Test Twenty Cricket Format

test twenty new format of cricket will be launched on january 2026 know the rules.

क्रिकेटमध्ये आला चौथा नवा फॉरमॅट, काय आहेत नियम आणि कधीपासून होणार सुरूवात?

15 मार्च 1877 साली पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. त्यानंतर वनडे फॉरमॅट सुरुवात झाली. त्यानंतर लोकप्रिय असा टी 20 अस्तित्वाला आले. हल्ली तर विदेशात द हंड्रेड नावाची लीग खेळली जाते. ज्यात दोन्ही टीमला 100 चेंडू खेळायला दिले जातात. अलीकडे टी 10 स्वरूपाचे क्रिकेट खेळले जावू लागले आहे. त्यात टेस्ट ट्वेंटी या नव्या फॉरमॅट ची भर पडली आहे.

Test Twenty Cricket Format : क्रिकेटचा एक नवीन फॉरमॅट सुरू होणार आहे. हा क्रिकेटचा चौथा फॉरमॅट असेल. तो जानेवारी २०२६ मध्ये सुरू होईल. त्याचे  सामने ८० षटकांचे असतील.

Test Twenty क्रिकेटचा नवा चौथा फॉरमॅट

टेस्ट ट्वेंटी फॉरमॅट

Test Twenty New Cricket Format :

क्रिकेटमध्ये अनेक नवनवीन बदल होताना दिसत आहेत. पण आता तर क्रिकेटचा नवा फॉरमॅटच आला आहे. या नव्या फॉरमॅटमुळे क्रिकेटचा रोमांच अधिक वाढताना दिसणार आहे. टी-२०, वनडे आणि कसोटी क्रिकेटबरोबर आता टेस्ट ट्वेंटी हा फॉरमॅट खेळवला जाईल. या नव्या फॉरमॅटचे नियम आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

टेस्ट ट्वेंटी चे सल्लागार मंडळ – 

वेस्ट इंडिजचे महान सर क्लाईव्ह लॉयड, दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंग यांचा या नव्या स्वरूपाच्या सल्लागार मंडळात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, राजस्थान रॉयल्सचे माजी सीईओ मायकेल फोर्डहॅम यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.The Divices used by the Umpires in the cricket.

Test twenty format

काय आहे नवीन फॉरमॅट?

1) कसोटी ट्वेंटी फॉरमॅटमध्ये कसोटी क्रिकेटचे पैलू टी-20 शी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.

2) हा जगातील पहिला 80 षटकांचा फॉरमॅट असेल. पण, एकाच वेळी 40 षटकांचा सामना खेळण्याऐवजी , दोन्ही संघ 20 षटकांचे दोन डाव खेळतील.

3) प्रत्येक संघ कसोटी सामन्याप्रमाणेच दोनदा फलंदाजीसाठी उतरेल.

4) कसोटी आणि टी – 20 क्रिकेटचे नियम यात लागू होतील.

5) चारही निकाल शक्य आहेत: विजय, पराभव, बरोबरी किंवा अनिर्णित.

6) या सामन्यांमध्ये, प्रत्येक संघाला सामन्यात एकदा चार षटकांचा पॉवरप्ले दिला जाईल.

7) जर एखाद्या संघाने पहिल्या डावात 75 किंवा त्याहून अधिक धावांची आघाडी घेतली तर फॉलो-ऑन देखील लागू होऊ शकतो.

8) या सामन्यात संघ जास्तीत जास्त पाच गोलंदाज वापरू शकतात. प्रत्येक गोलंदाज सामन्यात जास्तीत जास्त आठ षटके टाकू शकतो

9) या फॉरमॅट मध्ये काही नियम हे टेस्ट मधील तर काही नियम हे टी ट्वेंटी फॉरमॅट प्रमाणे असतील.

टे्स्ट ट्वेंटी फॉरमॅट कधी सुरू होणार ?

टे्स्ट ट्वेंटी२० चा पहिला हंगाम जानेवारी २०२६ मध्ये सुरू होईल. सहा फ्रँचायझी यात सहभागी होतील: भारतातील तीन आणि दुबई, लंडन आणि अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्येकी तीन संघ असतील. प्रत्येक संघात १६ खेळाडू असतील. १६ ऑक्टोबर रोजी हा नवीन फॉरमॅट अधिकृतपणे लाँच करण्यात आला. टेस्ट ट्वेंटी ही द वन वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष गौरव बहिरवानी यांच्या विचारांतून फॉरमॅट तयार झाला आहे. या फॉरमॅटची माजी क्रिकेटपटूंनी मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली आहे

महान खेळाडूंची प्रतिक्रिया 

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, कसोटी ट्वेंटीच्या परिचयामुळे क्रिकेटचा उत्साह आणखी वाढेल आणि तरुण खेळाडूंना भरपूर संधी मिळतील. वेस्ट इंडिजचे दिग्गज सर क्लाईव्ह लॉईड म्हणाले, “क्रिकेटच्या प्रत्येक युगातून अनुभव घेतल्यानंतर, मी असे म्हणू शकतो की खेळ नेहमीच अनुकूल झाला आहे, परंतु कधीही मुद्दामहून नाही. कसोटी ट्वेंटी२० खेळाची कला आणि लय परत आणते, तर आधुनिक उर्जेने तो जिवंत ठेवते.”

 

 

 

वनडेत 277 धावांची वादळी खेळी, 25 फोर 15 सिक्स, रोहितचा महारेकॉर्ड मोडला गेला. 

 वनडेत 277 धावांची वादळी खेळी, 25 फोर 15 सिक्स, रोहितचा महारेकॉर्ड मोडला गेला.

Published by:

Ramesh gosavi official.com

वनडे क्रिकेटमध्ये जेव्हा रेकॉर्डबद्दल बोललं जातं, तेव्हा क्रिकेट रसिकांना रोहित शर्माने केलेल्या 264 धावांचा विक्रम आठवतो. रोहित शर्माचा हा विक्रम मागची बरीच वर्ष तुटला नव्हता.

मुंबई : वनडे क्रिकेटमध्ये जेव्हा रेकॉर्डबद्दल बोललं जातं, तेव्हा क्रिकेट रसिकांना रोहित शर्माने केलेल्या 264 धावांचा विक्रम आठवतो. रोहित शर्माचा हा विक्रम मागिल बरीच वर्षे तुटला नव्हता, पण आता एका भारतीय खेळाडूनेच हा विश्वविक्रम मोडून इतिहास घडवला आहे. तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीसनने हा रेकॉर्ड केला आहे. जगदीसनने  एका स्थानिक वनडे सामन्यात धमाका केला आहे.

 वनडेत 277 धावांची खेळी, 25 फोर्स आणि 15 सिक्स, रोहित चा महरेकॉर्ड मिळाला.

277 धावांची वादळी खेळी

जगदीसनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये फक्त 141 बॉलमध्ये 277 धावांची वादळी खेळी केली, यात त्याने 25 चौकार आणि 15 षटकार मारले, म्हणजेच जगदीसनने प्रत्येक ओव्हरमध्ये एक बाऊंड्री लगावली आहे. या धमाकेदार खेळीने जगदीसनने रोहित शर्माचं 264 धावांचा रेकॉर्डही मोडला आहे. जगदीसनने हा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला नसला, तरी एवढा मोठा स्कोअर केल्यामुळे जगदीसन चर्चेत आला आहे.

टेनिस बॉल क्रिकेट आणि थेट सरकारी नोकरी

तामिळनाडूने केले 506 रन

या सामन्यात तामिळनाडूने तब्बल 506 रन केले, जो भारतीय स्थानिक क्रिकेट इतिहासातला विक्रम आहे. जगदीसनशिवाय साई सुदर्शनेही या सामन्यात 154 रनची खेळी केली, या दोघांमध्ये तब्बल 416 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे तामिळनाडू क्रिकेटचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये लिहिलं गेलं आहे.

खेळी एक आणि विक्रम अनेक 

जगदीसनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफी मध्ये चिनास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे अरुणाचल प्रदेश यांच्या विरुद्ध फक्त 141 चेंडूत 277 धावांची वादळी खेळी केली, यात त्याने 25 चौकार आणि 15 षटकार मारले. ह्या त्याच्या अद्भुत खेळीमुळे मात्र अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. ते पुढीप्रमाणे आपल्यासमोर मांडणार आहे.

1) सर्वोच्च धावसंख्या 

लिस्ट ए क्रिकेट मध्ये जगदीसन ने बनवलेल्या 277 धावा या  लिस्ट ए च्या इतिहासातील सर्वोच्च धावा ठरल्या. पूर्वी हा विक्रम एलिस्टर ब्राऊन च्या नावावर होता. त्याने 2002 मध्ये 268 धावांची खेळी केली होती.

2) सलग पाच शतके 

नारायण जगदीसन याने लिस्ट ए क्रिकेट मध्ये सलग पाच सामन्यात 5 शतके झळकावली आहेत. पूर्वी 3 फलंदाजांनी सलग 4 शतके झळकावली होती. कुमार संगकारा, अल्विरो पीटरसन आणि देवदत्त पडीकल यांनी हा कारनामा केला होता.

