितकाच खतरनाक आणि भरवशाचा होता. पहिला चेंडू निर्धाव जाऊनही त्या फलंदाजाने पुढील पाच चेंडूत चार षटकार मारून हा सामना एक हाती जिंकून दिला. त्याचे नाव होते कृष्णा लक्ष्मण सातपुते. ‘ क्रिकेटचा देव’ असा शब्द उच्चारला की सर्वांच्या डोळ्या समोर Sachin Tendulkar यांचा चेहरा आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचा हा हिरा जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. सचिन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही खेळाडूला आपण The God of cricket म्हणू शकत नाही. परंतु Krishna Satpute नावाच्या वादळाने आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं. टेनिस क्रिकेट विश्वावर ज्याने अधिराज्य गाजवल, टेनिस क्रिकेटला नवीन ओळख निर्माण करून दिली. म्हणूनच त्याला God of tennis cricket असे म्हटले जाते. अशा कुर्डूवाडी सोलापूरच्या कृष्णा सातपूतेचा संघर्ष सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे. चला तर पाहूया त्याचा संपूर्ण जीवन प्रवास.
कृष्णाचा जन्म ( date of birth)
कृष्णा सातपुते याचे आयुष्य संघर्षमयी होते. भारतानं1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला आणि त्याच वर्षी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ढवळस रेल्वे स्थानकाच्या रेल्वे क्वार्टरमध्ये कृष्णा सातपुते याचा जन्म 1 मे 1983 रोजी झाला. कृष्णाचे वडील रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यामुळे ढवळस रेल्वे स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या रेल्वे क्वार्टरमध्ये त्यांचे संपूर्ण बालपण गेले. लहान वयात कृष्णाचा स्वभाव खोडकर होता. मस्ती करणे, झाडावर चढणे, लपून बसणे, खोड्या काढणे त्यामुळे अनेक वेळा त्याने वडिलांचा सुद्धा खूप मार खाल्ला आहे.सध्या कृष्णा सातपुते हा 42 वर्षाचा असून उत्तम प्रकारे क्रिकेट खेळत आहे.
कृष्णाचे शालेय शिक्षण
कृष्णाचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण ढवळस गावातील जय जगदंबा विद्यालय या शाळेत झाले. त्यानंतर वडिलांची कुर्डूवाडी मध्ये बदली झाली व पुढील शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, कुर्डूवाडी येथे पूर्ण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण के.एन.भिसे कुर्डूवाडी या महाविद्यालयात त्याने घेतले. या कालखंडात त्यांनी क्रिकेटवर असलेले प्रेम जराही कमी होऊ दिले नाही. शालेय जीवनात तो फार रमला नाही, कारण मैदानात चौकार आणि षटकार खेचण्यात जो आनंद त्यांना मिळत होता, तो आनंद शाळेच्या चार भिंतीमध्ये त्याला कधी मिळाला नाही. इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर बहूदा त्यांनी पुढे शिक्षण घेतले नाही.
कुर्डूवाडीमध्ये कृष्णा सातपुते याच्या क्रिकेट कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्याने लहान असतानाच मोठ्या पोरांमध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्याच्या फलंदाजीचे तेव्हाही सर्वांना कौतुक होते. निर्भीड आणि धमाकेदार फटकेबाजी करत असल्यामुळे चांगल्या चांगल्या गोलंदाजांचा सुद्धा त्याने लहान वयात घाम काढला आहे. सहावीत असताना सिनियर खेळाडूंनी मारलेले बॉल आणण्याचे काम कृष्णा करत होता. त्याच्या मनात क्रिकेट खेळण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे त्याने शाळेतले मित्र आणि गावातील मित्र याची टीम बनवली व रबर बोलणे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी सर्फराज आणि रंजीत या दोन मित्रांनी ती टीम स्पॉन्सर केली होती. त्यावेळी जय हिंद नावाची मोठी टीम त्या भागात खेळत होती. त्यांच्याविरुद्ध कृष्णा ने अशी काही फटकेबाजी केली की त्यांनी त्याला आपल्या टीम मध्ये खेळण्यास बोलावले.
शालेय क्रिकेट ते प्रतीक XI डिंगडाँग पर्यंतचा प्रवास
जय हिंद संघाकडून खेळताना कृष्णाने अनेक स्पर्धा गाजवल्या. अशातच इंदापूर येथील स्पर्धेत पुण्यातील प्रसिद्ध आणि बाप संघ म्हणून ओळख असलेल्या प्रतीक XI संघाविरुद्ध त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचे त्याने सोनं केलं आणि प्रतीक XI मधील दिग्गज गोलंदाजांवर जबरदस्त प्रहार करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.त्याने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. खऱ्या अर्थाने कृष्णाच्या या खेळीमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सामना झाल्यानंतर प्रतीक XI संघाचे मालक विशाल कांबळे आणि संदीप जगताप यांनी स्वत: कृष्णाशी संपर्क साधून त्याला संघातून खेळण्यासाठी आमंत्रित केले.त्यावेळी कृष्णा कडे मोबाईल नव्हता. शेजारच्या टेलिफोन वरून कॉल करून त्याला खेळण्यासाठी बोलावत. त्या दिवसापासून कृष्णाच्या टेनिस क्रिकेट पर्वाला सुरुवात झाली.
एकाच महिन्यात कृष्णा पोरका झाला अन्…
एकीकडे कृष्णाची क्रिकेट कारकिर्द बहरत होती. मात्र दुसरीकडे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांना कॅन्सरचे निदान झाले आणि कुटुंबाला मोठा हादरा बसला. कृष्णाने वडिलांवर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, कर्ज काढून अमाप खर्च केला. परंतु त्याचे वडील वाचू शकले नाहीत. 2003 मध्ये त्यांचे निधन झाले. कृष्णा या दु:खातून सावरणार तोच वडिलांच्या निधनाचा आईला जबर धक्का बसला होता. त्या दु:खातून त्याची आई ही सावरू शकली नाही आणि वडीलांच्या पाठोपाठ आईचे सुद्धा त्याच महिन्यात निधन झाले. एकाच महिन्यात कृष्णा पोरका झाला. एकीकडे आई वडीलांच्या मृत्यूचा शोक, दुसरीकडे त्याची पत्नी गर्भवती होती त्यांचं टेंशन. वडिलांच्या आजारपणात बराच पैसा खर्च झाला होता. त्यामुळे कर्जही खूप झाले होते. त्यामुळे त्याने वाटेल ते काम करायला सुरुवात केली. बिगारी, रोजंदारी मजूर म्हणून सुद्धा त्याने काम केले. अनेक संकटे चहूबाजूंनी घोंघावत होती. परंतु कृष्णाने क्रिकेट खेळणे काही थांबवले नाही. एका मुलाखतीत कृष्णाने सांगितले होते की, त्याच्यावर एक वेळ अशी आली होती. जेव्हा त्याच्याकडे बायकोला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा भंगार विकून त्याने पैसे आणले होते. त्याचा आयुष्यातील ही पहिली आणि शेवटची चूक होती, असे त्याने तेव्हा म्हटल होतं. त्यानंतर कृष्णाने ती चूक पुन्हा कधीच केली नाही.
