RAYGAD KA TIGER : USMAN PATEL BIOGRAPHY

             त्याची उंची साधारण पाच साडेपाच फूट, वाढलेली दाढी आणि भला मोठा पोट घेऊन तो मैदानात आला आणि बघता बघता त्याने बॉल मैदानाबाहेर भिरकावून द्यायला सुरुवात केली. 8 षटकात 158 धावा चेस करताना या वाघाने फक्त 28 बॉलमध्ये शतक झळकावत चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला व सामना एक हाती जिंकून दिला. त्या खेळाडूचे नाव होते उस्मान पटेल. टेनिस क्रिकेट मधील सर्वात विध्वंसक फलंदाज आणि ज्याला रायगड का टायगर ( Raygad ka tiger 🐯)म्हणून ओळखले जाते त्या खेळाडूचा संपूर्ण जीवन प्रवास आपण या ब्लॉग द्वारे जाणून घेऊया.

परिचय 

Usman Patel
Credit : Facebook

नाव : उस्मान पटेल 

जन्म : 19 सप्टेंबर 1990 

गाव : तळोजा (रायगड) महाराष्ट्र ,भारत 

बॅटिंग स्टाईल : उजव्या हाताने फलंदाजी 

टोपण नाव : रायगड का टायगर 

टेनिस क्रिकेटची सुरुवात 

उस्मान पटेल ला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळे तो बहुतेक वेळा शाळा सोडून मैदानात खेळायला जात असे. या गोष्टीसाठी त्याला घरातून नेहमी ओरडा खावा लागत असे. उस्मानचा जन्म हा रायगड जिल्ह्यातील तळोजा या गावी झाला. त्याकाळी तळोजा मध्ये यंग स्टार तळोजा ही बेस्ट टीम म्हणून ओळखली जायची. त्याकाळी रायगड मध्ये विश्वास पाटील हे सर्वोत्तम खेळाडू होते. एका मॅच मध्ये उस्मान पटेल ने विश्वास पाटील यांच्या ओव्हरमध्ये दोन चौकार एक षटकार खेचला होता. त्याच्या या खेळीने प्रभावित होऊन यंग स्टार तळोजा या टीम ने त्याला आपल्याकडून खेळण्याची ऑफर दिली. तेव्हापासून उस्मान पटेलच्या टेनिस कारकीर्दीला सुरुवात झाली. उस्मान पटेल ला क्रिकेट खेळण्यासाठी त्याच्या घरचा खूप सपोर्ट होता. त्याने फक्त क्रिकेटवरच लक्ष द्यावे असे त्याच्या कुटुंबीयांना वाटत असे. त्यामुळे उस्मानने आपला पूर्ण फोकस क्रिकेटवर केला. कामोठा येथील स्पर्धेत 6 बॉल ला 6 चौकार तसेच केसीएम ट्रॉफी खारघर येथे 25 बॉल मध्ये 106 धावा बनवल्या. तेव्हापासून त्याच्यातील खरा क्रिकेटर जागा झाला व लोक त्याला ओळखू लागले व आपल्या संघाकडून खेळण्यासाठी बोलावू लागले.

परदेशात खेळणे 

Usman Patel
Credit: google.com

विशितला उस्मान पटेल त्याकाळी भलत्याच फॉर्मात होता. त्यावेळी उमर इलेव्हन मुंबई या संघाने गुजरात मध्ये त्याला खेळायला बोलावले होते. तिथे उस्मान ने खूप चांगला खेळ केला होता. संतोष नाणेकर आपल्या कॅमेऱ्याने ती मॅच लाईव्ह दाखवत होता. त्यामुळे खूप सार्‍या लोकांनी उस्मानचा खेळ पाहिला होता. उस्मानची अफलातून बॅटिंग पाहून बऱ्याच जणांचे फोन त्याला येऊ लागले. उमर भाई आणि हकीम भाई यांच्यामुळे उस्मान पटेलला कतारला जाण्याची संधी मिळाली. तिथेही त्याने खूप चांगला खेळ केला नंतर उस्मानला दुबई ,कतार, श्रीलंका आणि नेपाळ यासारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट खेळायला मिळाले.

गावकऱ्यांची साथ 

उस्मान पटेल ला क्रिकेट खेळताना त्याच्या गावकऱ्यांची आणि मित्रांची खूप साथ लाभली. उस्मान पटेल वेळोवेळी त्यांचे आभार नेहमी मानत असतो. उस्मानची जर मॅच एखाद्या ठिकाणी असेल तर गावकऱ्यांकडून त्याविषयी विचारपूस केली जाते. काही वेळा ते मॅच च्या ठिकाणी उपस्थिती दाखवून उस्मान चे प्रोत्साहन वाढवताना दिसतात. त्याचे मित्र मुददसिर, साद, अब्बास, अरबाज हे नेहमी त्याच्यासोबत असतात. ज्यावेळी उस्मानने पर देशात जाऊन प्रभावी कामगिरी केली होती त्यावेळी त्याचा रायगड वासियानी भव्य दिव्य असा सत्कार केला होता. तसेच पुरस्कार देऊनही सन्मानित केले होते. अशाप्रकारे उस्मान पटेलला आपल्या गाववासीयांची खूप मोलाची साथ मिळत आहे.

रायगड का टायगर अशी ओळख       Raygad ka tiger 🐯

Raygad ka tiger
Credit: Instagram

एका मॅच मध्ये उस्मान पटेल ने 16 बॉल मध्ये 53 धावा करून सामना आपल्या टीमला जिंकून दिला होता त्यावेळी मच्छिंद्र पाटील यांनी पहिल्यांदाच ‘ ये तो सही टायगर हे’ असे म्हटले होते. त्यावरूनच उस्मान पटेलला’ रायगड का टायगर ‘असे म्हटले जाऊ लागले.

सर्वात मोठी फॅन फॉलोइंग 

उस्मान पटेल हे टेनिस क्रिकेट मधील खूप मोठे नाव आहे. टेनिस क्रिकेट मध्ये उस्मान पटेल हा सर्वाधिक फॅन फॉलोइंग असलेला खेळाडू आहे. त्याचे इंस्टाग्राम वर दीड लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तसेच पुढील काही कारणामुळे किंवा घटनांमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग आपल्याला दिसून येतो.

  •  सचिन तेंडुलकर ज्यावेळी आऊट व्हायचा त्यावेळी टीव्ही बंद केले जायचे. तसेच उस्मान पटेल ज्यावेळी आऊट होतो त्यावेळी स्टेडियम खाली केली जातात असे म्हटले जाते.
  •  जर एखाद्या सामन्यात उस्मान पटेल शून्यावर बाद झाला तर त्याचे फॅन हे त्याला असे – तसे खेळण्याचे सल्ला द्यायचे तसेच हे सल्ले तो नम्रपणे ऐकून त्यावर अंमल करत असे.
  •  एकदा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अशी घटना घडली की उस्मान पटेल साठी चालू सामना हा अर्धा तास थांबवण्यात आला. गाडीतून मैदानापर्यंत उस्मान ला आणण्यासाठी सहा-सात बाउन्सर लावले गेले. एवढी प्रचंड गर्दी त्यावेळी उस्मानाला पाहण्यासाठी आली होती. एवढी इज्जत पैसे देऊनही विकत घेता येत नाही हे तो नेहमी सांगत असतो.
  •  क्षेत्ररक्षण करत असताना उस्मान पटेल ज्या साईडला जाईल त्या साईडला पब्लिकांची गर्दी चे प्रमाण जास्त वाढत असे.