3) सर्वोच्च धावसंख्या

क्रिकेट चे कोणत्याही वनडे फॉरमॅट मधील सर्वोच धावसंख्येचा विक्रम या सामन्यात मोडला गेला. कारण तामिळनाडू ने या सामन्यात तब्बल 506 धावा काढल्या. पूर्वी हा विक्रम इंग्लंड च्या नावावर होता. त्यांनी नेदरलँड विरुद्ध 498 धावांची खेळी केली होती.

4) सर्वात कमी चेंडूत द्विशतक

जगदीसन ने 114 चेंडूत आपले द्विशतक झळकावले. त्याने ट्रेविस हेड च्या विक्रमाची बरोबरी साधली. जे की लिस्ट ए मधील सर्वात कमी चेंडूत शतक झळकावले गेले.

5) सर्वाधिक सरासरी 

जगदीसन ने आपल्या द्विशतकी खेळी दरम्यान 196. 45 च्या सरासरीने धावा बनवल्या. ही सरासरी ही लिस्ट ए मधील आजवरची सर्वोच्च सरासरी ठरली . या पूर्वी फक्त ट्राविस हेड ने फक्त 181 च्या सरासरीने धावा बनवल्या होत्या.

6) सर्वोच्च भागिदारी 

लिस्ट ए च्या वनडे फॉरमॅट मध्ये 400 प्लस धावांची भागीदारी ही पहिल्याच पाहायला मिळाली. जगदीसन आणि साई सुदर्शन यांच्यात 416 धावांची भागीदारी झाली. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल च्या नावावर होता. त्यांनी 2015 मध्ये झिंबांबे विरुद्ध 372 धावांची भागीदारी केली होती.

7) सर्वात मोठा विजय 

तामिळनाडू ने या सामन्यात अरुणाचल प्रदेश चा तब्बल 435 धावांनी पराभव केला. एवढ्या मोठ्या फरकाने सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ असावी. यापूर्वी सॉमरसेट ने 346 धावांनी सामना जिंकला होता.

कोण आहे नारायण जगदीसन?

नारायण जगदिसन याचा जन्म 24 डिसेंबर 1995 रोजी कोइंबतूर तामिळनाडू येथे झाला. त्याचे वडिलांचे नाव सी.जे. नारायण आणि आईचे नाव जयश्री आहे. सध्या नारायण जगदीसन 29 वर्षाचा असून तो तामिळनाडूच्या संघाकडून खेळतो. तो एक स्टायलिश विकेट किपर फलंदाज आहे. त्याचे शिक्षण हे श्रीराम कृष्णा कॉलेज ऑफ सायन्स येथे झाले.

घरेलु कारकीर्द – 

प्रथम श्रेणी :

त्याने 2016-17 च्या हंगामात पदार्पण केले आणि 50.49 च्या सरासरीने 3686 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 11 शतके आहेत.

लिस्ट ए :

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम जगदीसनच्या नावावर आहे, त्याने 2022-23  विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध 277 धावा केल्या. लिस्ट ए फॉरमॅटमध्ये सलग पाच शतके करणारा तो पहिला क्रिकेटपटू देखील आहे. त्याने एकूण लिस्ट ए चे 64 सामने खेळले असून त्यात 2728 धावा बनवल्या आहेत.

टी 20 :

तो टी 20 स्वरूपात खेळला आहे आणि तमिळनाडूचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 66 टी  20 सामन्यात 1475 धावा काढल्या आहेत. तसेच आयपीएल मध्ये तो चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याकडूनही खेळला आहे.

जगदीसनने ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे 

जगदीसन स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जगदीसनने स्वत:ला सिद्ध करून निवड समितीला प्रभावित केलं आहे. या कामगिरीनंतर जगदीसनला भारताच्या टेस्ट टीममध्ये सामील करण्यात आलं, पण त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली नाही.

जगदीशनचं तंत्र, संयम आणि आक्रमकता यांचं मिश्रण त्याला भविष्यातला स्टार बनवू शकतं. त्याची लवकरच टीम इंडियात निवड होईल, असा विश्वास क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मोठ्या सामन्यांमध्ये संधी मिळाली, तर जगदीशन तिथेही असाच धमाका करेल, असा विश्वास भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे.

 

टेनिस बॉल क्रिकेट आणि थेट सरकारी नोकरी

टेनिस बॉल क्रिकेट आणि थेट सरकारी नोकरी

टेनिस बॉल क्रिकेटला सरकारी नोकरीसाठी आरक्षणात मान्यता :

टेनिस बॉल क्रिकेटपटूंना सुद्धा सरकारी शासकीय सेवेत आता नोकरी मिळू शकणार आहे. शासनाने नोकरीसाठी या खेळाला आरक्षणात मान्यता दिली आहे. या खेळाडूंची नियुक्ती रोजगार मंत्रालय किंवा केंद्र सरकारच्या केंद्रीय विभागातील गट “क” पदावर केली जाईल .भरतीसाठी तयार केलेल्या क्रीडा कोटाच्या यादीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट ६४ व्या क्रमांकावर जोडले गेले आहे. हा आदेश केंद्र सरकारच्या कर्मचारी तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने जारी केले आहे, अशी माहिती राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. एम बाबर यांनी दिली आहे.

भारत सरकारचे अतिरिक्त सचिव प्रदीप कुमार यांच्यावतीने गत आठवड्यात कार्यालयाचा आदेश जारी करण्यात आला आहे. क्रीडा विभागाच्या प्रस्तावावर टेनिस बॉल क्रिकेटमधील गुणी खेळाडूंना शासकीय विभागात गट “क”च्या पदांवर भरती करण्याचे मान्य केले आहे. तसेच या खेळाचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे. भरतीची संबंधित इतर क्रीडाबाबत खेळाडूंच्या नियुक्तीसाठी जे पात्रता आणि निकष लागू असतील त्याच समान अटी लागू असतील. क्रीडा विभागाने १ सप्टेंबर २०२० रोजी हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला होता.

या खेळाकडे सातत्याने खेळाडूंचा कल वाढत आहे. तसेच लवकरच टेनिस बॉल क्रिकेटची ही लीग होणार असल्याची माहिती टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अभिनव तिवारी, सचिव इम्रान लारी यांनी दिली.

RAYGAD KA TIGER : USMAN PATEL BIOGRAPHY

टेनिस बॉल क्रिकेट आणि थेट सरकारी नोकरी
Credit : google search downloder.
Good News : Reservation In Government Jobs For Tennis Ball Cricketers.

राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना सरकारी नोकरीत आरक्षण मिळते. पण अशा नोकऱ्या टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्यांना मिळत नाहीत. यापुढे टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्यांना ही अशी सुविधा मिळणार आहे.

क्रिकेट खेळात रणजी किंवा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसाठीच शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण असते. मात्र, आता टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पोर्टस कोटाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे टेनिस बॉल क्रिकेटपटूंची नियुक्ती रोजगार मंत्रालय किंवा केंद्र सरकारच्या केंद्रीय विभागातील गट ‘क’ पदावर केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. मोहम्मद बाबर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

टेनिस बॉल क्रिकेट या खेळाचा क्रीडा आरक्षणात समावेश करावा यासंदर्भात  सप्टेंबर महिन्यात क्रीडा विभागाने केंद्रीय मंत्रालयाला प्रस्ताव पाठविला होता. केंद्र सरकारने या प्रस्तावाबद्दल सकारात्मक निर्णय घेतला असून आता प्राविण्यप्राप्त खेळाडूंना सरकारी विभागांमध्ये ‘क’ गटाच्या पदभरतीसाठी पात्र ठरविले आहे. केंद्र सरकारच्या कर्मचारी तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने याबद्दल आदेशही काढला आहे.

क्रीडा आरक्षणाच्या यादीत टेनिस बॉल क्रिकेटला ६४ व्या क्रमांकावर जोडले गेले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय योग्य असून याचा महाराष्ट्रातील शेकडो खेळाडूंना लाभ होणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट भविष्यात मनोरंजन म्हणून नव्हे तर व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून खेळला जाईल व याकडे खेळाडूही आकर्षित होतील, असेही डॉ. बाबर यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबर यांनी आग्रा येथे ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान येथे होणाऱ्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर केला. यात कर्णधार शेख मोहम्मद हारूनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात नागपूरच्या मनोज मेहर, सोनू गुप्तासह, राहुल नाईक, हर्षद मेहर, जागरूक धडू, यादेश वर्टी, ऋषी शिंदे, यश चौहान, धीरज शिंदे, स्वरूप पाटील, सोनल पाटील, जया पटेलचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष एस. फारुकी, उपाध्यक्ष डॉ. बाबूलाल धोत्रे, सहसचिव जगदिश गणभोज, निखिल राऊत उपस्थित होते.

