Most Time Double Century in Test Cricket

हल्लीचे क्रिकेट जरी t20 स्वरूपाचे असले तरी टेस्ट क्रिकेट बेस्ट आहे असे आपण बऱ्याच क्रिकेटपटूंच्या भाषणातून ऐकले आहे एखाद्या खेळाडूची जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे टेस्ट क्रिकेट खेळल्यामुळे दिसून येते. म्हणूनच टेस्ट क्रिकेटला ‘Test is the best ‘म्हटले जाते.

टेस्ट क्रिकेटमध्ये खूप मोठ मोठे खेळाडू बनलेले आहेत जसे की डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, जॅक कॅलिस आणि आणखी बरेचसे खेळाडू ज्यांनी टेस्ट क्रिकेटला उच्च पातळीवर नेले. आपल्या सर्वांना माहीतच आहे की टेस्ट क्रिकेट हे खेळाडूंची शारीरिक आणि मानसिकतेची कसोटीच पाहत असते आणि यातूनच एका खऱ्या खेळाडूची ओळख होते.

आजच्या लेखात आपण अशा काही खेळाडू बदल बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा डबल सेंच्युरी बनवल्या आहेत.

 Most Time Double Century in Test Cricket  

 1] डॉन ब्रॅडमन ( ऑस्ट्रेलिया )          12 Duble century 

Sir डॉन ब्रॅडमन

ऑस्ट्रेलियाचे सर्वकालीन महान फलंदाज आणि क्रिकेट विश्वातील सर्वकालीन महान फलंदाज म्हणून सर डॉन ब्रॅडमन ओळखले जातात. डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 मध्ये झाला होता. त्यांनी 29 डिसेंबर 1928 रोजी इंग्लंडविरुद्ध आपले पहिले आंतरराष्ट्रीय टेस्ट शतक झळकावले होते. डॉन ब्रॅडमन यांनी 52 आंतरराष्ट्रीय सामने खेळले व त्यात त्यांनी 6,996 धावा बनवल्या त्यात त्यांची सरासरी ही 99.94 इतकी प्रचंड होती. ही टेस्ट क्रिकेट मधील एखाद्या खेळाडूची आजवरची सर्वाधिक सरासरी मानली जाते. त्यांनी आपल्या 52 टेस्ट मध्ये 29 शतके झळकावली होती. त्यातील त्यांनी सर्वाधिक 12  वेळा डबल सेंच्युरी झळकावण्याचा मान पटकावला आहे आणि हा रेकॉर्ड आजपर्यंत अबाधित राहिलेला आहे. त्यांनी आपल्या टेस्ट करियर मध फक्त सहा षटकार मारले होते. ते आपल्या शेवटच्या सामन्यात शून्यावर बाद झाले. त्यांनी जर आणखी  फक्त 4 धावा बनवल्या असत्या तर टेस्टमध्ये 100 ची सरासरी राखणारा जगातील एकमेव खेळाडू अशी अजरामर ओळख त्यांची झाली असती.

2] कुमार संगकारा ( श्रीलंका )         11 Duble century 

Kumar Sangakkara
Credit: google.com

कुमार संगकारा हे श्रीलंकेचे महान विकेट किपर फलंदाज होते. ते श्रीलंकेचे कॅप्टन ही राहिले होते. शिवाय  डाव्या हाताचे तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. कुमार संगकारा यांनी  2004 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी श्रीलंकेकडून 134 टेस्ट सामने खेळले व त्यात 12400 बनवल्या त्यांचा सर्वाधिक स्कोर हा 319 होता. त्यांनी 57.40 च्या सरासरीने धावा कुटल्या होत्या. मोक्याच्या क्षणी जयवर्धने सोबत मैदानात राहून त्यांनी श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाच्या भागीदारी केल्या. टेस्टमध्ये महिला जयवर्धने सोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेली 624 धावांची भागीदारी ही आजवरची सर्वाधिक भागीदारी म्हणून ओळखली जाते. त्यांनी आपल्या टेस्ट करिअरमध्ये एकूण 11 वेळा डबल सेंच्युरी बनवल्या आहेत. 2009, 2012 आणि 2014 मध्ये आयसीसी ने त्यांची सर्वोत्तम टेस्ट खेळाडू म्हणून निवड केली होती.