क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट…
Credit: google.com
क्रिकेट वेड्या कृष्णाने आपले क्रिकेट प्रेम कायम ठेवत खेळात सातत्य ठेवलं आणि पुण्यामध्ये प्रतीक XI कडून खेळायला सुरुवात केली. याच काळात तो पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील एका कंपनीमध्ये नोकरी करू लागला. मात्र मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारा कृष्णाला ऑफिसच्या चार भिंती कोठडी प्रमाणे भासत होत्या. एकदा त्याचा बॉस त्याला ‘आप काम नही कर सकते आप सिर्फ क्रिकेट ही खेलो.’ असा म्हणाला होता. तेंव्हा पासून कृष्णाने पूर्ण वेळ क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि मैदान गाजवायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या खेळाचा स्तर उंचावत गेला. त्याच्या फलंदाजीने त्याने टेनिस क्रिकेटमधील मातब्बर गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढले. त्याच्या फलंदाजीची क्रेझ तरुणांमध्ये निर्माण झाली. फक्त कृष्णाची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करू लागले. त्याने सुद्धा चाहत्यांचा हिरमोड केली नाही. अनेक शतकं, अर्धशतक ठोकून त्याने आपल्या फलंदाजीचा धडाका कायम ठेवला. 2019 मध्ये गोव्याच्या एका मोठ्या स्पर्धेत प्रतिक 11 विरुद्ध रायगड हे दोन्ही संघ फायनलमध्ये एकमेकांच्या विरुद्ध येऊन ठेपले. दोन्ही बाप संघ आमने सामने आल्यामुळे चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी होती. फायनल ला प्रतीक XI संघाला जिंकण्यासाठी 8 षटकांमध्ये 88 धावा करायच्या होत्या. मात्र प्रतीक XI ची सलामीची जोडी आणि मधली फळी कोसळली होती. प्रतीक XI चे 5 गडी 17 या धावसंख्येवर बाद झाले होते. त्यामुळे सर्व भार कृष्णाच्या खांद्यावर आला होता. कृष्णाने या परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता तुफान फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची त्याने आतषबाजी केली आणि 1 षटक राखून प्रतीक XI संघ विजयी झाला.
कृष्णा सातपुते मुळे लोकांचा टेनिस क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
Image credit : Google .com ISPL.
इंग्लंडमध्ये झालेल्या ICC CRIO चषकामध्ये भारत विरुद्द पाकिस्तान सामन्यामध्ये त्याने भारताच्या टीमचे सदस्य होता. तसेच 2022 साली झालेल्या सहा संघांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्यावर भारताच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, युएई, ओमान आणि कॅनडा या सहा देशांचा समावेश होता. एकेकाळी कृष्णाने स्वतः म्हटले होते की, टेनिस क्रिकेट ला एखादे मोठे व्यासपीठ मिळेल आणि टेनिस क्रिकेट ला सुगीचे दिवस येतील. आणि खरच सध्या ISPL मुळे टेनिस क्रिकेट ला सुगीचे दिवस आले आहेत. आज रोजी कृष्णाने आपली चाळिशी जरी ओलांडली असली तरी या ISPL ही त्याच्या नावाची चर्चा नेहमी होत असते. वाघ जणू म्हातारा जरी झालेला असला तरी त्याच्या नावाची दहशत नेहमीच असते. याचीच प्रचिती ज्यावेळी कृष्णा सातपुते मैदानात उतरतो त्यावेळी होते. म्हणूनच त्याला कुर्डूवाडी चा डॉन म्हणतात.
कृष्णा सातपुते आणि विक्रम
टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णाने भारताकडून खेळताना सर्वाधिक 23 शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत टेनिस क्रिकेटमध्ये 25 हून अधिक शतकांची नोंद त्याच्या नावावर आहे.
2001 मध्ये एकाच सामन्यात 14 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम त्याने केला होता.
एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आतापर्यंत तीन वेळा केला आहे.
त्याने आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक पारितोषिकं जिंकली असून त्यामध्ये अनेक दुचाकींचा समावेश आहे.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम फक्त कृष्णा सातपुतेच्या नावावर आहे.
कृष्णा सातपुतेने आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीत अनेक वेळा एकहाती सामने आपल्या संघांना जिंकून दिले आहेत. त्याच्या बॅटमधून निघणारे चौकार आणि षटकार पाहण्यासाठी चाहते मैदानांमध्ये मोठ्या संख्येने तेव्हाही गर्दी करत होते आणि आजही गर्दी करत आहेत. चाहता वर्ग देशाच्या कानाकोपऱ्यात असल्यामुळे देशभरातली विविध संघ त्याला खेळण्यासाठी आमंत्रित करतात.
कृष्णा सातपुते च्या सर्वोत्तम खेळी – best knock by Krishna Satpute
Credit: google.com
[ Most fit player of the year ]
कर्नाटकातील कारवारमध्ये खेळत असताना त्याने 57 चेंडूमध्ये 159 धावांची धुवाधार खेळी केली होती. त्याचा आक्रमक पवित्रा पाहून विरुद्ध टीमसह चाहते सुद्धा आवाक झाले होते.
कर्नाटक मधील बेळगाव येथे त्या काळची सर्वोत्तम असलेली दौंडच्या टीम बरोबर फायनल मॅच मध्ये कृष्ण सातपुते ने एक अजरामर खेळी केली होती. जिंकण्यासाठी दहा षटकांमध्ये 110 धावांची गरज असताना 35 वर 5 विकेट जाऊनही सतीश पठारे आणि विजय पावले सारख्या मातब्बर गोलंदाजांचा चा खरपूस समाचार घेत कृष्णाने 65 धावांची खेळी केली आणि हा सामना एक ओव्हर राखून जिंकला.
रतन बुवा ट्रॉफी मध्ये त्या काळची सर्वोत्तम असलेली लॉईड टीम बरोबर 78 धावांची गरज असताना वैयक्तिक नाबाद 62 धावांची खेळी करून कृष्णा सातपुते ने आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता.
कोलकता मधील एका लोकल टीमने त्यांच्या टीम मध्ये खेळण्यासाठी कृष्णाला बोलावले होते. तेथील बेस्ट टीम बरोबर त्यांची मॅच होती जिंकण्यासाठी 117 धावांची आवश्यकता असताना 36 वर 6 विकेट जाऊनही कृष्णाने 75 धावांची अफलातून केली त्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटसमन असे सर्वच पुरस्कार मिळाले होते.
केलेले उपकार जाणणारा कृष्णा सातपुते –
कृष्णा सातपुते याने क्रिकेटच्या दुनियेत बरेच विक्रम केले आहेत. खूप नाव कमावले आहे. परंतु संकटकाळी त्याला ज्यांनी मदत केली होती त्यांना तो कधीच विसरत नाही. 2012 साली ज्यावेळी त्याने स्पोर्ट्स कपड्यांचे दुकान चालू केले होते त्यावेळी मयूर स्पोर्ट्स चे मालक राजू भालेकर यांनी त्याला आर्थिक पाठबळ दिले होते व कीट साठी सपोर्ट केला होता. याचे महत्त्व तो नेहमी सांगत असतो. तसेच संतोष नाणेकर यांचे tennis cricket.in, अजय दादा दूधभाते यांचे crickelife.in , तसेच तारीक भाई यांचे 77.in यांद्वारे टेनिस क्रिकेटचे लाईव्ह प्रक्षेपण देशांतर्गत जसे की दिल्ली मुंबई कर्नाटक या ठिकाणी शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबई, कतार आणि गल्फ – आखाती देशात पोहोचवण्याचे काम या प्रसारमाध्यमांनी केले आहे. त्यांच्यामुळेच कृष्णाचा खेळ पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळाली. या सर्वांचे आभार कृष्णा सातपुते वेळोवेळी मानत असतो हे आपल्या सर्वांना परिचितच आहे.
