अशी झाली आशिया कप ची सुरुवात 

ACC

 

” क्या बोलती पब्लिक ?, कसं काय मजेत.” मित्रांनो, आज मी तुम्हाला आशिया कपची सुरुवात कशी झाली याबद्दल एक रंजक अशी कहाणी सांगणार आहे जी आपण क्वचितच ऐकली किंवा वाचली असणार. चला तर मग आजच्या लेखाला प्रारंभ करू.

 अशी झाली आशिया कप ची सुरुवात 

अशी झाली आशिया कप ची सुरुवात
                               Credit: goggle.com

१९८३ च्या वर्ल्डकप मध्ये भारतीय टीमने ६ पैकी ४ सामने जिंकून दिमाखात फायनल मध्ये प्रवेश केला होता. संपूर्ण देशाला आपणच फायनल जिंकणार अशी आस लागली होती . प्रत्येकजण फायनलचा तो क्षण प्रत्यक्ष अनुभवावा यासाठी प्रयत्नशील होता. त्यात सिद्धांत शंकर राय जे की त्यावेळी ‘ युनियन एज्युकेशन मिनिस्टर ‘ होते. त्यांनी आपले मित्र एन.के.पी. साळवे जे की त्यावेळी BCCI चे अध्यक्ष व युनियन मिनिस्टर होते त्यांना फायनल ची दोन तिकिटे मिळवण्यासाठी फोन लावला. साळवे साहेब त्या वेळी आयसीसी चे मेंबर ही होते. परंतु संयोजकांनी त्यांना दोन एक्स्ट्रा तिकीट देण्यास चक्क नकार दिला व पूर्वी दिलेल्या तिकिटावरच भागवण्यास सांगण्यात आले. साळवे साहेबाना तिकिटासाठी नकार दिल्याचा राग नव्हता पण ज्याप्रकारे नकार दिला गेला त्यामुळे मात्र त्यांना प्रचंड राग आला व त्यातूनच इंग्लंड मधून वर्ल्डकप चे आयोजन हलविण्याची चिंगारी पेट धरू लागली. कारण वर्ल्डकप चे आयोजन फक्त इंग्लंड मध्येच होत होते.

तथापि इंग्लंड ची टीम १९८३ च्या फायनल मधून बाहेर गेल्यामुळे बरेचसे बोर्ड मेंबर फायनल पाहण्यासाठी आलेच नाही. एन.पी.के. साळवे यांच्या लक्षात आले की, इंग्लंड मधून वर्ल्डकप इतरत्र हलविण्याची ही नामी संधी आहे. २६ जून १९८३ म्हणजेच वर्ल्डकप विजयाच्या दुसऱ्या दिवशी लंडन मध्ये लंचच्या वेळी साळवे साहेबांची मुलाखत पाकिस्तानचे एअर चीफ मार्शल नुर खान यांच्याशी झाली. त्यांनी नूर खान यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली . आशियाच्या ऐक्यासाठी पाकिस्तान सारखा मोठा संघ हातभार लावू शकतो याचे महत्त्व पटवून दिले. त्याकाळी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन टीम कडे वेटो पावर होती. तिच्या जोरावर ते त्यांना जर एखादा प्रस्ताव नामंजूर करायचा असेल तर तसे ते करू शकत होते. याचा विरोध करण्यासाठी साळवे साहेबांनी आशियातील मोठ्या संघाना एकत्र करण्यास सुरू केले.

Asiya Cup Winner List

Asian Cricket council ( ACC ) ची स्थापना 

यासाठी BCCI व मोठ – मोठे उद्योगपती यांची साथ आवश्यक होती. हे पाहून कोलकात्याचे उद्योगपती जगमोहन दालमिया व पंजाबचे आय. एस. बिंद्रा पुढे आले. त्याच वर्षी लाहोरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात श्रीलंकेचे चीफ गामिनी दिस्नायके यांनाही आमंत्रण धाडण्यात आले. त्या दिवशी Asian Cricket council म्हणजेच ACC ची स्थापना करण्यात आली. यापूर्वी फक्त आयसीसी च आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत होता. मात्र यापुढे ACC ही अशा सामन्यांचे आयोजन करणार होता. एन.पी.के. साळवे हे ACC चे पहिले अध्यक्ष झाले. जगमोहन दालमिया यांनी एक प्रस्ताव तयार केला की ,ज्यात वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन फक्त इंग्लंडकडेच न राहता इतर देशांनाही आयोजनाची संधी मिळावी अशी संकल्पना होती. १९८३ च्या शेवटी आयसीसी समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु आयसीसी ने मात्र हा प्रस्ताव बरखास्त केला. साळवेनाही नेमके हेच हवे होते. आयसीसी चे असे म्हणणे होते की, आशियामध्ये ६० ओव्हरचे सामने खराब हवामान व लाईटच्या कमतरतेमुळे होवू शकत नव्हते . कारण यापूर्वी आशियामध्ये एकदिवसीय सामने हे ३६ किंवा ४० ओव्हरचेच खेळवले जात असत. परंतु असा कोणताच नियम नव्हता की, एकदिवसीय सामने हे ६० ओव्हरचेच खेळवले जावेत. म्हणूनच ACC ने आशियात किंबहुना भारतातही ६० ओव्हरचे सामने चांगल्या प्रकारे खेळले जावू शकतात हे जगाला ( ICC) दाखवून देण्यासाठी साळवे यांनी आशिया कप जे की ,५० ओव्हरचे असतील अशी संकल्पना मांडली. या स्पर्धेद्वारे आशियातील संघ व राष्ट्रे यातील संबंध सुधारण्याची ही नामी संधी होती.

आता प्रश्न होता तो स्पर्धा आयोजनाचा  व ५० ओव्हरचे सामने खेळवले जाण्याचा .परंतु ही स्पर्धा पार पाडण्यासाठी पैशाची खूप आवश्यकता होती. त्यावेळी ACC मधील कोणत्याही बोर्डकडे एवढा पैसा उपलब्ध नव्हता. त्यासाठी पुढील मीटिंग ही दिल्ली येथे बोलावण्यात आली. ज्यात आयसीसी चे मेंबर असलेल्या देशांनाही आमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी अमीरात क्रिकेट बोर्ड ही अस्तित्वात नव्हते. त्या मीटिंग मध्ये एका खास पाहुण्याला आमंत्रण देण्यात आले होते व त्याचे कारणही तसे खासच होते. त्यांचे नाव होते शेख बुखाशिर. शेख बुखाशिर हे शारजा मधील एक मोठे उद्योगपती व क्रिकेट चे प्रचंड मोठे चाहते होते. ते पहिल्यापासूनच शारजा मध्ये अनधिकृत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत व प्रचंड मोठे बक्षीस ही देत असत. यावेळी मात्र त्यांना अधिकृत व आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्याची संधी मिळणार होती व ती त्यांनी आनंदाने स्वीकारलीही. व यातूनच आशिया कप ची सुरुवात झाली. या घटनेमुळेच शारजा क्रिकेट ग्राउंड नावारूपास आले.

असा खेळवला गेला पहिला आशिया कप 

१९८४ मध्ये पहिल्यांदाच आशिया कप ची सुरुवात झाली. भारत, पाकिस्तान व श्रीलंका हे तीन संघ यात सहभागी झाले. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आली. यात विजेत्या संघाला ५० हजार डॉलर, उपविजेत्या संघास २० हजार डॉलर तर मॅन ऑफ द सिरीज साठी ५ हजार डॉलर अशी बक्षिसे लावण्यात आली. या स्पर्धेत भारतीय टीम वर प्रचंड दबाव होता. कारण १९८३ चा विजय हा काही हवेत मारलेला फुसका बार नव्हता हे लोकांना दाखवून द्यायचे होते. त्यात कपिल देव ज्यांनी संपूर्ण वर्ल्डकप गाजवलेला होता ते गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकले नाही. तरीही भारतीय टीमने जिगरबाज खेळ करून अंतिम सामन्यात पाकिस्तानला धूळ चारून पहिले-वहिले आशिया कप चॅम्पियन झाले. पुढे जावून १९८७ मध्ये भारत व पाकिस्तान यांनी संयुक्तपणे १९८७ वर्ल्डकप चे यशस्वी आयोजन केले व साळवे साहेबांचे स्वप्न सत्यात उतरले.

FAQ

१) आशिया कप ची संकल्पना मांडणारे कोण होते ?

उत्तर – एन. के. पी. साळवे

२) पहिला आशिया कप कोणी जिंकला ?

उत्तर – भारत

३) ACC चा फुल फॉर्म काय आहे ?

उत्तर – एशियन क्रिकेट कौन्सिल  ( Asiyan Cricket Council.

चला तर मित्रांनो आशिया कप ची रंजक कहाणी कशी वाटली हे सांगायला विसरू नका व आपल्या ब्लॉग वर यायला तर अजिबात लाजायचे नाही. आपल्या मित्रांना व क्रिकेट प्रेमींना ही पोस्ट नक्की शेअर करा.

Asiya Cup Winner List

नमस्कार मित्रांनो, आशिया कप २०२५ ची सुरुवात येत्या ९ सप्टेंबर पासून यूएई त होणार आहे. आतापर्यंत आशिया कप चे १६ पर्व झाले असून त्यात आपल्याला वेगवेगळे विजेते संघ  पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत भारताचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. भारताने आतापर्यंत तब्बल ८ वेळा आशिया कप जिंकला असून श्रीलंकेने ५ वेळा तर पाकिस्तानने ३ वेळा विजेतेपद मिळविले आहे. या लेखात आपल्याला १९८४ ते २०२३ ( Asiya Cup Winner List) पर्यंतच्या सर्व विजेत्या व उपविजेत्या संघाची माहिती मिळणार आहे. ही माहिती समरी स्वरूपात असणार आहे. त्यामुळे आपल्याला एका झलकीत सर्व पर्वातील विजेत्यांची माहिती एका क्लिक वर मिळणार आहे. चला तर मग सुरू करू

Asiya Cup Winner List 

आशिया कप 2025 : भारत-पाक क्रिकेट वाद पुन्हा पेटला !

