ISPL Season 3 Match No. 8 Majhi Mumbai vs Haidrabad 

ISPL Season 3 Match No. 8 Majhi Mumbai vs Haidrabad 

माझी मुंबईच्या गोलंदाजाने जिंकवला पुन्हा एकदा सामना. हैदराबादच्या तोंडातला हिसकावला घास. सामना जिंकला अवघ्या दोन धावांनी ! 

ISPL season 3 : आय एस पी एल सिझन 3 मध्ये सध्या जोरदार असे अटीतटीचे सामने चालू आहेत. त्यातीलच एक सामना आपल्याला काल पाहायला मिळाला. हा सामना माझी मुंबई विरुद्ध फाल्कन रायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना माझी मुंबई संघाने फक्त 64 धावा जमवल्या होत्या. परंतु माझी मुंबईच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करताना हा सामना अवघ्या दोन धावांनी जिंकला. अशा तऱ्हेने माझी मुंबई संघाने जोरदार कमबॅक करताना अंकतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

मुंबईची फलंदाजी पुन्हा ढेपाळली 

प्रथम फलंदाजी करताना माझी मुंबई संघाची सुरुवात निराशा जनक झाली. एका बाजूने एजाज कुरेशीने 6 चेंडू 16 धावा फटकवल्या. परंतु इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. करण अंबाला आजही लवकर बाद झाला. तसेच माझी मुंबईच्या संघाला फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये दहा धावांचे टार्गेट पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शेवटी त्यांचा संघ निर्धारित 10 षटकात केवळ 64 धावा बनवू शकला.

विकी भोईर ने दाखवली पेस पॉवर 

फाल्कन रायझर्स हैदराबादचा प्रमुख गोलंदाज विकी भोईर ने अफलातून गोलंदाजी करताना आपल्या वेगवान गोलंदाजीचा नमुना दाखवला. त्याने आपल्या निर्धारित दोन षटकात फक्त पंधरा धावा खर्चून दोन गडी बाद केले. त्याची आजची गोलंदाजी अत्यंत दर्जेदार राहिली. त्याच्या या घातक पेस अटॅकने मुंबईच्या प्रमुख फलंदाजांना जखडून ठेवण्याचे काम केले.

हैदराबादच्या फलंदाजानीही टाकल्या नांग्या 

65 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली. परंतु प्रशांत घरात व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. प्रशांत घरातने 22 धावांचे योगदान दिले. हैदराबादचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. परंतु शेवटच्या षटकात हा सामना माझी मुंबईच्या बाजूने झुकला.

मयूर वाघमारे स्विंगचा किंग 

यंदाच्या आयएसपीएलमध्ये माझी मुंबईच्या संघाने स्विंग बॉल टाकण्याची जबाबदारी मयूर वाघमारेवर सोपवली आहे. ही जबाबदारी मयूर वाघमारे खूप उत्तमरीत्या पार पाडत आहे. कालच्या सामन्यात त्याने स्विंग बॉल वर गोलंदाजी करताना आपल्या दोन षटकात फक्त सहा धावा खर्च करत एक बळी मिळवला. स्विंग बॉलवर सगळ्यात कमी इकॉनॉमीने रन देणारा गोलंदाज म्हणून मयूर वाघमारे ओळखला जाऊ लागला आहे. यंदाच्या Ispl मध्ये स्विंगचा सुलतान अशी उपाधी स्विंग बॉल मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाला दिली जाणार आहे त्यासाठी मयूर वाघमारे हा प्रमुख दावेदार म्हणून गणला जात आहे.

 माझी मुंबईची बॉलिंग लय भारी 

माझी मुंबईचा संघ हा आय एस पी एल मध्ये खूप तगडा संघ मानला जातो. त्यांची प्रमुख ताकद ही गोलंदाजी आहे. त्याने अनेक सामने आपल्या गोलंदाजांवर जिंकून दिलेले आहेत. कालच्या सामन्यात ही तसेच काहीसे पाहायला मिळाले. माझी मुंबईला फक्त 65 धावांचे लक्ष रोखायचे होते. परंतु त्यांच्या एजाज अहमद ,विजय पावले आणि करण अंबाला या प्रमुख गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांना जखडून ठेवले. शेवटी सामन्यात हैदराबादचा संघ सहज विजय मिळवेल असे वाटले होते. कारण त्यांना तीन षटकांत फक्त 26 धावांची गरज होती. फलंदाजीला त्यांचे प्रमुख फलंदाज श्रेयश कदम आणि नितीन माटुंगे हे दोन पावर हीटर होते. परंतु आठव्या षटकात करण अंबाला ने फक्त सहा च धावा दिल्या . तर नवव्या षटकात विजय पावलेने तेरा धावा दिल्या खऱ्या परंतु नितीन माटुंगे सारख्या फलंदाजाची विकेट हि घेतली. शेवटी करण अंबाला ने अप्रतिम गोलंदाजी करताना शेवटच्या षटकात आठ धावांचा बचाव करताना सामना दोन धावांनी जिंकवून दिला.

लास्ट ओव्हर ड्रामा 

शेवटच्या षटकात हैदराबादला जिंकण्यासाठी फक्त आठ धावांची गरज होती. श्रेयश कदम आणि संस्कार ध्यानी हे दोन फलंदाज क्रिजवर होते. परंतु खांद्याची दुखापत असून सुद्धा करण अंबाला ने यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यात यशस्वी झाला. त्याने सगळे बॉल यॉर्कर टाकत श्रेयश कदमला चकवले. परंतु एजाज कुरेशीने त्याचा सोपा देईल सोडला. पण याचा करण अंबाला वर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने संस्कार ध्यानीला शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद करत सामना आपल्या बाजूला झुकवला. शेवटच्या बॉलवर चार धावांची गरज असताना करण अंबालाने सटीक यॉर्कर टाकत  सामना जिंकून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी करण अंबाला ला ‘गली टू ग्लोरी अवार्ड’ देवून सन्मानित करण्यात आले.

ISPL च्या इतिहासातील पहिला फायफर. करण अंबाला ने रचला इतिहास.

ISPL च्या इतिहासातील पहिला फायफर. करण अंबाला ने रचला इतिहास.

आयएसपीएल सीझन तीन मध्ये माझी मुंबई संघ आणि अहमदाबाद लायन्स यांच्यात एक रोमांचक सामना झाला. या सामन्यात माझी मुंबई संघाने 27 धावांनी विजय मिळवला. परंतु या विजयाचा खरा हिरो ठरला तो माझी मुंबई संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अभिषेक कुमार दलहोर म्हणजेच करण अंबाला. करण अंबालाने आयएसपीलच्या इतिहासातील पहिला फायफर  म्हणजेच एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याच्या या भीम पराक्रमामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाला.

करन अंबाला ने घेतले एका सामन्यात पाच बळी

आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी फक्त विकी भोईर ने एका सामन्यात चार बळी घेतले होते. परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाने एकाच सामन्यात पाच बळी घेतले नव्हते. परंतु आजच्या सामन्यात करन अंबाला ने सर्व विक्रम मोडून काढत त्याच्या दोन षटकात फक्त तीन धावा देऊन तब्बल पाच बळी मिळवले. आय एस पी च्या इतिहासातील एकाच सामन्यात पाच बळी मिळवणारा तो एकमेव गोलंदाज बनला आहे.Ispl Season 3 Match 1 : Majhi Mumbai vs Shrinagar ke Veer

माझी मुंबई संघाने 27 धावांनी जिंकला सामना

माझी मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना दहा षटकात 90 धावा बनवल्या होत्या. 91 धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला फक्त 64 धावा जमवता आल्या. अशा रीतीने मुंबई संघाने हा सामना 27 धावांनी जिंकत अंकतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला.

