ISPL Season 3 Match No. 8 Majhi Mumbai vs Haidrabad

माझी मुंबईच्या गोलंदाजाने जिंकवला पुन्हा एकदा सामना. हैदराबादच्या तोंडातला हिसकावला घास. सामना जिंकला अवघ्या दोन धावांनी !
ISPL season 3 : आय एस पी एल सिझन 3 मध्ये सध्या जोरदार असे अटीतटीचे सामने चालू आहेत. त्यातीलच एक सामना आपल्याला काल पाहायला मिळाला. हा सामना माझी मुंबई विरुद्ध फाल्कन रायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना माझी मुंबई संघाने फक्त 64 धावा जमवल्या होत्या. परंतु माझी मुंबईच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करताना हा सामना अवघ्या दोन धावांनी जिंकला. अशा तऱ्हेने माझी मुंबई संघाने जोरदार कमबॅक करताना अंकतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
मुंबईची फलंदाजी पुन्हा ढेपाळली
प्रथम फलंदाजी करताना माझी मुंबई संघाची सुरुवात निराशा जनक झाली. एका बाजूने एजाज कुरेशीने 6 चेंडू 16 धावा फटकवल्या. परंतु इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. करण अंबाला आजही लवकर बाद झाला. तसेच माझी मुंबईच्या संघाला फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये दहा धावांचे टार्गेट पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शेवटी त्यांचा संघ निर्धारित 10 षटकात केवळ 64 धावा बनवू शकला.
विकी भोईर ने दाखवली पेस पॉवर

फाल्कन रायझर्स हैदराबादचा प्रमुख गोलंदाज विकी भोईर ने अफलातून गोलंदाजी करताना आपल्या वेगवान गोलंदाजीचा नमुना दाखवला. त्याने आपल्या निर्धारित दोन षटकात फक्त पंधरा धावा खर्चून दोन गडी बाद केले. त्याची आजची गोलंदाजी अत्यंत दर्जेदार राहिली. त्याच्या या घातक पेस अटॅकने मुंबईच्या प्रमुख फलंदाजांना जखडून ठेवण्याचे काम केले.
हैदराबादच्या फलंदाजानीही टाकल्या नांग्या
65 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली. परंतु प्रशांत घरात व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. प्रशांत घरातने 22 धावांचे योगदान दिले. हैदराबादचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. परंतु शेवटच्या षटकात हा सामना माझी मुंबईच्या बाजूने झुकला.
मयूर वाघमारे स्विंगचा किंग
यंदाच्या आयएसपीएलमध्ये माझी मुंबईच्या संघाने स्विंग बॉल टाकण्याची जबाबदारी मयूर वाघमारेवर सोपवली आहे. ही जबाबदारी मयूर वाघमारे खूप उत्तमरीत्या पार पाडत आहे. कालच्या सामन्यात त्याने स्विंग बॉल वर गोलंदाजी करताना आपल्या दोन षटकात फक्त सहा धावा खर्च करत एक बळी मिळवला. स्विंग बॉलवर सगळ्यात कमी इकॉनॉमीने रन देणारा गोलंदाज म्हणून मयूर वाघमारे ओळखला जाऊ लागला आहे. यंदाच्या Ispl मध्ये स्विंगचा सुलतान अशी उपाधी स्विंग बॉल मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाला दिली जाणार आहे त्यासाठी मयूर वाघमारे हा प्रमुख दावेदार म्हणून गणला जात आहे.
माझी मुंबईची बॉलिंग लय भारी
माझी मुंबईचा संघ हा आय एस पी एल मध्ये खूप तगडा संघ मानला जातो. त्यांची प्रमुख ताकद ही गोलंदाजी आहे. त्याने अनेक सामने आपल्या गोलंदाजांवर जिंकून दिलेले आहेत. कालच्या सामन्यात ही तसेच काहीसे पाहायला मिळाले. माझी मुंबईला फक्त 65 धावांचे लक्ष रोखायचे होते. परंतु त्यांच्या एजाज अहमद ,विजय पावले आणि करण अंबाला या प्रमुख गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांना जखडून ठेवले. शेवटी सामन्यात हैदराबादचा संघ सहज विजय मिळवेल असे वाटले होते. कारण त्यांना तीन षटकांत फक्त 26 धावांची गरज होती. फलंदाजीला त्यांचे प्रमुख फलंदाज श्रेयश कदम आणि नितीन माटुंगे हे दोन पावर हीटर होते. परंतु आठव्या षटकात करण अंबाला ने फक्त सहा च धावा दिल्या . तर नवव्या षटकात विजय पावलेने तेरा धावा दिल्या खऱ्या परंतु नितीन माटुंगे सारख्या फलंदाजाची विकेट हि घेतली. शेवटी करण अंबाला ने अप्रतिम गोलंदाजी करताना शेवटच्या षटकात आठ धावांचा बचाव करताना सामना दोन धावांनी जिंकवून दिला.
लास्ट ओव्हर ड्रामा
शेवटच्या षटकात हैदराबादला जिंकण्यासाठी फक्त आठ धावांची गरज होती. श्रेयश कदम आणि संस्कार ध्यानी हे दोन फलंदाज क्रिजवर होते. परंतु खांद्याची दुखापत असून सुद्धा करण अंबाला ने यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यात यशस्वी झाला. त्याने सगळे बॉल यॉर्कर टाकत श्रेयश कदमला चकवले. परंतु एजाज कुरेशीने त्याचा सोपा देईल सोडला. पण याचा करण अंबाला वर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने संस्कार ध्यानीला शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद करत सामना आपल्या बाजूला झुकवला. शेवटच्या बॉलवर चार धावांची गरज असताना करण अंबालाने सटीक यॉर्कर टाकत सामना जिंकून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी करण अंबाला ला ‘गली टू ग्लोरी अवार्ड’ देवून सन्मानित करण्यात आले.