कृष्णाचे कार आणि बाईक कलेक्शन (krishnas car and bike collection)
एकेकाळी गरजेच्या वेळी शेजारच्या कडे कार आणि बाईक साठी बोलणी खाणारा, बिगारी काम करणारा, वेळप्रसंगी भंगार चोरून विकणाऱ्या कृष्णाकडे आज वीस पेक्षा जास्त टू व्हीलर व चार फोर व्हीलर गाड्या आहेत. हे सर्व काही शक्य झालं आहे ते फक्त क्रिकेटमुळेच. 2010 मध्ये त्यांनी सर्वप्रथम प्लॅटिना बाइक जिंकली. तर 2014 मध्ये पहिली फोर व्हीलर कार सेंट्रो त्याला मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आज त्याच्या घरांमध्ये वीस पेक्षा जास्त गाड्या दिमाखात उभ्या आहेत.
हेलिकॉप्टर शॉट आणि कृष्णा
Helicopter shot 🚁
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर शॉट साठी प्रसिद्ध आहेत. तर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कृष्णा सातपुते हा हेलिकॉप्टर शॉट साठी ओळखला जातो. समोर कोणताही गोलंदाज असो त्याचा उत्तम प्रकारे टाकलेला यॉरकर बॉल ही कृष्णा अगदी सहज सीमापार पाठवतो. या हेलिकॉप्टर शॉट द्वारे कृष्णा ने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. सध्याच्या घडीला हेलिकॉप्टर शॉट म्हणजेच’ कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका ‘अशी ओळख निर्माण झाली आहे.
FAQ –
कृष्णा सातपुते कोणाला आपला रोल मॉडेल मानतो?
उत्तर – संजय नागटिळक ( मध्य प्रदेश ).
कृष्णा सातपुते चा टेनिस क्रिकेट मधील आदर्श खेळाडू कोण आहे ?
उत्तर – उमेश मांजरेकर सर (कोल्हापूर ).
कृष्णा सातपुते च्या मते टेनिस क्रिकेटमधील त्याला सर्वात कठीण वाटणारा गोलंदाज कोण होते?
उत्तर – कै. संदीप दाभाडे, सतीश पठारे आणि भावेश पवार
सध्याच्या घडीतील कृष्णा सातपुते चा सर्वात आवडता फलंदाज कोण आहे. ?
उत्तर – बबलू पाटील.
सध्याच्या घडीतील कृष्णा सातपुतेचा सर्वात आवडता गोलंदाज कोण आहे?
उत्तर – तुकाराम गुंजे.
कृष्णा सातपुते चा सर्वात आवडता क्रिकेट शॉट कोणता आहे ?
उत्तर – हेलिकॉप्टर शॉट, बैठक शॉट आणि लोफ्टेड स्ट्रेट शॉट.
कृष्णा सातपुते चा सगळ्यात आवडता फॅन कोण आहे ?
उत्तर – अतुल थोरात ( खेडगाव ) आणि किशोर मदने ( पुसेगाव ).
कृष्णा सातपुते यांना 2025 चा कोणता पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर – मोस्ट फिट प्लेअर ऑफ दी इयर . ( Most fit player of the year.)
निष्कर्ष
कृष्णाने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना आकर्षीत केलेच. परंतु त्याबरोबर त्याने भारतीय संघाचे दिग्गज खेळाडूंना सुद्धा आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले. सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग सारख्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंनी कृष्णाचा खेळ पाहिला आहे. तसेच त्याचे तोंड भरून कौतुक सुद्धा केले आहे. टेनिस क्रिकेटला नवीन ओळख मिळवून देण्यामध्ये नक्कीच कृष्णा सातपुते याचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहते लांब लांबून मैदानामध्ये आपली उपस्थिती दर्शवतात. तुम्ही कृष्णाचा सातपुते याचा खेळ पाहिला आहे. पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या खेळाडूची माहिती सर्वांना व्हावी म्हणून जास्तीत जास्त शेअर सुध्दा करा.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपच्या ( WTC final 2025 ) अंतिम सामन्यात साउथ आफ्रिकेने अफलातून खेळ करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. साउथ आफ्रिकेने तब्बल 27 वर्षानंतर आयसीसी ची ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. याबरोबरच त्यांनी आपल्यावरील चोकर्स नावाचा डाग पुसून काढला. यापूर्वी साउथ आफ्रिकेने 1998 मध्ये वेस्ट इंडीज ला नमवत आयसीसी ची पहिली ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून आजपर्यंतचा त्यांचा हा संघर्ष आजच्या या विजयाने सफल झाला असेल म्हणावे लागेल.
टेस्ट चॅम्पियनशिप ची रेस –
आयसीसी ने टेस्ट क्रिकेट जिवंत रहावे व त्यातील रंजकता टिकून राहावी यासाठी दर दोन वर्षांनी टेस्ट चॅम्पियनशिप आयोजित करण्याचे ठरवले. त्यात त्यांनी अव्वल 9 संघाचा समावेश केला. त्यानुसार 2021 मध्ये सर्वप्रथम न्यूझीलंड हा चॅम्पियन ठरला. तर सन 2022 23 या सालचा टेस्ट चॅम्पियन ऑस्ट्रेलिया ठरला. त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला. यंदाच्या वर्षी साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळाली. आफ्रिकेने या दोन वर्षात एकूण 12 सामने खेळले व त्यात त्यांनी 8 विजय आणि 3 पराभव स्वीकारले. त्यांनी 69.44 पॉइंट सह अव्वल स्थान राखले. तर ऑस्ट्रेलियाने 19 सामन्यात 13 विजय व 4 पराभव स्वीकारले. परंतु त्यांचे 67.54 पॉईंट झाले. भारताचे 50 पॉईंट असल्याकारणाने साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला.