ISPL मुळे टेनिस बॉल क्रिकेट ला अच्छे दिन 

भारतात लेदर क्रिकेट पेक्षा टेनिस बॉल ने खेळले जाणारे क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळले जाते. परंतु या खेळाला मोठे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. पण Ispl ने टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या गुणवान खेळाडूंना आपले कौशल्य जगासमोर दाखवण्याची एक उत्तम संधी Bcci आणि Ispl च्या कोर कमिटीने उपलब्ध करून दिली. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट मधील मातब्बर खेळाडूंना प्रत्यक्ष टीव्हीवर पाहण्याची संधी हजारो प्रेक्षकांना मिळाली. याचा फायदा असा झाला की टेनिस क्रिकेटला सर्वजण ओळखू लागले. शिवाय Ispl च्या सीजन एक आणि दोन प्रमाणेच सीजन तीनही मोठ्या उत्साहाने लवकरच सुरू होणार आहे. याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणजेच काय की लेदर क्रिकेट प्रमाणेच टेनिस क्रिकेट सुद्धा हळूहळू प्रसिद्ध होत आहेत.

टेनिस क्रिकेटचे भविष्य उज्वल 

येणाऱ्या काळात टेनिस क्रिकेटला प्रचंड मागणी असणार आहे. कारण टेनिस क्रिकेट हे बहुतांश सहा ते दहा ओवरचे खेळवले जातात. म्हणजेच काय की प्रेक्षकांना एका दिवसात बरेच सामने पाहण्याची संधी मिळते शिवाय अनेक मातब्बर आणि गुणवान खेळाडूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधीही मिळते. लेदर क्रिकेट मध्ये प्रचंड खर्च असतो तसे टेनिस क्रिकेटमध्ये नसते. पूर्वी टेनिस क्रिकेटमध्ये बक्षीस रुपी रक्कम ही खूप कमी असायची. परंतु आत्ताच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये लाखो – करोडो च्या स्पर्धा खेळवल्या जातात व प्रचंड मोठी बक्षिसे दिली जातात. आता तर गट क च्या भरती दरम्यान टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आरक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे अनेक खेळाडू या खेळाकडे  गांभीर्याने आणि करियर म्हणून पाहू लागले आहेत. Krishna Satpute : The God of Tennis Cricket

घर खर्चाचे उत्तम साधन 

सध्या टेनिस क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा येऊ लागला आहे कारण पूटेनिस बॉल क्रिकेट ला आले सुगीचे दिवस. आता मिळणारर्वी रक्कम ही खूप कमी असायची. परंतु सध्याच्या घडीला अनेक मोठमोठे दानशूर आणि राजकीय मंडळी सुद्धा आपल्या नावासाठी  टेनिस क्रिकेटला एटेनिस बॉल क्रिकेट ला आले सुगीचे दिवस. आता मिळणारक प्रसिद्धीचे माध्यम म्हणून पाहतात आणि मोठमोठ्या रकमेच्या स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात. त्यामुळेच की काय अनेक गुणवंत टेनिस क्रिकेट खेळाडूंनी एज ए करियर ‘ म्हणून या खेळाकडे पाहिले आहे. महाराष्ट्रात आणि भारतात बरेच असे मोठे मोठे खेळाडू आहेत की जे वर्षाला जवळपास 100 स्पर्धा खेळतात आणि त्यातून जवळपास 20 लाखापेक्षा जास्त कमाई करतात. त्यामुळे अशा खेळाडूंचे कमाईचे प्रमुख साधन म्हणून टेनिस क्रिकेट कडे पाहिले जात आहे.

 

Asia Cup Final 2025

Asia Cup Final 2025, India vs Pakistan :

दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड वर खेळवल्या गेलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर पाच गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्याचे खरे हिरो ठरले ते तिलक वर्मा आणि कुलदीप यादव. या दोघांनी अंतिम सामन्यात अफलातून कामगिरी करताना भारताला सहज विजय मिळवून दिला. 

Asiya Cup final 2025

पाकिस्तानची दमदार सलामी

आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानची सलामी जोडी जास्त फॉर्म मध्ये नव्हती. परंतु या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या सलामी जोडी थोडासा बदल करून त्यांनी साहेबजादा फरहान आणि फकर जमान यांना सलामीला पाठवले. या दोघांनी हा निर्णय सार्थ ठरवताना 58 चेंडूत 84 धावांची सलामी दिली. यात फरहानने 38 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकाराच्याच्या सहाय्याने दमदार 57 धावा काढल्या. या दोघांच्या आक्रमक खेळीने पाकिस्तान मोठी धावसंख्या उभारू शकेल असे वाटू लागले होते.

कुलदीप यादव ची कमाल

एकीकडे पाकिस्तान च्या दोन्ही सलामीवीरांनी 84 धावांची दमदार भागीदारी केली होती. वरून चक्रवर्ती ने ही जोडी फोडताना फरहानला तिलक वर्मा च्या हाती झेल देण्यास भाग पाडले. नंतर सेट झालेल्या फकर जमान ला देखील कुलदीप यादवकरवी झेलबाद केले. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या कुलदीप यादव ने पाकिस्तानचे कंबरडे मोडताना 4 षटकात 30 धावा देऊन तब्बल चार बळी टिपले. कुलदीप यादव ने सॅम अयुब, शाहीन आफ्रिदी, सलमान आगा आणि अश्रफ यांना बाद केलं. कुलदीप यादव ला इतर भारतीय गोलंदाजांची ही उत्तम साथ लाभली. बुमराह, वरून चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 – 2 बळी घेतले. या सर्वांच्या सुरेख गोलंदाजी मुळे पाकिस्तानला 150 चा ही टप्पा गाठता आला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ फक्त 146 धावा करून ऑल आउट झाला.

Asia Cup 2025 Prize Money

भारताची आक्रमक फळी ठरली फेल

आशिया कपच्या अंतिम सामन्यात 147 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूप निराशाजनक झाली. आतापर्यंत तुफान फॉर्म मध्ये असणारा अभिषेक शर्मा अंतिम सामन्यात स्वस्तात बाद झाला. अभिषेक शर्माने फक्त पाच धावा बनवल्या त्याला फहीम अश्रफ ने बाद केले. अश्रफ ने शुभमन गिल ला सुद्धा बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव ला देखील शाहीन आफ्रिदी ने 1 धावेवर झेलबाद केले. भारताचे 3 भरवश्याचे फलंदाज फक्त 20 धावांवर बाद झाले. त्यामुळे भारताची आक्रमक फळी सपशेल फेल ठरली. पाकिस्तानकडून अश्रफ ने सर्वाधिक 3 बळी घेतले तर शाहीन आफ्रिदी ने 2 बळी घेतले.

सॅमसंग, तिलक आणि दुबे ने डाव सावरला

भारताचे 3 फलंदाज फक्त 20 धावांवर बाद झाल्याने भारत खूप मोठ्या अडचणीत सापडला होता.परंतु संजू सॅमसन ने 21 बॉल मध्ये  24 तर शिवम दुबे ने आक्रमक 22 बॉल मध्ये 33 धावांची खेळी केली. त्यात 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर सर्वात स्पेशल खेळी ही तिलक वर्माने केली. त्याने 53 बॉल मध्ये नाबाद 69 धावांची निर्णायक खेळी केली. त्यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

तिलक वर्मा ठरला सामनावीर

अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 69 धावांची निर्णायक कामगिरी करून तिलक वर्मा हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तिलक वर्मा ने भारताचा संघ संकटात सापडलेला असतानाही शांत आणि आक्रमक खेळी करत  53 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी केली. त्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.’ अभ्यास केला होता शर्माचा आणि पेपर आला वर्माचा ‘ अशी पाकिस्तानच्या संघाची अवस्था झाली होती.

अभिषेक शर्मा ठरला मालिकावीर

Abhishek Sharma

 ( Abhishek Sharma become man of the searise. )

आशिया कप 2025 मध्ये खोऱ्याने धावा करणारा भारताचा अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. अभिषेक शर्माने या आशिया कप मध्ये एकूण 314  धावा बनवल्या. त्याला बक्षीस म्हणून 15000 यूएस डॉलर मिळाले. शिवाय हावल एच 9 एसयूवी कार ( Haval H 9 SUV ) ही बक्षीस म्हणून दिली गेली. मालिकावीर पाठोपाठ आशिया कप मध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू म्हणूनही अभिषेक शर्मा ला पुरस्कार मिळाला.

कुलदीप यादवने घेतल्या सर्वाधिक विकेट

Kuldip Yadav

आशिया कप मध्ये कुलदीप यादव ने सर्वाधिक 17 विकेट घेतल्या. कुलदीप यादव  हा या स्पर्धेतील ‘ मोस्ट व्हॅल्यू बल प्लेयर ‘ ठरला.