दर्शन बांदेकर ची बेधडक फलंदाजी

मूळचा कोकणातून आलेला आणि सध्या माझी मुंबई संघाकडून पदार्पण करणारा दर्शन बांदेकर ने आज आपल्या मजबूत फलंदाजीचा नमुना सादर केला. दर्शन बांदेकर ने फक्त 14 चेंडूत 28 धावांची आतिशबाजी केली . त्यात त्याने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये 1 चौकार 1 षटकार आणि 1 नवकार अशा एकूण 18 धावा वसूल केल्या. त्यामुळे माझी मुंबई संघाला अधिकच्या नऊ धावा अश्या एकूण या षटकात 27 धावा मिळाल्या. त्यामुळे माझी मुंबई संघाने दहा षटकात 90 धावांचा पल्ला गाठला.

विजय पावले चे महत्वाचे योगदान

माझी मुंबईचा शांत आणि संयमी कर्णधार विजय पावले हा आपल्या टीम साठी नेहमी महत्त्वाचे योगदान देत असतो. आज विजय पावले ने आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले आहे. अहमदाबाद लायन्स कडून विजय पावलेला फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये चॅलेंज करण्यात आले. परंतु विजय पावलेने या षटकात एक विकेट घेताना फक्त चारच धावा दिल्या. त्यामुळे अहमदाबाद लायन्स या संघाला दहा धावांचे टार्गेट पूर्ण करता आले नाही. शिवाय त्यांना दोन धावांची पेनल्टी ही लागली. विजय पावल्याने आपल्या दोन षटकात 13 धावा देऊन तीन बळी घेतले शिवाय फलंदाजीत ही योगदान दिले. फील्डिंग करताना सुंदर कॅच ही पकडला.

करन अंबाला ने इतिहास घडवला

करण अंबाला हा आयएसपीएलच्या इतिहासातील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. मागील दोन सीझन मधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. सीजन दोन मध्ये तो मॅन ऑफ द सिरीज ही होता. परंतु या सीझनमध्ये फलंदाजीत त्याने आतापर्यंत साजेशी कामगिरी केलेली नाही. पण आजच्या सामन्यात त्याने 9 चेंडूत 14 धावांची खेळी केली. पण आजच्या सामन्यात चमकला तो त्याच्या गोलंदाजीमुळे . आजच्या सामन्यात त्याने आपल्या दोन षटकात फक्त तीन धावा देऊन पाच बळी घेतले. आयएसपीएलच्या इतिहासातील एखाद्या गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाला.

ISPL Season 3 Match No.3 : चेन्नई सिंघमची दमदार सुरुवात. कोलकत्ता विरुद्ध 44 धावांनी जिंकला सामना. 

ISPL Season 3 Match No.3 : चेन्नई सिंघमची दमदार सुरुवात. कोलकत्ता विरुद्ध 44 धावांनी जिंकला सामना. 

ISPL 2026 मधील तिसरा सामना हा चेन्नई सिंघम आणि टायगर्स ऑफ कलकत्ता यांच्या दरम्यान खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई सिंघम ने तब्बल 44 धावांनी विजय मिळवला. Ispl Season 3 Match 1 : Majhi Mumbai vs Shrinagar ke Veer

चेन्नई सिंघम ने केली शंभरी पार 

चेन्नई सिंघम हा संघ यावर्षीचा निर्धारित 10 षटकात शंभर धावा पूर्ण करणारा पहिला संघ ठरला आहे. चेन्नई सिंघमने आपल्या दहा षटकात आठ गडी गमावून 102 धावा बनवल्या होत्या. चेन्नई सिंघम तर्फे सरफराज खान ने 24 चेंडूत 4 चौकार 1 षटकार आणि 1 नवकार अशा एकूण 45 धावा कुठल्या. शेवटी संभाजी पाटील म्हणजेच बबलू पाटील यांनी दोन षटकार खेचून चेन्नई सिंघम ला शंभरी पार करून दिले.

सरफराज खान चमकला 

सरफराज खान

चेन्नई सिंघम तर्फे बाहुबली सरफराज खानला यावेळी पहिल्याच मॅचमध्ये वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले गेले. याचा पुरेपूर फायदा घेताना सर्फराज खानने दमदार फलंदाजी केली. सुरुवातीला सावधपणे खेळणाऱ्या सर्फराज ने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये भावेश पवार विरुद्ध 27 धावा बनवले. त्यात दोन चौकार एक षटकार आणि एक नवकार यांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे चेन्नई सिंघमने दहा षटकात 102 धावा बनवले. त्याच्या या खेळीमुळे सरफराज खान ला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

भावेश पवार ने दिल्या एकावर ओवर मध्ये 40 धावा 

चेन्नई सिंघमने फिफ्टी-फिफ्टी ओवर साठी लेफ्ट आर्म गोलंदाज भावेश पवार याची निवड केली होती. सातव्या षटकात फिफ्टी-फिफ्टी ओवर टाकण्यासाठी आलेल्या भावेश पवारने पहिला चेंडू सुंदर टाकला होता. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती. परंतु सरफराज खान ज्यावेळी फलंदाजीसाठी आला त्याने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्याने पुढील पाच चेंडूत तब्बल 27 धावा कुटल्या. त्यात एक षटकार दोन चौकार आणि एक नवकार यांचा समावेश होता. चेन्नई सिंघमने या षटकात तब्बल 27 धावा बनवल्या. शिवाय त्यात 13 धावांची भर पडून या षटकात तब्बल 40 धावा चेन्नई सिंघम ला मिळाल्या

विवेक शेलार ठरला कोलकत्याचा हिरो 

एकीकडे चेन्नई ने कोलकात्याच्या सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. परंतु त्यांचा प्रमुख गोलंदाज विवेक शेलार यांने उत्तम गोलंदाजी करताना आपल्या दोन षटकात 15 धावा खर्च करून तीन बळी मिळवले. शिवाय एक उत्कृष्ट कॅच ही पकडला. या कॅच साठी त्याला बेस्ट कॅच ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला.

कोलकात्याचे फलंदाज फेल 

10 षटकात 103 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजानी सपशेल नांग्या टाकल्या. त्यांनी आपल्या दहा षटकात फक्त 56 धावाच बनवल्या. त्यांचे बहुतेक प्रमुख फलंदाज या सामन्यात लयीत खेळताना दिसली नाहीत. सागर अली आणि सरोज परमानिक सारखे फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे टायगर ऑफ कोलकाता ने हा सामना तब्बल 44 धावांनी गमावला.

फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये ठरले विजयाचे अंतर 

ISPL मध्ये फिफ्टी-फिफ्टी ओवर हा गेम चेंजर म्हणून ओळखला जातो. याचाच उत्तम नमुना या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे सरफराज खानच्या बहारदार खेळीमुळे फिफ्टी फिफ्टी ओवर मध्ये चेन्नई ने 27 प्लस 13 अशा एकूण 40 धावा बनवल्या. तर दुसरीकडे कोलकत्ता ने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये फक्त 6 च धावा बनवल्या. त्यामुळे त्यांच्या 3 धावा कमी झाल्या. त्यामुळे फिफ्टी-फिफ्टी ओवर हे या मॅच मध्ये चेन्नईच्या विजयाचे कारण बनले.