चॅम्पियन साऊथ आफ्रिका ( This time for Africa)
Imege credit source from Google.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना हा ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हा सामना 30000 प्रेक्षक क्षमता असलेल्या लॉर्ड्स च्या मैदानावर खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकी कॅप्टन बवूमा ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा त्याचा निर्णय सार्थ ठरवताना कगिसो रबाडाने 15 षटकात 51 धावा देऊन 5 बळी मिळवले. तर मार्को जान्सनने त्याला उत्तम साथ देताना तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांवर आटोपला. पेट कमिन्स च्या धारदार गोलंदाजीमुळे आफ्रिकेचा पहिला डाव फक्त 138 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने 74 धावांची महत्त्व पूर्ण आघाडी मिळवली होती. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात आहे रबाडाने सुरेख गोलंदाजी करताना चार गडी गारद केले. मिचेल स्टार्क च्या साहसी ५८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावावर आटोपला. आफ्रिकेला जिंकण्यासाठी 282 धावांचे आव्हान मिळाले. परंतु खडतर सुरुवातीनंतर एडम मारक्रम चे धमाकेदार शतक आणि टेंबा बवूमा ची झुंजार 66 धावांच्या खेळीमुळे आफ्रिकेने हा अविस्मरणीय सामना जिंकला. आणि पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियन बनले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 282 धावांचा पाठलाग करत असताना आफ्रिकेचे दोन फलंदाज स्वस्तात बाद झाले. परंतु मारक्रम ने एक बाजू सांभाळून ठेवली होती. तर त्याला बवूमाची उत्तम साथ मिळाली. या दोघांमध्ये 143 भागीदारी झाली. यात मारक्रम ने २०७ चेंडूंचा सामना करताना 136 धावांची खेळी केली. त्यात त्याने 14 चौकार मारले. तर बवूमाने 134 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्यात त्याने पाच चौकार मारले. या दोघांच्या खेळी मुळे लॉर्ड्स वरील दुसरी सर्वोत्तम धावसंख्येचा पाठलाग करण्यात आफ्रिकेला यश आले. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मारक्रम ने एका खास यादी स्थान मिळवले. सौरभ गांगुली आणि रिकी पाँटिंग सह त्याने आयसीसीच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंची यादी स्थान मिळवले. यापूर्वी फक्त 7 खेळाडूंनीच अंतिम सामन्यात शेतकी खेळी केली आहे. शिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात दुसऱ्या डावात शतक मारणारा तो एकमेव खेळाडू बनला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकणारा दक्षिण आफ्रिका हा तिसरा संघ ठरला असून त्यांनी WTC ची फायनल जिंकून कोट्यावधी रुपयांची बक्षीसे ही जिंकली आहेत. त्यांना सुमारे 30.7 कोटी म्हणजेच 3.6 दशलक्ष डॉलर्स बक्षीस म्हणून मिळाले. तर ऑस्ट्रेलियाला 18.53 कोटी रुपये म्हणजेच 2.16 दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम मिळाली आहे. तर तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या भारताला 12.30 कोटी रुपये मिळाले. पाकिस्तानला सर्वात कमी म्हणजेच चार लाख 80 हजार डॉलर्स मिळाले.
T20 वर्ल्ड कप पेक्षा WTC जिंकणाऱ्या संघाला मिळाली जास्त रक्कम
2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताने T20 वर्ल्ड कप जिंकले. त्यावेळी त्यांना 20.4 कोटी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. तर 2025 ची IPL विजेता RCB चा संघ यांना वीस कोटी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. परंतु WTC च्या विजेत्या संघाला म्हणजे दक्षिण आफ्रिकेला 3.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 30.7 कोटी एवढी बक्कळ रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.
FAQ –
1) डब्ल्यूटीसी फायनल सामन्यातील पंच कोण होते ?
उत्तर – मेन पंच – ख्रिस गफनी, रिचर्ड एलिंगवॉर्थ
3rd umpire – रिचर्ड कटलब्रो.
मॅच रेफ्री – जवागल श्रीनाथ.
2) WTC 2025 फायनल चे प्रक्षेपण कोठे करण्यात आले?
उत्तर – जिओ हॉट स्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.
3) WTC 2025 फायनल मधील सामनावीर कोण ठरले?.
उत्तर – ॲडम मारक्रम. (136 धावा आणि 2 बळी. )
4) साऊथ आफ्रिकेने पहिली आयसीसी ट्रॉफी केव्हाची दिली होती ?
उत्तर – 1998 विरुद्ध वेस्ट इंडीज.
5) WTC ची बक्षीस रक्कम दक्षिण आफ्रिकेला किती मिळाली आहे ?
“क्या भागता है, क्या गती है और क्या गेंदबाजी करता है. गजब है भाई !” हे आकाश चोपडा यांच्या कॉमेंट्रीतून निघालेले गौरवोदगार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एका धगधगत्या वादळाविषयीचे. आणि त्या वादळाचे नाव आहे विजय जयसिंगराव पावले. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे ब्रँड अँबेसीडर असलेला विजय पावले. आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने भल्या भल्यांच्या दांड्या गुल करणारा विजय सध्याच्या घडीतील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. MPL म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीगही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा तसेच ISPL म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा विजय पावलेने खऱ्या अर्थाने गाजवली. आणि पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा साऱ्या भारतभर सुरू झाली. सांगली एक्सप्रेस, रफ्तार का राजा, टेनिस क्रिकेटचा डेल स्टेनअशा टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या विजय पावले चा म्हणजेच आपल्या विजू भाऊंचा संपूर्ण जीवन प्रवास आपण आता जाणून घेऊया.
Vijay Pavale : The Sangli Express Biography
विजय पावले यांचा परिचय
पूर्ण नाव – विजय जयसिंगराव पावले
जन्मतारीख – 16 ऑगस्ट 1989. ( 36 वर्षे )
गाव – मांगले , ता – हातकणंगले , जि – सांगली.
प्राथमिक शिक्षण – जिल्हा परिषद शाळा ,मांगले.
माध्यमिक शिक्षण – श्री मंगलनाथ विद्यामंदिर, मांगले.
उच्च माध्यमिक शिक्षण – विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा.
पुणे युनिव्हर्सिटी मधून डिफेन्स आणि स्ट्रेटीजिक स्टडीत रिसर्च केला आहे आणि नक्षलवाद व समाज यावर काम केले आहे.
विजय पावले यांचा जन्म 16 ऑगस्ट 1989 साली सांगली जिल्ह्यातील मांगले या छोट्याशा खेडेगावात झाला. यांचे पूर्ण नाव विजय जयसिंगराव पावले आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा – मोरणा नद्यांच्या संगमावर असलेले मांगले हे गाव पुर्वीपासून सधन म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव पावले तसेच आईचे नाव उषाताई पावले होते. तसेच त्याला एक भाऊ ही राहुल पावले. तो ही त्याच्या गावाच्या टीम मधून क्रिकेट खेळतो. मांगले गाव जरी पूर्वी पासून सधन असले तरी पावले कुटुंबीयांची घरची परिस्थिती हालाखीची होती. छोट्या शेतीत हे पावले कुटुंब कसेबसे गुजराना करत असे. त्यांच्याकडे दुभती जनावरे होती. दूध विक्री करून ते उदरनिर्वाह करत असे. भाऊंना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. पहाटे उजाडल्या नंतर सायंकाळी अंधार पडेपर्यंत फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच असा त्यांचा दिनक्रम असे. त्यामुळे त्यांना खूप बोलणीही खावी लागत असे. परंतु लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्यातच काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्येच पुढे जाण्याचे ठरवले. शालेय जीवनातच त्यांनी आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवण्यास सुरुवात केली होती. गोलंदाजी आणि फलंदाजी ते चांगल्या पद्धतीने करत होते. परंतु ग्रामीण भागातून असल्याकारणाने त्याकाळी त्यांना फारशी संधी मिळाली नाही. घरची परिस्थिती हालाखीची असल्याकारणाने मिळेल ते काम करून त्यांनी घराला हातभार लावला. पण त्यातही क्रिकेट खेळणे हे सुरू होते. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले. विजय पावले यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून डिफेन्स आणि स्ट्रेटीजिक स्टडीत रिसर्च केला आहे आणि नक्षलवाद व समाज यावर काम केले आहे.
विजय पावले यांना लहानपणापासून शिक्षणाबरोबरच क्रिकेट या खेळाची प्रचंड आवडत होती. ही आवड जपण्यासाठी बऱ्याच वेळा त्याला मोल मजुरी सुद्धा करावी लागली. तो शाळा सुटल्यानंतर गावातीलच एका किराणा मनाच्या दुकानात काम करत असेल तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी गवंडीच्या हाताखाली काम करत असे तसेच शेतात मोल मजुरी म्हणजेच मिळेल ते काम करून शिक्षणाबरोबर खेळायची आवड तो जोपासत होता. तसेच आपला स्वतःचा खर्चही भागवत असे.