उस्मान पटेल आणि समस्या 

टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा बॅकग्राऊंड म्हणा किंवा घरची आर्थिक परिस्थिती म्हणा ही म्हणावी तितकी साजेशी नसते. त्यामुळेच कदाचित एखादा चांगला क्रिकेटर सुद्धा मागे पडतो. पण उस्मान पटेल त्या बाबतीत नशीबवान असावा. कारण उस्मान पटेलचे वडील व त्याचा भाऊ त्याच्या मागे खंबीरपणे नेहमी उभे असत. परंतु तळोजा गावात ग्राउंडची कमतरता नेहमी भासत असे. त्यामुळे उस्मान पटेल ला म्हणावं तितका सराव करता येत नसे. शिवाय कालांतराने त्याचा फॉर्म आणि फिटनेसही त्याला राखता आला नाही. या काही समस्या उस्मान भाई ला नेहमी जाणवत राहिल्या.

उस्मान पटेल चा फिटनेस 

उस्मान पटेल ला फिटनेस च्या बाबतीत बऱ्याच समस्या उद्भवल्या होत्या. परंतु उस्मान पटेल ने या समस्येचा आपल्या जीवनात  समावेश करून बरेच सामने गाजवले. उस्मान पटेल मॅच च्या वेळी जेवत नाही. तो फक्त साधे पाणी किंवा कोल्ड्रिंकस यावरच पूर्ण दिवस खेळत राहतो. शिवाय बाहेरचे काहीही खात नाही.फक्त तो घरचे जेवण जेवत असतो. त्याच्या मित्रांच्या मते तो एकाच वेळी चार ते पाच मॅचेस खेळू शकतो. शिवाय 50 ओव्हरचे सामने तो सहज खेळून काढतो.

उस्मान पटेल चे रेकॉर्ड 

  •  देवांश ट्रॉफी मध्ये 158 धावांचा पाठलाग करताना 34 चेंडूत नाबाद 131 धावांची खेळी केली. त्यात 16 षटकार आणि 7 चौकार मारले होते. 
  • सहा बॉल ला सहा षटकार.
  • दुबईमध्ये T10 स्पर्धेत 16 बॉल मध्ये 50 धावा. 
  •  24 बॉल मध्ये 104 धावा करत टेनिस क्रिकेटमध्ये फास्टेस्ट सेंच्युरी बनवण्याचा रेकॉर्ड. 

उस्मान पटेल ने जिंकलेले पुरस्कार 

  •  उस्मान पटेल ने आतापर्यंत चार पेक्षा जास्त कार जिंकलेले आहेत.
  •  खासदार चषक 2021 मध्ये मॅन ऑफ द सिरीज. 
उस्मान पटेल ने खेळलेल्या प्रमुख स्पर्धा 
  •  यूएई मध्ये T 10 स्पर्ध्ये दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात भारताचे प्रतिनिधी केले.
  • रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सातत्याने सहभाग घेतला. 
  • एल ए एम ट्रॉफी 2023 भोपाळ येथे उपविजेतेपद मिळवले. 
  • सुप्रीमो ट्रॉफी आणि रतन बुवा ट्रॉफीत दिमाखदार कामगिरी केली. 
  •  दुबई, कतार ,ओमान आणि श्रीलंका या देशात जाऊन क्रिकेट खेळण्याचा अनुभव.

ISPL मध्ये उस्मान पटेल Unsold

आयपीएलच्या धर्तीवर BCCI आणि बॉलीवूड कलाकार यांच्या साह्याने ISPL नावाची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा भरवण्यात आली. यात टेनिस क्रिकेट मधील खूप मोठे मोठे खेळाडू आपल्याला खेळताना दिसले परंतु एक नाव त्यातून दिसून आले नाही. उस्मान पटेल हा ISPL चे दोन्ही सीजन खेळू शकला नाही. त्याच्यावर बरेच तर्कवितर्क लावण्यात आले. परंतु त्याचे खरे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ISPL च्या पहिल्या सीजनमध्ये रमजान महिना असल्याकारणाने शिवाय फिटनेस ची समस्या असल्या मुळे उस्मान पटेल ने  फॉर्म भरला नव्हता. गेल्या दोन वर्षापासून उस्मान पटेल ने व्यावसायिक क्रिकेट खेळणे कमी केले होते. तर त्याला वेळोवेळी फिटनेस ची समस्या जाणवत होती. तसेच त्याचा फॉर्मही कमी झाला होता. याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर दिसून येत होता. उस्मान पटेल ने दुसऱ्या सीजन ला फॉर्म भरला होता.  त्याचे नावही ऑक्शन मध्ये आले होते. परंतु तो अनसोल्ड राहिला.

 उस्मान पटेल ची लॉयल्टी Loyalty of Usman Patel 

Credit: Facebook

उस्मान पटेल यांनी कधीही क्रिकेट खेळताना पैशाची मागणी केली नाही. त्याने जर एखाद्या टीमला किंवा व्यक्तींना वचन दिले तर तो त्याच टीमकडून खेळतो. हीच त्याची खरी लॉयल्टी त्याला एक मोठा खेळाडू बनवते. कोणी एका व्यक्तीने जर ज्यादा पैसे देऊन त्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला स्पष्ट नकार देतो त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये शब्दांना खूप किंमत असते. त्यामुळे जो त्याला सर्वप्रथम सांगेल त्याच टीमकडून तो आजवर खेळत आला आहे.

उस्मान पटेल चा नवोदित खेळाडूंना मोलाचा सल्ला 

  • एखाद्या खेळाडूला जर खरंच पुढच्या लेवलवर क्रिकेट खेळायचे असेल तर त्याने रोज प्रॅक्टिस करणे खूप आवश्यक आहे .
  • आपले जे कोणतेही कौशल्य असेल ते हेरून दिवसभरात किमान दोन तास क्रिकेटसाठी देणे आवश्यक आहे.
  • वयाची 17 ते 22 या पाच वर्षात आपल्याला नेमके काय करायचे आहे हे पक्के करावे.
  • आपल्याबरोबर चार ते पाच नवीन पोरांना तयार करून आऊट न होता रोज शंभर बॉल खेळण्याचा प्रयत्न करावा.
  • नवोदित खेळाडूंनी घरच्यांची रिस्पेक्ट करा आणि त्यांना वेळ द्या कारण अडचणीच्या वेळी तेच कामाला येतात असे उस्मान पटेल चे म्हणणे आहे.