Ispl Season 3 Match 1 : Majhi Mumbai vs Shrinagar ke Veer

Ispl Season 3 Match 1 : Majhi Mumbai vs Shrinagar ke Veer माझी मुंबई ठरला श्रीनगर वर भारी. केला अवघ्या 60 धावांचा बचाव. पहिला सामना जिंकला 13 धावांनी. 

Ispl 2026 तिसऱ्या पर्वाची एकदम दिमाखात सुरुवात झाली आहे. काल खेळल्या गेलेल्या माझी मुंबई आणि श्रीनगर के वीर या मागील finalist संघामध्ये माझी मुंबई संघाने बाजी मारताना जोखात सुरुवात केली. माझी मुंबई संघाने 10 षटकात फक्त 59 धावा केल्या होत्या. परंतु त्यांच्या गोलंदाजांनी आणि फिल्डर्स नी उत्तम कामगिरी करताना सामना आपल्या बाजूने वळवला.

टीम मालकांनी केला टॉस – 

Ispl च्या तिसऱ्या पर्वात एक अनोखी घटना घडली. कारण अमुमन आपण संघाच्या कॅप्टन ला टॉस उडवताना पाहतो पण यावेळी मैदानावर टीम च्या मालकांनी टॉस उडवला. त्याचे झाले असे की , माझी मुंबई चे मालक अमिताभ बच्चन आणि श्रीनगर के वीर चे मालक यांच्यात टीप – ट्याप पद्धतीने टॉस झाला त्यावेळी अक्षय कुमार यांनी म्हणजेच श्रीनगर के वीर संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

Ispl season 3 Auction 2025 : मराठमोळा विजय पावले ठरला Ispl मधील सर्वात महागडा खेळाडू.

प्रज्योत अंबिरे ठरला श्रीनगर चा हिरो 

टॉस जिंकून श्रीनगर के वीर ने प्रथम फिल्डिग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना प्रज्योत अंबीरे ने पहिल्याच ओवर मध्ये फक्त 8 धावा देवून 2 महत्त्वाचे बळी टिपले. तर संपूर्ण सामन्यात त्याने 2 ओवर मध्ये 11 धावा देवून 3 महत्त्व पूर्ण बळी मिळवले. त्याला मिनाद मांजरेकर आणि राजू मुखिया यांनी सुरेख साथ दिली. मांजरेकर ने स्विंग बॉल टाकताना 2 ओवर मध्ये फक्त 9 धावा देवून 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले तर राजू मुखीया ने 2 षटकात फक्त 6 धावा देवून 2 बळी घेतले.या तिघांच्या अप्रतिम कामगिरी मुळे माझी मुंबई चा संघ फक्त 59 धावांवर ऑल आऊट झाला.

स्विंग बॉल ओवर – 

श्रीनगर के वीर या संघाकडून स्विंग बॉल चे ओवर टाकण्याची जबाबदारी मिनाद मांजरेकर याच्यावर सोपवण्यात आली. मीनाद मांजरेकर हा एक लेदर बॉल चा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला बॉल स्विंग करण्याची कला अवगत आहे. त्याचा पुरेपूर वापर करत त्याने प्रथम करण अंबाला याला क्लीन बोल्ड केले त्यानंतर त्याने थॉमस डायस याला क्लीन बोल्ड केले.

50 – 50 ओवर 

माझी मुंबई संघाने 50 – 50 ओवर साठी धनंजय भिंताडे याची निवड केली. पण धनंजय ने दुसऱ्या बॉल वर बंटी पटेल याला झेलबाद केले. त्याने आपल्या पहिल्या 5 बॉल वर फक्त 7 धावा खर्च केल्या. पण शेवटच्या बॉल वर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या दर्शन बांदेकर ने अप्रतिम सिक्स मारून 50 – 50 ओवर माझी मुंबई च्या नावे केली. त्यामुळे माझी मुंबई ला अतिरिक्त सहा धावांचा बोनस मिळाला.

काय आहे फिफ्टी-फिफ्टी ओवर ? 

ISPL च्या पूर्वीच्या दोन हंगामात फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला 16 धावांचे लक्ष दिले जायचे परंतु यंदाच्या हंगामात हा नियम थोडासा शिथिल करून 10 धावांचे लक्ष फलंदाजी करणाऱ्या संघाला दिले गेले आहे. जर का प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 10 धावांचे लक्ष त्या ओवर मध्ये पूर्ण केले आणि जर 10 पेक्षा जास्त किती धावा झाल्या तरी झालेल्या धावांच्या निम्म्या धावा त्या संघाला बोनस म्हणून दिल्या जातील. आणि जर त्या फलंदाजी करणाऱ्या संघाने 10 धावा काढल्या नाहीत तर जेवढ्या धावा काढल्या जातील तेवढ्या धावांच्या निम्म्या धावा त्या संघाच्या त्या ओवर मध्ये कमी होतील. उदाहरण देऊन सांगायचे झाले तर, समजा एका संघाने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये 16 धावा जमवल्या तर त्या संघाला 16 + 8 अशा एकूण 24 धावा मिळतील. एका संघाने त्यावर मध्ये फक्त 8 धावा केल्या तर त्या संघाच्या 8 – 4 अशा एकूण 4 धावा बनवल्या गेलेल्या स्कोर मधून कापल्या जातील. Ispl Season 3 Match Fixtures

माझी मुंबई ने बनवला फक्त 59 धावा 

Majhi Mumbai vs Shrinagar ke Veer

ISPL मध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून माझी मुंबई हा संघ ओळखला जातो. परंतु ISPL  च्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात या संघासाठी खूप निराशाजनक झाली. कारण आपल्या निर्धारित 10 ओवर मध्ये या संघाने फक्त 59 धावा बनवल्या. या संघातील महत्त्वाचे फलंदाज खूप लवकर बाद झाल्यामुळे माझी मुंबई संघाला फक्त 59 धावांपर्यंत मजल मारता आली.

श्रीनगर के वीर संघाची दमदार सुरुवात 

60 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीनगर के वीर या संघाची सुरुवात दमदार झाली. कारण या संघाने पहिल्या तीन ओवर मध्ये च 30 धावा फटकावल्या. हा संघ हा सामना आरामात जिंकणार असे दिसू लागले होते.

माझी मुंबई संघाचा शानदार कम बॅक 

या संघाने आपल्या तीन ओवर मध्ये 30 धावा फटकावून सामना जिंकण्याचे दृष्टीने पाऊल उचलले परंतु माझी मुंबईच्या ऐजाज आणि जीशान या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्या निर्धारित 2 ओव्हर मध्ये 9 धावा खर्चून दोन – दोन बळी मिळवले. त्यांना कर्णधार विजय पावलेने सुद्धा 1.4 ओवर मध्ये 10 धावा देवून 2 बळी घेत उत्तम साथ दिली. त्यामुळे माझी मुंबई ने हा सामना 13 धावांनी जिंकला.

