Ispl Season 3 Match 1 : Majhi Mumbai vs Shrinagar ke Veer माझी मुंबई ठरला श्रीनगर वर भारी. केला अवघ्या 60 धावांचा बचाव. पहिला सामना जिंकला 13 धावांनी.
Ispl 2026 तिसऱ्या पर्वाची एकदम दिमाखात सुरुवात झाली आहे. काल खेळल्या गेलेल्या माझी मुंबई आणि श्रीनगर के वीर या मागील finalist संघामध्ये माझी मुंबई संघाने बाजी मारताना जोखात सुरुवात केली. माझी मुंबई संघाने 10 षटकात फक्त 59 धावा केल्या होत्या. परंतु त्यांच्या गोलंदाजांनी आणि फिल्डर्स नी उत्तम कामगिरी करताना सामना आपल्या बाजूने वळवला.
टीम मालकांनी केला टॉस –
Ispl च्या तिसऱ्या पर्वात एक अनोखी घटना घडली. कारण अमुमन आपण संघाच्या कॅप्टन ला टॉस उडवताना पाहतो पण यावेळी मैदानावर टीम च्या मालकांनी टॉस उडवला. त्याचे झाले असे की , माझी मुंबई चे मालक अमिताभ बच्चन आणि श्रीनगर के वीर चे मालक यांच्यात टीप – ट्याप पद्धतीने टॉस झाला त्यावेळी अक्षय कुमार यांनी म्हणजेच श्रीनगर के वीर संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.
Ispl season 3 Auction 2025 : मराठमोळा विजय पावले ठरला Ispl मधील सर्वात महागडा खेळाडू.
प्रज्योत अंबिरे ठरला श्रीनगर चा हिरो
टॉस जिंकून श्रीनगर के वीर ने प्रथम फिल्डिग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना प्रज्योत अंबीरे ने पहिल्याच ओवर मध्ये फक्त 8 धावा देवून 2 महत्त्वाचे बळी टिपले. तर संपूर्ण सामन्यात त्याने 2 ओवर मध्ये 11 धावा देवून 3 महत्त्व पूर्ण बळी मिळवले. त्याला मिनाद मांजरेकर आणि राजू मुखिया यांनी सुरेख साथ दिली. मांजरेकर ने स्विंग बॉल टाकताना 2 ओवर मध्ये फक्त 9 धावा देवून 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले तर राजू मुखीया ने 2 षटकात फक्त 6 धावा देवून 2 बळी घेतले.या तिघांच्या अप्रतिम कामगिरी मुळे माझी मुंबई चा संघ फक्त 59 धावांवर ऑल आऊट झाला.
स्विंग बॉल ओवर –
श्रीनगर के वीर या संघाकडून स्विंग बॉल चे ओवर टाकण्याची जबाबदारी मिनाद मांजरेकर याच्यावर सोपवण्यात आली. मीनाद मांजरेकर हा एक लेदर बॉल चा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला बॉल स्विंग करण्याची कला अवगत आहे. त्याचा पुरेपूर वापर करत त्याने प्रथम करण अंबाला याला क्लीन बोल्ड केले त्यानंतर त्याने थॉमस डायस याला क्लीन बोल्ड केले.
50 – 50 ओवर
माझी मुंबई संघाने 50 – 50 ओवर साठी धनंजय भिंताडे याची निवड केली. पण धनंजय ने दुसऱ्या बॉल वर बंटी पटेल याला झेलबाद केले. त्याने आपल्या पहिल्या 5 बॉल वर फक्त 7 धावा खर्च केल्या. पण शेवटच्या बॉल वर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या दर्शन बांदेकर ने अप्रतिम सिक्स मारून 50 – 50 ओवर माझी मुंबई च्या नावे केली. त्यामुळे माझी मुंबई ला अतिरिक्त सहा धावांचा बोनस मिळाला.
काय आहे फिफ्टी-फिफ्टी ओवर ?
ISPL च्या पूर्वीच्या दोन हंगामात फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला 16 धावांचे लक्ष दिले जायचे परंतु यंदाच्या हंगामात हा नियम थोडासा शिथिल करून 10 धावांचे लक्ष फलंदाजी करणाऱ्या संघाला दिले गेले आहे. जर का प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 10 धावांचे लक्ष त्या ओवर मध्ये पूर्ण केले आणि जर 10 पेक्षा जास्त किती धावा झाल्या तरी झालेल्या धावांच्या निम्म्या धावा त्या संघाला बोनस म्हणून दिल्या जातील. आणि जर त्या फलंदाजी करणाऱ्या संघाने 10 धावा काढल्या नाहीत तर जेवढ्या धावा काढल्या जातील तेवढ्या धावांच्या निम्म्या धावा त्या संघाच्या त्या ओवर मध्ये कमी होतील. उदाहरण देऊन सांगायचे झाले तर, समजा एका संघाने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये 16 धावा जमवल्या तर त्या संघाला 16 + 8 अशा एकूण 24 धावा मिळतील. एका संघाने त्यावर मध्ये फक्त 8 धावा केल्या तर त्या संघाच्या 8 – 4 अशा एकूण 4 धावा बनवल्या गेलेल्या स्कोर मधून कापल्या जातील. Ispl Season 3 Match Fixtures
माझी मुंबई ने बनवला फक्त 59 धावा

ISPL मध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून माझी मुंबई हा संघ ओळखला जातो. परंतु ISPL च्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात या संघासाठी खूप निराशाजनक झाली. कारण आपल्या निर्धारित 10 ओवर मध्ये या संघाने फक्त 59 धावा बनवल्या. या संघातील महत्त्वाचे फलंदाज खूप लवकर बाद झाल्यामुळे माझी मुंबई संघाला फक्त 59 धावांपर्यंत मजल मारता आली.
श्रीनगर के वीर संघाची दमदार सुरुवात
60 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीनगर के वीर या संघाची सुरुवात दमदार झाली. कारण या संघाने पहिल्या तीन ओवर मध्ये च 30 धावा फटकावल्या. हा संघ हा सामना आरामात जिंकणार असे दिसू लागले होते.
माझी मुंबई संघाचा शानदार कम बॅक
या संघाने आपल्या तीन ओवर मध्ये 30 धावा फटकावून सामना जिंकण्याचे दृष्टीने पाऊल उचलले परंतु माझी मुंबईच्या ऐजाज आणि जीशान या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्या निर्धारित 2 ओव्हर मध्ये 9 धावा खर्चून दोन – दोन बळी मिळवले. त्यांना कर्णधार विजय पावलेने सुद्धा 1.4 ओवर मध्ये 10 धावा देवून 2 बळी घेत उत्तम साथ दिली. त्यामुळे माझी मुंबई ने हा सामना 13 धावांनी जिंकला.
माझी मुंबईची फील्डिंग भारी
माझी मुंबई ने हा सामना खऱ्या अर्थाने गोलंदाजी आणि फिल्डिंग ने जिंकला. कारण माझी मुंबई संघातील प्रत्येक खेळाडूने जीव ओतून फिल्डिंग करताना बरेच अप्रतिम झेल घेतले शिवाय दोन-तीन खेळाडूंना धावबाद केले. त्यामुळे माझी मुंबई संघाने हा सामना 13 धावांनी जिंकून आपल्या अभियानाची सुरुवात केली.