उस्मान पटेल चे स्वप्न 

उस्मान पटेल हे टेनिस क्रिकेट मधील खूप मोठे नाव आहे. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने खूप नाव केले.त्याचबरोबर त्याला लेदर क्रिकेटची खूप आवड होती.  लेदर बॉल क्रिकेटमध्ये तो श्रीलंका व नेपाळला खेळण्यासाठी गेला होता व तिथेही त्याने उत्तम कामगिरी केली होती. हैदराबाद येथे कॅम्प मध्ये त्याची निवड झाली होती परंतु दुसऱ्या राऊंड नंतर फिटनेस प्रॉब्लेम मुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्याचे टीव्हीवर झळकण्याचे तसेच आयपीएल खेळण्याचे स्वप्न आहे.

FAQ

  • उस्मान पटेल चा क्रिकेट मधील सर्वात आवडता खेळाडू कोण आहे? 

उत्तर – विरेंद्र सेहवाग

  •  उस्मान पटेल च्या मते टेनिस क्रिकेट मधील बेस्ट बॅट्समन कोण आहे ? 

उत्तर – कृष्णा सातपुते 

Krishna Satpute : The God of Tennis Cricket

  •  उस्मान पटेल च्या मध्ये टेनिस क्रिकेट मधील सर्वात कठीण गोलंदाज कोण आहे ? 

उत्तर – विजय पावले ( स्लोवर वन ओळखणे कठीण )

Vijay Pavale: The Sangli Express Biography

  •  उस्मान पटेल चा सर्वात आवडता शॉट कोणता?

उत्तर – कव्हर ड्राईव्ह, उडी मारून शॉट मारणे, रिव्हर्स शॉट. 

  • उस्मान पटेल ला रायगड का टायगर हे नाव कोणी दिले? 

उत्तर – मच्छिंद्र पाटील 

  •  उस्मान पटेल ची आवडती स्पर्धा कोणती? 

उत्तर – सुप्रीमो ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, रतन बुवा ट्रॉफी. 

  • उस्मान पटेल च्या मध्ये आताच्या घडीतील टेनिस क्रिकेटमधील तीन बेस्ट ऑल राऊंडर कोण आहेत ?

उत्तर – 1] विजय पावले 

          2] करण अंबाला  

          3] विश्वजीत ठाकूर.

निष्कर्ष

एकंदरीत या ब्लॉग द्वारे आपल्याला स्पष्ट होते की उस्मान पटेल हा टेनिस क्रिकेटमधील खूप मोठा खेळाडू आहे तसेच चांगला माणूस आहे. आयपीएलच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिल्ली आणि अहमदाबाद दोन नव्या संघाची भर पडणार आहे. त्यामुळे ISPL पासून वंचित राहिलेल्या बऱ्याच ⭐ खेळाडूंना तिसऱ्या सिझनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.  जर का उस्मान पटेल ने आपल्या फिटनेस वर काम केले तर तो ISPL चा पुढील सीजन नक्कीच खेळू शकतो यात शंका नाही. शिवाय त्याचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न आहे तेही लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही आपल्या सर्वांची इच्छा असणार आहे. यासाठी आपण सर्वांनी उस्मान पटेलला शुभेच्छा देऊया. उस्मान पटेल विषयी माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा ब्लॉग उस्मान पटेल च्या सर्व चाहत्यांपर्यंत नक्की पोहोच वण्यास  विसरू नका.

धन्यवाद.

हे ही वाचा.जरूर आवडेल.

क्रिकेट मध्ये इतिहास घडला. एकाने ठोकल्या 1000 धावा आणि संघाने बनवल्या 1400 धावा.

 

 

 

Krishna Satpute : The God of Tennis Cricket

Krishna Satpute

फलंदाजी करणाऱ्या संघाला एक ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 23 धावा हव्या होत्या. आव्हान तसे खूप कठीण होते परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला आपण जिंकू शकतो याची जणू खात्रीच होती कारण हे तसेच होते. कारण फलंदाजी करणारा फलंदाज ही तितकाच खतरनाक आणि भरवशाचा होता. पहिला चेंडू निर्धाव जाऊनही त्या फलंदाजाने पुढील पाच चेंडूत चार षटकार मारून हा सामना  एक हाती जिंकून दिला. त्याचे नाव होते कृष्णा लक्ष्मण  सातपुते. ‘ क्रिकेटचा देव’ असा शब्द उच्चारला की सर्वांच्या डोळ्या समोर Sachin Tendulkar यांचा चेहरा आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचा हा हिरा जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. सचिन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही खेळाडूला आपण The God of  cricket म्हणू शकत नाही. परंतु  Krishna Satpute नावाच्या वादळाने आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं. टेनिस क्रिकेट विश्वावर ज्याने अधिराज्य गाजवल, टेनिस क्रिकेटला नवीन ओळख निर्माण करून दिली. म्हणूनच त्याला God of tennis cricket असे म्हटले जाते. अशा कुर्डूवाडी  सोलापूरच्या कृष्णा सातपूतेचा संघर्ष सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे. चला तर पाहूया त्याचा संपूर्ण जीवन प्रवास.

कृष्णाचा जन्म ( date of birth)

कृष्णा सातपुते याचे आयुष्य संघर्षमयी होते. भारतानं1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला आणि त्याच वर्षी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ढवळस रेल्वे स्थानकाच्या रेल्वे क्वार्टरमध्ये कृष्णा सातपुते याचा जन्म  1 मे 1983  रोजी झाला. कृष्णाचे वडील रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यामुळे ढवळस रेल्वे स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या रेल्वे क्वार्टरमध्ये त्यांचे संपूर्ण बालपण गेले. लहान वयात कृष्णाचा स्वभाव खोडकर होता. मस्ती करणे, झाडावर चढणे, लपून बसणे, खोड्या काढणे त्यामुळे अनेक वेळा त्याने वडिलांचा सुद्धा खूप मार खाल्ला आहे.सध्या कृष्णा सातपुते हा 42 वर्षाचा असून उत्तम प्रकारे क्रिकेट खेळत आहे.

कृष्णाचे शालेय शिक्षण 

               कृष्णाचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण ढवळस गावातील जय जगदंबा विद्यालय या शाळेत झाले. त्यानंतर वडिलांची कुर्डूवाडी मध्ये बदली झाली व पुढील शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, कुर्डूवाडी येथे पूर्ण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण के.एन.भिसे कुर्डूवाडी या महाविद्यालयात त्याने घेतले. या कालखंडात त्यांनी क्रिकेटवर असलेले प्रेम जराही कमी होऊ दिले नाही. शालेय जीवनात तो फार रमला नाही, कारण मैदानात चौकार आणि षटकार खेचण्यात जो आनंद त्यांना मिळत होता, तो आनंद शाळेच्या चार भिंतीमध्ये त्याला कधी मिळाला नाही. इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर बहूदा त्यांनी पुढे शिक्षण घेतले नाही.

