IPL 2025 : KKR vs RCB – कोण होणार विजेता?

आयपीएलच्या 18 व्या पर्वाची सुरुवात ही 22 मार्च 2025 पासून होत आहे. आयपीएल ही क्रिकेट स्पर्धा जगात सर्वाधिक पसंद केली जाणारी स्पर्धा असून याची क्रेझ ही जगभर पसरली आहे. 2008 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे हे 18 वे संस्करण असून याची सुरुवात ही कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन मातब्बर संघांच्या सामन्याने होणार आहे. हा सामना कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियम वर सायंकाळी ठीक 7.30 वाजता खेळवला जाईल.Ipl 2025 - KKR vs RCB

आमने- सामने आणि कोण कोणावर भारी ?

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे दोन्ही संघ मजबूत आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेले आहेत. या दोन संघा दरम्यान आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत. त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी 14 सामने तर कोलकाता नाईट रायडर्स यांनी 20 सामने जिंकले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स यांनी  आयपीएल चे विजेते पद हे एकूण 3 वेळा मिळवले असून मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांना अद्याप त्यांच्या पहिल्या – वहिल्या ट्रॉफी ची अपेक्षा असणार आहे. दोन्ही संघांच्या कामगिरीकडे लक्ष वेधले असता आरसीबी कडून विराट कोहलीची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. तर केकेआर कडून त्यांची सांघिक कामगिरी आणि फिरकीपटू यांचा दबदबा आपल्याला पाहावयास दिसतो.तसे पाहता इडन गार्डन्स मैदानावर दोन्ही संघामध्ये एकूण 12 सामने खेळले गेले आहेत.त्यात कोलकाता नाईट रायडर्स यांनी 8 सामन्यात विजय मिळवला असून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी 4 सामन्यात विजय मिळवला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स च भारी !

गत वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि 2024 मध्ये प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवलेला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आयपीएल 2025 मधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. पण या दोन्ही संघामध्ये केकेआर हा संघ उजवा ठरतो. कारण या दोन्ही संघामध्ये एकूण 34 सामने खेळवले गेले आहेत. त्यात केकेआर ने एकूण 20 सामन्यात बाजी मारली आहे. तर आरसीबी ला फक्त 14 सामन्यात बाजी मारता आली आहे. मागील सिझन मध्ये या दोन संघात 2 सामने झाले मात्र या दोन्ही सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने बाजी मारली. मागील सिझन मधील या दोन संघातील दुसरा सामना खूप रोमहर्षक झाला. कोलकाता नाईट रायडर्स ने प्रथम फलंदाजी करताना 221 धावा बनवल्या मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी या धावांचा पाठलाग करत असताना 220 धावा करून हा सामना अवघ्या 1 धावेने हा सामना गमावला. प्रेक्षकांसाठी हा सामना पैसावसुल ठरला.

पर्व नवे आणि कर्णधार ही नवे –

आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव झाला आणि सर्वच  संघामध्ये अनेक प्रमुख खेळाडू साठी रस्सीखेच सुरू झाली. त्यात प्रत्येक संघांनी प्रमुख खेळाडूंसाठी मोठी बोली लावून त्यांना आपल्या ताफ्यात दाखल केले. पण प्रश्न असा होता की, कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? हा प्रश्न मात्र या दोन संघानी सोडवलेला दिसतोय. कारण कोलकाता नाईट रायडर्स या संघाची कमान मराठमोळा अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाची कमान नवखा रजत पाटीदार याच्याकडे असणार आहे. एकीकडे अनुभव तर दुसरीकडे नवा जोश कोण कोणावर भारी पडेल हे पाहणे उत्कंठावर्धक असणार आहे.

KKR vs RCB pitch Report :

आयपीएल 2025 चा उद्घाटनाचा सामना हा केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात कोलकाता मधील इडन गार्डन स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. पण या सामन्यात हवामान खात्याच्या निर्देशानुसार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. या अंदाजानुसार 22 मार्चला कोलकाता मध्ये 80 % पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पण सायंकाळी मात्र याची तीव्रता कमी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. असे जर झाले तर या सामन्यात टॉस हा खूप मोठी भूमिका निभावू शकतो. कारण जर या दिवशी पाऊस पडला तर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. इडन गार्डन ची पीच ही जरी फलंदाजांसाठी नंदनवन  असली तरी फिरकीपटू साठी खूप फायदेशीर असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स यांच्याकडे सध्या सुनील नारायण आणि वरून चक्रवर्ती यांसारखे जबरदस्त फिरकीपटू आहेत. याचा फायदा नक्कीच त्यांच्या संघाला होणार आहे.

इडन गार्डन स्टेडियम आणि रेकॉर्डस् –

कोलकाता मधील इडन गार्डन स्टेडियम हे फलंदाज आणि गोलंदाज या दोन्हीसाठी खूप फायदेशीर आहे. कारण या स्टेडियम मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 38 सामने आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने एकूण 55 सामने जिंकले आहेत. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या ही 262 असून ती पंजाब किंग ने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळताना बनवली होती. तर सर्वात निम्न धावसंख्या ही 49 असून हा अनोखा रेकॉर्डस् रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या नावावर आहे. एकंदरीत हा सामना मात्र रोमहर्षक होणार यात शंका नाही.

कुठे पाहता येईल लाईव्ह सामना ?

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील आयपीएल 2025 चा सामना हा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ हॉट स्टार ॲप वर लाईव्ह पाहता येईल.

कोलकाता नाईट रायडर्स संघ 2025

फलंदाज –

  • अजिंक्य रहाणे (C)
  • रिंकू सिंग
  • मनीष पांडे
  • अंगकृष रघुवंशी
  • क्विंटन डी कोक ( wk)
  • लव निथ सिसोदिया
  • रहमान उला गुरबाज.

ऑल राऊंडर – 

  • सुनील नारायण
  • आंद्रे रसेल
  • अनुकूल रॉय
  • मोईन अली
  • वेंकटेश अय्यर
  • रोमन पॉवेल
  • रमण दीप सिंग.

गोलंदाज – 

  • हर्षित राणा
  • एनारिक नॉर्टजे
  • मयंक मार्कंडेय
  • वरून चक्रवर्ती
  • वैभव अरोरा
  • उमरान मलिक
  • स्पेंसर जॉन्सन.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ 2025

फलंदाज –

  • रजत पाटीदार ( C )
  • विराट कोहली
  • देवदत्त पडीकल
  • जितेश शर्मा ( wk )
  • स्वस्तिक चिकारा
  • फील सॉल्ट
  • मनोज भडांगे .

ऑल राउंडर –

  • लियाम लिविंगस्टन
  • कृणल पांड्या
  • टीम डेव्हिड
  • रोमारियो शेफर्ड
  • स्वप्नील सिंग
  • जेकब बेटेल

गोलंदाज –

  • जोश हेजलवूड
  • भुवनेश्वर कुमार
  • लुंगी इंगिडी
  • यश दयाल
  • सुयश शर्मा
  • अभिनंदन सिंग
  • मोहित राठी
  • रसिख दार सलाम

 

Leave a Comment