१)रोथमंस आशिया कप १९८४

 

Asiya Cup Winner List
Credit: google.com
  • साल – १९८४ 
  • यजमान देश – संयुक्त अरब अमिरात
  • सहभागी देश – भारत ,पाकिस्तान, श्रीलंका.
  • ठिकाण  – शारजा क्रिकेट स्टेडियम, शारजा
  • विजेता – भारत
  • उपविजेता – श्रीलंका

Final Match Sammary

भारत – १८८/४ ( ४६)

फलंदाजी – सुरिंदर खन्ना ५६ (७२)

संदीप पाटील ४३ (५०)

गोलंदाजी – शाहिद मेहमूद १/२३ ( १० )

सर्फराज नवाज १/३७ ( १०)

पाकिस्तान – १३४/१० ( ३९.४)

फलंदाजी – मोहसीन खान ३५ (६५)

जहीर अब्बास २७ (४५)

गोलंदाजी – रॉजर बिन्नी ३/३३ (९.४)

रवी शास्त्री ३/४० (१०)

निकाल – भारत ५४ धावांनी विजयी.

सामनावीर – सुरींदर खन्ना .

२)एस्ट्रल आशिया कप १९८६

  • साल – १९८६ 
  • यजमान देश – श्रीलंका
  • सहभागी संघ – श्रीलंका , पाकिस्तान , भारत , बांगलादेश.
  • ठिकाण – सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंड , कोलंबो.
  • विजेता – पाकिस्तान
  • उपविजेता – भारत

Final Match Sammary

भारत – २४५/७ (५०)

फलंदाजी – सुनील गावसकर ९२ (१३४)

के. श्रीकांत ७५ (८०)

गोलंदाजी – वसीम अक्रम ३/४२ ( १०)

इम्रान खान २/४० (१०)

पाकिस्तान – २४८/९ (५०)

फलंदाजी – जावेद मियादाद ११६(११४)*

मोहसीन खान ३६ (५५)

गोलंदाजी – चेतन शर्मा ३/५१ (९)

मदन लाल २/५३ (१०)

निकाल – पाकिस्तान १ गड्यानी विजयी.

सामनावीर – जावेद मियादाद

मालिकावीर – सुनील गावसकर .

३)विल्स आशिया कप १९८८

  • साल -१९८८ 
  • यजमान देश – बांगलादेश
  • सहभागी संघ – भारत, पाकिस्तान,श्रीलंका ,बांगलादेश
  • ठिकाण  – बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियम , ढाका .
  • विजेता – भारत
  • उपविजेता – श्रीलंका.

Final Match Sammary

श्रीलंका – १७६/१० (४३.२)

फलंदाजी – दुलीप मेंडिस ३६ (३६)

अथुला समरसेकरा २६ (३६)

गोलंदाजी – श्रीकांत ३/१२ (३.२)

मोहिंदर अमरनाथ १/२१ (६ )

भारत – १८०/४ (३७.१)

फलंदाजी – नवज्योतसिंग सिद्धू ७६ (८७)

दिलीप वेंगसकर ५० (८१)*

गोलंदाजी – कपिला वाजेगुणवर्धने २/३३ (९)

रणजित मधुरसिंघे १/३५ (९)

निकाल – भारत ६ गड्यांनी विजयी.

सामनावीर – नवज्योतसिंग सिद्धू

मालिकावीर – नवज्योतसिंग सिद्धू.

 

४) आशिया कप १९९०

  • साल – १९९०
  • यजमान देश – भारत
  • सहभागी संघ – भारत , पाकिस्तान, श्रीलंका.
  • ठिकाण – इडन गार्डन, कोलकाता.
  • विजेता – भारत
  • उपविजेता – श्रीलंका.

Final Match Sammary

श्रीलंका – २०४/९. (४५)

फलंदाजी – अर्जुन रणातुंगा ४९(४५)

अशंका गुरुसिंघा ३९(५४)

गोलंदाजी – कपिल देव ४/३१ (९)

सर्दिंदू मुखर्जी १/३९ (९)

भारत – २०५/३ (४२.१)

फलंदाजी – संजय मांजरेकर ७५ (९५)*

मोहम्मद अझरुद्दीन ५४(३९)

गोलंदाजी – ग्रॅम लब्रुई १/२९ ( ८.१)

रमेश रतनायके १/३४ (८)

निकाल – भारत ७ गड्यांनी विजयी.

सामनावीर – मोहम्मद अझरुद्दीन .

५)पेप्सी आशिया कप  १९९५

Pepsi Asiya cup 2004
Credit: google.com
  • साल – १९९५ 
  • यजमान देश – संयुक्त अरब अमिरात
  • सहभागी संघ – श्रीलंका , बांगलादेश,भारत, पाकिस्तान
  • ठिकाण  – शारजा क्रिकेट स्टेडियम
  • विजेता – भारत
  • उपविजेता – श्रीलंका.

Final match sammary

श्रीलंका – २३०/७ (५०)

फलंदाजी – असंका गुरुसिंघा ८५ (१२२)

सनथ जयसुर्या २२ (२८)

गोलंदाजी – व्यंकटेश प्रसाद २/३२ (१०)

अनिल कुंबळे २/५० (१०)

भारत – २३३/२ (४१.५)

फलंदाजी – मोहम्मद अझरुद्दीन ९० (८९)*

नवज्योतसिंग सिद्धू ८४ (१००)*

गोलंदाजी – चमींडा वास १/५२ (९)

चंपक रमानायके १/५२ (८.५)

निकाल – भारत ८ गड्यांनी विजयी.

सामनावीर – मोहम्मद अझरुद्दीन

मालिकावीर – नवज्योतसिंग सिद्धू.

६)पेप्सी आशिया कप १९९७

  • साल – १९९७ 
  • यजमान देश – श्रीलंका
  • सहभागी संघ – भारत , पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश
  • ठिकाण  – आर प्रेमादासा स्टेडियम, कोलंबो.
  • विजेता – श्रीलंका
  • उपविजेता – भारत

Final Match Sammary

भारत – २३९/७ (५०)

फलंदाजी – मोहम्मद अझरुद्दीन ८१ (१०२)

सचिन तेंडुलकर ५३ (६७)

गोलंदाजी – चामिंडा वास २/३२

कुमार धर्मसेना २/५४

श्रीलंका – २४०/२ ( ३६.५)

फलंदाजी – मरवन आटापटू ८४(१०१)

सनथ जयसुर्या ६३(५२)

गोलंदाजी – निलेश कुलकर्णी १/४८

सौरव गांगुली १/२५

निकाल – श्रीलंका ८ गड्यांनी विजयी

सामनावीर – मर्वान आटापटू

मालिकावीर – अर्जुन रणतुंगा.

 

७)पेप्सी आशिया कप २०००

  • साल – २००० 
  • यजमान देश – बांगलादेश
  • सहभागी संघ – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश
  • ठिकाण  – बांगबंधू राष्ट्रीय स्टेडियम,ढाका.
  • विजेता – पाकिस्तान
  • उपविजेता – श्रीलंका

Final Match Sammary

पाकिस्तान- २७७/४ (५०)

सईद अन्वर ८२ (११५)

नुवान झोयसा २/४४ (८)

श्रीलंका – २३८/१० (४५.२)

मारवान आटापटू १००(१२४)

अर्शद खान २/४२ (१०)

निकाल – पाकिस्तान ३९ धावांनी विजयी

सामनावीर – सईद अन्वर

८)इंडियन ऑईल आशिया कप २००४

Pepsi Asiya cup 2004
Credit: google.com
  • साल – २००४ 
  • यजमान देश – श्रीलंका
  • सहभागी संघ – भारत , पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग, यूएई.
  • ठिकाण – आर प्रेमदासा स्टेडियम,कोलंबो.
  • विजेता – श्रीलंका
  • उपविजेता – भारत

Final Match Sammary

श्रीलंका – २२८/९ (५०)

मारवन आटापटू ६५ (८७)

सचिन तेंडुलकर २/४० (१०)

भारत – २०३/९ (५०)

सचिन तेंडुलकर ७४ (१००)

उपुल चंदना ३/३३ (१०)

निकाल – श्रीलंका २५ धावांनी विजयी.

सामनावीर – मारवान आटापटू .

९)स्टार क्रिकेट आशिया कप २००८

Star cricket Asiya cup 2008
Credit: google.com
  • साल – २००८ 
  • यजमान देश – पाकिस्तान
  • सहभागी संघ – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग , यूएई.
  • ठिकाण  – नॅशनल स्टेडियम ,कराची
  • विजेता – श्रीलंका
  • उपविजेता – भारत

Final Match Sammary

श्रीलंका – २७३/१० (४९.५)

सनथ जयसुर्या १२५ ( ११४)

ईशांत शर्मा ३/५२ (१०)

भारत – १७३/१० (३९.३)

वीरेंद्र सेहवाग ६० (३६)

अजंठा मेंडिस ६/१३ (८)

निकाल – श्रीलंका १०० धावांनी विजयी.

सामनावीर – अजंठा मेंडिस८

१०)मेक्रोमॅक्स आशिया कप २०१०

  • साल – २०१० 
  • यजमान देश – श्रीलंका
  • सहभागी संघ – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश
  • ठिकाण  – रंगिरी,दंबुला
  • विजेता – भारत
  • उपविजेता – श्रीलंका

Final Match Sammary

भारत – २६८/६ (५०)

फलंदाजी – दिनेश कार्तिक ६६(८४)

रोहित शर्मा ४१(५२)

गोलंदाजी – टी. कदंबी २/३७

लसिथ मलिंगा २/५७

श्रीलंका – १८७/१० (४४.४)

फलंदाजी – चामिरा कपुगेदरा ५५(८०)

टी. कदंबी ३१(४५)

गोलंदाजी – आशिष नेहरा ४/४०

झहीर खान २/३६

निकाल – भारत ८१ धावांनी विजयी.

सामनावीर – दिनेश कार्तिक

मालिकावीर – शाहिद आफ्रिदी.

११)मायक्रोमॅक्स आशिया कप २०१२

  • साल – २०१२ 
  • यजमान देश – बांगलादेश
  • सहभागी संघ – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश
  • ठिकाण – शेर ए बांगला नॅशनल स्टेडियम,मिरपूर
  • विजेता – पाकिस्तान
  • उपविजेता – बांगलादेश

Final Match Sammary

पाकिस्तान – २३६/९ (५० )

फलंदाजी – सर्फराज अहमद ४६ (५२)

मोहम्मद हाफिज ४० (८७)

गोलंदाजी – अब्दूर रज्जाक २/२६

शकीब अल हसन २/३९

बांगलादेश – २३४/८ (५०)

फलंदाजी – शाकीब अल हसन ६८ (७२)

तमिम इकबाल ६० (६८)

गोलंदाजी – एजाज चीमा ३/४६

सईद अजमल २/४०

निकाल – पाकिस्तान २ धावांनी विजयी

सामनावीर – शाहिद आफ्रिदी

मालिकावीर – शकिब अल हसन.