3] ब्रायन लारा ( वेस्ट इंडीज )            9 Duble century 

ब्रायन लारा
Credit : google.com

ब्रायन लारा यांचा जन्म 2 मे 1969 रोजी कॅन्टारो त्रिनिदाद येथे झाला. लारा हे वेस्ट इंडीजचे महान स्टायलिश फलंदाज होते. ते आपल्या मोठमोठ्या खेळीसाठी ओळखले जायचे.  टेस्ट क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 131 टेस्ट सामने खेळले असून त्यात 11953 धावा बनवल्या होत्या. त्यात त्यांची 52.9 इतकी सरासरी राहिली होती. लारा यांनी तब्बल 9 वेळा डबल सेंच्युरी बनवल्या होत्या. आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद 400 धावा आणि प्रथम श्रेणी सामन्यात नाबाद 501 धावा ही त्यांची आजवरची सर्वोत्तम खेळी आहेत. प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन वेळा 400 पेक्षा जास्त धावा करणारे लारा हे एकमेव खेळाडू आहेत.

4] विराट कोहली ( भारत )               7  Duble century 

Virat Kohli
Credit : google.com

आधुनिक क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीने नुकतीच टेस्ट  क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि क्रिकेटचे विक्रम यांचे घनिष्ठ असे नाते आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली एकूण 123 सामने खेळला असून त्यात त्याने 9230 धावा बनवले असून 254 ही त्याची सर्वाधिक खेळी आहे. विराटने आपल्या टेस्ट करिअरमध्ये 7 वेळा डबल सेंच्युरी झळकावले आहेत. शिवाय तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर नंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

वनडेत 170 चेंडूत 404 धावा. सारे रेकॉर्ड उद्ध्वस्त

5] वॉली हैंमंड ( इंग्लंड )                  7 Duble century 

वॉली
                        Credit : google.com

वॉली हैंमंड हे नव्वदीच्या  दशकातील इंग्लंडचे महान फलंदाज होते. त्यांनी 1927 ते 1947 दरम्यान 85 टेस्ट सामने खेळले. त्यात त्यांनी 58 च्या सरासरीने 7249 धावा बनवल्या. शिवाय 22 शतक ही मारली. खास करून त्यात त्यांनी 7 डबल सेंच्युरी  मारल्या. इतक्या वर्षानंतरही त्यांचे नाव या यादीत येते ही खूप अभिमानाची बाब आहे. त्या काळात तर त्यांनी प्रथम श्रेणी सामन्यात हाहाकार माजवला होता. त्यांनी 634 प्रथम श्रेणी सामन्यात 50,500 धावा चोपल्या होत्या. त्यात त्यांनी तब्बल 167 शतके आणि 185 अर्धशतके झळकावली होती. शिवाय 732 बळी मिळवले होते.

6] महिला जयवर्धने (श्रीलंका )          7 Duble century 

Most Time Double Century in Test Cricket
                          Credit : google.com

श्रीलंकेला लाभलेला क्रिकेटमधील आणखीन एक कोहिनूर हिरा म्हणजेच महिला जयवर्धने होय. भारतासाठी जसे राहुल द्रविड मैदानात भिंत म्हणून काम करायचे. त्याप्रमाणे श्रीलंकेसाठी श्रीलंकेची भिंत म्हणून महिला जयवर्धने नेहमीच मैदानात उभे असायचे. महिला जयवर्धने यांनी 49 च्या सरासरीने 149 टेस्टमध्ये 11814 धावा काढल्या आहेत.  त्यांनी 34 शतक झळकावले आहेत. त्यात त्यांनी 7 वेळा डबल सेंच्युरी झळकावली आहे. त्यांची 374 धावांची खेळी टेस्ट क्रिकेटमधील उजव्या हाताच्या फलंदाजाने काढलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

FAQ 

1) 3 ओव्हर मध्ये 100 धावा कोणी काढल्या होत्या ?

उत्तर – डॉन ब्रॅडमन. 

2) डॉन ब्रॅडमन यांना सर्वाधिक वेळा कोणी बाद केले होते ?

उत्तर – हेडली वेरीटी ( इंग्लंड ) 8 वेळा. 

3) कुमार संगकाराने टेस्टमध्ये किती शतके ठोकली आहे ? 

उत्तर – 38 शतक.

4) कसोटीत  400 करणारा जगातील एकमेव खेळाडू कोण ? 

उत्तर – ब्रायन  लारा  ( वेस्ट इंडीज )

5) विराट कोहलीने एकूण किती आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहेत? 

उत्तर – वनडे – 51 ( सर्वाधिक ) , टेस्ट – 30 , T 20 – 1 

एकूण – 82 शतक . 

क्रिकेट मध्ये इतिहास घडला. एकाने ठोकल्या 1000 धावा आणि संघाने बनवल्या 1400 धावा.

 

Leave a Comment