IND vs Pak , Asiya Cup 2025 

भारतीय टिमवर झाला बक्षीसांचा वर्षाव

भारताने 2025 च्या आशिया कप मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवत 9  व्या वेळेस चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. भारताने मागील सलग चार वेळा आशिया कप मध्ये  चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. भारताला आशिया कप चॅम्पियन म्हणून 2.6 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस मिळाली. तर पाकिस्तानात उप विजेते म्हणून 1.3 कोटी रुपयाची बक्षीस मिळाले. BCCI ने भारतीय टीमला 21 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

भारताने पाकिस्तानला सलग तीन वेळा हरवले 

अपेक्षेप्रमाणे आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान  यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार असे सर्वांना वाटत होते. 14 सप्टेंबरला खेळवल्या गेलेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गड्यांनी पराभव केला होता. तर 21 तारखेला खेळले गेलेल्या सुपर फोर मध्ये भारताने पाकिस्तानचा सहा गड्यांनी पराभव केला होता. तर 28 तारखेला फायनल मध्ये भारताने पाकिस्तानचा पाच गड्यांनी पराभव करत नवव्यांदा आशिया कप जिंकला. अशा रीतीने या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला सलग तीन वेळा हरवले आहे.

आशिया कप आणि भारत पाकिस्तान वादविवाद

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदुर यांचा निषेध असतानाही भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मैदानाबाहेर आणि मैदानात ही वातावरण हे बरेचसे तापले होते. पुढील काही अशा घटना मैदानामध्ये घडल्या ज्या की भारत पाकिस्तान यांच्यामध्ये वादविवाद होते हे स्पष्ट जाणवत होते.

  • सर्वप्रथम भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान चा  कर्णधार सलमान आगा याच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
  • सामना संपल्यानंतरही भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन करण्यास टाळले.
  • पाकिस्तानच्या संघाने याची तक्रार ACC कडे केली. याला कारणीभूत  म्हणून एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.
  • मैदानावर ही हॅरिस राउफ ने अश्लील आणि विक्षिप्त इशारे केले.
  • भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हॅरिस राउफ  ला सामना शुल्काच्या 30% दंड करण्यात आला.
  • अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने त्यांना मिळालेला चेक फेकून दिला.
  • बक्षीस समारंभाला पाकिस्तानच्या संघाने येण्यासाठी बराच विलंब लावला. भारतीय संघाने  मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय संघाला विजेतेपदाची ट्रॉफी आणि मेडल्स मिळालेच नाही. पाकिस्तान चे एसीसी चे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे आपल्यासोबत ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन हॉटेलला गेले.
  • पाकिस्तानी खेळाडू गन सेलिब्रेशन आणि प्लेन क्रॅश सारखे हातवारे सतत करत होते. याचे उत्तर म्हणून बुमराहने देखील हॅरिस राउफ ला आउट केल्यानंतर तसेच प्लेन क्रॅश चे सेलिब्रेशन केले.

एकंदरीत भारतीय संघाने पाकिस्तानची चांगली जिरवत  आशिया कप वर आपले नाव कोरले.

 

Asia Cup 2025 Prize Money


Asia Cup 2025 Prize Money: जिंकणारा संघाला मिळणार 2.6 कोटी, तर  उपविजेता  ही कमावणार करोडो रुपये! जाणून घ्या बक्षीस रक्कम.

What is Asia Cup 2025 Prize Money: 2025 चा आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरूवात झाली. आठ संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. युएईमध्ये झालेल्या या T-20 स्वरूपातील स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन संघात फायनल खेळवली जाणार आहे.

Asia Cup 2025 Prize Money:

आशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेचा थरार अखेर शिगेला पोहोचला असून चाहत्यांचे लक्ष आता भारत आणि पाकिस्तान यांचा अंतिम सामन्यासह विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेवर केंद्रित झाले आहे. आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) धोरणानुसार यंदाच्या हंगामातील बक्षीस रक्कम मागील स्पर्धेपेक्षा अधिक ठेवण्यात आली आहे. यामागचा उद्देश म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा मिळवून देणे. आठ संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन संघ असतील.

Asiya Cup 2025 prize money

विजेत्या संघाला जॅकपॉट

आशिया कप 2025 च्या विजेत्या संघाला तब्बल 2.6 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक बोनस देखील देण्यात येणार आहे. ही रक्कम थेट आशियाई क्रिकेटमधील सर्वात मोठ्या बक्षीसांपैकी एक ठरत आहे.

उपविजेत्या संघालाही मोठा फायदा

फायनलमध्ये पराभव झालेला उपविजेता संघ रिकाम्या हाताने जाणार नाही. त्यांना 1.3 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय उपविजेत्या संघातील खेळाडूंनाही वेगळा बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर राहूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ खेळाडूंना मिळणार आहे.

IND vs Pak , Asiya Cup 2025 

वैयक्तिक पुरस्कारालाही उत्तम बक्षीस 

यंदा वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही उत्तम बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे सांघिक कामगिरी बरोबरच खेळाडूला आपली वैयक्तिक कामगिरी कडेही लक्ष्य द्यावे लागणार आहे आणि त्याचा मोबदलाही त्यांना मिळणार आहे. खेळाडूना मिळणारे बक्षीस पुढीलप्रमाणे –

  • टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू (Player of the Tournament) : 12.5 लाख रुपये
  • सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम गोलंदाज : प्रत्येकी 4.5 लाख रुपये
  • फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच : 4.1 लाख रुपये
  • स्मार्ट कॅच ऑफ द मॅच : 2.5 लाख रुपये.

यामुळे केवळ संघनिष्ठा नव्हे, तर वैयक्तिक चमक दाखवणाऱ्या क्रिकेटपटूंनाही त्याचा मोबदला मिळणार आहे.

बक्षीसवाढीमागील कारण

ACC ने यंदा बक्षीस रक्कमेत वाढ का केली, याचं उत्तर सोपं आहे की, आशिया कपला अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा, स्पर्धा अधिक रोमहर्षक व्हावी आणि खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळावं. आशियाई क्रिकेट नेहमीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय राहिलं आहे आणि प्रायोजकांकडून मिळणाऱ्या भरघोस मदतीमुळे ही रक्कम वाढवणं शक्य झालं आहे.

आशिया कप 2025 मध्ये विजेत्या संघाला मिळणारे 2.6 कोटी आणि उपविजेत्याला मिळणारे 1.3 कोटी हे आकडे दाखवतात की क्रिकेट आता फक्त खेळ नाही तर मोठं आर्थिक व्यासपीठ बनलं आहे. या बक्षीस रकमेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि चाहत्यांना अधिक चुरशीचे सामने पाहायला मिळतील, यात शंका नाही.

पहिल्यांदाच फायनल चा महामुकाबला 

आशिया कप च्या इतिहासात पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर विरोधक आशिया कप च्या फायनल मध्ये एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. आशिया कप चे आतापर्यंत 16 पर्व झाले असून त्यात एकदाही भारत आणि पाकिस्तान हे फायनल मध्ये एकमेकांसमोर आले नाहीत. परंतु 2025 च्या आशिया कप मध्ये हा योग जुळून आला असून येत्या 28 सुप्टेंबर ला भारत विरुद्ध पाकिस्तान असा मेगा फायनल चा सामना खेळवला जाणार आहे.हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर रात्री 8.00 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे.

Asiya Cup Winner List

वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सनसनाटी वर्ल्ड रेकॉर्ड; दक्षिण आफ्रिकेची धुळधाण, इतिहासातील सर्वात मोठा विजय

वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सनसनाटी वर्ल्ड रेकॉर्ड; दक्षिण आफ्रिकेची धुळधाण, इतिहासातील सर्वात मोठा विजय

वनडेत 170 चेंडूत 404 धावा. सारे रेकॉर्ड उद्ध्वस्त

Published by: Rameshgosaviofficial.com 

वन डे क्रिकेटच्या सामन्यात आपण बरेच चढ उतार पहात असतो. पूर्वी वनडे क्रिकेट हे 60 षटकांचे खेळवले जात असे. कालंंतराने ते 50 षटकांचे करण्यात आले. त्यात बरेचसे रेकॉर्डस हे बनवले गेले. परंतु दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद झाली आहे त्याची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.

वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या टीमने नवा इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडने वनडे क्रिकेटमधील सगळ्यात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 342 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडने दिलेलं 415 धावांचे आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 20.5 ओव्हरमध्ये फक्त 72 धावांवर ऑलआऊट झाला आहे. या विजयासोबतच इंग्लंडने टीम इंडियाचा वनडे क्रिकेटमधील सगळ्यात मोठ्या विजयाचा विश्वविक्रम मोडला आहे. याआधी भारताने 2023 साली श्रीलंकेविरुद्ध 317 धावांनी विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा नीचांकी स्कोर 

इंग्लंड विरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिका फक्त 72 धावावर ऑल आउट झाली. दक्षिण आफ्रिकेचा वनडे क्रिकेटच्या इतिहासातला हा दुसरा नीचांकी स्कोअर आहे. 1993 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 69 धावांवर ऑलआऊट झाला होता.