१२)अराईज आशिया कप २०१४

  • साल -२०१४ 
  • यजमान देश – बांगलादेश
  • सहभागी संघ – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगानिस्तान.
  • ठिकाण  – शेर ए बांगला स्टेडियम,मिरपूर
  • विजेता – श्रीलंका
  • उपविजेता – पाकिस्तान

Final Match Sammary

पाकिस्तान – २६०/५ (५०)

फलंदाजी – फवाद आलम ११४ (१३४)

मिसबा उल हाक ६५ (९८)

गोलंदाजी – लसिथ मलिंगा ५/५६

श्रीलंका – २६१/५ (४६.२)

फलंदाजी – लाहिरी थिरीमाने १०१ (१०८)

महिला जयवर्धने ७५ (९३)

गोलंदाजी – सईद अजमल ३/२६

जुनेद खान १/५६

निकाल – श्रीलंका ५ गड्यांनी विजयी.

सामनावीर – लसिथ मलिंगा

मालिकावीर – लाहिरी थिरीमाने

१३)मायक्रोमॅक्स आशिया कप २०१६

  • साल – २०१६ 
  • यजमान देश – बांगलादेश
  • सहभागी संघ – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश,संयुक्त अरब अमिरात.
  • ठिकाण  – शेर ए बांगला स्टेडियम ,मिरपूर
  • विजेता – भारत
  • उपविजेता – श्रीलंका

Final Match Sammary

बांगलादेश – १२०/५ (१५) D/L

महमदुला रियाद ३३ (१३)*

जसप्रीत बुमराह १/१३ (३)

भारत – १२२/२ ( १३.५)

शिखर धवन ६० (४४)

तस्कीन अहमद १/१४ (३)

निकाल – भारत ८ गड्यांनी विजयी.

सामनावीर – शिखर धवन

१४)युनिमोनी आशिया कप २०१८

  • साल – २०१८ 
  • यजमान देश – संयुक्त अरब अमिरात
  • सहभागी संघ – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग, अफगानिस्तान.
  • ठिकाण – दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई.
  • विजेता – भारत
  • उपविजेता – श्रीलंका

Final Match Sammary

बांगलादेश – २२२/१० (४८.३)

लिटन दास १२१ (११७)

कुलदीप यादव ३/४५ (१०)

भारत – २२३/७ (५०)

रोहित शर्मा ४८ (५५)

रुबल हुसेन २/२६ ( १०)

निकाल – भारत ३ गड्यांनी विजयी.

सामनावीर – लिटन दास .

 

१५)डी पी वर्ल्ड आशिया कप ( टी २० ) २०२२

DP World Asiya cup 2022
Credit: google.com
  • साल – २०२२ 
  • यजमान देश – संयुक्त अरब अमिरात.
  • सहभागी संघ – भारत , पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश,अफगानिस्तान, यूएई.
  • ठिकाण – दुबई
  • विजेता – श्रीलंका
  • उपविजेता – पाकिस्तान

Final Match Sammary

श्रीलंका – १७०/६ (२०)

भानुका राजपक्षे ७१ (४५) *

हॅरिस रॉफ ३/२९ ( ४)

पाकिस्तान – १४७/१० ( २०)

मोहम्मद रिजवान ५५ (४९)

प्रमोद मदुशन ४/३४ (४)

निकाल – श्रीलंका २३ धावांनी विजयी.

सामनावीर – भानुका राजपक्षे.

१६) आशिया कप २०२३

  • साल – २०२३
  • सहभागी संघ – भारत,पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान , नेपाळ.
  • ठिकाण – आर प्रेमदासा स्टेडियम, श्रीलंका.
  • विजेता – भारत
  • उपविजेता – श्रीलंका

Final Match Sammary

श्रीलंका – ५०/ १०. ( १५.२ )

कुशल मेंडिस १७ ( ३४ )

एम. सिराज – ६/२१ ( ७ )

भारत – ५१/ ० ( ६.१ )

ईशान किशन – २३( १८ )

शुभमन गील – २७  ( १९ )

ही होती १९८४ ते २०२३ पर्यंतच्या आशिया कप विजेत्या संघाची यादी व थोडक्यात आढावा. ही माहिती कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून कळवा.

Transgender Cricketer : Denielle Mcgahey

Transgender Cricketer: Denielle Mcgahey    सध्या संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर हा चर्चेत आहे. कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 23 वर्षीय आर्यन बांगर हा आता अनया बांगर म्हणून ओळखली जाईल. अनया बांगर ने हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी(HRT) 2023 मध्ये करून घेतली. सध्या अनया बांगर युके मध्ये क्रिकेट खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपण आतापर्यंत पुरुष, महिला, अपंग आणि अंध खेळाडूंचे क्रिकेट पाहिलेले आहे.पण एखाद्या Transgender ( तृतीयपंथीं ) खेळाडूंचे क्रिकेट कोणी क्वचितच पाहिलेले असणार आणि तेही आतंरराष्ट्रीय स्तरावर हे मात्र दुर्मिळच असावे. इंग्लंडची मॅक्सीन ब्लिथिन ही २६ वर्षीय खेळाडू विश्वातील पहिली Transgender cricketer म्हणून ओळखली जाते. इंग्लंडच्या घरेलु सामन्यात खेळताना या उजव्या हाताच्या खेळाडूने एकूण १५ सामन्यात २०० हून अधिक धावा बनवल्या. २०१९ मध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावर तिला ‘ प्लेअर ऑफ द इअर ‘ म्हणून गौरविण्यात आले.

ही झाली विश्वातील प्रथम transgender खेळाडूची गोष्ट. पण आता २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एक transgender खेळाडू जी महिला वर्ल्डकप मध्ये खेळताना दिसली. तिने आपल्या उत्तम कामगिरी ने सर्वांची मनेही जिंकली. पण आयसीसीच्या एका नियमाने तिचे छोटेसे क्रिकेट करियर संपुष्टात आले.चला तर मग ती कोण खेळाडू होती ते  जाणून घेऊया.Transgender Cricketer: Denielle Mcgahey.

 

डॅनिअल मॅक हे

Transgender Cricketer : Denielle Mcgahey 

Transgender cricketer
Credit: webduniya.com

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये भाग घेणारी पहिली transgender क्रिकेटर म्हणून डॅनिअल मॅक हे हीने इतिहास घडवला आहे. २०२४ च्या महिला वर्ल्डकप मध्ये तीने कॅनडा कडून खेळताना हा पराक्रम केला. मॅक हे ही मूळची ऑस्ट्रेलियाची आहे. लहानपणापासूनच तिला क्रिकेटची खूप आवड होती. तिचा जन्म 14 एप्रिल 1994 साली ऑस्ट्रेलिया मध्ये झाला. फेब्रुवारी २०२० मध्ये तिने कॅनडा मध्ये स्थलांतर केले. तिने नोव्हेंबर २०२० मध्ये मेल टू फिमेल असे रूपांतरण केले.

 

डॅनिअल मॅक हे ची कामगिरी 

आतापर्यंत कोणतीही  ट्रान्स जेंडर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना दिसलेली नव्हते. परंतु प्रत्यक्षात असे चित्र आपणास पहावयास  मिळाले आहे. डॅनिअल मॅक हे ही लॉस एंजेलिस येथे झालेल्या पात्रता फेरीत कॅनडा कडून खेळताना दिसली. २०२४ मध्ये बांगलादेश मध्ये  महिला टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी ही पात्रता फेरी होती.त्या पात्रता फेरीत कॅनडा संघाने अर्जेंटिना,अमेरिका व ब्राझील शी दोन हात केले होते. डॅनिअल मॅक हे ने आता पर्यंत कॅनडा साठी 6 सामने खेळले असून त्यात 118 धावा बनवल्या आहेत. तसेच 2023 मध्ये नॅशनल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत कॅनडाकडून सर्वाधिक 237 धावा ही बनवल्या होत्या. त्यात तिचा एका शतकाचा ही समावेश होता.

AUS Vs SA 3rd ODI : 36 चौकार, 18 षटकार. 431 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या गोलंदाजांना फो फो फोडले.

मेल टू फीमेल पात्रता निकष –

सायकलिंग ,पोहणे, आणि रग्बी सारखे ॲथलेटिक्स खेळ अजूनही transgender महिलांना मोठ्या स्पर्धेत भाग घेण्यास प्रतिबंध करतात. आयसीसीने मात्र मॅक हे ला क्रिकेट खेळण्यासाठी पात्र मानले आहे. त्यासाठी आयसीसीने काही निकष लावले आहेत ते पुढीलप्रमाणे.

निकष –

  •  महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी एका transgender महिलेने हे सिध्द केले पाहिजे की , किमान १२ महिन्यांसाठी तिच्या रक्तातील टेस्टोस्टेरोन चे प्रमाण हे ५ nmol/L१ पेक्षा कमी असावे.
  •  त्या व्यक्तीने क्रिकेटमधील सहभागा दरम्यान हीच पातळी कायम राखली पाहिजे.
  •  मेल टू फिमेल transgender खेळाडू ने लिखित व सही केलेले शपथ पत्र आयसीसीला देणे बंधनकारक आहे.
  •  संबंधित खेळाडू ही स्त्री असल्याची खात्री आयसीसी च्या नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यास पटली पाहिजे.

 

डॅनिअल मॅक हे काय म्हणाली?

डॅनिअल मॅक हे ही वरील चाचण्या जवळपास दोन वर्षे देत आहे. तिच्या तृतीयपंथी समूहाचे एवढ्या मोठ्या स्टेज वर प्रतिनिधित्व करणे याचा तिला अभिमान आहे व ती यासाठी सज्ज असल्याचे ही आवर्जून सांगते. शरीरातील टेस्टोस्टेरोन चे प्रमाण निश्चित करण्यासाठी ती दोन वर्षापासून दर महिन्याला रक्ताची तपासणी करत आहे. ती कोणाविरुद्ध खेळली व किती धावा काढल्या याचाही तिला पाठपुरावा करावा लागतो .

डॅनियल मॅक हे ने घेतला संन्यास 

Transgender cricketer ban

आयसीसी ने वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय समिती यांच्या सल्ल्याने आणि नऊ महिने पाठपुरावा करून हा कठोर निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे इथून पुढे कोणताही ट्रान्स जेंडर खेळाडू ही महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. त्यांच्या नवीन नियमानुसार कोणतीही अशी खेळाडू जी पुरुष होती व नंतर ती स्त्री झाली किंवा तिने जे आवश्यक असलेले निकष पूर्ण केले असतील अशी कोणती खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेऊ शकणार नाही. आयसीसीच्या या नवीन नियमानुसार डॅनियल मॅक हे ला इथून पुढे क्रिकेट खेळता येणार नाही त्यामुळे तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जड अंत:करणाने संन्यास घेतला आहे.