माझी मुंबईची फील्डिंग भारी 

माझी मुंबई ने हा सामना खऱ्या अर्थाने गोलंदाजी आणि फिल्डिंग ने जिंकला. कारण माझी मुंबई संघातील प्रत्येक खेळाडूने जीव ओतून फिल्डिंग करताना बरेच अप्रतिम झेल घेतले शिवाय दोन-तीन खेळाडूंना धावबाद केले. त्यामुळे माझी मुंबई संघाने हा सामना 13 धावांनी जिंकून आपल्या अभियानाची सुरुवात केली.

 

Vaibhav Suryavanshi Records In 2025

क्रिकेटच्या मैदानावर 14 वर्षांच्या पोराचं वादळ! 2025 मध्ये गाजला फक्त वैभव सूर्यवंशी; वाचा त्याने केलेले सर्व रेकॉर्ड्स आणि बरेच काही.

Vaibhav Suryavanshi Records In 2025: वैभव सूर्यवंशीने 2025 हे वर्ष खऱ्या अर्थाने गाजवले. वयाच्या 14 व्या वर्षी पोरगं शाळेत असतं आणि मजा मस्ती करत शाळा शिकत असतं. पण या 14 वर्षाच्या पोराने मात्र क्रिकेटच्या मैदानावर भल्या भल्यांना घाम सोडायला लावले आहे. जाणून घ्या त्याने या वर्षात केलेले सर्व रेकॉर्ड्स.

Vaibhav Suryavanshi record in 2025

vaibhav suryavanshi

 गूगल सर्च मध्ये राहिला नंबर वन ! 

वैभव सूर्यवंशी, हे नाव २०२५ मध्ये तुफान चर्चेत राहिलं. वर्तमानपत्र, टीव्ही किंवा सोशल मीडिया, पाहाल तिथे वैभव सूर्यवंशीच झळकत होता. क्रिकेटचं मैदान असो की गुगल सर्च, वैभव पहिल्या क्रमांकावर टिकून राहिला. कोणीतरी १४ वर्षांचा पोरगा आहे, खूप मोठे फटके मारतो. हा पोरगा आहे तरी कोण? हे शोधून काढण्यासाठी लोकांनी गुगलवर भरभरून सर्च केलं. गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत तो भारतात पहिला, तर जगात सहाव्या क्रमांकावर राहिला. वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएल पदार्पण करून वेगवान शतक झळकावून दणक्यात सुरूवात करणाऱ्या वैभवने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १९० धावांची खेळी करून वर्षाचा शेवट केला आहे. दरम्यान वाचा वैभवने २०२५ या वर्षात कोणते कोणते विक्रम केले आहेत. ते आपल्याला पुढे दिले आहेत.

Vaibhav Suryavanshi Records in 2025 : 

बिहारकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीला आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात स्थान दिलं. राजस्थानने त्याच्यावर १.१ कोटींची विक्रमी बोली लावली व आपल्या संघात घेतले होते. या संधीचे सोने करत वैभव सूर्यवंशी ने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

1)वयाच्या १३ व्या वर्षी लिलावात बोली लागणारा आणि वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएल स्पर्धेत पदार्पण करणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला होता.

2)आयपीएल पदार्पण मध्ये पहिल्याच चेंडूवर त्याने खणखणीत षटकार खेचला होता. यासह तो आयपीएलच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा सर्वात युवा फलंदाज ठरला होता.

3) त्यानंतर गुजरात टायटन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात वैभवने कहरच केला. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने अवघ्या 35 चेंडूत वेगवान शतक झळकावले होते. यासह या स्पर्धेत वेगवान शतक झळकावणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला होता.याआधी भारताचा माजी फलंदाज यूसूफ पठाणच्या नावे देखील 35 चेंडूत शतक झळकावण्याची नोंद होती. तर सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 30 चेंडूत शतक झळकावले होते.

Ispl season 3 Auction 2025 : मराठमोळा विजय पावले ठरला Ispl मधील सर्वात महागडा खेळाडू.

4) या खेळीदरम्यान वैभवने 11 षटकार खेचले होते.यासह त्याने एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुरली विजयच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

5) वैभवने अंडर 19 आशिया कप स्पर्धेत फलंदाजी करताना एकूण 20 षटकार मारले. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसचा विक्रम मोडून काढला.

6) तो एकाच बहूराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज ठरला. यूएईविरूद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने 95 चेंडूंचा सामना करत त्याने 171 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने 14 खणखणीत षटकार मारले होते.

7) यासह अंडर-19 आशिया कप स्पर्धेत तो 20 षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला.

8) विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये वैभव सूर्यवंशी ने शतक झळकावत लिस्ट ए क्रिकेट स्पर्धेत  शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

 

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीचा पहिलाच दिवस ठरला रेकॉर्ड ब्रेकिंग! याआधी असं कधीच घडलं नव्हतं

वैभव विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बिहार संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. अरूणाचल संघाविरूद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने 84 चेंडूत 190 धावांची खेळी केली. यासह तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. या खेळीदरम्यान त्याने 15 षटकार मारले.

मूर्ती लहान पण कीर्ती महान 

वैभव सूर्यवंशी हा आता फक्त 14 वर्षाचा आहे. या वयातच त्याने अनेक किर्तीमान आपल्या नावावर केले आहेत. कमीतकमी चेंडूत जास्तीत जास्त धावा बनवण्याचे ध्येय मनाशी बाळगून फलंदाजी करणाऱ्या या वैभव सूर्यवंशी चे भविष्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही. पूर्वीच्या काळी वीरेंद्र सेहवाग आणि ॲडम गिलख्रिस्ट, ख्रिस गेल सारखेच फलंदाज आक्रमक खेळी साठी प्रसिद्ध होते. पण आताच्या फास्ट क्रिकेट च्या जमान्यात वैभव ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्याचा विचार करूनच बीसीसीआयने त्याच्यावर under – 19 World Cup च्या आधीच त्याच्यावर कॅप्टन शिप ची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. 2025 मध्ये ज्याप्रकारे त्याने अफलातून खेळ दाखवला त्याच प्रमाणे पुढेही आपल्याला त्याचा हा खेळ दाखवेल अशीच अपेक्षा करूया.

Most Expensive Uncapped Indian Player  in Ipl Auction Prashant veer.

Most Expensive Uncapped Indian Player  in IPL Auction Prashant Veer. ‌

Most Expensive Uncapped Indian Player in IPL Auction Prashant Veer


Who is Prashant Veer : आयपीएल 2026 चे मिनी ऑक्शन 16 डिसेंबर 2025 रोजी झाले. या 2026 च्या लिलावात उत्तर प्रदेशच्या एका खेळाडूचे नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. चेन्नईने त्याच्यावर 14.2 कोटींची बोली लावल्याने सगळेच थक्क झाले आहेत. यंदाच्या मिनी ऑक्शनमध्ये उत्तर प्रदेशच्या एका तरुण अष्टपैलू खेळाडूने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. केवळ 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजसह लिलावात उतरलेल्या प्रशांत वीर नावाच्या खेळाडूवर चेन्नई सुपर किंग्सने थेट 14.20 कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला संघात सामील करून घेतले. या एका बोलीमुळे प्रशांत वीर चर्चेत आला आहे. एवढंच नाही तर तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ही ठरला आहे. उत्तर प्रदेशच्या या अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडूने लिलावात असा काही धुमाकूळ घातला की, मागील सर्व विक्रम मोडीत निघाले. १४.२० कोटी रुपयांची विक्रमी बोली लावत चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.प्रशांत वीरची मूळ किंमत अवघी ३० लाख रुपये होती. मात्र, त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे फ्रँचायझींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली.