इंग्लंडची दमदार बॅटिंग 

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.पण दक्षिण आफ्रिकेचा हा निर्णय थोडासा चुकल्यासारखा वाटला. कारण इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून तब्बल 414 धावा केल्या. जेकब बेथलने 110 आणि जो रूटने 100 धावांची खेळी केली. याशिवाय जेमी स्मिथने 62, जॉस बटलरने नाबाद 62, डकेटने 31 आणि विल जॅक्सने नाबाद 19 धावा केल्या.  दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. या सामन्यात इंग्लंडने त्यांच्या इनिंग मध्ये तब्बल 50 चौकार षटकारांची आतिषबाजी केली.

जो रूट जेकब बेथल यांची दमदार शतके 

SA vs ENG 2025 वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सनसनाटी वर्ल्ड रेकॉर्ड; दक्षिण आफ्रिकेची धुळधाण, इतिहासातील सर्वात मोठा विजय
Credit: google.com

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने पुन्हा षटकात पाच गड गमावून तब्बल धावा बनवल्या. त्यात जेकब बेथल आणि जो रूट यांनी शतके झळकावली. जे कप बेथन ने 82 चेंडू 110 धावा केल्या . त्यात त्याने 13 चौकार व 3 षटकार मारले. तर रूटने 96 चेंडू 100 धावा बनवल्या. त्यात 6 चौकारांचा समावेश होता. या दोघांनी 144 चेंडूत 182 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने 414 धावांचा डोंगर उभारला.

दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग गडगडली

इंग्लंडने दिलेलं 415 धावांचे आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग कोलमडली. त्यांचा फक्त 72 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याने 9 षटकात 3 निर्धाव  षटके टाकून फक्त 18 धावा दिल्या. आदिल रशीदने 3 बळी टीपताना फक्त 13 धावा दिल्या. तर ब्रायडन कार्सला 2 विकेट मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फक्त 3 फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यांच्या डावात 20 हे सर्वाधिक धावसंख्या ठरली जे की बॉस ने बनवली होती.

जोफ्रा आर्चर ठरला सामनावीर 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर ने घातक गोलंदाजी करताना 9 षटकात 3 निर्धाव षटके टाकून फक्त 18 धावा देऊन दक्षिण आफ्रिका चे 4 गडी गारद केले. त्याच्या या कामगिरी साठी त्याला सामनावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

केशव महाराज ठरला मालिकावीर 

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्याच्या सिरीज मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनर केशव महाराज ने एकूण 202 धावा देऊन अकरा बळी घेतले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेने जिंकली मालिका 

या सामन्यात जरी दक्षिण आफ्रिकेने नीचांकी धावसंख्येचा विक्रम केला असला तरी आणि इंग्लंडने वन डे मधील सर्वाधिक धावांनी विजय मिळवला असला तरी दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 2- 1 अशा फरकाने जिंकली.

इंग्लंडने तोडला टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड 

इंग्लंडने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 342 धावांनी पराभव करत आजवरचा वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. पूर्वी हा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. 2023 साली श्रीलंकेविरुद्ध भारताने 317 धावांनी विजय मिळवला होता. हा आजवरचा वनडे इतिहासातील सर्वाधिक धावांनी मिळवलेला विजय होता. परंतु इंग्लंडच्या या विजयाने हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला.

400 प्लस धावा बनवण्यात इंग्लंडच भारी 

2015 च्या वर्ल्ड कप नंतर आजवरच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडने तब्बल सात वेळा 400 प्लस धावा बनवलेले आहेत. तर त्यांच्या आसपास असलेले दक्षिण आफ्रिका आणि भारत यांनी अनुक्रमे तीन आणि दोन वेळा 400 पेक्षा जास्त धावा बनवलेल्या आहेत. शिवाय या यादीत ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे सारख्या संघाचाही समावेश आहे. त्यांनी प्रत्येकी एक वेळा 42 धावा बनवलेले आहेत.

 

IND vs Pak , Asiya Cup 2025 

IND vs Pak , Asiya Cup 2025 

रविवारी खेळवल्या गेलेल्या ए ग्रुप मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ गड्यांनी चितपट करत पाकिस्तानला आसमान दाखवले व सामना आरामात जिंकला. भारतीय संघाने हा विजय पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि भारतीय सैनिकांना समर्पित केला. भारताने पाकिस्तान विरुद्ध मागील 14 सामन्यात पैकी एकूण 11 सामने जिंकले आहेत.

Top Five Batsman in Asiya Cup

Top Five Bowlers in Asiya Cup

पाकिस्तानचा फुसका बार

या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधार सलमान आगा ने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय त्यांच्या चांगला च अंगलट आला. कारण भारतीय गोलंदाजांनी टीचून गोलंदाजी करत पाकिस्तानच्या सर्वच फलंदाजांना जखडून ठेवण्याचे काम केले. पाकिस्तानने आपले पहिले दोन गडी फक्त दहा धावांवर गमावले. भारताकडून बुमरा,हार्दिक पांड्या कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी सुंदर गोलंदाजी करताना पाकिस्तानच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला. पाकिस्तानकडून फरहान आणि शेवटी शाईन आफ्रिदी यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची धावसंख्या कशीबशी 127 धावापर्यंत पोहोचवली. फरहानने 44 चेंडूत सर्वाधिक 40 धावा बनवल्या. तर शाहीन आफ्रिदीने 16 चेंडूत 4 षटकाराच्या सहाय्याने नाबाद 33 धावा बनवल्या.

भारतीय गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी

पाकिस्तानला 127 धावांपर्यंत रोखण्याची मोठी कामगिरी भारतीय गोलंदाजांनी पार पडली. त्यात सर्वाधिक वाटा हा कुलदीप यादव चा होता. कुलदीप यादवने चार षटकात 18 धावा देत तीन बळी टिपले तर अक्षर पटेल ने चार षटकात 18 धावा देत दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराने चार षटकात 28 धावा देत दोन बळी घेतले. या तिघांना उत्तम साथ देताना हार्दिक पांड्या आणि वरून चक्रवती ने सुरेख गोलंदाजी केली.

भारतीय फलंदाजांची दमदार कामगिरी

128 धावांचा माफक आव्हान घेऊन मैदानात धरलेल्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी जोरदार सुरुवात केली. अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या दोन चेंडूवर एक चौकार एक  षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले. अभिषेक शर्माने तेरा चेंडूत ताबडतोड 31धावा बनवल्या. तर शुभमन गिल 10 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरताना भारताला विजयासमीप नेले. तिलक वर्माने  31 चेंडू 31 हवा बनवल्या तर सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 47 धावांची बहारदार खेळी केली. अशा रीतीने भारताने हा सामना सहजरित्या जिंकला.

वाढदिवसाच्या दिवशी सूर्य कुमार ने दिले भारतीय टीमला रिटर्न गिफ्ट

IND vs Pak Asiya Cup, 2025

काल खेळले गेलेल्या पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने 47 धावांची बहुमोल खेळी करून भारताला सहज विजय मिळवून दिला. काल त्याचा वाढदिवसही होता. ही खेळी त्याने भारताला रिटर्न गिफ्ट म्हणून खेळली होती. तसेच हा विजय पहलगाम मधील भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि भारतीय सैन्याला समर्पित केला असे त्याने नमूद केले.

अशी झाली आशिया कप ची सुरुवात 

मैदानात दिसला भारतीय संघाकडूनही विरोध

पहलगाम मधील भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता त्याचा विरोध म्हणून भारतीय संघाने आशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये व त्यांच्यावर बहिष्कार घालावा अशी भारतीय नागरिकांमधून मागणी होत होती. परंतु भारतीय सरकारने सर्व बाजूने विचार करून भारतीय संघाला इतरत्र ठिकाणी पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यास परवानगी दिली होती.त्यानुसार हा सामना दुबई मध्ये खेळवला गेला. या सामन्यात नेहमीप्रमाणे भारतीय संघाने विजय मिळवला सामना सुरू होण्याअगोदर टॉस च्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करण्याचे टाळले. शिवाय सामना झाल्यानंतरही भारतीय संघ मैदानावर आला नाही. सरळ त्यांनी दरवाजा लावून घेतला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने हा सामना पहलगाम मधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना व भारतीय सैन्याला समर्पित केला. संपूर्ण भारतीय संघ हा आपल्या पाठीशी आहे असे सांगितले.

पाकिस्तानचे माजी खेळाडू कडून पाकिस्तानची कानउघाडणी

पाकिस्तानचे माझी खेळाडू वसीम अक्रम यांनी पाकिस्तानच्या संघाची आणि त्यांच्या कर्णधार ची चांगलीच कान उघडणे केली. वसीम अक्रम यांच्या मते पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर खेळताना चाचपडत होते. खास करून कुलदीप यादव च्या फिरकी समोर तर त्यांनी नांग्या टाकल्या होत्या. कुलदीप यादव चा प्रत्येक बोलती स्वीप म्हणूनच खेळत होते. अशा तऱ्हेने ते आपली कमजोरी चे प्रदर्शन करत होते. शिवाय पावरप्ले नंतर त्यांनी खूप स्लो खेळ केला. चुकीच्या वेळी चुकीचा शॉट खेळून सर्व फलंदाज बाद झाले. शिवाय प्रत्येक फलंदाजांनी दीडशेच्या स्ट्राईक रेट ने खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाकिस्तान मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.