                  कुर्डूवाडीमध्ये कृष्णा सातपुते याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्याने लहान असतानाच मोठ्या पोरांमध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्याच्या फलंदाजीचे तेव्हाही सर्वांना कौतुक होते. निर्भीड आणि धमाकेदार फटकेबाजी करत असल्यामुळे चांगल्या चांगल्या गोलंदाजांचा सुद्धा त्याने लहान वयात घाम काढला आहे. सहावीत असताना सिनियर खेळाडूंनी मारलेले बॉल आणण्याचे काम कृष्णा करत होता. त्याच्या मनात क्रिकेट खेळण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे त्याने शाळेतले मित्र आणि गावातील मित्र याची टीम बनवली व रबर बोलणे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी सर्फराज आणि  रंजीत या दोन मित्रांनी ती टीम स्पॉन्सर केली होती. त्यावेळी जय हिंद नावाची मोठी टीम त्या भागात खेळत होती. त्यांच्याविरुद्ध कृष्णा ने अशी काही फटकेबाजी केली की त्यांनी त्याला आपल्या टीम मध्ये खेळण्यास बोलावले.

शालेय क्रिकेट ते प्रतीक XI  डिंगडाँग पर्यंतचा प्रवास 

जय हिंद संघाकडून खेळताना कृष्णाने अनेक स्पर्धा गाजवल्या. अशातच इंदापूर येथील स्पर्धेत पुण्यातील प्रसिद्ध आणि बाप संघ म्हणून ओळख असलेल्या प्रतीक XI संघाविरुद्ध त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचे त्याने सोनं केलं आणि प्रतीक XI मधील दिग्गज गोलंदाजांवर जबरदस्त प्रहार करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.त्याने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. खऱ्या अर्थाने कृष्णाच्या या खेळीमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सामना झाल्यानंतर प्रतीक XI संघाचे मालक  विशाल कांबळे आणि संदीप जगताप यांनी स्वत: कृष्णाशी संपर्क साधून त्याला संघातून खेळण्यासाठी आमंत्रित केले.त्यावेळी कृष्णा कडे मोबाईल नव्हता. शेजारच्या टेलिफोन  वरून कॉल करून त्याला खेळण्यासाठी बोलावत.  त्या दिवसापासून कृष्णाच्या टेनिस क्रिकेट पर्वाला सुरुवात झाली.

एकाच महिन्यात कृष्णा पोरका झाला अन्…

एकीकडे कृष्णाची क्रिकेट कारकिर्द बहरत होती. मात्र दुसरीकडे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांना कॅन्सरचे निदान झाले आणि कुटुंबाला मोठा हादरा बसला. कृष्णाने वडिलांवर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, कर्ज काढून अमाप खर्च केला. परंतु त्याचे वडील वाचू शकले नाहीत. 2003 मध्ये त्यांचे  निधन झाले. कृष्णा या दु:खातून सावरणार तोच वडिलांच्या निधनाचा आईला जबर धक्का बसला होता. त्या दु:खातून त्याची आई ही सावरू शकली नाही आणि वडीलांच्या पाठोपाठ आईचे सुद्धा त्याच महिन्यात निधन झाले. एकाच महिन्यात कृष्णा पोरका झाला. एकीकडे आई वडीलांच्या मृत्यूचा शोक, दुसरीकडे त्याची पत्नी गर्भवती होती त्यांचं टेंशन. वडिलांच्या आजारपणात बराच पैसा खर्च झाला होता. त्यामुळे कर्जही खूप झाले होते. त्यामुळे त्याने वाटेल ते काम करायला सुरुवात केली. बिगारी, रोजंदारी मजूर म्हणून सुद्धा त्याने काम केले. अनेक संकटे चहूबाजूंनी घोंघावत होती. परंतु कृष्णाने क्रिकेट खेळणे काही थांबवले नाही. एका मुलाखतीत कृष्णाने सांगितले होते की, त्याच्यावर एक वेळ अशी आली होती. जेव्हा त्याच्याकडे बायकोला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा भंगार विकून त्याने पैसे आणले होते. त्याचा आयुष्यातील ही पहिली आणि शेवटची चूक होती, असे त्याने तेव्हा म्हटल होतं. त्यानंतर कृष्णाने ती चूक पुन्हा कधीच केली नाही.

क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट…

Krishana satpute.
Credit: google.com

क्रिकेट वेड्या कृष्णाने आपले क्रिकेट प्रेम कायम ठेवत खेळात सातत्य ठेवलं आणि पुण्यामध्ये प्रतीक XI कडून खेळायला सुरुवात केली. याच काळात तो पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील एका कंपनीमध्ये नोकरी करू लागला. मात्र मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारा कृष्णाला ऑफिसच्या चार भिंती कोठडी प्रमाणे भासत होत्या. एकदा त्याचा बॉस त्याला ‘आप काम नही कर सकते आप सिर्फ क्रिकेट ही खेलो.’ असा म्हणाला होता. तेंव्हा पासून कृष्णाने पूर्ण वेळ क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि मैदान गाजवायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या खेळाचा स्तर उंचावत गेला. त्याच्या फलंदाजीने त्याने टेनिस क्रिकेटमधील मातब्बर गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढले. त्याच्या फलंदाजीची क्रेझ तरुणांमध्ये निर्माण झाली. फक्त कृष्णाची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करू लागले. त्याने सुद्धा चाहत्यांचा हिरमोड केली नाही. अनेक शतकं, अर्धशतक ठोकून त्याने आपल्या फलंदाजीचा धडाका कायम ठेवला. 2019 मध्ये गोव्याच्या एका मोठ्या स्पर्धेत प्रतिक 11 विरुद्ध रायगड हे दोन्ही संघ फायनलमध्ये एकमेकांच्या विरुद्ध येऊन ठेपले. दोन्ही बाप संघ आमने सामने आल्यामुळे चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी होती. फायनल ला प्रतीक XI संघाला जिंकण्यासाठी 8 षटकांमध्ये 88 धावा करायच्या होत्या. मात्र प्रतीक XI ची सलामीची जोडी आणि मधली फळी कोसळली होती. प्रतीक XI चे 5 गडी 17 या धावसंख्येवर बाद झाले होते. त्यामुळे सर्व भार कृष्णाच्या खांद्यावर आला होता. कृष्णाने या परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता तुफान फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची त्याने आतषबाजी केली आणि 1 षटक राखून प्रतीक XI संघ विजयी झाला.

कृष्णा सातपुते मुळे लोकांचा टेनिस क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
Image credit : Google .com ISPL.