निष्कर्ष 

Transgender ( तृतीयपंथी ) ही सुध्दा मानवी जात आहे. बऱ्याचदा यांच्याकडे हीन नजरेने पाहिले जाते.परंतु २१ व्या शतकात सर्वच क्षेत्रात transgender जोमाने पुढे जात आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा डॅनिअल मॅक हे च्या रूपाने एक चांगली खेळाडू आपणास पहावयास मिळाली आहे.आगामी काळात तिचा खेळ बहरत जावो व तिला पाहून आणखी खेळाडू तयार होवोत ही कामना करूया. परंतु ट्रान्स जेंडर खेळाडूवर घातलेली बंदी ही योग्य आहे की अयोग्य आहे कमेंट करून नक्की सांगा.

एकंदरीत हा लेख कसा वाटला ते कमेंट करून कळवा. व शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद.!

 

The Divices used by the Umpires in the cricket.

पूर्वीचे क्रिकेट आणि आजचे क्रिकेट यामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये खेळाडू सोबतच पंचांसाठी सुद्धा बरेचसे Divices आलेली आहेत.पंच हे खेळातील जणू देवच असतात. त्यांच्या एका निर्णयावर सुध्दा  टीमची हार – जित अवलंबून असते.  त्यामुळे आताच्या टेक्नॉलॉजीचा जमान्यात पंचांना निर्णय घेण्यास सुलभता यावी यासाठी बरीचशी उपकरणे बाजारात  उपलब्ध झालेली आहेत. याचा वापर करून पंच निर्णय देताना अचूकता राखण्याचा प्रयत्न करतात. चला तर आजच्या लेखात पाहूया अशी काही उपकरणे जी पंच मैदानात असताना वापरताना दिसतात.

The Divices used by the Umpires in the cricket. 

1] The Counter – काउंटर मशीन.

The Counter machine

‘ काउंटर मशीन ‘ हे छोटेसे उपकरण पंचांसाठी खूप उपयुक्त आहे. याचा वापर क्रिकेटमध्ये पंचांकडून किती ओव्हर झाल्या? किती  विकेट गेल्या आणि किती बॉल झाले यांचे मोजमाप करण्यासाठी केला जातो. पूर्वी क्रिकेटमध्ये अशी  उपकरणे नव्हती. त्यावेळी सगळे काही हातानेच मोजले जायचे आणि लक्षतही ठेवले जायचे. पण आताच्या डिजिटल युगात खूप सारी उपकरणे बाजारात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे डिजिटल उपकरणांद्वारे बॉल, विकेट आणि ओव्हर किती झाले यांचे मोजमाप या उपकरणाद्वारे सहज केले जाते.

द काउंटर मशीन हे उपकरण कसे काम करते ?

ज्यावेळी एखादा बॉलर ओव्हर टाकत असतो त्यावेळी त्याने किती बॉल टाकले ? किती विकेट घेतली आहे ? तसेच एकूण किती ओव्हर झाल्या याचे मोजमाप पंच करत असतात. एखादा बॉल टाकल जातो किंवा एखादी विकेट जाते किंवा एखादी ओव्हर पूर्ण होते त्यावेळी पंच उपकरणांमध्ये असलेले बटन दाबून त्याची माहिती या उपकरणांमध्ये साठवत असतात.

2] Bat Gauge – बॅट गेज

Bat Gauge

2025 च्या आयपीएल मध्ये या उपकरणाचा वापर करताना बंद झाला पण बऱ्याच वेळा पाहिलेले आहे जर का एखाद्या बॅट्समन ची बॅट ही नियमानुसार अधिक जाड किंवा रुंद असेल तर ती बॅट ग्राह्य धरली जात नाही आणि त्या बॅट्समन ला त्या बॅट ने खेळू दिले जात नाही. बॅट गेज या उपकरणाद्वारे बॅटची जाडी आणि रुंदी तपासली जाते. जर ती योग्य असेल तर त्या बॅटने त्या बॅट्समनला खेळू दिले जाते.

बॅट विषयीचे नियम –

  • बॅट ची face width ही 4.25 इंच असावी.
  • बॅटची blade width ही 2.64 इंच असावी
  • बॅटची Edge width ही 1.56 इंच असावी.

याचे मोजमाप करण्यासाठी एका पंचाची नेमणूक केली जाते. हे पंच टीमच्या डग आऊट  मध्ये जाऊन किंवा प्रत्यक्षात मैदानात जाऊन बॅटचे मोजमाप करतात जर का बॅट खेळण्यास योग्य असेल तर त्या खेळाडूला त्या बॅटने खेळू दिले जाते.अन्यथा  दुसऱ्या बॅटचा वापर करण्यास सांगितले जाते.

3] Ball Gauge – बॉल गेज

Ball Gauge

या उपकरणाद्वारे पंच हे बॉलच्या शेप नुसार तो खेळण्यास योग्य आहे की नाही याची पाहणी करतात.  या उपकरणात दोन रिंग दिलेल्या असतात एक रिंग ही दुसरी पेक्षा थोडी मोठी असते. ज्यावेळी पंचांना बॉल चा आकार थोडा बदललेला आहे असे वाटते. त्यावेळी बॉल गेज या उपकरणाचा  वापर केला जातो. यात बॉल हा प्रथम लहान रिंग मधून तर नंतर तो मोठ्या रिंग मध्ये  चेक केला जातो. या चाचणीत जर का तो  बॉल फेल होत असेल तर पंच नवीन बॉल चा वापर करण्याची परवानगी देऊ शकतात.

4] Stump Gauge – स्टंप गेज

Stump Gauge

क्रिकेटमध्ये यष्टी म्हणजेच स्टंप ला खूप महत्त्व आहे. एखादा खेळाडू बाद होण्याचे ते प्रमाण मानले जाते. जर का स्टंप उध्वस्त झाले तर तो खेळाडू त्रिफळा बाद म्हणजेच क्लीन बोल्ड किंवा यष्टीचीत म्हणजेच स्टम्पिंग,धाव बाद म्हणजेच रन आउट समजला जातो.  स्टंप ची रुंदी क्रिकेट नियमानुसार नऊ इंच असावी लागते. त्यासाठी stump Gauge या उपकरणाचा वापर केला जातो. मैदानात तीन समान होल पाडून स्टंप साठी योग्य ते माप घेतले जाते.

5] Walki – Talki – वोकी टोकी

वॉकी - टोकी

क्रिकेटमध्ये एखाद्यावेळी मैदानात पंचाकडून दिले गेलेल्या निर्णयावर पुढील टीम सहमत नसेल तर तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जाते. वोकि – टॉकी या उपकरणाद्वारे तिसरे पंच त्या निर्णयाची शहानिशा करून योग्य निर्णय कळवतात. जर का मैदानी पंचाचा निर्णय योग्य असेल तर तो वोकी – टॉकी द्वारे निर्णय कायम ठेवण्यास सांगितले जाते जर का निर्णय चुकला असेल तर तो निर्णय बदलण्यास सांगितले जाते.

6] Snick – O – meter – स्निक – ओ – मीटर

Snick o meter

स्निक ओ मीटर हे क्रिकेटमध्ये वापरले जाणारे आणखी एक प्रभावी उपकरण आहे. याचा उपयोग बॅटला बॉलचा संपर्क झाला की नाही हे तपासण्यासाठी केला जातो. स्निक ओ मीटर मधील आवाजाच्या तीव्रतेवरून बॅट्समन आऊट किंवा नॉट आऊट आहे पंच ठरवतात.

स्निक ओ मीटर म्हणजे काय ?

स्निक म्हणजे चेंडू बॅटला घासून जाणे आणि त्याची आवाजाची तीव्रता मोजण्याचे साधन म्हणजे स्निक ओ मीटर होय. हे उपकरण बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यावर जो आवाज होतो ते मोजण्यासाठी पंचाकडून वापरले जाते. हा आवाज मोजण्यासाठी ओसीलोस्कोप नावाच्या उपकरणाचा वापर केला जातो. स्निक ओ मीटर मध्ये बॅट जवळ असलेले सेंसर बॉल बॅटचा आणि बॉलच्या संपर्कातील आवाज मोजतात. यामुळे पंचांना योग्य तो निर्णय घेण्यास मदत होते.

7] Light – O – Meter – लाईट ओ मीटर

Light o meter

RAYGAD KA TIGER : USMAN PATEL BIOGRAPHY

क्रिकेट सामन्यात मैदानावरील प्रकाशाचे म्हणजेच उजेडाचे प्रमाण कितपत आहे किंवा अंधाराची पातळी किती आहे. हे मोजण्याचे प्रमाण म्हणजेच लाईट ओ मीटर होय.  जर एखाद्या सामन्यात अंधुक प्रकाश असेल आणि जर खेळ होऊ शकणार नसेल तर पंच तो सामना मध्येच थांबवू शकतात. लाईट मीटरच्या सहाय्याने प्रकाशाचे मोजमाप करून त्याची तीव्रता मोजली जाते व पंच पुढील योग्य तो निर्णय घेतात.

8] The Protective shield – प्रोटेक्टिव शिल्ड

Protective shield

आगामी काळात क्रिकेटमध्ये हे उपकरण पंचांसाठी वरदान ठरले आहे. कारण खेळाडूंना आपण बॉल पासून बचावासाठी पॅड, ग्लोज ,गार्ड , हेल्मेट यासारखे उपकरण वापरताना पाहिलेले आहे. पण पंचांसाठी एखादे संरक्षणात्मक उपकरण वापरताना आपण कधी पाहिले ना पाहिलेले नाही पण हल्ली क्रिकेटमध्ये पंचांना प्रोटेक्टिव्ह शिल्ड वापरताना आपण पाहिले आहे.

मग मित्रानो कशी वाटली ही माहिती ते आम्हाला. नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला यातील कोणते उपकरण माहीत होते तेही सांगा. आणि शेअर करायला विसरू नका.

 

 

AUS Vs SA 3rd ODI : 36 चौकार, 18 षटकार… 431 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या गोलंदाजांना फो फो फोडले.

ब्रेकिंग न्युज :

AUS Vs SA 3rd ODI : 36 चौकार, 18 षटकार… 431 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या गोलंदाजांना फो फो फोडले.

वनडेत 170 चेंडूत 404 धावा. सारे रेकॉर्ड उद्ध्वस्त

Read more

आशिया कप 2025 : भारत – पाक क्रिकेट वाद पुन्हा पेटला !