पाकिस्तानने ही दर्शवला विरोध

भारताकडून झालेल्या प्रभावाने पाकिस्तान चा तिळपापड झाला आहे. सामना सूर्य होण्याआधी वरती कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधार सलमान आगा याच्याशी हस्तांदोलन करण्याचे टाळले तसेच सामना झाल्यानंतर हे भारतीय संघ पाकिस्तानच्या खेळाडूंची हस्तांदोलन करण्यासाठी मैदानात आला नाही. या घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सूत्रानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधाराच्या या वर्तणुकीविरुद्ध अधिकृतरित्या तक्रार नोंदवत निषेध व्यक्त केला आहे.

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यावर बडतर्फ ची कारवाई 

भरती कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण भारतीय संघाने पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूशी हस्तांदोलन केले नाही हे प्रकरण चांगले तापले होते.  अख्या जगासमोर पाकिस्तानची लाज निघाली होती.  परिणाम म्हणून पाकिस्तानने पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला बडतर्फ केले. पाकिस्तानी बोर्डाने त्यांचा संचालक उस्मान वाहला याचे निलंबन केले आहे.

 

Top Five Batsman in Asiya Cup

Top Five Batsman in Asiya Cup : आज आपण पाहणार आहोत आशिया कप मधील एकदिवसीय व टी- २० फॉरमॅट मधील टॉप ५ बॅटसमन ची कामगिरी आणि त्यांच्या काही अप्रतिम खेळी. चला तर मग वेळ न घालवता लगेच चालू करूया.

Top Five Batsman in Asiya Cup

एकदिवसीय आशिया कप 

१९८४ पासून सुरू झालेल्या आशिया कपचे स्वरूप हे २०१८ पर्यंत एकदिवसीय च होते. त्यात खालील पाच बॅटसमन नी मैदान गाजवले.

१) सनथ जयसुर्या (श्रीलंका)

Top Five Batsman in Asiya Cup : sanath jaysurya

सनथ जयसूर्या हा श्रीलंकेचा डावखुरा शैलीदार फलंदाज होता. वनडे असो किंवा कसोटी ताबडतोड फलंदाजी करण्यात हा पटाईत असायचा. हा जोपर्यंत क्रीज वर असायचा समोरील टीमची फिल्डींग सारखी बदलवून कॅप्टन मात्र हैराण होत असे. आशिया कप मध्ये तर याने कमालच केली आहे. त्याच्या दोन अप्रतिम खेळींचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. त्या पुढील प्रमाणे –

१) १२५ धावा विरुद्ध भारत, कराची २००८.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका ६६ वर ४ अशा स्थितीत होती. तिथून जयसुर्या ने शांत व संयमी खेळ करून फक्त ११४ चेंडूत १२५ धावा कुटल्या. त्यात ९ चौकार व ५ खणखणीत षटकार होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २७३ धावांचा डोंगर उभारला. डोंगरच होता तो ! , कारण पुढे अजंठा मेंडिस च्या १३ धावा देवून ६ बळी या मॅजिक स्पेलने भारताला १७३ धावांवरच रोखले. व श्रीलंकेने तब्बल १०० धावांनी हा सामना जिंकला.

२) १३० धावा , विरुद्ध बांगलादेश, कराची, २००८.

आशिया कपमधील जयसूर्या ची ही सर्वोत्तम खेळू होती. त्याने फक्त ८८ चेंडूत १३० धावा कुटल्या.त्यात १६ चौकार व ६ उत्तुंग षटकार होते. लवकर धावा काढण्याच्या नादात तो २८ व्या षटकात बाद झाला. नाहीतर कदाचित वनडे तील पाहिले द्विशतक त्याच्या नावावर झाले असते. पुढे बांगलादेश १७४ धावांवर बाद झाला व श्रीलंकेने हा सामना १५८ धावांनी जिंकला.

कामगिरीचा आढावा 
  • मॅच – २५
  • इनिंग – २४
  • धावा – १२२०
  • सर्वोच्च धावा – १३०
  • सरासरी – ५३.०४
  • स्ट्राईक रेट – १०२.५२
  • शतक – ६
  • अर्धशतक – ३
  • चौकार – १३९
  • षटकार – २३

 २) कुमार संगकारा ( श्रीलंका) 

during the ICC Champions Trophy group A match between Sri Lanka and New Zealand at Cardiff Stadium on June 9, 2013 in Cardiff, Wales.

श्रीलंकेचा आतापर्यंत चा सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कुमार संगकारा चा उल्लेख करावासा वाटतो. शांत, संयमी व शैलीदार फलंदाज म्हणून त्याची ओळख होती. सामना शेवटपर्यंत नेवून जिंकून देण्याची ताकद या फलंदाजामध्ये होती.

कामगिरीचा आढावा 
  • मॅच – २६
  • इनिंग – २४
  • धावा – १०७५
  • सर्वोच्च धावा – १२१
  • सरासरी – ४८.८६
  • स्ट्राईक रेट – ८४.५१
  • शतक – ४
  • अर्धशतक – ८
  • चौकार – १०७
  • षटकार – ७

३) सचिन तेंडुलकर ( भारत )

क्रिकेट विश्वातील सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही आशिया कप मध्ये वेगळी अशी छाप सोडली आहे. आशिया कप ची वेगळीच ओळख आपल्या सर्वांच्या लक्षात राहील ती म्हणजे सचिन तेंडुलकर यांनी त्यात आपले ‘ शतकांचे शतक ‘ म्हणजेच १०० वे आंतरराष्ट्रीय शतक लगावले. बांगलादेश विरुद्ध खेळताना त्यांनी २०१२ मध्ये १४७ चेंडूत ११४ धावांची संयमी खेळी करून भारताला २८९ धावांपर्यंत पोहचवले. परंतु या सामन्यात भारताचा पराभव झाला. पराभव झाला असला तरी हा माईलस्टोन आपल्या कायम स्मरणात राहील.

कामगिरीचा आढावा 
  • मॅच – २३
  • इनिंग – २१
  • धावा – ९७१
  • सर्वोच्च धावा – ११४
  • सरासरी. – ५१.१०
  • स्ट्राईक रेट – ८५.४७
  • शतक – २
  • अर्धशतक – ७
  • चौकार – १०८
  • षटकार – ८

ASIYA CUP 2025 IND VS UAE

४) शोएब मलिक (पाकिस्तान )

शोएब मलिक हा पाकिस्तानच्या मधल्या फळीतील भरवश्याचा फलंदाज होता. शिवाय तो गोलंदाजी ही उत्तम करायचा. याची बॅट आशिया कप मध्ये चांगलीच तळपायाची. भारताविरुद्ध तर तो नेहमी चांगलीच बॅटिंग करायचा. २००८ च्या आशिया कप मध्ये त्याने खेळलेली नाबाद १२५ धावांची खेळी ही अविस्मरणीय होती. पण या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता.

कामगिरीचा आढावा 
  • मॅच – १७
  • इनिंग. – १५
  • धावा – ७८६
  • सर्वोच्च धावा – १४३
  • सरासरी – ६५.५०
  • स्ट्राईक रेट – ९०.६५
  • शतक – ३
  • अर्धशतक – ३
  • चौकार – ७६
  • षटकार – ८

५) विराट कोहली ( भारत)

सध्याच्या घडीतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराट कोहली चा उल्लेख केला जातो. आशिया कप मध्ये विराट कोहली ची बॅट नेहमी तळपलेली असते. २०१२ च्या आशिया कप मध्ये मिरपूर येथे पाकिस्तान विरुद्ध त्याने १८३ धावा १४८ चेंडूत बनवल्या होत्या. ही त्याची सर्वोत्तम खेळी होती .शिवाय आशिया कप मधील ही आतापर्यंत ची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. ३३० धावांचा पाठलाग करताना त्याने ही कामगिरी केली होती. म्हणून त्याला चेस मास्टर म्हणतात.

कामगिरीचा आढावा 
  • मॅच – १६
  • इनिंग – १६
  • धावा – ७६६
  • सर्वोच्च धावा – १८३
  • सरासरी – ६३.८३
  • स्ट्राईक रेट – ९७.१४
  • शतक – ३
  • अर्धशतक – २
  • चौकार – ८०
  • षटकार – १२

टी -२० आशिया कप 

२०१६ मध्ये ACC ने आशिया कप च्या फॉरमॅट मध्ये बदल करून तो टी २० स्वरूपाचा करण्यात आला. आता आपण टी २० स्वरूपातील टॉपच्या पाच फलंदाजांची कामगिरी पाहूया

Top Five Bowlers in Asiya Cup

१) विराट कोहली (भारत)

सध्याच्या टी २० फॉरमॅट मध्ये ही कोहलीची किंग आहे असे आपणास दिसते सचिन तेंडुलकर नंतर एकमेव व्यक्ती जी आऊट होण्याची वाट विरूद्ध टीम पाहत असते. आशिया कप मध्ये १२२ या सर्वोच्च धावसंख्येसह सर्वाधिक धावा ही कोहलीच्या नावावर आहेत.