इंग्लंडमध्ये झालेल्या ICC CRIO चषकामध्ये भारत विरुद्द पाकिस्तान सामन्यामध्ये त्याने भारताच्या टीमचे सदस्य होता. तसेच 2022 साली झालेल्या सहा संघांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्यावर भारताच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, युएई, ओमान आणि कॅनडा या सहा देशांचा समावेश होता. एकेकाळी कृष्णाने स्वतः म्हटले होते की, टेनिस क्रिकेट ला एखादे मोठे व्यासपीठ मिळेल आणि टेनिस क्रिकेट ला सुगीचे दिवस येतील. आणि खरच सध्या ISPL मुळे टेनिस क्रिकेट ला सुगीचे दिवस आले आहेत. आज रोजी कृष्णाने आपली चाळिशी जरी ओलांडली असली तरी या ISPL ही त्याच्या  नावाची चर्चा नेहमी होत असते. वाघ जणू म्हातारा जरी झालेला असला तरी त्याच्या नावाची दहशत नेहमीच असते. याचीच प्रचिती ज्यावेळी कृष्णा सातपुते मैदानात उतरतो त्यावेळी होते. म्हणूनच त्याला  कुर्डूवाडी चा डॉन म्हणतात.

कृष्णा सातपुते आणि विक्रम

  • टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णाने भारताकडून खेळताना सर्वाधिक 23 शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत टेनिस क्रिकेटमध्ये 25 हून अधिक शतकांची नोंद त्याच्या नावावर आहे.
  • 2001 मध्ये एकाच सामन्यात 14 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम त्याने केला होता.
  •  एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आतापर्यंत तीन वेळा केला आहे.
  • त्याने आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक पारितोषिकं जिंकली असून त्यामध्ये अनेक दुचाकींचा समावेश आहे.
  • सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम फक्त कृष्णा सातपुतेच्या नावावर आहे.

कृष्णा सातपुतेने आपल्या टेनिस क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक वेळा एकहाती सामने आपल्या संघांना जिंकून दिले आहेत. त्याच्या बॅटमधून निघणारे चौकार आणि षटकार पाहण्यासाठी चाहते मैदानांमध्ये मोठ्या संख्येने तेव्हाही गर्दी करत होते आणि आजही गर्दी करत आहेत. चाहता वर्ग देशाच्या कानाकोपऱ्यात असल्यामुळे देशभरातली विविध संघ त्याला खेळण्यासाठी आमंत्रित करतात.

कृष्णा सातपुते च्या सर्वोत्तम खेळी –  best knock by Krishna Satpute

Krishna Satpute
Credit: google.com

[ Most fit player of the year ]

  1. कर्नाटकातील कारवारमध्ये खेळत असताना त्याने 57 चेंडूमध्ये 159 धावांची धुवाधार खेळी केली होती. त्याचा आक्रमक पवित्रा पाहून विरुद्ध टीमसह चाहते सुद्धा आवाक झाले होते.
  2. कर्नाटक मधील बेळगाव येथे त्या काळची सर्वोत्तम असलेली दौंडच्या टीम बरोबर फायनल मॅच मध्ये कृष्ण सातपुते ने एक अजरामर खेळी केली होती. जिंकण्यासाठी दहा षटकांमध्ये 110 धावांची गरज असताना 35 वर 5 विकेट जाऊनही सतीश पठारे आणि विजय पावले सारख्या मातब्बर गोलंदाजांचा चा खरपूस समाचार घेत कृष्णाने 65 धावांची खेळी केली आणि हा सामना एक ओव्हर राखून जिंकला.
  3. रतन बुवा ट्रॉफी मध्ये त्या काळची सर्वोत्तम असलेली लॉईड टीम बरोबर 78 धावांची गरज असताना वैयक्तिक नाबाद 62 धावांची खेळी करून कृष्णा सातपुते ने आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता.
  4. कोलकता मधील एका लोकल टीमने त्यांच्या टीम मध्ये खेळण्यासाठी कृष्णाला बोलावले होते. तेथील  बेस्ट टीम बरोबर त्यांची मॅच होती जिंकण्यासाठी 117 धावांची आवश्यकता असताना 36 वर 6 विकेट जाऊनही कृष्णाने 75 धावांची अफलातून केली त्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटसमन असे सर्वच पुरस्कार मिळाले होते.
केलेले उपकार जाणणारा कृष्णा सातपुते – 

कृष्णा सातपुते याने क्रिकेटच्या दुनियेत बरेच विक्रम केले आहेत. खूप नाव कमावले आहे. परंतु संकटकाळी त्याला ज्यांनी मदत केली होती त्यांना तो कधीच विसरत नाही. 2012 साली ज्यावेळी त्याने स्पोर्ट्स कपड्यांचे दुकान चालू केले होते त्यावेळी मयूर स्पोर्ट्स चे मालक राजू भालेकर यांनी त्याला आर्थिक पाठबळ दिले होते व कीट साठी सपोर्ट केला होता. याचे महत्त्व तो नेहमी सांगत असतो. तसेच संतोष नाणेकर यांचे tennis cricket.in, अजय दादा दूधभाते यांचे crickelife.in , तसेच तारीक भाई यांचे 77.in यांद्वारे टेनिस क्रिकेटचे लाईव्ह प्रक्षेपण देशांतर्गत जसे की दिल्ली मुंबई कर्नाटक या ठिकाणी शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबई, कतार आणि गल्फ – आखाती देशात पोहोचवण्याचे काम या प्रसारमाध्यमांनी केले आहे. त्यांच्यामुळेच कृष्णाचा खेळ पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळाली. या सर्वांचे आभार कृष्णा सातपुते वेळोवेळी मानत असतो हे आपल्या सर्वांना परिचितच आहे.

कृष्णाचे कार आणि बाईक कलेक्शन         (krishnas car and bike collection)

एकेकाळी गरजेच्या वेळी शेजारच्या कडे कार आणि बाईक साठी बोलणी खाणारा, बिगारी काम करणारा, वेळप्रसंगी भंगार चोरून विकणाऱ्या कृष्णाकडे आज वीस पेक्षा जास्त टू व्हीलर व चार फोर व्हीलर गाड्या आहेत. हे सर्व काही शक्य झालं आहे ते फक्त क्रिकेटमुळेच. 2010 मध्ये त्यांनी सर्वप्रथम प्लॅटिना बाइक जिंकली. तर 2014 मध्ये पहिली फोर व्हीलर कार सेंट्रो त्याला मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आज त्याच्या घरांमध्ये वीस पेक्षा जास्त गाड्या दिमाखात उभ्या आहेत.

हेलिकॉप्टर शॉट आणि कृष्णा 

Helicopter shot 🚁

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर शॉट साठी प्रसिद्ध आहेत. तर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कृष्णा सातपुते हा हेलिकॉप्टर शॉट साठी ओळखला जातो. समोर कोणताही गोलंदाज असो त्याचा उत्तम प्रकारे टाकलेला यॉरकर  बॉल ही कृष्णा अगदी सहज सीमापार पाठवतो. या हेलिकॉप्टर शॉट द्वारे कृष्णा ने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. सध्याच्या घडीला हेलिकॉप्टर शॉट म्हणजेच’ कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका ‘अशी ओळख निर्माण झाली आहे.

FAQ –

  • कृष्णा सातपुते कोणाला आपला रोल मॉडेल मानतो?

उत्तर – संजय नागटिळक ( मध्य प्रदेश ).