Ispl Season 3 Match Fixtures

प्रशांत वीर साठी पाच संघांमध्ये रंगली चुरस

प्रशांत वीरसाठीची बोली लखनऊ सुपर जायंट्सने सुरू केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने आक्रमक पवित्रा घेत बोली 1.10 कोटी रुपयांपर्यंत नेली. मुंबईने माघार घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स मैदानात उतरली आणि प्रशांतची बोली 4 कोटी रुपयांपर्यंत नेली. यानंतर लखनऊ ने पावले मागे घेतली, पण राजस्थान राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई यांच्यात जोरदार चढाओढ सुरू झाली. 6.40 कोटी रुपयांवर राजस्थान बाहेर पडला. त्यानंतर सनराइजर्स हैदराबादची एंट्री झाली. हैदराबाद आणि चेन्नई यांच्यातील दीर्घ लढतीनंतर अखेर 14.20 कोटी रुपयांवर सीएसकेने बाजी मारली. केवळ 20 वर्षांचा असलेला प्रशांत वीर उत्तर प्रदेशकडून खेळतो. छोट्याशा कारकिर्दीत त्याने स्फोटक फलंदाजी आणि डावखुर्‍या फिरकी गोलंदाजीचा प्रभावी संगम दाखवला आहे. त्याची ओळख एक आक्रमक ऑलराउंडर म्हणून झाली असून मधल्या फळीत सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. याच अष्टपैलू गुणांमुळे मोठ्या आयपीएलमधील पाच संघांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि कोट्यवधी रुपयांची बोली लावली.

का लागली एवढी मोठी बोली ?

प्रशांत वीर हा आता केवळ 20 वर्षाचा असून तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. छोट्याशा कारकिर्दीत त्याने स्फोटक फलंदाजी आणि डावखुर्‍या फिरकी गोलंदाजीने सर्वांना  प्रभावीत केले आहे. त्याची ओळख एक आक्रमक ऑलराउंडर म्हणून झाली असून मधल्या फळीत सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.प्रशांत वीर ने घरगुती क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ७ सामन्यांत ११२ धावा आणि ९ महत्त्वाचे बळी घेतले होते. त्याचसोबत उत्तर प्रदेश टी२० लीग येथे प्रशांत खऱ्या अर्थाने चमकला. त्याने ३२० धावा कुटल्या आणि ८ बळीही घेतले. तो त्याच्या ‘पॉवर हिटिंग’ आणि चेंडू स्विंग करण्याच्या कौशल्यासाठी ओळखला जातो.

यूपी टी 20 लीग आणि U 23 स्टेट ए  ट्रॉफी मध्ये वर्चस्व

उत्तर प्रदेश टी 20 लीग 2025 मध्ये प्रशांत वीर ला ‘एमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन’ म्हणून गौरवण्यात आले. नोएडा सुपर किंग्सकडून खेळताना त्याने 10 डावांमध्ये 64.00 च्या सरासरीने आणि 155.34 च्या स्ट्राइक रेटने 320 धावा केल्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश होता. गोलंदाजीतही त्याने 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय पुरुषांच्या U-23 स्टेट ए ट्रॉफीत तो ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला. या स्पर्धेत त्याने 7 सामन्यांत 94.00 च्या सरासरीने 376 धावा आणि 18 विकेट्स घेतल्या.

IPL ऑक्शनच्या इतिहासातील सर्वाधिक किमतीचे अनकॅप्ड खेळाडू 

प्रशांत वीर – चेन्नई सुपर किंग्ज – ₹14.20 कोटी (2025)

कार्तिक शर्मा – चेन्नई सुपर किंग्ज – ₹14.20 कोटी (2025)

आवेश खान – लखनऊ सुपर जायंट्स – ₹10 कोटी (2022)

कृष्णप्पा गौतम – चेन्नई सुपर किंग्ज – ₹9.25 कोटी (2021)

शाहरुख खान – पंजाब किंग्ज – ₹9 कोटी (2022)

राहुल तेवतिया – गुजरात टायटन्स – ₹9 कोटी (2022)

कृणाल पांड्या – मुंबई इंडियन्स – ₹8.80 कोटी (2018)

आकिब नबी – दिल्ली कॅपिटल्स – ₹8.40 कोटी (2025)

 

वरुण चक्रवर्ती – किंग्स इलेव्हन पंजाब – ₹8.40 कोटी (2019 )

प्रशांत वीर चा आदर्श आहे युवराज सिंग.

प्रशांत हा डावखुरा फलंदाज असून भारताचा महान अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा त्याचा आदर्श आहे. मैदानात तो अनेकदा युवीच्या शैलीची नक्कल करताना दिसतो.

CSK ची रणनीती आणि अपेक्षा

चेन्नई सुपर किंग्स नेहमीच अशा युवा खेळाडूंवर गुंतवणूक करते जे भविष्यात ‘मॅच विनर’ ठरू शकतात. यापूर्वी ते आपल्या संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश करत आले होते. परंतु यावर्षी पासून त्यांनी भविष्याचा विचार करून संघ बांधणीला सुरुवात केली आहे.त्यामुळेच तर त्यांनी नवख्या खेळाडूंवर प्रचंड पैसा खर्च केला आहे. १४.२० कोटींची प्रचंड रक्कम ही प्रशांतवरील विश्वासाचे प्रतीक आहे. आता धोनीच्या छत्रछायेखाली या २० वर्षीय हिऱ्याला पैलू पाडले जाणार असून, आगामी हंगामात तो ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो.

रवींद्र जडेजा ची रिप्लेसमेंट ठरू शकेल का ? 

प्रशांत वीर हा रवींद्र जडेजा सारखाच डावखुरा फलंदाज आहे. शिवाय तो उत्तमरीत्या ऑफ स्पिन गोलंदाजी ही करतो. शिवाय तो चपळ क्षेत्ररक्षक ही आहे. या सर्व गुणांचा विचार करता सी एस के ने रवींद्र जडेजा ची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसून येते. पण हे आपल्याला मैदानावरच प्रशांत वीरच्या कामगिरीने पाहता येईल.

प्रशांत वीर काय म्हणाला ?

“चेन्नईने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणे हेच माझे आता एकमेव ध्येय आहे. माही भाईंकडून शिकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” उत्तर प्रदेशातील बुलंदशहर सारख्या छोट्या शहरातून आलेल्या प्रशांतसाठी हा प्रवास स्वप्नवत आहे. “मला एकदा तरी धोनी सरांसोबत खेळायला मिळावे,” अशी इच्छा प्रशांतने एका मुलाखतीत व्यक्त केली होती. आता तो केवळ त्यांच्यासोबत खेळणारच नाही, तर त्यांच्याच नेतृत्वाखाली आयपीएल पदार्पण करेल.

FAQ –

1) प्रशांत वीर चे गाव कोणते ?

उत्तर – यूपी मधील बुलंद शहर.

2) प्रशांत वीर वर किती कोटी ची बोली लागली ?

उत्तर – 14.20 कोटी ( csk )

3) प्रशांत वीर सोबत csk ने कोणाला 14.20 कोटीला खरेदी केले ?

उत्तर – कार्तिक शर्मा .