कामगिरीचा आढावा 
  • मॅच – १०
  • इनिंग – ९
  • धावा – ४२९
  • सर्वोच्च धावा – १२२*
  • सरासरी – ८५.८०
  • शतक – १
  • अर्धशतक – ३
  • साल – २०१६- २०२२

२) मोहम्मद रिजवान ( पाकिस्तान ) 

मोहम्मद रिजवान रिजवान हा पाकिस्तान चा गुणवान खेळाडू आहे. कामरान अकमल नंतर संघात बरेचसे विकेट कीपर बॅटसमन आले पण रिजवान सारखा कोणी नव्हता. कारण रिजवान हा निडर व आक्रमक फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने आशिया कप २०२२ चा टी २० फॉरमॅट खेळला आहे. व त्यात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे

कामगिरीचा आढावा
  • मॅच – ६
  • इनिंग. – ६
  • धावा – २८१
  • सर्वोच्च धावा – ७८
  • सरासरी – ५६.२०
  • शतक – ०
  • अर्धशतक – ३

३)  रोहित शर्मा( भारत ) 

 

रोहित शर्मा म्हणजेच ‘ रो – हीट मॅन शर्मा ‘ याने टी २० फॉरमॅट चे आतापर्यंत दोन सीजन खेळले असून सर्वाधिक धावांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी २० फॉरमॅट मधील दशकातील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक असलेला रोहित शर्मा येणाऱ्या काळात आशिया कप गाजवेल यात शंका नाही.

कामगिरीचा आढावा 
  • मॅच. – ९
  • इनिंग – ९
  • धावा – २७१
  • सर्वोच्च धावा – ८३
  • सरासरी – ३०.११
  • शतक – ०
  • अर्धशतक – २

४) बाबर हयात( हाँगकाँग )

बाबर हयात हा हाँगकाँग चा प्रतिभावान खेळाडू आहे. या ३१ वर्षीय खेळाडूचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. परंतु तो हाँगकाँग कडून खेळतो. २०१६ च्या आशिया कपच्या टी २० फॉरमॅट मध्ये ओमान विरुद्ध खेळताना ६० चेंडूत १२२ धावा केल्या होत्या. ह्या धावा विराट कोहली च्या नाबाद १२२ धावांचा साथीने संयुक्त सर्वोच्च धावा म्हणून गणल्या जातात.

कामगिरीचा आढावा 
  • मॅच – ५
  • इनिंग – ५
  • धावा – २३५
  • सर्वोच्च धावा – १२२
  • सरासरी – ४७
  • शतक – १
  • अर्धशतक – ०

 ५) इब्राहिम जद्रान ( अफगाणिस्तान )

आशिया कप मध्ये अफगाणिस्तान तर्फे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू इब्राहिम जद्रान आहे. विशेष म्हणजे त्याचे वय फक्त २१ वर्षे असून भारताविरुद्ध त्याने ६४ धावांची बहारदार खेळी केली होती. येणारा काळ हा अफगाणिस्तान व इब्राहिम जद्रान साठी महत्त्वाचा असणार हे नक्की.

कामगिरीचा आढावा 
  • मॅच – ५
  • इनिंग -५
  • धावा – १९६
  • सर्वोच्च धावा – ६४
  • सरासरी – ६५.३३
  • शतक – ०
  • अर्धशतक – १

अशा तऱ्हेने आपण आशिया कप मधील टॉप पाच बॅटसमन ची कामगिरी पहिली. कशी वाटली ते नक्की कॉमेंट करा.

ASIYA CUP 2025 IND VS UAE

ASIYA CUP २०२५ IND VS UAE : काल खेळल्या गेलेल्या अशा कप 2025 मधील ग्रुप ए मधील दुसऱ्या सामन्यात भारताने यू ए इ चा नऊ गड्यांनी पराभव करत दिमाखात सुरुवात केली . भारताने प्रथम तो टॉस जिंकून फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवताना भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना यूएईला ५७ धावांमध्ये ऑल आउट केले.  भारताकडून कुलदीप यादव ने तर शिवम दुबे ने तीन बळी घेतले. त्यानंतर शुभमन गिल आणि अभिषेक शर्माच्या धमाकेदार बॅटिंग ने भारताने हा सामना अवघ्या चार षटकात जिंकला.

Top Five Bowlers in Asiya Cup

ASIYA CUP 2025 IND VS UAE 

Asiya Cup: IND vs UAE

टॉस जिंकत भारताचा फिल्डींगचा निर्णय 

काल दुबई येथील शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध यूएई या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव ने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवताना अप्रतिम गोलंदाजी केली. सर्वप्रथम जसप्रीत बुमराने शराफु क्लीन बोल्ड केले. त्यानंतर युएई च्या डावाला गळती लागली. शराफु २२ आणि वसीम १९ यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यांचा संपूर्ण संघ १३.१ षटकात फक्त ५७ धावांवर ऑल आउट झाला. भारताकडून कुलदीप यादवने २.१  षटकात ७ धावा देऊन ४ बळी टिपले. तर त्याला शिवम दुबे ने उत्तम साथ देताना २ षटकात ४ धावा देऊन ३ बळी गारद केले.

कुलदीप आणि शिवम दुबे चा अप्रतिम स्पेल 

प्रथम फलंदाजी करताना युएई चा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारेल असे सर्वांना वाटत होते. परंतु  कुलदीप यादव ने आपल्या फिरकीच्या जाळ्यात यूएईच्या फलंदाजांना असे काही फिरवले की त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. शिवाय त्याला शिवम दुबे ने उत्तम साथ दिली. कुलदीप यादव ने २.१ षटकात केवळ ७ धावा खर्च करून तब्बल ४ बळी टिपले. तर शिवम दुबे ने दोन षटकार फक्त ४ धावा देऊन तीन बळी घेतले. अशा तऱ्हेने या दोघांनी चार षटकात फक्त ११ धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. या दोघांच्या जादुई गोलंदाजीने चा संपूर्ण संघ फक्त ५७ धावाच करू शकला.

भारताने सामना फक्त चार षटकात जिंकला.

५८ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. अभिषेक शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक रूप धारण करताना फक्त १६ चेंडूत ३० धावा फटकावल्या. त्यात त्याने दोन चौकार आणि तीन षटकार खेचले. सतीश धावावर त्याला जुनेद ने  झेलबाद केले. शुभमन गिल ने ९ चेंडूत २० धावा फटकावताना दोन चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने दोन चेंडूचा सामना करताना एक षटकार मारत हा सामना भारताला जिंकून दिला. भारताने हा सामना ४.३ षटकात म्हणजेच २७ चेंडूत जिंकला.

यू ए ई आणि भारत आमने सामने 

आशिया कप मध्ये भारत आणि युएई एकूण दोन वेळा आम्ही सामने आलेले आहेत. या दोन्ही सामन्यात भारताने मोठा विजय मिळवलेला आहे. २०१६ च्या आशिया कप मध्ये भारताने युएईला ८६ धावावर ऑल आउट केले होते तर २०२५ च्या आशिया कप मध्ये भारताने यूएईला ५७ धावांवर ऑल आउट केले आहे. अशा तऱ्हेने भारताने यूएई ला आतापर्यंत शंभरी सुद्धा गाठू दिली नाही.

सामना एक आणि विक्रम अनेक

  •   ९३ चेंडू राखून विजय 

भारताने विरुद्ध 93 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. शिवाय आशिया कप मध्ये भारता शिवाय इतर कोणत्याही संघाला 10 षटके राखून विजय मिळवता आलेला नाही.

  • आशिया कप मधील दुसरी सर्वोच्च गोलंदाजी

युएई विरुद्ध झालेल्या सामन्यात कुलदीप यादवने फक्त सात धावा देऊन चार बळी मिळवले. ही आशिया कप मधील आतापर्यंतची दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. 2022 मध्ये भुवनेश्वर कुमारने अफगाणिस्तान विरुद्ध पाच  धावा देऊन चार बळी मिळवले होते. कुलदीप यादव ने एका षटकात तीन बळी हे चार वेळा मिळवले आहेत. त्याच्यापुढे फक्त राशीद खान याने सहा वेळा असा पराक्रम केला आहे.

  •  टॉस गमावण्याची मालिका खंडित 

भारतीय संघाने सलग 15 टॉस गमावण्याची मालिका या सामन्यात खंडित केली. सूर्यकुमार यादव ने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टॉस गमावण्याची ही सर्वात मोठी मालिका ठरली.