ब्रेकिंग न्यूज : 

आशिया कप 2025 :  भारत – पाक क्रिकेट वाद पुन्हा पेटला !

काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना ठार मारले. यामागे पाकिस्तानचा हात होता हे आधीच निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भारतीय सरकारने पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी केली होती.राहिली गोष्ट क्रिकेट ची तर, भारत हा आधीपासूनच पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका खेळत नाही. शिवाय अनेक खेळाडूंनीही भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये असे सांगितले आहे. ‘ आधी देश मगच क्रिकेट ‘अशी अनेक माजी खेळाडूंची भूमिका राहिली आहे. त्यामुळे भारताने फक्त द्विपक्षीय मालिकांमध्येच नव्हे तर आशिया कप आणि वनडे व टी-20 विश्वचषकावर देखील बहिष्कार टाकावा अशी क्रीडाप्रेमींकडून मागणी होत आहे. याचा परिणाम म्हणून भारत – पाक क्रिकेट वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

 लेजण्ड क्रिकेट लीग मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास भारताचा नकार . 

व्यवसायिक क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेल्या माजी खेळाडूंची लेजण्ड क्रिकेट लीग भरवली जाते. मागच्या महिन्यात झालेल्या या लीगमध्ये भारतीय लेजण्ड संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास साफ नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघ जरी सेमीफायनल गाठू शकला नसला तरी त्यांनी करोडो भारतीयांची मने मात्र जिंकली होती.

राजकीय मंडळींची आशिया कप मध्ये पाकिस्तानी बहिष्कार घालण्याची मागणी.

आशिया कप 2025 .
भारत - पाक क्रिकेट वाद पुन्हा पेटला !

पहलगाम हल्ल्यानंतर  पाकिस्तानला भारतीय जनतेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय जनता आणि राजकीय मंडळी सुद्धा आगामी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच अनेक तर्क – वितर्क  मांडले जात आहेत.

आशिया कप मध्ये भारत पाकिस्तान सामना होणार.

आशिया कप 2025

आशिया कप 9 सप्टेंबर पासून यूएई मध्ये सुरू होणार असून नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारत – पाकिस्तान कदाचित तीन वेळा आमने – सामने येण्याची शक्यता आहे. सर्व स्तरातून आशिया कपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा अशी मागणी असतानाही भारत सरकारने या स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच बहुराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास कोणतीही बंदी नाही असेही स्पष्ट केले आहे.

पहलगाम मधील भ्याड आल्यानंतरही भारत पाकिस्तान विरुद्ध आशिया कप मध्ये क्रिकेट खेळणार आहे याची काही प्रमुख कारणे समोर आलेले आहेत

1] ACC मधील भारताचा दर्जा कमी होऊ शकतो.

आशियन क्रिकेट कौन्सिल म्हणजेच ACC वर आतापर्यंत भारताचे वर्चस्व राहिले आहे. आशिया कप मध्ये भारतीय संघ आतापर्यंत अव्वल राहिला आहे.जर भारतीय संघाने पाकिस्तान वर बहिष्कार टाकला तर ही स्पर्धा अपयशी ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम या स्पर्धेच्या उत्पन्नावर ही होऊ शकतो. तसेच एशियन क्रिकेट कौन्सिल मधील भारताचा दर्जाही कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय पाकिस्तान कट कारस्थान करून इतर देशांना भारताविरुद्ध करण्याची योजना आखू शकतो.

2] बहिष्कार टाकल्यास पाकिस्तानला मोफत गुण मिळतील. 

भारताने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किंवा स्पर्धा चालू असतानाच पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तानला नाहक मोफत गुण मिळतील. त्यामुळे कदाचित पाकिस्तान फायनल मध्ये पोहचून विजेता ही बनू शकतो. त्यामुळे पाकिस्तानात फुकटचा गुण न देता त्यांच्याशी खेळून त्यांना पराभूत करून वचपा काढावा हा उद्देश असू शकतो.

क्रिकेट मध्ये इतिहास घडला. एकाने ठोकल्या 1000 धावा आणि संघाने बनवल्या 1400 धावा.

3] आयसीसी मध्ये बीसीसीआयचे स्थान कमकुवत होऊ शकते. 

आशिया कप 2025
ICC and BCCI

पैशाच्या बाबतीत जगातील सर्व क्रिकेट बोर्ड खरेदी करण्याची ताकद बीसीसीआय कडे आहे त्यामुळे जगातील सर्वाधिक शक्तिशाली क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआय ओळखले जाते. शिवाय आशियाई गटाच्या एकतेमुळे आयसीसीच्या राजकारणात बीसीसीआय देखील मजबूत स्थितीत आहे. जर भारतीय संघाने पाकिस्तान वर बहिष्कार टाकला तर आशियाई गटाची एकता कमी होईल आणि आयसीसीच्या राजकारणात बीसीसीआयचे स्थान कमकुवत होऊ शकते.

4] भारत – पाक सामना आणि पैशांचा खेळ.

भारत आणि पाकिस्तान यांचा कोणताही सामना हा हाय व्होल्टेज असतो. तसेच जाहिरात  आणि प्रसारमाध्यमे यांच्यामार्फत बराच पैसा ही या सामन्यावर लावला जातो. 2025 मध्ये होणाऱ्या आशिया कपचे प्रसारण हक्क आधीच सुमारे 1500 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तान या सामन्यामुळेच आशिया कप चे प्रसारणाचे हक्क इतक्या प्रचंड किमतीला विकले गेलेले आहेत. भारत-पाक सामन्याचे जाहिरातीचे स्लॉट प्रत्येक 10 सेकंदाला 25 ते 30 लाखांना विकले जातात. तर इतर सामन्याचे प्रसारण हक्काची रक्कम ही निम्म्यापेक्षाही कमी आहे. जर भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध खेळला नाही तर प्रसारकांना हे स्लॉट चांगल्या किमतीने विकता येणार नाहीत व प्रसारकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

या सर्व कारणांमुळे कदाचित भारत सरकार आणि बीसीसीआयने पाकिस्तानसोबत बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सामना खेळण्यास परवानगी दिली आहे.

तुमच्यामध्ये भारताने पाकिस्तानसोबत बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळावे की संपूर्ण बहिष्कार टाकावा? हे कमेंट करून नक्की कळवा आणि शेअर करायला विसरू नका.

FAQ

1) आशिया कप 2025 ते यजमानपद कोणाकडे आहे?

उत्तर – युएई. 

2) 2025 च्या आशिया कप चे प्रसारण माध्यमाचे हक्क सुमारे किती रुपयांना विकले गेले आहे ? 

उत्तर – पंधराशे कोटी. 

3) आशिया कप 2025 ची सुरुवात कधीपासून होणार आहे? 

उत्तर – 9 सप्टेंबर 2025 पासून. 

 

 

 

Most Time Double Century in Test Cricket

हल्लीचे क्रिकेट जरी t20 स्वरूपाचे असले तरी टेस्ट क्रिकेट बेस्ट आहे असे आपण बऱ्याच क्रिकेटपटूंच्या भाषणातून ऐकले आहे एखाद्या खेळाडूची जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे टेस्ट क्रिकेट खेळल्यामुळे दिसून येते. म्हणूनच टेस्ट क्रिकेटला ‘Test is the best ‘म्हटले जाते.

टेस्ट क्रिकेटमध्ये खूप मोठ मोठे खेळाडू बनलेले आहेत जसे की डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, जॅक कॅलिस आणि आणखी बरेचसे खेळाडू ज्यांनी टेस्ट क्रिकेटला उच्च पातळीवर नेले. आपल्या सर्वांना माहीतच आहे की टेस्ट क्रिकेट हे खेळाडूंची शारीरिक आणि मानसिकतेची कसोटीच पाहत असते आणि यातूनच एका खऱ्या खेळाडूची ओळख होते.

आजच्या लेखात आपण अशा काही खेळाडू बदल बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा डबल सेंच्युरी बनवल्या आहेत.

 Most Time Double Century in Test Cricket  

 1] डॉन ब्रॅडमन ( ऑस्ट्रेलिया )          12 Duble century 

Sir डॉन ब्रॅडमन

ऑस्ट्रेलियाचे सर्वकालीन महान फलंदाज आणि क्रिकेट विश्वातील सर्वकालीन महान फलंदाज म्हणून सर डॉन ब्रॅडमन ओळखले जातात. डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 मध्ये झाला होता. त्यांनी 29 डिसेंबर 1928 रोजी इंग्लंडविरुद्ध आपले पहिले आंतरराष्ट्रीय टेस्ट शतक झळकावले होते. डॉन ब्रॅडमन यांनी 52 आंतरराष्ट्रीय सामने खेळले व त्यात त्यांनी 6,996 धावा बनवल्या त्यात त्यांची सरासरी ही 99.94 इतकी प्रचंड होती. ही टेस्ट क्रिकेट मधील एखाद्या खेळाडूची आजवरची सर्वाधिक सरासरी मानली जाते. त्यांनी आपल्या 52 टेस्ट मध्ये 29 शतके झळकावली होती. त्यातील त्यांनी सर्वाधिक 12  वेळा डबल सेंच्युरी झळकावण्याचा मान पटकावला आहे आणि हा रेकॉर्ड आजपर्यंत अबाधित राहिलेला आहे. त्यांनी आपल्या टेस्ट करियर मध फक्त सहा षटकार मारले होते. ते आपल्या शेवटच्या सामन्यात शून्यावर बाद झाले. त्यांनी जर आणखी  फक्त 4 धावा बनवल्या असत्या तर टेस्टमध्ये 100 ची सरासरी राखणारा जगातील एकमेव खेळाडू अशी अजरामर ओळख त्यांची झाली असती.

2] कुमार संगकारा ( श्रीलंका )         11 Duble century 

Kumar Sangakkara
Credit: google.com

कुमार संगकारा हे श्रीलंकेचे महान विकेट किपर फलंदाज होते. ते श्रीलंकेचे कॅप्टन ही राहिले होते. शिवाय  डाव्या हाताचे तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. कुमार संगकारा यांनी  2004 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी श्रीलंकेकडून 134 टेस्ट सामने खेळले व त्यात 12400 बनवल्या त्यांचा सर्वाधिक स्कोर हा 319 होता. त्यांनी 57.40 च्या सरासरीने धावा कुटल्या होत्या. मोक्याच्या क्षणी जयवर्धने सोबत मैदानात राहून त्यांनी श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाच्या भागीदारी केल्या. टेस्टमध्ये महिला जयवर्धने सोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेली 624 धावांची भागीदारी ही आजवरची सर्वाधिक भागीदारी म्हणून ओळखली जाते. त्यांनी आपल्या टेस्ट करिअरमध्ये एकूण 11 वेळा डबल सेंच्युरी बनवल्या आहेत. 2009, 2012 आणि 2014 मध्ये आयसीसी ने त्यांची सर्वोत्तम टेस्ट खेळाडू म्हणून निवड केली होती.