  • कृष्णा सातपुते चा टेनिस क्रिकेट मधील आदर्श खेळाडू कोण आहे ?

उत्तर – उमेश मांजरेकर सर (कोल्हापूर ).

  • कृष्णा सातपुते च्या मते टेनिस क्रिकेटमधील त्याला सर्वात कठीण वाटणारा गोलंदाज कोण होते?

उत्तर – कै. संदीप दाभाडे, सतीश पठारे  आणि भावेश पवार

  • सध्याच्या घडीतील कृष्णा सातपुते चा सर्वात आवडता फलंदाज कोण आहे. ?

उत्तर – बबलू पाटील.

  • सध्याच्या घडीतील कृष्णा सातपुतेचा सर्वात आवडता गोलंदाज कोण आहे?

उत्तर – तुकाराम गुंजे.

  • कृष्णा सातपुते चा सर्वात आवडता क्रिकेट शॉट कोणता आहे ?

उत्तर – हेलिकॉप्टर शॉट, बैठक शॉट आणि लोफ्टेड स्ट्रेट शॉट.

  • कृष्णा सातपुते चा सगळ्यात आवडता फॅन कोण आहे ?

उत्तर – अतुल थोरात ( खेडगाव ) आणि किशोर मदने    ( पुसेगाव ).

  • कृष्णा सातपुते यांना 2025 चा कोणता पुरस्कार मिळाला आहे? 

उत्तर – मोस्ट फिट प्लेअर ऑफ दी इयर . ( Most fit player of the year.) 

निष्कर्ष 

कृष्णाने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना आकर्षीत केलेच. परंतु त्याबरोबर त्याने भारतीय संघाचे दिग्गज खेळाडूंना सुद्धा आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले. सचिन  तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग सारख्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंनी कृष्णाचा खेळ पाहिला आहे. तसेच त्याचे तोंड भरून कौतुक सुद्धा केले आहे. टेनिस क्रिकेटला नवीन ओळख मिळवून देण्यामध्ये नक्कीच कृष्णा सातपुते याचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहते लांब लांबून मैदानामध्ये आपली उपस्थिती दर्शवतात. तुम्ही कृष्णाचा सातपुते याचा खेळ पाहिला आहे. पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या खेळाडूची माहिती सर्वांना व्हावी म्हणून जास्तीत जास्त शेअर सुध्दा करा.

हे ही वाचा –

Vijay Pavale: The Sangli Express Biography

Vijay Pavale : The Sangli Express Biography

क्या भागता है, क्या गती है और क्या गेंदबाजी करता है. गजब है भाई !”  हे आकाश चोपडा यांच्या कॉमेंट्रीतून निघालेले गौरवोदगार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एका धगधगत्या वादळाविषयीचे. आणि त्या वादळाचे नाव आहे विजय जयसिंगराव पावले. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे ब्रँड अँबेसीडर असलेला विजय पावले. आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने भल्या भल्यांच्या दांड्या गुल करणारा विजय  सध्याच्या घडीतील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. MPL म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीग ही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा तसेच ISPL म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही  टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा  विजय पावलेने खऱ्या अर्थाने गाजवली. आणि पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा साऱ्या भारतभर सुरू झाली. सांगली एक्सप्रेस, रफ्तार का राजा, टेनिस क्रिकेटचा डेल स्टेन अशा टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या विजय पावले चा म्हणजेच आपल्या विजू भाऊंचा संपूर्ण जीवन प्रवास आपण आता जाणून घेऊया.

Vijay Pavale : The Sangli Express Biography

विजय पावले यांचा परिचय 

Vijay Pavale : The sangali Express

  • पूर्ण नाव – विजय जयसिंगराव पावले 
  • जन्मतारीख – 16 ऑगस्ट 1989. ( 36 वर्षे ) 
  • गाव – मांगले , ता – हातकणंगले , जि – सांगली. 
  • प्राथमिक शिक्षण – जिल्हा परिषद शाळा ,मांगले.
  • माध्यमिक शिक्षण – श्री मंगलनाथ विद्यामंदिर, मांगले.
  • उच्च माध्यमिक शिक्षण – विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा. 
  •  पुणे युनिव्हर्सिटी मधून डिफेन्स                       आणि  स्ट्रेटीजिक स्टडीत रिसर्च केला          आहे आणि नक्षलवाद व समाज यावर काम केले आहे.
  • पेशा – क्रिकेटर 
  • नोकरी – 1. बॉश कंपनीत क्वालिटी इंजिनियर                 2. ओप्पो कंपनीत ट्रेनर.
  • टोपण नाव – रफतार का राजा, सांगली एक्सप्रेस.
  • आयडियल टीम – डिंग डाँग पुणे, तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे.
  • सर्वोत्तम स्पर्धा – सुप्रीमो ट्रॉफी , रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, ISPL, MPL. 

Krishna Satpute : The God of Tennis Cricket

विजय पावले यांचा जन्म 16 ऑगस्ट 1989 साली सांगली जिल्ह्यातील मांगले या छोट्याशा खेडेगावात झाला. यांचे पूर्ण नाव विजय जयसिंगराव पावले आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा – मोरणा नद्यांच्या संगमावर असलेले मांगले हे गाव पुर्वीपासून सधन म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव पावले तसेच आईचे नाव उषाताई पावले होते. तसेच त्याला एक भाऊ ही राहुल पावले. तो ही त्याच्या गावाच्या टीम मधून क्रिकेट खेळतो. मांगले गाव जरी पूर्वी पासून सधन असले तरी पावले कुटुंबीयांची घरची परिस्थिती हालाखीची होती. छोट्या शेतीत हे पावले कुटुंब कसेबसे गुजराना करत असे. त्यांच्याकडे दुभती जनावरे होती. दूध विक्री करून ते उदरनिर्वाह करत असे. भाऊंना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. पहाटे उजाडल्या नंतर सायंकाळी अंधार पडेपर्यंत फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच असा त्यांचा दिनक्रम असे. त्यामुळे त्यांना खूप बोलणीही खावी लागत असे. परंतु लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्यातच काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्येच पुढे जाण्याचे ठरवले. शालेय जीवनातच त्यांनी आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवण्यास सुरुवात केली होती. गोलंदाजी आणि फलंदाजी ते चांगल्या पद्धतीने करत होते. परंतु ग्रामीण भागातून असल्याकारणाने त्याकाळी त्यांना फारशी संधी मिळाली नाही.  घरची परिस्थिती हालाखीची असल्याकारणाने मिळेल ते काम करून त्यांनी घराला हातभार लावला. पण त्यातही क्रिकेट खेळणे हे सुरू होते. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले. विजय पावले यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून डिफेन्स आणि स्ट्रेटीजिक स्टडीत रिसर्च केला आहे आणि नक्षलवाद व समाज यावर काम केले आहे.

https://www.instagram.com/reel/DJ54046zC9U/?igsh=N2x4ZXR4OGZ0cjE1

लहानपणापासूनच क्रिकेटसाठी काय पण 

विजय पावले यांना लहानपणापासून शिक्षणाबरोबरच क्रिकेट या खेळाची प्रचंड आवडत होती. ही आवड जपण्यासाठी बऱ्याच वेळा त्याला मोल मजुरी सुद्धा करावी लागली. तो शाळा सुटल्यानंतर गावातीलच एका किराणा मनाच्या दुकानात काम करत असेल तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी गवंडीच्या हाताखाली काम करत असे तसेच शेतात मोल मजुरी म्हणजेच मिळेल ते काम करून शिक्षणाबरोबर खेळायची आवड तो जोपासत होता. तसेच आपला स्वतःचा खर्चही भागवत असे.