  •  आशिया कप मधील सर्वात लहान सामना

काल भारत आणि यूएई यांच्यात खेळवला गेलेला सामना हा आशिया कप मधील सर्वात लहान सामना म्हणून ओळखला गेला. युएई ने १३.१ षटक आणि भारताने ४.३ षटक खेळली. अशा रीतीने हा सामना १७.४ षटकात समाप्त झाला. अशा पद्धतीने  हा सामना आतापर्यंतचा सर्वात लहान सामना म्हणून गणला गेला.

  •  शेवटच्या सात फलंदाजानी फक्त दहा धावा जोडल्या.

शेवटच्या सात फलंदाजांनी फक्त दहाच धावा जोडल्या. असे यापूर्वी फक्त एकदाच घडले होते. २०१७ मध्ये इंग्लंडचा डाव ३ बाद ११९ धावावरून सर्वबाद १२७ धावांवर गडगडला होता.

  •  भारताविरुद्ध नीचांकी धावसंख्या 

टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यातील भारताविरुद्ध ही नीचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी 2023 मध्ये 235 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ फक्त 66 धावावर सर्व बाद झाला होता.

  •  यूएई ची नीचांकी धावसंख्या 

यू ए ई चा संघ भारताविरुद्ध फक्त ५७ धाव सर्व बाद झाला. ही त्यांची टी – २० सामन्यातील नीचांकी धावसंख्या ठरली. तसेच आशिया कप मधील ही दुसरी सर्वाधिक नीचांकी  धावसंख्या ठरली. यापूर्वी हाँगकाँगचा संघ हा पाकिस्तान विरुद्ध ३८ धावावर सर्व बाद झाला होता.

 

 

 

Top Five Bowlers in Asiya Cup

नमस्कार मित्रांनो, आशिया कप 2025 ची सुरुवात लवकरच होत असून आपल्याला आशिया कप मधील बरेच रेकॉर्ड्स आणि खेळाडूंची माहिती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल असे मला वाटते म्हणून मी आज तुमच्यासाठी आशिया कप मधील टॉप 5 बॉलर्स आणि त्यांची कामगिरी या लेखात आपल्यासमोर मांडणार आहे. चला तर मग लगेच सुरू करूया. ( Top five Bowlers in Asiya cup )

तसे पाहायला गेले तर आशिया कप मध्ये बॅटसमन चाच डंका वाजत आलेला आहे असे प्रथमदर्शनी आपल्याला  दिसते. परंतु तसे नसून बॉलरानीही सुरेख अशी कामगिरी केली आहे. अशा पाच बॉलरांची यादी दिली आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने आशिया कपला एका खास उंचीवर नेऊन ठेवले आहे. पण यात श्रीलंकन बॉलर्स चा दबदबा आपणास जास्त दिसतो.

Asiya Cup Winner List

Top Five Bowlers in Asiya Cup 

१)  लसिथ मलिंगा  (श्रीलंका) २००४ – २०१८

 Top Five Bowlers in Asiya Cup: lasith Malinga

आशिया कप मधील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून लसिथ मलिंगा ओळखला जातो. लसिथ मलिंगा आतापर्यंत सहा वेळा आशिया कप खेळला असून त्यात त्याने १५ सामन्यात ३३ बळी घेतले आहेत. शिवाय एका डावात ५ बळी त्याने तब्बल तीन वेळा घेतले आहेत. आपल्या विचित्र अँक्शन व हेअर स्टाईल मुळे हा गोलंदाज नेहमीच चर्चेत असायचा. त्याचा टो-क्रशिंग यॉर्कर फलंदाजांच्या मनात नेहमी धडकी भरवत असे. त्याच्या या भन्नाट कामगिरीच्या जोरावर च श्रीलंकेने २००४ व २०१४ चा आशिया कप आपल्या नावावर केला होता.

लसिथ मलिंगा ची आशिया कप मधील कामगिरी
  • सामने – १५
  • विकेट – ३३
  • ओव्हर – १३२.१
  • धावा – ५९६
  • इकॉनॉमी – ४.७०
  • सरासरी – २०.५५
  • बेस्ट बॉलिंग – ५/३४
  • ४ बळी – २ वेळा
  • ५ बळी – ३ वेळा ( सर्वाधिक )
 २)  मुथय्या मुरलीधरन ( श्रीलंका) १९९५ – २०१०

Murali Dharan

श्रीलंकन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून मुरलीधरन ओळखले जातात. आशिया कप मध्ये मात्र ते सर्वाधिक बळीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. थोडा विचित्र बॉलिंग ॲक्शन व विचित्र अपील करणारे मुरलीधरन यांच्यावर ऑस्ट्रेलिया कडून ‘ चोकर्स’ म्हणजेच ‘ फेकरा ‘ अशी वारंवार टिप्पणी केली गेली परंतु त्यांना न जुमानता मुरलीधरन यांनी आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले. त्यांचे चेंडू हातभर वळत असे. म्हणूनच तर भले भले फलंदाज त्यांना घाबरत असे. काचेवर सुद्धा चेंडू वळवण्याची धमक त्यांच्या मनगटात होती. म्हणूनच तर संपूर्ण क्रिकेट विश्वात ८०० बळींचा टप्पा पूर्ण करणारे लेजेंड गोलंदाज अशी त्यांची ओळख आहे.

 मुथय्या मुरलीधरन ची आशिया कप मधील कामगिरी 
  • सामने – २४
  • विकेट – ३०
  • ओव्हर – २३०.२
  • धावा – ८६५
  • इकॉनॉमी – ३.७५
  • सरासरी – २८.८३
  • बेस्ट बॉलिंग – ५/३१
  • ४ बळी – १
  • ५ बळी –
३) अजंता मेंडिस (श्रीलंका ) २००८-२०१४ 

अजंता मेंडिस हा श्रीलंकेचा ‘ मिस्ट्री स्पिनर ‘ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला तो जेंव्हा आला होता त्यावेळी त्याचे चेंडू फलंदाजाना कळायंचेच नाही.म्हणूनच की काय त्याने आशिया कप च्या आठच सामन्यात तब्बल २६ बळी घेतले. २००८ च्या फायनल मध्ये तर त्याने भारताला परेशान करून सोडले. त्या सामन्यात त्याने फक्त १३ धावा देवून ६ बळी मिळवले व एकतर्फी सामना जिंकून दिला. तो जर आणखी सामने खेळला असता तर कदाचित सर्वाधिक बळी त्याच्या नावावर झाले असते.

अशी झाली आशिया कप ची सुरुवात 

अजंता मेंडिस ची आशिया कप मधील कामगिरी 
  • सामने – ८
  • विकेट – २६
  • ओव्हर – ६८
  • धावा – २७१
  • इकॉनॉमी – ३.९८
  • सरासरी – १०.४२
  • बेस्ट बॉलिंग – ६/१३
  • ४ बळी – २ वेळा
  • ५ बळी – १ वेळा
 ४) सईद अजमल ( पाकिस्तान ) २००८-२०१४

सईद अजमल

पाकिस्तान हा जलदगती गोलंदाजांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु सईद अजमल हा ऑफ स्पिनर असूनही त्याने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. आशिया कप मध्ये पाकिस्तानकडून त्याने सर्वाधिक २५ बळी मिळवले आहेत. एका षटकात कमीत कमी धावा देण्याचा व फलंदाजांना जखडून ठेवण्याचा त्याचा मानस असे. २०१४ च्या आशिया कप मध्ये ११ बळींसह मलिंगासोबत तो संयुक्त सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.

सईद अजमल ची आशिया कप मधील कामगिरी 
  • सामने – १२
  • विकेट – २५
  • ओव्हर – ११५
  • धावा – ४८५
  • इकॉनॉमी – ४.२१
  • सरासरी – १९.४०
  • बेस्ट बॉलिंग – ३/२३
  • ४ बळी – ०
  • ५ बळी – ०
५) चामिंडा वास ( श्रीलंका ) १९९५-२००८

श्रीलंकेचा आतापर्यंत चा डाव्या हाताचा सर्वोत्तम जलदगती गोलंदाज म्हणून चामिंडा वास ओळखला जातो. दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्याची कला या गोलंदाजाला अवगत होती पावरप्ले मध्ये कमीत कमी धावा देवून जास्तीत जास्त बळी मिळवण्याकडे त्याचा कल होता. म्हणूनच तर त्याच्याविरुद्ध भले भले महारथी सावध खेळत.

चामिंडा वास ची आशिया कप मधील कामगिरी 
  • सामने – १९
  • विकेट – २३
  • ओव्हर – १५२.३
  • धावा – ६३९
  • इकॉनॉमी – ४.१९
  • सरासरी – २७.७८
  • बेस्ट बॉलिंग – ३/३०
  • ४ बळी – ०
  • ५ बळी – ०

एकंदरीत आशिया कप मध्ये श्रीलंकन गोलंदाजांचा दबदबा आहे असे आपल्याला पाहायला मिळते. भारताचा विचार केला तर रवींद्र जडेजा याने भारताकडून सर्वाधिक २२ बळी घेतले आहेत. येणारा काळ हा भारतासाठी चांगला जावो व आपलेही गोलंदाज या यादीत लवकरच यावीत अशीच अपेक्षा करूया.