 

BCCI Announced India’s Squad For 2026 ICC Men’s T20 World Cup

BCCI Announced India’s Squad For 2026 ICC Men’s T20 World Cup : भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या ICC टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने शनिवारी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली.

7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत-श्रीलंकेतील मैदानात टी- 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिके सह टी- 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली.

Ispl Season 3 Match Fixtures

मुंबई त पार पडली सभा 

Selection committee

संघ निवडीची घोषणा करण्यासाठी BCCI च्या मुंबईतील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या उपस्थितीत बीसीसीयचे संयुक्त सचिव देवजीत सैकिया यांनी संघाची घोषणा केली. शुभमन गिलचा पत्ता कट झाला असून अक्षर पटेलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय ईशान किशनलाही संघात स्थान देण्यात आले आहे.गेल्या काही काळापासून भारतीय टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग आणि उपकर्णधार असलेला शुभमन गिलला 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही.गिलला संघातून बाहेर काढल्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे, परंतु त्याचे खराब प्रदर्शन हे यामागचे मुख्य कारण मानले जात आहे.

शुभमन गिल ला खराब फॉर्म मुळे वगळले 

शुभमन गिलसाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन टी – 20 मालिका अत्यंत निराशाजनक ठरल्या. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 5 सामन्यांत फक्त 132 धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांत केवळ 32 धावा केल्या आहेत. सलग फ्लॉप ठरत असल्यामुळे निवड समितीने त्याला डच्चू देण्याचा कडक निर्णय घेतला. गिल उपकर्णधार असल्यामुळे त्याला संघातून काढले जाणार नाही असा अंदाज होता, मात्र बीसीसीआयने (BCCI) गुणवत्तेला प्राधान्य देत घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

कोणाचा झाला पत्ता कट ? 

संघातील इतर खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास, उपकर्णधार शुभमन गिलवर पण टांगती तलवार होती. त्यालाही या वर्षात टी20 आंतरराष्ट्रीयत एकही अर्धशतक करता आलेले नाही. त्याच्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग-11 बाहेर बसावे लागले, तर यशस्वी जैस्वालला तर स्क्वॉडमध्येही जागा मिळत नाहीये. त्यामुळे टी – 20 वर्ल्ड कप चे स्कोड मधून त्याचे नाव वगळण्यात आले आहे. त्याच्याबरोबर यशस्वी जयस्वाल ला ही बेंचवर बसवण्यात आले आहे. मात्र संजू सॅमसन आणि सध्या तुफान फॉर्म मध्ये असलेल्या ईशान किशन ला संघात स्थान देण्यात आले आहे.

सोशल मीडियात बरीच तर्क -वितर्क लावण्यात आले 

सोशल मीडिया मध्ये भारतीय संघावर बरेच तर्क-वितर्क लावण्यात आले होते. जसे की, सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवले जाईल का? निवड समिती काही धक्कादायक निर्णय घेणार का? हार्दिक पांड्याला पुन्हा नेतृत्वाची संधी मिळणार का, ज्याने या मालिकेत बॅट आणि बॉल दोन्हीने जबरदस्त पुनरागमन केले ? किंवा शुभमन गिल आहे तसा संघात निवडला जाईल असे बरेच विचार मांडण्यात आले होते. परंतु या सर्व विचारांना बाजूला ठेवून अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1:30 च्या सुमारास मुंबई येथे भारतीय संघाची टी -20 वर्ल्ड कप साठी 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली. तसेच सूर्य कुमार यादव यालाच कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.

राखीव खेळाडूंशिवाय टीम इंडियाची घोषणा

बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघ बांधणीसाठी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजित साकिया यांनी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. यावेळी देवजित साकिया यांनी राखीव खेळाडूंची निवड न करण्यामागचं कारणही स्पष्ट केले आहे.2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलसह रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान हे राखीव खेळाडूच्या रुपात होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांचे नाव राखीव खेळाडूंच्या यादीत होते. पण यावेळी भारतीय संघाने राखीव खेळाडूंशिवायच भारतीय संघाची घोषणा केली. यासंदर्भात देवजित साकिया म्हणाले की, टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा ही घरच्या मैदानातच खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे राखीव खेळाडूंची नावे आता जाहीर करण्याची गरज नाही. आयसीसी स्पर्धा जर परदेशात असेल तर त्यांना आयत्या वेळी तिकडे पाठवणे शक्य नसते. त्यामुळे आधीच राखीव खेळाडूसंदर्भात माहिती दिली जाते. आगामी स्पर्धेत गरज पडल्यास त्यावेळी बदली खेळाडूच्या रुपात योग्य तो निर्णय घेतला जाईल.

ICC टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ –



कप्तान: सूर्यकुमार यादव 

उपकप्तान: अक्षर पटेल 

विकेटकीपर: 1)संजू सॅमसन

                    2)ईशान किशन

बॅट्समन

1) अभिषेक शर्मा 

2) तिलक वर्मा

3) रिंकू सिंग

ऑलराउंडर्स – 

1) हार्दिक पांड्या 

2) शिवम दुबे

3) वॉशिंग्टन सुंदर

गोलंदाज – 

  1) जसप्रीत बुमराह

            2)हर्षित राणा

            3) अर्शदीप सिंग

           4) कुलदीप यादव

           5) वरुण चक्रवर्ती



अशारीतीने भारतीय संघात 4 भक्कम फलंदाज , 4 ऑलराउंडर्स आणि 5 गोलंदाज तसेच 2 विकेट कीपर अश्या 15 खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.

 

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार ५ सामन्यांची टी-२० मालिका

 

पहिला टी-२० सामना- २१ जानेवारी, नागपूर

दुसरा टी-२० सामना – २३ जानेवारी, रायपूर

तिसरा टी-२० सामना – २५ जानेवारी, गुवाहाटी

चौथा टी-२० सामना – २८ जानेवारी, विशाखापट्टणम

पाचवा टी-२० सामना – ३१ जानेवारी, तिरुवनंतपुरम


टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारतीय संघाचे वेळापत्रक


भारत विरुद्ध अमेरिका – ७ फेब्रुवारी, मुंबई

भारत विरुद्ध नामिबिया – १३ फेब्रुवारी, दिल्ली

भारत विरुद्ध पाकिस्तान – १५ फेब्रुवारी, कोलंबो

भारत  विरुद्ध नेदरलँड्स – १८ फेब्रुवारी, अहमदाबाद


 

 

 

 

 

Ispl Season 3 Match Fixtures

Ispl Season 3 Match Fixtures :

Ispl च्या नव्या हंगामाची लवकरच सुरुवात होणार आहे. Ispl म्हणजेच ‘Indian Street Premiar League ‘ चे हे तिसरे पर्व असणार आहे. आय एस पी एल च्या नव्या हंगामाची सुरुवात 9 जानेवारी 2026 पासून होणार आहे. यात एकूण 44 सामने खेळवले जाणार असून क्वालिफायर एक हा 3 फेब्रुवारी ला तर एलिमिनेटरचा सामना हा 4 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. क्वालिफायर दोन हा 5 फेब्रुवारीला खेळवला जाणार असून अंतिम सामना हा 6 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हे सर्व सामने लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम सुरत येथे खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने दहा षटकांचे असणार आहेत

यंदाच्या आयएसपीएल च्या ऑक्शन मध्ये बरेचसे चढ-उतार पहावयास मिळाले कारण बऱ्याच संघांनी आपला संघ मजबूत करण्याकडे विशेष लक्ष दिले होते काही संघाने आपल्या जुन्या खेळाडूवर विश्वास दाखवला तर काय संघानी सर्वच खेळाडूंना वगळून ऑक्शन मध्ये नवा संघ बनवण्याकडे लक्ष दिले. या ऑक्शन मध्ये 144 खेळाडूंवर एकूण दहा करोड रुपये खर्च करण्यात आले.