3] ब्रायन लारा ( वेस्ट इंडीज )            9 Duble century 

ब्रायन लारा
Credit : google.com

ब्रायन लारा यांचा जन्म 2 मे 1969 रोजी कॅन्टारो त्रिनिदाद येथे झाला. लारा हे वेस्ट इंडीजचे महान स्टायलिश फलंदाज होते. ते आपल्या मोठमोठ्या खेळीसाठी ओळखले जायचे.  टेस्ट क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 131 टेस्ट सामने खेळले असून त्यात 11953 धावा बनवल्या होत्या. त्यात त्यांची 52.9 इतकी सरासरी राहिली होती. लारा यांनी तब्बल 9 वेळा डबल सेंच्युरी बनवल्या होत्या. आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद 400 धावा आणि प्रथम श्रेणी सामन्यात नाबाद 501 धावा ही त्यांची आजवरची सर्वोत्तम खेळी आहेत. प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन वेळा 400 पेक्षा जास्त धावा करणारे लारा हे एकमेव खेळाडू आहेत.

4] विराट कोहली ( भारत )               7  Duble century 

Virat Kohli
Credit : google.com

आधुनिक क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीने नुकतीच टेस्ट  क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि क्रिकेटचे विक्रम यांचे घनिष्ठ असे नाते आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली एकूण 123 सामने खेळला असून त्यात त्याने 9230 धावा बनवले असून 254 ही त्याची सर्वाधिक खेळी आहे. विराटने आपल्या टेस्ट करिअरमध्ये 7 वेळा डबल सेंच्युरी झळकावले आहेत. शिवाय तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर नंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

वनडेत 170 चेंडूत 404 धावा. सारे रेकॉर्ड उद्ध्वस्त

5] वॉली हैंमंड ( इंग्लंड )                  7 Duble century 

वॉली
                        Credit : google.com

वॉली हैंमंड हे नव्वदीच्या  दशकातील इंग्लंडचे महान फलंदाज होते. त्यांनी 1927 ते 1947 दरम्यान 85 टेस्ट सामने खेळले. त्यात त्यांनी 58 च्या सरासरीने 7249 धावा बनवल्या. शिवाय 22 शतक ही मारली. खास करून त्यात त्यांनी 7 डबल सेंच्युरी  मारल्या. इतक्या वर्षानंतरही त्यांचे नाव या यादीत येते ही खूप अभिमानाची बाब आहे. त्या काळात तर त्यांनी प्रथम श्रेणी सामन्यात हाहाकार माजवला होता. त्यांनी 634 प्रथम श्रेणी सामन्यात 50,500 धावा चोपल्या होत्या. त्यात त्यांनी तब्बल 167 शतके आणि 185 अर्धशतके झळकावली होती. शिवाय 732 बळी मिळवले होते.

6] महिला जयवर्धने (श्रीलंका )          7 Duble century 

Most Time Double Century in Test Cricket
                          Credit : google.com

श्रीलंकेला लाभलेला क्रिकेटमधील आणखीन एक कोहिनूर हिरा म्हणजेच महिला जयवर्धने होय. भारतासाठी जसे राहुल द्रविड मैदानात भिंत म्हणून काम करायचे. त्याप्रमाणे श्रीलंकेसाठी श्रीलंकेची भिंत म्हणून महिला जयवर्धने नेहमीच मैदानात उभे असायचे. महिला जयवर्धने यांनी 49 च्या सरासरीने 149 टेस्टमध्ये 11814 धावा काढल्या आहेत.  त्यांनी 34 शतक झळकावले आहेत. त्यात त्यांनी 7 वेळा डबल सेंच्युरी झळकावली आहे. त्यांची 374 धावांची खेळी टेस्ट क्रिकेटमधील उजव्या हाताच्या फलंदाजाने काढलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

FAQ 

1) 3 ओव्हर मध्ये 100 धावा कोणी काढल्या होत्या ?

उत्तर – डॉन ब्रॅडमन. 

2) डॉन ब्रॅडमन यांना सर्वाधिक वेळा कोणी बाद केले होते ?

उत्तर – हेडली वेरीटी ( इंग्लंड ) 8 वेळा. 

3) कुमार संगकाराने टेस्टमध्ये किती शतके ठोकली आहे ? 

उत्तर – 38 शतक.

4) कसोटीत  400 करणारा जगातील एकमेव खेळाडू कोण ? 

उत्तर – ब्रायन  लारा  ( वेस्ट इंडीज )

5) विराट कोहलीने एकूण किती आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहेत? 

उत्तर – वनडे – 51 ( सर्वाधिक ) , टेस्ट – 30 , T 20 – 1 

एकूण – 82 शतक . 

क्रिकेट मध्ये इतिहास घडला. एकाने ठोकल्या 1000 धावा आणि संघाने बनवल्या 1400 धावा.

 

कसोटीत एका डावात शंभरहून अधिक धावा देणारे वेगवान गोलंदाज

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंड आणि भारतीय फलंदाजांचा धबधबा राहिला. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय  गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना 669 धावा फटकावल्या. तर भारताने पहिल्या डावात 358 धावा आणि दुसरा डावात 425 धावा बनवल्या. खास करून इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना 600 हून अधिक धावा केल्या. शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमरा यांनी 100 हून अधिक धावा दिल्या. जसप्रीत बुमराने तर आपल्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच एका डावात शंभरहून अधिक धावा दिल्या. कोणत्याही संघाचा वेगवान गोलंदाज हा कणा मानला जातो. क्रिकेट विश्वात एकापेक्षा एक मातब्बर वेगवान गोलंदाज होऊन गेलेत आणि काही जण आजही खेळत आहेत. पण काही वेळा अशा गोलंदाजाला ही मार खावा लागतो. चला तर पाहूया काही अश्या गोलंदाजांना ज्यांनी कसोटीत एका डावात 100 हून अधिक धावा दिल्या आहेत. 

शंभरहून अधिक धावा देणारे वेगवान गोलंदाज 

1) कपिल देव ( भारत ) 

Kapil Dev
Image source IMDb.com

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार असलेले कपिल देव हे भारतातील एक सर्वोत्तम ऑल राऊंडर खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी 131 कसोटी सामने खेळलेले असून त्यात त्यांनी 434 बळी घेतलेले आहेत. कपिल देव यांच्या करिअरमध्ये बऱ्याच वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत. कपिल देवयानी आपल्या टेस्ट करिअरमध्ये सर्वाधिक 25 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.

2)मिचेल जॉन्सन(ऑस्ट्रेलिया ) 

Michel jonsan
Image source google.com

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनने 2007 मध्ये कसोटी मध्ये पदार्पण केले होते. त्याने 73 सामन्यातील निश्चित 313 विकेट मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या डाव्या हाताचा हा गोलंदाज बाऊन्सर आणि स्लेजिंग साठी प्रसिद्ध होता.  बऱ्याच वेळा त्याने या अस्त्राचा वापर करून खूप विकेट्स मिळवले आहेत. पण मी चेंज जॉन्सन ने कसोटीत एकूण 24 वेळा 100 हून अधिक धावा दिलेले आहेत.

3) इमरान खान ( पाकिस्तान )

Imran Khan
Image source Pinterest.com

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि 2022 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले इमरान खान हे आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्याने एकूण 88 सामने खेळले व त्यात 362 विकेट मिळवले. पण इमरान खान यांनी कसोटीत एकूण 21 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिले आहेत.

4) चामिंडा वास ( श्रीलंका ) 

Chaminda vas
Image source sky sports.com

श्रीलंकेचा आतापर्यंतचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा चामिंडा वास यांनी 1994 मध्ये कसोटीत पदार्पण केले. 1994 ते 2009 पर्यंत त्यांनी एकूण 111 कसोटी सामने खेळले व त्यात 355 विकेट घेतल्या. पण या वेगवान डावखुऱ्या गोलंदाजांनेही कसोटीत एकूण 20  वेळा एका डावा शंभर पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.

5) ईशांत शर्मा ( भारत ) 

Ishant Sharma
Image source google.com

ईशांत शर्मा हा भारताचा एक शानदार वेगवान गोलंदाज होता. ईशांत शर्माने 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले त्याने आपल्या कसोटीत रिकी पाँटिंग सारख्या फलंदाजाला जखडून ठेवले होते. त्याने 105 कसोटी सामन्यात 311 विकेट मिळवले आहेत. पण ईशांत शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 19 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.

6) जेम्स अँडरसन ( इंग्लंड ) 

जेम्स अँडरसन
Image source google.com

इंग्लंडचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसनला ओळखले जाते. जेम्स अँडरसन मध्ये इन स्विंग  आणि आऊट स्विंग करण्याची अनोखी ताकद होती. 2024 मध्ये जेम्स अँडरसन ने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. पण त्यापूर्वी त्याने 188 सामन्यात तब्बल 704 विकेट्स मिळवले. जेम्स इन द सेना हा सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. पण त्याने तब्बल 18 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.

7) जवागल श्रीनाथ ( भारत ) 

Javagal shrinath
Image source google.com

90 च्या दशकातील भारताचा सर्वोत्तम वेगवान गोविंदाचा एक असलेले जवागल श्रीनाथ हे आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 157 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने गोलंदाजी केली होती. त्याने एकूण 67 सामने खेळलेले असून त्यात 236 विकेट मिळवलेले आहेत. पण त्याने 17 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.

8) ब्रेट ली ( ऑस्ट्रेलिया ) 

Bret Lee
Image source google.com

ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेला ब्रेट ली याने एकूण 76 कसोटी सामने खेळलेले असून त्यात त्याने 310 विकेट्स मिळवलेले आहेत. 2005 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्याने 161.1 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने चेंडू टाकला होता. हा कसोटी मधील सर्वाधिक वेगवान चेंडू ठरला होता. पण या वेगवान गोलंदाजानेही आपल्या कारकिर्दीत एकूण 15 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.

9) डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका )

डेल स्टेन
Image source Pinterest.com

दक्षिण आफ्रिकेची’ स्टेन गन ‘म्हणून ओळखला जाणारा डेल स्टेन हा दक्षिण आफ्रिकेचा आतापर्यंतचा सर्वोत्तम  वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तसेच क्रिकेट विश्वात सर्वोत्तम बॉलिंग ॲक्शन साठीही हा गोलंदाज ओळखला जातो. तसेच कसोटी मध्ये 2343 दिवस नंबर एक चा गोलंदाज म्हणून त्याने विक्रम प्रस्थापित केला होता. त्याने 93 कसोटी सामन्यात 439 विकेट्स मिळवल्या आहेत. इतक्या भारी गोलंदाजांनेही 15 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.

10)मिचेल स्टार्क(ऑस्ट्रेलिया )

मिचेल स्टार्क
Image source jagaran.com

सध्याच्या घडीतील सर्वोत्तम डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख असावी स्टार्क याने नुकताच 100 वा  कसोटी सामना खेळला. त्यात त्याने 400 विकेट्स पूर्ण केलेत. या यादीतील हा एकमेव सक्रिय खेळाडू आहे मिचेल स्टार्क ने 2011 मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. परंतु या गोलंदाजानेही एकूण 14 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेले आहेत.

वनडेत 170 चेंडूत 404 धावा. सारे रेकॉर्ड उद्ध्वस्त

11)वसीम अक्रम(पाकिस्तान ) 

वसीम अक्रम
Image source google.com

पाकिस्तानचा स्विंग किंग म्हणून ओळखला जाणारा वसीम अक्रम याने 1985 मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. 2002 पर्यंत त्याने 104 सामन्यात 414 विकेट मिळवल्या होत्या. संपूर्ण क्रिकेट विश्वात The King of Swing अशी त्याची ओळख होती. पण त्यानेही कसोटीत एका डावात एकूण बारा वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिलेल्या आहेत.

12)शोएब अख्तर(पाकिस्तान )

Shoaib Akhtar
Image source google.com

बालपणी पायाने चालू ही न शकणारा शोएब अख्तर क्रिकेटमधील सर्वात घातक आणि वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला गेला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत फक्त 46 कसोटी सामने खेळले परंतु त्यात 178 विकेट मिळवल्या. त्याने कसोटी मधील 161.3 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने चेंडू टाकून ब्रेट ली चा विक्रम मोडला होता. शोएब अख्तर चा रन अप आणि स्पीड पाहून भले भले फलंदाज त्याच्या गोलंदाजीला घाबरत. तरी शोएब अख्तर ने  आपल्या कसोटी कारकीर्दीत  एकूण 7 वेळा 100 पेक्षा जास्त धावा दिले आहेत.

निष्कर्ष ( cunclution)

क्रिकेटमध्ये कितीही मोठा गोलंदाज असो जर का त्या दिवशी त्याचा दिवस नसेल तर तो हमखास धावा खर्च करतो. आपण पाहिलेले यादीत एका पेक्षा एक भारी गोलंदाज असतानाही त्यांनी कसोटीच्या एका डावात 100 पेक्षा जास्त धावा  बऱ्याच वेळा दिलेले आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय घडून जाईल हे सांगता येत नाही आणि क्रिकेटच सगळ्यांपेक्षा मोठा असतो याची प्रचिती आपल्याला यातून येते. माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका.

हे ही वाचा.

Krishna Satpute : The God of Tennis Cricket

क्रिकेट मध्ये इतिहास घडला. एकाने ठोकल्या 1000 धावा आणि संघाने बनवल्या 1400 धावा.

सध्याचे क्रिकेट हे खूप फास्ट झाले आहे. बरेच जण म्हणतात की सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये फलंदाजांचा धबधबा असतो हे जरी खरे असले तरी एखाद्या खेळाडूला सामन्यात शतक, द्विशतक आणि त्रिशतक ही झळकावताना आपण पाहिले आहे. त्यामध्ये त्यांची मेहनतही पाहिली आहे पण असे धावांचे डोंगर उभारणे ही काही सोपी गोष्ट नाही. आपल्याला माहीतच आहे की कसोटीत ब्रायन लारा ने नाबाद 400 धावा तसेच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात नावात 501 धावा बनवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मग आपल्या सर्वांना असा प्रश्न पडतो की, क्रिकेट विश्वात सर्वाधिक वैयक्तिक धावा किती येणे कोणी काढल्या असतील ? सांगू ? त्याचे नाव आहे प्रणव धनवडे. या मुंबईकर खेळाडूने एका डावात एक नाही दोन नाही तर तब्बल दहा शतके ठोकली होती. चला तर त्याच्या या विश्व-विक्रमाबद्दल जाणून घेऊया.

 323 चेंडू आणि नाबाद 1009 धावा  (1009 runs in just 323 balls) 

आज आम्ही तुम्हाला अशा एका विश्वविक्रमी खेळी बद्दल सांगणार आहोत की जे वाचून आपल्याला आश्चर्याचा धक्का दर बसेलच शिवाय अभिमानही वाटेल. नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये क्रिकेट विश्वात एक आश्चर्यकारक घटना घडली क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने एकट्याने एका डावात एक हजार धावा बनवल्या. 15 वर्षीय प्रणव धनवडे नावाच्या खेळाडूने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)यांच्या वतीने आयोजित भंडारी कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत दरम्यान ही अद्भुत कामगिरी केली होती.  प्रणव धनवडे ने 312 च्या स्ट्राईक रेटने 323 चेंडूत तब्बल नाबाद 1009 धावा ठोकल्या. त्यात 129 चौकार आणि 59 षटकारांचा समावेश होता. त्यात 870 धावा तर त्याने फक्त चौकार आणि षटकारांनीच वसूल केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती एका डावात सर्वाधिक धावा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू बनला होता.

कोण आहे प्रणव धनवडे ?

प्रणव धनवडे

प्रणव धनवडे चा जन्म 13 मे 2000 रोजी एका गरीब कुटुंबात झाला प्रणव चे वडील प्रशांत धनवडे हे रिक्षाचालक तर आई मोहिनी धनवडे ही एका कॅन्टीनमध्ये काम करायची. प्रशांत धनवडे यांचे प्रणवची  मुंबईच्या रणजी टीम मध्ये निवड व्हावी असे स्वप्न होते. त्यासाठी ते प्रणवला खूप प्रोत्साहित करत. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या प्रणवनेही आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आणि अशी विश्वविक्रमी खेळी करून दाखवली.

असा घडला विश्वविक्रम

             2016 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने Under 16 ही भंडारी अंतर शालेय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. के.सी.गांधी स्कूल आणि आर्य गुरुकुल स्कूल यांच्यात सामना खेळवला जाणार होता. पण आर्य गुरुकुलचे 11 खेळाडू होत नव्हते. दहावी ची परीक्षा असल्यामुळे शाळेने दहावीच्या मुलांना खेळण्यास मज्जाव केला. तर त्यांच्या एका प्रमुख खेळाडूला घरातून खेळण्यास पाठवले गेले नाही. तरीही आर्य गुरुकुलच्या प्रशिक्षकांनी शक्कल लढवून 11 खेळाडू कसेबसे मैदानात उतरवले. मैदान हे फारसे मोठे नव्हते. त्याची सीमारेषा ही फक्त 30 यार्ड पर्यंत होती. आर्य गुरुकुल चा पहिला डाव फक्त 31 धावांवर आटोपला. त्यानंतर के.सी. गांधी स्कूल ने पहिल्या दिवशी 1 बाद 956 धावांचा डोंगर उभारला. त्यात प्रणवने  एकट्याने तब्बल 652 धावा बनवत मुंबईच्या शालेय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला पूर्वी हा विक्रम पृथ्वीच्या शॉ च्या नावावर होता. पृथ्वी शॉ ने 546 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी प्रणवणे नाबाद 1009 धावा बनवत सारे विक्रम मोडीत काढले. प्रणवणे आपल्या या खेळीत 395 मिनिटे क्रीज वर थांबत 323 चेंडूत 1009 धावा बनवल्या. त्यात 129 चौकार आणि 59 षटकारांचा समावेश होता.

सामन्याचा निकाल काय लागला 

Score card
Imege source from Google

                 प्रणव धनवडे ने प्रथम आकाश सिंग सोबत पहिल्या विकेटसाठी 546 धावांची भागीदारी केली. नंतर सिद्धेश पाटील सोबत 531 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे के.सी.गांधी स्कूलने 3 बाद 1465 धावांवर आपला डाव घोषित केला. आर्य गुरुकुल स्कूलचा संघ पहिल्या डावात फक्त 31 धावांवर आटोपला. के.सी. गांधी संघाला 1434 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही आर्य गुरुकुल स्कूलचा संघ फक्त 52 धावा च करू शकला. अशा तऱ्हेने के.सी.गांधी स्कूल ने हा सामना एक डाव आणि 1382 धावांनी जिंकला आणि इतिहास घडवला. के.सी. गांधी स्कूलने काढलेल्या 1465 धावा या एका डावातील सर्वाधिक धावा होत्या.

पूर्वी यांच्या नावावर होता हा विक्रम 

             प्रणव धनवडे च्या नाबाद 1009 धावांच्या खेळीमुळे अनेक विक्रमांना गवसणी घातली गेली. मुंबईच्या शालेय स्पर्धेत पृथ्वी शॉ ने 546 धावा बनवल्या होत्या. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 1899 मध्ये इंग्लंडच्या आर्थर कॉलिंनसने 628 धावा बनवल्या होत्या. त्या सर्वोच्च मानल्या जात होत्या. परंतु 2016 मध्ये खेळलेल्या प्रणवच्या या खेळीने 116 वर्षांपूर्वीचा विक्रम ही मोडीत निघाला आणि अविश्वसनीय आणि कदाचित कधीही न मोडला जाणारा विक्रम प्रस्थापित झाला.

प्रणव धनवडे वर कौतुकाचा वर्षाव 

                प्रणव धनवडे च्या नाबाद 1009 या खेळीमुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक क्रिकेटर आणि राजकारण्यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्याच्या या खेळीची दखल भारतातच नव्हे साता समुद्र पार परदेशातही घेतली गेली. खुद्द सचिन तेंडुलकर यांनी त्यांची स्वाक्षरी असलेली बॅट त्याला भेट दिली. तर एम एस धोनी आणि अजिंक्य रहाणे यांनी त्याच्या खेळीचे कौतुक केले होते. अजित वाडेकर यांनी त्याला क्रिकेटचे किट भेट दिले होते. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला दरमहा 10000 रुपयांची स्कॉलरशिप दिली होती. तर तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रणवचा पुढील शिक्षणाचा खर्च सरकार करेल असे घोषित केले होते.