स्पर्धात्मक क्रिकेट आणि कोकणची साथ
विजय पावले यांच्या व्यावसायिक क्रिकेटची खऱ्या अर्थाने सुरुवात कोकणच्या मातीतून झाली आहे. लहान वयातच विजय पावले यांचा बहारदार खेळ सर्वांना प्रभावित करत होता. त्यात त्यांना पहिली संधी मिळाली ती कोकणच्या लांजा तालुक्यातील शिपोशी गावातील महाराष्ट्राच्या अंडर 19 समर कॅम्प मार्फत. या संधीचा फायदा उचलत विजय पावलेनी आपला बहारदार खेळ दाखवून सर्वांना मंत्र मध्ये केले. पुढे त्यांचा खेळ पाहून उमेश पटवाल सरांनी त्यांना पुण्यात PDPL ( पुणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ) खेळण्यास आमंत्रित केले. परंतु ऑक्शन मध्ये विजय ला कोणी घेतले नाही. ते थोडेसे निराश झाले. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना एका जखमी खेळाडूच्या बदली संघात घेण्यात येणार होते. विजय पावले नी कोणताही विचार न करता सरळ पुण्याकडे धाव घेतली. मांगले ते पुणे असा संपूर्ण रात्रीचा प्रवास त्यांनी ट्रक द्वारे केला. शेवटी भुकेने व्याकूळ होऊन ते स्टेडियम जवळच झोपी गेले. ‘खेळाविषयी किती प्रेम आणि आपुलकी.’ या स्पर्धेत त्यांनी एकूण 16 बळी घेऊन आपली निवड सार्थ असल्याचे सिद्ध करून दाखवले.
विजय पावले यांच्या व्यावसायिक टेनिस क्रिकेटची सुरुवात चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावातील तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे या संघापासून झाली. त्याकाळी तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे हा खूप मजबूत संघ होता आणि त्यात संजय वाखरे सचिन वाखरे यांच्या साह्याने विजय ला खेळायची संधी मिळाली. त्याकाळी पुण्याची डिंग डॉंग ही टेनिस विश्वातील सर्वोत्तम टीम होती आणि याच टीम बरोबर मंडणगड मध्ये तिरुपती सावर्डे यांची मॅच झाली. ही मॅच डिंगडॉंग टीमने जरी जिंकली असली तरी विजय पावलेने मात्र या मॅच मध्ये सर्वांची मने जिंकली. कारण या मॅच मध्ये विजयने दोन षटकात फक्त 3 धावा देऊन तब्बल 6 बळी मिळवले होते. त्यावेळी या कामगिरीची दखल साऱ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाने घेतली. नंतर विजय काही काळ दौंड संघाकडून खेळले शेवटी त्यांच्या खेळाच्या जोरावर त्यांना डिंगडॉंग च्या संघाने आपल्या संघात बोलावून घेतले. आणि आज ते त्या संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. परंतु आजही ते तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे या संघाला विसरले नाहीत. कोणतीही मोठी स्पर्धा असो जर तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे हा संघ त्यात असला तर विजय पावले हे त्या संघाकडून हमखास खेळताना आपल्याला दिसतात. माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याने आपले पाय जमिनीवरच ठेवावे याचे हे उत्तम उदाहरण आहे.
कोकणातून सुरू झालेला प्रवास विजय पावलेंच्या प्रभावी कामगिरीमुळे दुबई, शारजा, कतार पर्यंत जाऊन पोहोचला होता. एकेकाळी स्थानिक लेवल वर खेळणारे विजय आंतरराष्ट्रीय खेळाडू झाले. पुढे शारजा, दुबई येथे होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. त्यांच्या अफलातून कामगिरीमुळे भारताने हा सामना सुद्धा जिंकला. पुढे त्यांना बऱ्याच देशात जसे की कतार, कुवेत, दुबई येथे खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले.
आयपीएल कॅम्प आणि नेट बॉलर :
विजय पावलेनी बॉश कंपनीत क्वालिटी इंजिनियर तर ओपो कंपनीत ट्रेनर म्हणून काही काळ नोकरी केली. परंतु त्यांचे क्रिकेट खेळणे हे चालूच होते. सकाळी नोकरी आणि संध्याकाळी सराव चालूच होता. त्यांच्या करिअरमध्ये सर्वात मोठा ट्रेनिंग पॉईंट म्हणजे आयपीएलचा कॅम्प. त्यांच्यातील गुणवत्ता पाहून रोहन पाटे सरांनी त्यांना मुंबई इंडियन्सच्या कॅम्प मध्ये एज ए नेट बोलर म्हणून पाठवले. तिथे त्यांनी रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांसारख्या दिग्गजांना गोलंदाजी केली शिवाय शोन पोलाक आणि मुनाफ पटेल यांच्याकडून गोलंदाजीचे धडे ही गिरवले. याचा फायदा त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये झाला. कारण आतापर्यंत फक्त जोर जोरात गोलंदाजी करणारा विजय व्हेरिएशन करून अधिक घातक गोलंदाज बनला होता. बॅक ऑफ द हँड स्लॉवर , यॉर्कर आणि डेडली स्पीड यांचा सुरेख संगम साधत त्यांनी भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या.
MPL मधील कामगिरी :
Vijay Pavale performance in MPL 2024
आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्रातील खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ मिळावे यासाठी MPL म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीगची स्थापना करण्यात आली. या लीग मध्ये 20000 च्या बेस प्राईज वर रत्नागिरी जेट्स संघाने विजय पावले ना आपल्या संघात घेतले. या संधीचा फायदा उचलत विजय पावलेंनी स्पर्धेत 9.41 च्या इकॉनोमीने 7 बळी मिळवले. पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही परंतु अंतिम सामन्यातील विजय पावलेनी केदार जाधवची घेतलेली विकेट मात्र कायम लक्षात राहिली. पॉइंट टेबल मध्ये अव्वल असल्याकारणाने रत्नागिरी जेट्स हा संघ विजेता घोषित करण्यात आला. लेदर क्रिकेटचा फारसा अनुभव नसतानाही उत्तम कामगिरीने विजयने मात्र सर्वांचे मन जिंकले. याचीच पोचपावती की काय त्यांना महाराष्ट्राच्या रणजी संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी 2023 मध्ये झारखंड विरुद्ध पदार्पण केले.
ISPL मधील कामगिरी :
Vijay Pavale got man of the match in ISPL 2024.
आपल्या देशात टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या खूप जास्त आहे. त्यांच्यात टॅलेंटही खूप आहे. परंतु त्यांना एखादे मोठे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. हे BCCI ने हेरून अशा गुणवान खेळाडूंसाठी ISPL म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ची 2024 मध्ये स्थापना केली. सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, रितिक रोशन,सैफ अली खान, राम चरण यांसारख्या मंडळींनी संघ खरेदी केले. त्यात विजय पावले यांना अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या माझी मुंबई संघाने आपल्या ताफयात घेतले. ही निवड सार्थ ठरवताना विजयने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर माझी मुंबई संघाला फायनल पर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला.ISPL च्या पहिल्या सीझन मध्ये त्यांनी बेस्ट फिल्डर (एकूण 15 झेल) हा पुरस्कार पटकावला. माझी मुंबई हा संघ हा फायनल सामना जिंकू शकला नसला तरी विजय भाऊंची कामगिरी मात्र उल्लेखनीय राहिली.