यंदाच्या Ispl मध्ये माझी मुंबई, टायगर्स ऑफ कोलकाता, फाल्कन रायझर्स हैद्राबाद ,श्रीनगर के वीर, चेन्नई सिंघम, बेंगलोर स्ट्रायकर हे पूर्वीचे सहा संघ उपलब्ध असणार आहेत. तर अहमदाबाद लायन्स आणि दिल्ली सुपर हिरोज हे दोन नवीन संघ असे एकूण आठ संघ यावेळी सहभागी होणार आहेत. अहमदाबाद लायन्स हा संघ बॉलीवूड स्टार अजय देवगन यांच्या मालकीचा असून दिल्ली सुपर हिरोज हा संघ बॉलीवूड चा दबंग सलमान खान यांच्या मालकीचा आहे.

आयएसपीएलच्या तिसऱ्या पर्वाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे ते पुढील प्रमाणे सविस्तरपणे आपल्यासमोर मांडले आहे. सर्वप्रथम महानायक अमिताभ बच्चन यांच्या मालकीचा संघ माझी मुंबई यांचे वेळापत्रक आपल्यासमोर देत आहोत. त्यानंतर पुढील सर्व संघांचे वेळापत्रक क्रमाने दिलेले आहे.

Ispl season 3 Auction 2025 : मराठमोळा विजय पावले ठरला Ispl मधील सर्वात महागडा खेळाडू.

 1. माझी मुंबई संघाचे सर्व सामने 

माझी मुंबई


1) 9 जानेवारी 2026

माझी मुंबई vs श्रीनगर के वीर           8.00 – 10.00


2) 12 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरो vs माझी मुंबई         8.00 – 10.00


‎3) 14 जानेवारी 2019

माझी मुंबई vs फाल्कन रायझर्स हैदराबाद  8.00 – 10.00


4) 16 जानेवारी 2026

माझी मुंबई  vs अहमदाबाद लायन्स.    8.00 – 10.00


5) 17 जानेवारी 2026

चेन्नई सिंघम vs माझी मुंबई.               5.30 – 7.30


6) 18 जानेवारी 2020

माझी मुंबई vs श्रीनगर के वीर.          5.30 – 7.30


7) 23 जानेवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता vs माझी मुंबई   5.30 – 7.30


8) 24 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैदराबाद vs माझी मुंबई. 8.00 – 10.00


9) 29 जानेवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता. vs माझी मुंबई 8.00 – 10.00


10) 1 फेब्रुवारी 2026

माझी मुंबई vs बेंगलोर स्ट्रायकर्स         8.00 – 10.00


2. श्रीनगर के वीर  या संघाचे सामने

श्रीनगर के वीर


1) 9 जानेवारी 2026

माझी मुंबई vs श्रीनगर के वीर            8.00 – 10.00


2) 10 जानेवारी 2026

श्रीनगर के वीर vs अहमदाबाद लायन्स.  5.30 – 7.30


3) 16 जानेवारी 2026

श्रीनगर के वीर vs टायगर्स ऑफ कोलकाता  5.30 – 7.30


4) 18 जानेवारी 2026

माझी मुंबई vs श्रीनगर के वीर.        5.30 – 7.30


5) 21 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैद्राबाद vs श्रीनगर के वीर   8.00 – 10.00


6) 23 जानेवारी 2026

बेंगलोर स्ट्रायकर्स vs श्रीनगर के वीर.  8.00 – 10.00


7) 24 जानेवारी 2026

चेन्नई सिंघम vs श्रीनगर के वीर.     5.30 – 7.30


8) 27 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैद्राबाद vs श्रीनगर के वीर 8.00 – 10.00


9) 29 जानेवारी 2026

श्रीनगर के वीर vs सुपरहिरोज       5.30 – 7.30


10) 30 जानेवारी 2026

श्रीनगर के वीर vs टायगर्स ओफ कोलकाता  8.00 – 10.00


3. अहमदाबाद लायन्स संघाचे सामने

अहमदाबाद लायन्स


1) 10 जानेवारी 2026

श्रीनगर के वीर vs अहमदाबाद लायन्स  5.30 – 7.30


2) 11 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs दिल्ली सुपर हिरो 5.30 – 7.30


3) 16 जानेवारी 2026

माझी मुंबई vs अहमदाबाद लायन्स   8.00 – 10.00


4) 17 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs बेंगलोर स्ट्रायकर.   8.00 – 10.00


5) 19 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs चेन्नई सिंघम   8.00 – 10.00


6) 22 जानेवारी 2026

दिल्ली सुपर ह vs अहमदाबाद लायन्स 5.30 – 7.30


7) 28 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs बेंगलोर स्ट्रायकर 8.00 – 10.00


8) 31 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs फाल्कन रायझर्स हैद्राबाद 8.00 – 10.00


9) 1 फेब्रुवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता vs अहमदाबाद लायन्स.         5.30 – 7.30


10) 2 फेब्रुवारी 2026

चेन्नई सिंघम vs अहमदाबाद लायन्स     5.30 – 7.30


4. टायगर ऑफ कोलकाता संघाचे सामने

टायगर ऑफ कोलकाता Ispl


1) 10 जानेवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता vs चेन्नई सिंघम 8.00 – 10.00


2) 15 जानेवारी 2020

बेंगलोर स्ट्रायकर vs टायगर ऑफ कोलकाता 5.30 – 7.30


3) 16 जानेवारी 2026

श्रीनगर के वीर vs टायगर्स ऑफ कोलकाता 5.30 – 7.30


4) 23 जानेवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता vs माझी मुंबई. 5.30 – 7.30


5) 25 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैद्राबाद  vs टायगर ऑफ कोलकाता 5.30 – 7.30


6) 26 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरोज vs टायगर ऑफ कोलकाता 8.00 – 10.00


7) 29 जानेवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता vs माझी मुंबई 8.00 – 10.00


8) 30 जानेवारी 2026

श्रीनगर के वीर vs टायगर्स ऑफ कोलकाता 8.00 – 10.00


9) एक फेब्रुवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता vs अहमदाबाद लायन्स 5.30 – 7.30


10 ) 2 फेब्रुवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता vs फाल्कन रायझर्स  हैद्राबाद 8.00 – 10.00


4. चेन्नई सिंघम संघाचे सामने

चेन्नई सिंघम Ispl


1) 10 जानेवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता vs चेन्नई सिंघम 8.00 – 10.00


2) 15 जानेवारी 2026

चेन्नई सिंघम vs फाल्कन रायझर्स हैद्राबाद 8.00 – 10.00


3) 17 जानेवारी 2026

चेन्नई सिंघम vs माझी मुंबई       5.30 – 7.30


4) 19 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs चेन्नई सिंघम. 8.00 – 10.00


5) 20 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरोज vs चेन्नई सिंघम   8.00 – 10.00