स्पर्धात्मक क्रिकेट आणि कोकणची साथ 

विजय पावले यांच्या व्यावसायिक क्रिकेटची खऱ्या अर्थाने सुरुवात कोकणच्या मातीतून झाली आहे. लहान वयातच विजय पावले यांचा बहारदार खेळ सर्वांना प्रभावित करत होता. त्यात त्यांना पहिली संधी मिळाली ती कोकणच्या लांजा तालुक्यातील शिपोशी गावातील महाराष्ट्राच्या अंडर 19 समर कॅम्प मार्फत. या संधीचा फायदा उचलत विजय पावलेनी  आपला बहारदार खेळ दाखवून सर्वांना मंत्र मध्ये केले.  पुढे त्यांचा खेळ पाहून उमेश पटवाल सरांनी त्यांना पुण्यात PDPL ( पुणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ) खेळण्यास आमंत्रित केले. परंतु ऑक्शन मध्ये  विजय ला कोणी घेतले नाही. ते थोडेसे निराश झाले. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना एका जखमी खेळाडूच्या बदली संघात घेण्यात येणार होते.  विजय पावले नी कोणताही विचार न करता सरळ पुण्याकडे धाव घेतली. मांगले ते पुणे असा संपूर्ण रात्रीचा प्रवास त्यांनी ट्रक द्वारे केला. शेवटी भुकेने व्याकूळ होऊन ते स्टेडियम जवळच झोपी गेले. ‘खेळाविषयी किती प्रेम  आणि आपुलकी.’ या स्पर्धेत त्यांनी एकूण 16 बळी घेऊन आपली निवड सार्थ असल्याचे सिद्ध करून दाखवले.

विजय पावले यांच्या व्यावसायिक टेनिस क्रिकेटची सुरुवात चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावातील तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे या संघापासून झाली.  त्याकाळी तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे हा खूप मजबूत संघ होता आणि त्यात संजय वाखरे सचिन वाखरे यांच्या साह्याने विजय ला खेळायची संधी मिळाली. त्याकाळी पुण्याची डिंग डॉंग ही टेनिस विश्वातील सर्वोत्तम टीम होती आणि याच टीम बरोबर मंडणगड मध्ये तिरुपती सावर्डे यांची मॅच झाली. ही मॅच डिंगडॉंग टीमने जरी जिंकली असली तरी विजय पावलेने मात्र या मॅच मध्ये सर्वांची मने जिंकली. कारण या मॅच मध्ये विजयने दोन षटकात फक्त 3 धावा देऊन तब्बल 6 बळी मिळवले होते. त्यावेळी या कामगिरीची दखल साऱ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाने घेतली. नंतर विजय काही काळ दौंड संघाकडून खेळले शेवटी त्यांच्या खेळाच्या जोरावर त्यांना डिंगडॉंग च्या संघाने आपल्या संघात बोलावून घेतले. आणि आज ते त्या संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. परंतु आजही ते तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे या संघाला विसरले नाहीत.  कोणतीही मोठी स्पर्धा असो जर तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे हा संघ त्यात असला तर विजय पावले हे त्या संघाकडून हमखास खेळताना आपल्याला दिसतात. माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याने आपले पाय जमिनीवरच ठेवावे याचे हे उत्तम उदाहरण आहे.

RAYGAD KA TIGER : USMAN PATEL BIOGRAPHY

कोकण ते शारजा असा प्रवास :

कोकणातून सुरू झालेला प्रवास विजय पावलेंच्या प्रभावी कामगिरीमुळे दुबई, शारजा, कतार पर्यंत जाऊन पोहोचला होता. एकेकाळी स्थानिक लेवल वर खेळणारे  विजय आंतरराष्ट्रीय खेळाडू झाले.  पुढे शारजा, दुबई येथे होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. त्यांच्या अफलातून कामगिरीमुळे भारताने हा सामना सुद्धा जिंकला. पुढे त्यांना बऱ्याच देशात जसे की कतार, कुवेत, दुबई येथे खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले.

आयपीएल कॅम्प आणि नेट बॉलर :

विजय पावलेनी बॉश कंपनीत क्वालिटी इंजिनियर तर ओपो कंपनीत ट्रेनर म्हणून काही काळ नोकरी केली. परंतु त्यांचे क्रिकेट खेळणे हे चालूच होते. सकाळी नोकरी आणि संध्याकाळी सराव चालूच होता. त्यांच्या करिअरमध्ये सर्वात मोठा ट्रेनिंग पॉईंट म्हणजे आयपीएलचा कॅम्प. त्यांच्यातील गुणवत्ता पाहून रोहन पाटे सरांनी त्यांना मुंबई इंडियन्सच्या कॅम्प मध्ये एज ए नेट बोलर म्हणून पाठवले. तिथे त्यांनी रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांसारख्या दिग्गजांना गोलंदाजी केली शिवाय शोन पोलाक आणि मुनाफ पटेल यांच्याकडून गोलंदाजीचे धडे ही गिरवले. याचा फायदा त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये झाला. कारण आतापर्यंत फक्त जोर जोरात गोलंदाजी करणारा विजय व्हेरिएशन करून अधिक घातक गोलंदाज बनला होता. बॅक ऑफ द हँड स्लॉवर , यॉर्कर आणि डेडली स्पीड यांचा सुरेख संगम साधत त्यांनी भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या.

MPL मधील कामगिरी : 

Vijay Pavale performance in MPL 2024

आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्रातील खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ मिळावे यासाठी MPL म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीगची स्थापना करण्यात आली. या लीग मध्ये 20000 च्या बेस प्राईज वर रत्नागिरी जेट्स संघाने विजय पावले ना आपल्या संघात घेतले. या संधीचा फायदा उचलत विजय पावलेंनी स्पर्धेत 9.41 च्या इकॉनोमीने 7 बळी मिळवले. पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही परंतु अंतिम सामन्यातील विजय पावलेनी केदार जाधवची घेतलेली विकेट मात्र कायम लक्षात राहिली. पॉइंट टेबल मध्ये अव्वल असल्याकारणाने रत्नागिरी जेट्स हा संघ विजेता घोषित करण्यात आला. लेदर क्रिकेटचा फारसा अनुभव नसतानाही उत्तम कामगिरीने विजयने मात्र सर्वांचे मन जिंकले. याचीच पोचपावती की काय त्यांना महाराष्ट्राच्या रणजी संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी 2023 मध्ये झारखंड विरुद्ध पदार्पण केले.