ISPL सीजन 2 च्या मुंबई ने विजय पावले साठी RTM चा वापर केला व त्यांना 13.75 लाख रक्कम मोजून आपल्या टीम मध्ये कायम ठेवले. शिवाय आपल्या टीमचे कर्णधार पदही त्यांना दिले. ही जणू त्यांच्या मागील सीझन मधील कामगिरीची पोचपावती असावी.आपली निवड सार्थ ठरवताना त्यांनी दिमाखदार नेतृत्व शैलीचे प्रदर्शन केले आणि मोक्याच्या क्षणी फायनल मध्ये 9 चेंडूत 22 धावा करून सामना एक हाती फिरवला व आपल्या टीमला चॅम्पियन बनवले. आतापर्यंत विजय पावलेंनी ISPL चे एकूण 19 सामने खेळलेले आहेत त्यात फलंदाजी करताना 109 धावा बनवले असून त्यात त्यांचा स्ट्राइक रेट 155 चा राहिला आहे. शिवाय गोलंदाजी करताना त्यांनी 11.59 च्या इकॉनोमीने तब्बल 20 बळी ही टिपले आहेत.
वडिलांचे स्वप्न विजयने पूर्ण केले
लहानपणापासूनच विजयला क्रिकेटची प्रचंड आवड होती. शाळा सूटल्यानंतर विजय हमखास क्रिकेट खेळताना मंगलनाथ विद्यालयाच्या मैदानावर सर्वाना दिसायचा. परंतु काही लोकांना ते बघवत नसे. ते विजयच्या वडिलांना त्याच्याबद्दल नेहमी टोमणे मारत. विजयच्या वडिलांना कधीकधी वाईटही वाटत असे. परंतु आपला विजय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावणार असा ठाम विश्वास त्यांना होता. हे विजयने आपल्या खेळाने वेळोवेळी सार्थ करून दाखवले होते. पण विजयने भारतातील टेनिस क्रिकेट मधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच ISPL जिंकून त्यांच्या वडिलांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केले असे म्हणावे लागेल. तो ज्यावेळी गावात आला त्यावेळी त्याची अख्ख्या गावाने जंगी मिरवणूक काढली. त्याच्यासाठी हे स्वप्नवत होते.परंतु हे सर्व पाहण्यासाठी त्याचे वडील हयात नव्हते. मागच्या जुलै महिन्यात त्यांचे निधन झाले. ते या जगात जरी नसले तरी विजयच्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद हे नेहमीच राहतील यात शंका नाही.
विजय पावले हा सध्याच्या घडीतील टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी आहे. तसेच फिटनेस बाबतही तो नेहमी जागृत असतो. दस्तरखुद्द सचिन तेंडुलकर यांनी विजय पावले यांच्या फिटनेसचे कौतुक केले आहे तसेच मुनाफ पटेल आणि शॉन पोलॉक या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विजयच्या गोलंदाजी चे कौतुक केले होते. विजय पावलेनी नवोदित खेळाडूंना फिटनेस चा कानमंत्र दिला आहे. हा मूलमंत्र जर कोणी दररोज अमलात आणला तर तो खेळाडू नक्कीच यशस्वी होऊ शकतो असा त्यांचा विश्वास आहे. त्यांचा फिटनेसचा फंडा पुढील प्रमाणे आहे.
खेळाडूंनी योग्य आहार आणि डाएट याची सांगड घालावी .
योग्य आणि पुरेसा व्यायाम करावा.
सकाळी लवकर उठावे आणि रात्री लवकर झोपावे.
सायकलिंग करणे, रनिंग करणे आणि स्प्रिंट मारणे इ.
नवोदित गोलंदाजांनी फक्त स्पीडवर लक्ष न देता वेरिएशनवर लक्ष द्यावे. फलंदाजाला ओळखून यॉर्कर , स्लोवर बॉल, बॅक ऑफ द हॅन्ड ,कटर यांसारखी व्हेरिएशन्स आपल्या गोलंदाजीत आणावीत.
सर्वात महत्त्वाचे गोलंदाजांनी फलंदाजीवरही लक्ष द्यावे.
हे होते सांगली एक्सप्रेस विजय पावले अर्थात आपले विजुभाऊ . घरची परिस्थिती हालाखीची असतानाही मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर सामान्य कुटुंबातील माणूस असामान्य बनू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. आणखी कोणत्या खेळाडूचा जीवनप्रवास आपणास पाहायला आवडेल हे नक्की कळवा आणि आपल्या विजुभाऊ च्या पुढील वाटचालीसाठी त्यांना कमेंट द्वारे भरपूर शुभेच्छा देऊया.
धन्यवाद !.
FAQ –
1) विजय पावले यांची टेनिस क्रिकेट मधील सर्वात आवडती टीम कोणती आहे?
उत्तर – प्रतीक इलेव्हन डिंग डॉंग पुणे आणि तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे.
2) विजय पावलेनी गाजवलेल्या प्रमुख स्पर्धा कोणत्या?
उत्तर – सुप्रिमो ट्रॉफी, ISPL , T10pl, एम पी एल, नजिमुल्ला ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी.
3) विजय पावलेंची सर्वात आवडती स्पर्धा कोणती?
उत्तर – सुप्रीमो ट्रॉफी ( टेनिस क्रिकेटचे वर्ल्ड कप )
4) २०२५ मध्ये विजय पावले यांना कोणता पुरस्कार मिळाला ?
उत्तर – ऑल राऊंडर ऑफ द इयर ( All Rounder Of the Year.)
चेपॉकवर चेन्नईच भारी ! चेन्नईचा मुंबईवर धमाकेदार विजय
आयपीएल 2025 च्या पहिल्या डबल हेडर वीक मधील दुसरा ब्लॉकबस्टर सामना चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. त्यात चेन्नई सुपर किंग धमाकेदार खेळ करत मुंबई इंडियन्स वर चार विकेट ने विजय मिळवला. या विजयात त्यांच्या यंग ब्रिगेडने मोलाची कामगिरी बजावली.कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचीन रवींद्र यांची अर्धशतके तर नूर अहमद आणि खलील अहमद यांची सुंदर गोलंदाजी केली.
सी एस के ची धमाकेदार सुरुवात
चेन्नई सुपर किंग्ज ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या खालील अहमद ने यशस्वी करून दाखवला. त्याने चाचपडत खेळत असलेल्या रोहित शर्माला शिवम दुबे च्या हाती झेलबाद करून शून्य धावांवर माघारी धाडले. त्यानंतर सी एस के च्या इतर गोलंदाजांनीही कसून गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना जखडून ठेवले. हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादव 29, तिलक वर्मा 31 आणि शेवटी चेन्नईतून मुंबईत खेळायला गेलेल्या दीपक चहर ने 28 धावांचे योगदान दिले. त्यामुळे त्यामुळे मुंबई इंडियन्स आपल्या निर्धारित 20 षटकात नऊ बाद 155 धावाच करू शकली.156 धावांचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईची ओपनिंग जोडी रचीन रवींद्र आणि राहुल त्रिपाठी मैदानात उतरली. परंतु वैयक्तिक दोन धावांवर राहुल त्रिपाठी बाद झाला. त्याला दीपक शहर ने यष्टीरक्षक रायान रिकल्टन द्वारे झेलबाद केले. पण तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या कर्णधार ऋतुराज गायकवाड ने एक बाजू सांभाळात धमाकेदार खेळी केली. त्याने वैयक्तिक 26 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी केली त्यात सहा चौकार आणि तीन षटकारांचा होता. पण कोणताही डोमेस्टिक लेवल च सामना न खेळलेला शिवाय आयपीएल पदार्पण करणारा नवखा विघ्नेश पुथुर ने प्रथम ऋतुराज गायकवाडला बाद केले त्यानंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यात शिवम दुबेला फसवले त्यानंतर दीपक उडाला झेलबाद करून चेन्नईच्या ताफ्यात खळबळ माजवून दिली. पण हे कामगिरी करत असताना मुंबई इंडियन्सच्या हातातून हा सामना पूर्वीच निसटला होता शेवटी चेन्नई सुपर किंग ने हा सामना चार गडी राखून जिंकला.