प्रणव धनवडे ला काय काय मिळाले ?.

           गरीब कुटुंबातील प्रणव धनवडे हा क्रिकेटच्या एका गावात 1000 धावा बनवणारा एकमेव खेळाडू आहे. त्याच्या या अजरामर खेळीचे सर्व स्तरातून कौतुक होत होते. शिवाय त्याच्या या खेळीची दखल बऱ्याच जणांनी घेतली तसेच त्याला पुरस्कार मिळाले होते ते पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहेत.

  • NDTV ने प्रणवला ‘ इंडिया ऑफ द इयर’ ( India of the Year ) हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. 
  • त्याच्या या खेळीची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ‘मध्ये नोंद झाली.
  • एमसीए कडून त्याला दरमहा दहा हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळाली. 

प्रणवणे घेतला पोलिसांशी पंगा 

            ही काय फारशी मोठी गोष्ट नव्हती. त्याचे झाले असे की प्रणव ज्या मैदानात सराव करत असे त्या मैदानात एका मंत्र्याचे हेलिकॉप्टर उतरणार होते. त्यामुळे सर्व खेळाडूंना मैदानाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. परंतु प्रणवला मैदानातून बाहेर जाण्यासाठी थोडा उशीर झाला होता. त्यामुळे पोलिसांनी प्रणवला फटकारले. प्रणवणे पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे त्याला थेट पोलीस चौकीत नेण्यात आले. विषय काय फार मोठा नव्हता. पण यावर चर्चा मात्र जोरदार झाली होती.

पुढे प्रणवचे काय झाले ? 

            प्रणव धनवडे याने खेळलेल्या विश्व विक्रमी खेळीमुळे त्याच्याकडून सर्वांच्या खूप अपेक्षा वाढल्या होत्या. काही जण  तर त्याला पुढील सचिन तेंडुलकर समजू लागले होते. अपेक्षा आणि दबावामुळे प्रत्येक सामन्यात त्याच्यावर दबाव वाढत गेला त्याची कामगिरी पूर्वीसारखी राहिली नाही. खराब फॉर्म आणि कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे त्याला वेस्ट झोनच्या Under 16 च्या टीम मध्ये स्थान मिळाले नाही. कारण वय बसत नव्हते शिवाय तो  मुंबईकडूनही खेळलेला नव्हता. पुढे खराब कामगिरीमुळे त्याला मुंबईच्या Under 19 संघातही संधी मिळाली नाही. इकडे अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली यावरही बरेचसे प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु  प्रणवणे स्वतः आपल्या खराब कामगिरीमुळे Under 19 संघात घेतले नसल्याचे कबूल केले होते.त्याच्या वडिलांनी नंतर एमसीए कडून मिळालेली स्कॉलरशिप ही परत केली.

प्रणव धनवडे सध्या काय करतोय? 

             सततच्या खराब कामगिरीनंतर 2022 मध्ये प्रणव धनवडे सहा महिन्याच्या करारावर क्रिकेट खेळण्यासाठी युनायटेड किंगडम येथे गेला. त्याने नॉर्थ विथ क्रिकेट क्लब कडून खेळताना एक शतक आणि चार अर्धशतके झळकावताना एकूण 715 धावा बनवल्या. शिवाय आपल्या घराला आर्थिक हातभार ही लावला. सध्या प्रणव धनवडे हा 25 वर्षाचा असून तो मुंबईच्या लोकल स्पर्धा खेळत आहे.

निष्कर्ष 

           एकंदरीत क्रिकेटमध्ये चार अंकी धावसंख्या बनवणारा जगातला पहिला फलंदाज प्रणव धनवडे ने जर आपल्या कामगिरीत सातत्य राखले असते तर आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत आपण त्याला खेळताना पाहिले असते असो प्रणवला आपण त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवूया .प्रणवची ही खेळी आपल्याला आवडली असेल आणि हे वाचून त्याच्या खेळीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले असेल तर लगेच कमेंट करून शेअर करायला विसरू नका.

हे ही वाचा.

वनडेत 170 चेंडूत 404 धावा. सारे रेकॉर्ड उद्ध्वस्त

वनडेत 170 चेंडूत 404 धावा. सारे रेकॉर्ड उद्ध्वस्त

170 चेंडूत 404 धावा.

म्हणतात ना क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षण काहीही घडू शकते. रोज नवनवीन रेकॉर्ड्स हे बनत असतात आणि काही रेकॉर्ड हे बदलत आणि तुटत असतात. क्रिकेटमध्ये कधीकधी असे काही  घडू शकते की जे पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. पूर्वी क्रिकेट हे खूप संथ गतीने खेळली जात असे. पूर्वी वनडे सामने हे 50 ते 60 षटकांचे व्हायचे. तरी जेमतेम 250 ते 300 धावाच व्हायच्या. परंतु आताच हे क्रिकेटचे युग खूप फास्ट झाले आहे. आत्ताच्या टी 20 च्या जमान्यात क्रिकेटमध्ये 20 षटकात 250 प्लस धावा सहज बनवल्या जातात. तसेच त्या चेसही केल्या जातात. वनडे सांगण्यात द्विशतके बरीच झालेली आहेत. परंतु त्रिशतक अजूनही झालेले नाही आणि त्याची आपण सर्व आतुरतेने वाटही पाहत आहोत. परंतु आज आम्ही तुमच्यासमोर अशी माहिती सादर करणार आहोत की ती वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. ‘एका वनडे सामन्यात बनवल्या गेल्या 700 प्लस धावा आणि एका खूंखार बॅट्समन ने बनवले नाबाद 400 धावा.’ हो , बसला ना आश्चर्याचा धक्का!.’

मित्रांनो मी कोणत्याही क्रिकेट गेम बद्दल सांगत नसून ही खरी रियालिटी आहे. क्रिकेटमध्ये ही घटना बांगलादेश मध्ये गर्दी असून तिथे एका मान्यताप्राप्त वनडे सामन्यात मुस्तकीम हौलादार नावाच्या खेळाडूने हा कारनामा करून दाखवला आहे. त्याने 170 चेंडूचा सामना करताना तब्बल नाबाद 404 धावा बनवल्या. त्याने 237.64 च्या सरासरीने धावा बनवल्या. त्याने तब्बल पन्नास चौकार आणि 22 षटकार मारले. चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया.

क्रिकेट विश्वात खळबळ 

Mustakim hauvladar.
Imege source – Google downloder

2025 हे वर्ष खूप उलथा-पालथीचे राहिले आहे. क्रिकेट क्षेत्रातही बरेचसे चढ-उतार राहिले आहेत. त्यात मार्च 2025 मध्ये घडलेली घटना क्रीडा विश्वाला आश्चर्यचकित करणारी ठरली. बांगलादेश मधील ढाका येथील ढाका युनिव्हर्सिटी सेंट्रल ग्राउंड वर केंब्रियन स्कूल अँड कॉलेज आणि सेंट ग्रे गोरी स्कूल अँड कॉलेज यांच्यात हा वनडे सामना खेळवला गेला. या सामन्यात सेंट ग्रे गोरी स्कूल विरुद्ध खेळताना मुस्तकीम हौलादार नावाच्या खेळाडूने वीस फोटो खेळी करताना फक्त 170 चेंडू तब्बल 404 धावा बनवल्या. त्यात तब्बल 50 चौकार आणि 22 षटकार यांचा समावेश होता. म्हणजेच 404 पैकी 332 धावा त्याने 72 चेंडूत चौकार आणि शेतकऱ्यांच्या सहाय्याने बनवल्या. त्याच्या या खेळीने संपूर्ण क्रीडा विश्वात एकच खळबळ माजली आहे.

 वनडेत 770 धावांचा डोंगर

केंब्रियन स्कूल आणि ग्रे गोरी स्कूल यांच्यात खेळवला गेलेला वनडे सामना हा शालेय स्तरावरील असून तो जिल्हास्तरावर खेळवला गेला होता. त्यामुळे तो अधिकृत मानला गेला नाही परंतु मुस्तकीम हौलादार च्या या अजब खेळीमुळे हा सामना नेहमी लक्षात राहील. मुस्तकीम ने 170 चेंडूत नावात 404 धावा बनवल्या तर सोआद परवेज ने 124 चेंडूत 256 धावा बनवल्या या दोघांनी 699 धावांची भागीदारी केली या दोघांनी मिळून एकूण 82 चौकार आणि 35 षटकार मारले. या दोघांच्या विस्फोटक खेळीमुळे केंब्रियन स्कूलने 50 षटकात तब्बल 770 धावांचा डोंगर उभारला.

बेधडक दे धडक मुस्तकीम हौलादार

(170 चेंडूत 404 धावा. )404 runs in just 170 balls. 

    Image source – Google downloder

नववीत शिकणाऱ्या पुस्तके हवालदार ने 260 मिनिटात 237 च्या सरासरीने 170 चेंडूत तब्बल नाबाद 404 धावा बनवल्या त्यात 50 चौकार आणि 22 षटकारांचा समावेश होता नववीतल्या या पोराने न भूतो न भविष्यती अशी खेळी केली. सेंट ग्रेगोरी स्कूलच्या प्रत्येक गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेतला. सेंट ग्रेगोरी च्या प्रत्येक गोलंदाजाचा इकॉनोमी हा 16 धावांच्याही पुढे होता.

738 धावांनी विशाल विजय 

मुस्तकीम आणि परवेज यांच्या  विध्वंसक खेळीमुळे केंब्रियन स्कूलने 50 षटकात तब्बल 770 धावा बनवल्या. या अशक्य प्राय आव्हानाचा पाठलाग करताना सेंट ग्रेगोरी स्कूल च्या फलंदाजानी अक्षरशः नांग्या टाकल्या. त्यांचा  संपूर्ण संघ हा  11 षटकात फक्त 32 धावांवर ऑल आउट झाला. अशा तऱ्हेने कॅम्ब्रीयन स्कूल ने हा सामना तब्बल 738 धावांनी जिंकला.

निष्कर्ष 

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. मग तो शालेय स्तरावरील असो किंवा इंटरनॅशनल स्तरावरील असो. रोज नवनवीन विक्रम हे होतच राहतात.मुस्तकीम हौलादार च्या नाबाद 404 धावांची खेळी ही वनडे सामन्यातील आजवरची सर्वोच्च  खेळी आहे. हे निश्चितच मान्य करावे लागेल. ही अद्भुत माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व शेअर करायला विसरू नका.

हे ही नक्की वाचा –

Krishna Satpute : The God of Tennis Cricket

Vijay Pavale: The Sangli Express Biography