ISPL मधील कामगिरी :

Vijay Pavale got man of the match in ISPL 2024.

आपल्या देशात टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या खूप जास्त आहे. त्यांच्यात टॅलेंटही खूप आहे. परंतु त्यांना एखादे मोठे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. हे BCCI ने  हेरून अशा गुणवान खेळाडूंसाठी ISPL म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ची 2024 मध्ये स्थापना केली. सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, रितिक रोशन,सैफ अली खान, राम चरण यांसारख्या मंडळींनी संघ खरेदी केले. त्यात विजय पावले यांना अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या माझी मुंबई संघाने  आपल्या ताफयात घेतले. ही निवड सार्थ ठरवताना विजयने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर माझी मुंबई संघाला फायनल पर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला.ISPL च्या पहिल्या सीझन मध्ये त्यांनी बेस्ट फिल्डर  (एकूण 15 झेल) हा पुरस्कार पटकावला.  माझी मुंबई हा संघ हा फायनल सामना जिंकू शकला नसला तरी विजय भाऊंची कामगिरी मात्र उल्लेखनीय राहिली.

ISPL सीजन 2 च्या  मुंबई ने विजय पावले साठी RTM  चा वापर केला व त्यांना 13.75 लाख रक्कम मोजून आपल्या टीम मध्ये कायम ठेवले. शिवाय आपल्या टीमचे कर्णधार पदही त्यांना दिले. ही जणू त्यांच्या मागील सीझन मधील कामगिरीची पोचपावती असावी.आपली निवड सार्थ ठरवताना त्यांनी दिमाखदार नेतृत्व शैलीचे प्रदर्शन केले आणि मोक्याच्या क्षणी फायनल मध्ये 9 चेंडूत 22 धावा करून सामना एक हाती फिरवला व आपल्या टीमला चॅम्पियन बनवले. आतापर्यंत विजय पावलेंनी ISPL चे एकूण 19 सामने खेळलेले आहेत त्यात फलंदाजी करताना 109 धावा बनवले असून त्यात त्यांचा स्ट्राइक रेट 155 चा राहिला आहे.  शिवाय गोलंदाजी करताना त्यांनी 11.59 च्या इकॉनोमीने तब्बल  20 बळी ही टिपले आहेत.

वडिलांचे स्वप्न विजयने पूर्ण केले 

लहानपणापासूनच विजयला क्रिकेटची प्रचंड आवड होती. शाळा सूटल्यानंतर विजय हमखास क्रिकेट खेळताना मंगलनाथ विद्यालयाच्या मैदानावर सर्वाना दिसायचा. परंतु काही लोकांना ते बघवत नसे. ते विजयच्या वडिलांना त्याच्याबद्दल नेहमी टोमणे मारत. विजयच्या वडिलांना कधीकधी वाईटही वाटत असे. परंतु आपला विजय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावणार असा ठाम विश्वास त्यांना होता. हे विजयने आपल्या खेळाने वेळोवेळी सार्थ करून दाखवले होते. पण विजयने भारतातील टेनिस क्रिकेट मधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच ISPL जिंकून त्यांच्या वडिलांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केले असे म्हणावे लागेल. तो ज्यावेळी गावात आला त्यावेळी त्याची अख्ख्या गावाने जंगी मिरवणूक काढली. त्याच्यासाठी हे स्वप्नवत होते.परंतु हे सर्व पाहण्यासाठी त्याचे वडील हयात नव्हते. मागच्या जुलै महिन्यात त्यांचे निधन झाले. ते या जगात जरी नसले तरी विजयच्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद हे नेहमीच  राहतील यात शंका नाही.

विजय पावलेचा फिटनेस मंत्र :

https://www.instagram.com/reel/DHwWicqRlid/?igsh=NTNvYndubjZjOTVj

विजय पावले हा सध्याच्या घडीतील टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी आहे.  तसेच फिटनेस बाबतही तो नेहमी जागृत असतो. दस्तरखुद्द सचिन तेंडुलकर यांनी विजय पावले यांच्या फिटनेसचे कौतुक केले आहे तसेच मुनाफ पटेल आणि शॉन पोलॉक या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विजयच्या गोलंदाजी चे कौतुक केले होते.  विजय पावलेनी नवोदित खेळाडूंना फिटनेस चा कानमंत्र दिला आहे.  हा मूलमंत्र जर कोणी दररोज अमलात आणला तर तो खेळाडू  नक्कीच यशस्वी होऊ शकतो असा त्यांचा विश्वास आहे.  त्यांचा फिटनेसचा फंडा पुढील प्रमाणे आहे.

  • खेळाडूंनी योग्य आहार आणि डाएट याची सांगड घालावी .
  • योग्य आणि पुरेसा व्यायाम करावा.
  • सकाळी लवकर उठावे आणि रात्री लवकर झोपावे.
  • सायकलिंग करणे, रनिंग करणे आणि स्प्रिंट मारणे इ.
  • नवोदित गोलंदाजांनी फक्त स्पीडवर लक्ष न देता वेरिएशनवर लक्ष द्यावे. फलंदाजाला ओळखून यॉर्कर , स्लोवर बॉल, बॅक ऑफ  द हॅन्ड ,कटर यांसारखी व्हेरिएशन्स आपल्या गोलंदाजीत आणावीत.
  •   सर्वात महत्त्वाचे गोलंदाजांनी फलंदाजीवरही लक्ष द्यावे.

हे होते सांगली एक्सप्रेस विजय पावले अर्थात आपले विजुभाऊ . घरची परिस्थिती हालाखीची असतानाही मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर सामान्य कुटुंबातील माणूस असामान्य बनू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. आणखी कोणत्या खेळाडूचा जीवनप्रवास आपणास पाहायला आवडेल हे नक्की कळवा आणि आपल्या विजुभाऊ च्या पुढील वाटचालीसाठी त्यांना कमेंट द्वारे भरपूर शुभेच्छा देऊया.

धन्यवाद !.

FAQ –

1) विजय पावले यांची टेनिस क्रिकेट मधील सर्वात आवडती टीम कोणती आहे?

उत्तर – प्रतीक इलेव्हन डिंग डॉंग पुणे आणि तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे.

2) विजय पावलेनी गाजवलेल्या प्रमुख स्पर्धा कोणत्या?

उत्तर –  सुप्रिमो ट्रॉफी, ISPL , T10pl, एम पी एल, नजिमुल्ला ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी.

3) विजय पावलेंची सर्वात आवडती स्पर्धा कोणती?

उत्तर – सुप्रीमो ट्रॉफी ( टेनिस क्रिकेटचे वर्ल्ड कप )

4) २०२५ मध्ये विजय पावले यांना कोणता पुरस्कार मिळाला ?

उत्तर – ऑल राऊंडर ऑफ द इयर ( All Rounder Of the Year.)