कदाचित आयपीएलमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नसेल. अशी कामगिरी या पट्ट्याने घडवून आणली. त्याचे झाले असे की, आयपीएल खेळणारा एखादा खेळाडू हा कोणी साधासुधा नसतो कारण त्याने घरेलू क्रिकेट आणि डोमेस्टिक लेव्हलवर बरेचसे क्रिकेट खेळलेले असते. पण विघ्नेश पुतुर हा आतापर्यंत कोणताही डोमेस्टिक लेवल चा सामना खेळलेला नाही. मुंबई इंडियन्सने त्याला एका क्लब कडून खेळताना पाहिले होते. त्याची गोलंदाजाची शैली व फिरकी वरची पकड पाहून मुंबई इंडियन्स ने त्याला आपल्या सोबत प्रॅक्टिस शेषन ला बोलावले. त्याचा विमानाचा संपूर्ण खर्च मुंबई इंडियन्सने उचलला. मागच्या वर्षी त्याला आपल्या टीम मध्ये नेट बॉलर म्हणून घेतले होते. पण यावर्षी त्याला पहिल्याच सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळण्यासाठी संधी दिली गेली आणि त्याने संधीचे सोने केले. सी एस के विरुद्ध खेळताना त्यांनी प्रथम ऋतुराज गायकवाड याला बात केले. त्यानंतर त्याने शिवम दुबे ला माघारी पाठवले. आणि शेवटी त्याने दीपक हूडाला बाद करून सणसणाटी सुरुवात केली. विघ्नेश हा रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा असून सामना संपल्यानंतर खुद्द एम एस धोनी कडून त्याला शाबासकी मिळाली.
2) एम एस धोनी ची लाईटनिंग स्टॅम्पिंग –
Lightaning stumping by MSD.
वय वर्ष 43, सगळेजण म्हणतात की हा त्याचा शेवटचा हंगाम असेल , पण म्हणतात ना, “चिते की चाल, बाज की नजर और धोनी की स्टंपिंग पर संदेह नही करते ! ” असेच काहीसे या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाले. त्याचे झाले असे की, अकराव्या षटकात नूर अहमद हा अफगाणी फिरकीपटू गोलंदाजी करत होता. त्याच्या शतकातील तिसरा चेंडू त्याने टाकला. त्यावेळी सूर्यकुमार यादव स्ट्राइकवर होता. पण सूर्यकुमार यादवला हा चेंडू काही कळलाच नाही. त्यानंतर डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत एम एस धोनीने सूर्यकुमार यादवच्या स्टंप उघडल्या होत्या. ही स्टंपिंग 0.12 मिली सेकंद इतक्या कमी वेळेत करण्यात आली होती. यावरून असे दिसून आले की टायगर अभी जिंदा है. सूर्यकुमार यादव च्या विकेट ने मुंबईच्या धाव गतीवर अंकुश ठेवण्यात चेन्नईला यश आले.
The Biggest Rivalry in IPL: MI vs CSK 2025 – टाटा आयपीएल 2025 ची सुरुवात ही जरी 22 मार्चपासून होत असली तरी खरी सुरुवात ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग च्या सामन्यानेच होईल असे वाटते. कारण या प्रतिस्पर्ध्यांची गोष्ट निराळी आहे ज्या ज्या वेळी एम आय आणि सीएसके यांची मॅच होणार असते त्यावेळी मैदानावर आणि मैदानाबाहेरही माहोल हा निराळाच होऊन जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसे की भारत आणि पाकिस्तान यांची मॅच असते त्यावेळी जो उत्साह असतो तसाच उत्साह एम आय आणि सीएसके यांच्या सामन्यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. आणि असाच काहीसा उत्साह आणि जोश यावेळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक 23 मार्च 2025 म्हणजेच येत्या रविवारी एमआय विरुद्ध सीएसके हा महा मुकाबला चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियम येथे ठीक साडेसात वाजता खेळवला जाणार आहे.
The Biggest Rivalry in IPL: MI vs CSK 2025
चॅम्पियन विरुद्ध चॅम्पियन
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स यांच्याकडे पाहिले जाते या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. मुंबई इंडियन्स यांनी 2013 2015 2017 2019 आणि 2020 मध्ये विजेते पद मिळवले होते. तर चेन्नई सुपर किंग्स यांनी 2010 2011 2018 2021 आणि 2023 मध्ये असे एकूण पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे.
एम आय आणि सीएसके यांच्यातील सामन्याला El Clasico असे का म्हणतात ?
EL Clasico. Credited by – Google.com
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग हे दोन्ही दिग्गज संघ एकमेकांसमोर खेळतात त्यावेळी या सामन्याला खूप महत्त्व प्राप्त होते . त्यांच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणी असते. पण चेन्नई आणि मुंबई यांच्यातील हा सामना एका खास नावाने ओळखला जातो आणि हे नाव कशामुळे पडले हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यातील सामन्याला El Clasico हे खास नाव देण्यात आले आहे अल क्लासिक हे स्पॅनिश शब्द आहे. फुटबॉल मधील रियल माद्रिद आणि बारसोलीना हे दोन दिग्गज संघ ज्यावेळी एकमेकांविरुद्ध खेळतात त्यावेळी हा शब्द वापरला जातो. कारण या दोन्ही संघांचे फॅन्स हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि काहीशी अशीच परिस्थिती MI आणि CSK यांच्या मॅचच्या वेळी असते. म्हणून हा शब्दप्रयोग या सामन्यासाठी वापरला जातो. 2025 मध्ये तर मागील सर्व सीजन प्रमाणे यावर्षी खूप रंगतदार सामने होणार यात शंका नाही.
पहिल्या सामन्यातून हार्दिक पांड्या OUT
2025 च्या आयपीएल मध्ये बऱ्याचश्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत. त्यातील स्लो ओवर रेट मुळे कर्णधारावरील एका सामन्याची बंदी हा नियम हटवण्यात आला. याचा फायदा हार्दिक पांड्याला मिळणार होता परंतु मागील पर्वात हार्दिक पांड्याला तीन मॅचेस मध्ये स्लो ओव्हर रेट चा फटका बसला होता. त्यामुळे यावर्षी मुंबईच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळताना दिसणार नाही हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.
हेड टू हेड कामगिरी
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात एकूण 39 सामने खेळले गेले आहेत त्यात मुंबई इंडियन्स ने 21 सामन्यात विजय मिळवला असून चेन्नईने 18 सामन्यात विजय मिळवला आहे मात्र मुंबई इंडियन्सने चेन्नईला फायनल मध्ये तीन वेळा तर चेन्नईने मुंबईला फक्त एकच वेळा फायनलमध्ये हरवले आहे पण 2025 ची कामगिरी कशी होते हे पाहणे रोचक ठरणार आहे.
एम ए चिदंबरम स्टेडियम पिच रिपोर्ट आणि आकडेवारी
23 मार्च 2025 रोजी चेन्नई आणि मुंबईमध्ये महा मुकाबला खेळवला जाणार आहे हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम येथे खेळवला जाईल या स्टेडियमला चेपॉक म्हणूनही ओळखले जाते. यावर्षी चापॉक मैदानावर एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत हे सामने दिल्ली हैदराबाद कोलकाता आणि पंजाब या विरुद्ध असतील या मैदानावर आतापर्यंत एकूण 85 सामने खेळवले गेले आहेत. त्यात प्रथम फलंदाजी करताना 49 वेळा आणि प्रथम गोलंदाजी करताना 36 वेळा विजय मिळवला गेला आहे या आकडेवारीवरून असे दिसून येते की प्रथम फलंदाजी करताना संघाला फायदा होतो कारण चेपॉक मैदानाची खेळपट्टी ही संथ असते याचा फायदा फिरकी गोलंदाजांना होतो त्यामुळेच कदाचित प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर जास्त सामने जिंकले गेले आहेत चेन्नईचा तर हा होम ग्राउंड आहे या मैदानावर फिरकीपटू आणि प्रेक्षक या दोघांची साथ चेन्नईला मिळत असते. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या ही 246 असून ती चेन्नईने राजस्थान विरुद्ध 2010 मध्ये बनवली होती तर सर्वात कमी धावसंख्या ही 70 असून ती आरसीबीने 2019 मध्ये बनवली होती.
आयपीएल 2025 मुंबई इंडियन्स संघ
हार्दिक पांड्या ( c ) , सूर्य कुमार यादव , रोहित शर्मा, तिलक वर्मा, नमन धीर जसप्रीत बुमराह , ट्रेन बोल्ट, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा ,दीपक चहर, रायन रिकल्टन, मुजीब उर रहमान, विल जॅक्स, अश्विन कुमार, मिचेल सेंटनर, कृष्ण राजे, रिस टॉपले, जेकल्स, अर्जुन तेंडुलकर, विघ्नेश पुथुर कॉर्बीन बॉश.
आयपीएलच्या 18 व्या पर्वाची सुरुवात ही 22 मार्च 2025 पासून होत आहे. आयपीएल ही क्रिकेट स्पर्धा जगात सर्वाधिक पसंद केली जाणारी स्पर्धा असून याची क्रेझ ही जगभर पसरली आहे. 2008 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे हे 18 वे संस्करण असून याची सुरुवात ही कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन मातब्बर संघांच्या सामन्याने होणार आहे. हा सामना कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियम वर सायंकाळी ठीक 7.30 वाजता खेळवला जाईल.
आमने- सामने आणि कोण कोणावर भारी ? –
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे दोन्ही संघ मजबूत आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेले आहेत. या दोन संघा दरम्यान आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत. त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी 14 सामने तर कोलकाता नाईट रायडर्स यांनी 20 सामने जिंकले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स यांनी आयपीएल चे विजेते पद हे एकूण 3 वेळा मिळवले असून मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांना अद्याप त्यांच्या पहिल्या – वहिल्या ट्रॉफी ची अपेक्षा असणार आहे. दोन्ही संघांच्या कामगिरीकडे लक्ष वेधले असता आरसीबी कडून विराट कोहलीची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. तर केकेआर कडून त्यांची सांघिक कामगिरी आणि फिरकीपटू यांचा दबदबा आपल्याला पाहावयास दिसतो.तसे पाहता इडन गार्डन्स मैदानावर दोन्ही संघामध्ये एकूण 12 सामने खेळले गेले आहेत.त्यात कोलकाता नाईट रायडर्स यांनी 8 सामन्यात विजय मिळवला असून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी 4 सामन्यात विजय मिळवला आहे.
गत वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि 2024 मध्ये प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवलेला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आयपीएल 2025 मधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. पण या दोन्ही संघामध्ये केकेआर हा संघ उजवा ठरतो. कारण या दोन्ही संघामध्ये एकूण 34 सामने खेळवले गेले आहेत. त्यात केकेआर ने एकूण 20 सामन्यात बाजी मारली आहे. तर आरसीबी ला फक्त 14 सामन्यात बाजी मारता आली आहे. मागील सिझन मध्ये या दोन संघात 2 सामने झाले मात्र या दोन्ही सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने बाजी मारली. मागील सिझन मधील या दोन संघातील दुसरा सामना खूप रोमहर्षक झाला. कोलकाता नाईट रायडर्स ने प्रथम फलंदाजी करताना 221 धावा बनवल्या मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी या धावांचा पाठलाग करत असताना 220 धावा करून हा सामना अवघ्या 1 धावेने हा सामना गमावला. प्रेक्षकांसाठी हा सामना पैसावसुल ठरला.
पर्व नवे आणि कर्णधार ही नवे –
आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव झाला आणि सर्वच संघामध्ये अनेक प्रमुख खेळाडू साठी रस्सीखेच सुरू झाली. त्यात प्रत्येक संघांनी प्रमुख खेळाडूंसाठी मोठी बोली लावून त्यांना आपल्या ताफ्यात दाखल केले. पण प्रश्न असा होता की, कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? हा प्रश्न मात्र या दोन संघानी सोडवलेला दिसतोय. कारण कोलकाता नाईट रायडर्स या संघाची कमान मराठमोळा अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाची कमान नवखा रजत पाटीदार याच्याकडे असणार आहे. एकीकडे अनुभव तर दुसरीकडे नवा जोश कोण कोणावर भारी पडेल हे पाहणे उत्कंठावर्धक असणार आहे.
KKR vs RCB pitch Report :
आयपीएल 2025 चा उद्घाटनाचा सामना हा केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात कोलकाता मधील इडन गार्डन स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. पण या सामन्यात हवामान खात्याच्या निर्देशानुसार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. या अंदाजानुसार 22 मार्चला कोलकाता मध्ये 80 % पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पण सायंकाळी मात्र याची तीव्रता कमी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. असे जर झाले तर या सामन्यात टॉस हा खूप मोठी भूमिका निभावू शकतो. कारण जर या दिवशी पाऊस पडला तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. इडन गार्डन ची पीच ही जरी फलंदाजांसाठी नंदनवन असली तरी फिरकीपटू साठी खूप फायदेशीर असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स यांच्याकडे सध्या सुनील नारायण आणि वरून चक्रवर्ती यांसारखे जबरदस्त फिरकीपटू आहेत. याचा फायदा नक्कीच त्यांच्या संघाला होणार आहे.
इडन गार्डन स्टेडियम आणि रेकॉर्डस् –
कोलकाता मधील इडन गार्डन स्टेडियम हे फलंदाज आणि गोलंदाज या दोन्हीसाठी खूप फायदेशीर आहे. कारण या स्टेडियम मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 38 सामने आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने एकूण 55 सामने जिंकले आहेत. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या ही 262 असून ती पंजाब किंग ने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळताना बनवली होती. तर सर्वात निम्न धावसंख्या ही 49 असून हा अनोखा रेकॉर्डस् रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या नावावर आहे. एकंदरीत हा सामना मात्र रोमहर्षक होणार यात शंका नाही.
कुठे पाहता येईल लाईव्ह सामना ?
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील आयपीएल 2025 चा सामना हा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ हॉट स्टार ॲप वर लाईव्ह पाहता येईल.