6) 22 जानेवारी 2026

चेन्नई सिंघम vs बेंगलोर स्ट्रायकर 8.00 – 10.00


7) 24 जानेवारी 2026

चेन्नई सिंघम vs श्रीनगर के वीर.   5.30 – 7.30


8) 25 जानेवारी 2026

बेंगलोर स्ट्रायकर vs चेन्नई सिंघम       8.00 – 10.00


9) 30 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरोज vs चेन्नई सिंघम    5.30 – 7.30


10) 2 फेब्रुवारी 2026

चेन्नई सिंघम vs अहमदाबाद लायन्स    5.30 – 7.30


5. बेंगलोर स्ट्रायकर्स संघाचे सामने

बेंगलोर स्ट्रायकर Ispl


1) 11 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैद्राबाद vs बेंगलोर स्ट्रायकर 8.00 – 10.00


2) 13 जानेवारी 2026

बेंगलोर स्ट्रायकर vs दिल्ली सुपरहिरोज 8.00 – 10.00


3) 15 जानेवारी 2026

बेंगलोर स्ट्रायकर vs टायगर्स ऑफ कोलकाता  5.30 – 7.30


4) 17 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs बेंगलोर स्ट्रायकर  8.00 – 10.00


5) 22 जानेवारी 2026

चेन्नई सिंघम vs बेंगलोर स्ट्रायकर. 8.00 – 10.00


6) 23 जानेवारी 2026

बेंगलोर स्ट्रायकर vs श्रीनगर के वीर. 8.00 – 10.00


7) 25 जानेवारी 2026

बेंगलोर स्ट्रायकर vs चेन्नई सिंघम.  8.00 – 10.00


8) 28 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs बेंगलोर स्ट्रायकर  8.00 – 10.00


9) 31 जानेवारी 2026

बेंगलोर स्ट्रायकर vs दिल्ली सुपर हिरोज  5.30 – 7.30


10 ) 1 फेब्रुवारी 2026

माझी मुंबई  vs बेंगलोर स्ट्रायकर. 8.00 – 10.00


7. फाल्कन रायझर्स हैद्राबाद संघाचे सामने

फाल्कन रायझर्स हैदराबाद Ispl


1) 12 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैद्राबाद vs बेंगलोर स्ट्रायकर 8.00 – 10.00


2) 14 जानेवारी 2026

माझी मुंबई vs फाल्कन रायझर्स हैद्राबाद 8.00 – 10.00


3) 15 जानेवारी 2026

चेन्नई सिंघम vs फाल्कन रायझर्स हैद्राबाद 8.00 – 10.00


4) 18 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरोज vs फाल्कन रायझर्स हैद्राबाद  8.00 – 10.00


5) 21 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैद्राबाद vs श्रीनगर के वीर 8.00 – 10.00


6) 24 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैद्राबाद vs माझी मुंबई 8.00 – 10.00


7) 25 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैद्राबाद vs टायगर्स ऑफ कोलकाता 5.30 – 7.30


8) 27 जानेवारी 2026

फाल्कन रायझर्स हैद्राबाद vs श्रीनगर के वीर 8.00 – 10.00


9) 31 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs फाल्कन रायझर्स हैद्राबाद 8.00 – 10.00


10) 2 फेब्रुवारी 2026

टायगर ऑफ कोलकाता vs  फाल्कन रायझर्स हैद्राबाद 8.00 – 10.00


8. दिल्ली सुपरहिरोज संघाचे सामने

दिल्ली सुपरहिरोज Ispl


1) 11 जानेवारी 2026

अहमदाबाद लायन्स vs दिल्ली सुपर हिरोज 5.30 – 7.30


2) 12 जानेवारी 2026

दिल्ली सुपर हिरोज vs माझी मुंबई  8.00 – 10.00


3) 13 जानेवारी 2026

बेंगलोर स्ट्रायकर vs दिल्ली सुपर हिरोज  8.00 – 10.00


4) 18 जानेवारी 2026

दिल्ली सुपर हिरोज vs फाल्कन रायझर्स हैद्राबाद 8.00 – 10.00


5) 20 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरोज vs चेन्नई सिंघम 8.00 – 10.00


6) 22 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरोज vs अहमदाबाद लायन्स 5.30 – 7.30


7) 26 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरोज vs टायगर ऑफ कोलकाता 8.00 – 10.00


8) 29 जानेवारी 2026

श्रीनगर के वीर vs दिल्ली सुपरहिरोज   5.30 – 7.30


9) 30 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरोज vs चेन्नई सिंघम. 5.30 – 7.30


10) 31 जानेवारी 2026

दिल्ली सुपरहिरोज vs बेंगलोर स्ट्रायकर.  5.30 – 7.30


Vijay Pavale : The Sangli Express Biography

Ispl season 3 Auction 2025 : मराठमोळा विजय पावले ठरला Ispl मधील सर्वात महागडा खेळाडू.

Ispl season 3 Auction 2025 :  यंदाच्या Ispl च्या ऑक्शन मध्ये माझी मुंबई चा मागील हंगामातील यशस्वी कर्णधार असलेल्या विजय पावले वर सर्वाधिक बोली लावली गेली आहे. माझी मुंबई संघाने आपल्या लाडक्या कर्णधाराला तब्बल 32.50 लाख खर्च करून आर टी एम चा वापर करत आपल्या ताफ्यात सामील केले आहे. अशा रीतीने विजय पावले हा Ispl च्या इतिहासातील सर्वाधिक बोली लावलेला खेळाडू ठरला आहे.

माझी मुंबई ने दाखवला विजय पावले वर विश्वास 

Most expensive player of the history of Ispl .

विजय पावले हा सीजन एक पासून माझी मुंबई संघासोबत जोडला गेलेला आहे. त्याने सीजन एक आणि दोन मध्ये अफलातून कामगिरी करून दाखवली आहे त्यामुळे माझी मुंबई हा संघ आयएसपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो याचे कारणही तसेच आहे.

माझी मुंबई सीजन एक मध्ये ठरला  उप विजेता – 

आयपीएलच्या सीजन एक मध्ये माझी मुंबई हा संघ जिगरबाज खेळ करत फायनल पर्यंत पोहोचला परंतु फायनल मध्ये त्यांना टायगर श्रॉफ कोलकता या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता यावेळी सुद्धा विजय पावली कामगिरी लक्षणीय ठरली होती.

माझी मुंबई सीजन दोन मध्ये ठरला विजेता – 

पहिल्या सीजन मधील राहिलेले विजेतेपदाचे पुरुष स्वप्न सीजन दोन मध्ये माझी मुंबई संघाने पूर्ण करत दिमाखात विजेतेपद मिळवले या सिझन मध्ये विजय पावले हा माझी मुंबई संघाचा कर्णधार होता. यावेळी माझी मुंबई ने श्रीनगर के वीर या संघाला फायनल मध्ये हरवत आपले पहिले विजेतेपद मिळवले होते यावेळी विजय पावलेने अंतिम सामन्यात कर्णधाराला साजेशी खेळी करत आपल्या संघाला पहिले विजेतेपद मिळवून दिले होते.

माझी मुंबई संघाने विजय साठी RTM चा केला वापर 

माझी मुंबई हा संघ आयपीएल मधील एक तगडा संग मानला जातो माझी मुंबई संघाने यावर्षी या आधीच त्यांचा प्रमुख खेळाडू करण अंबाला याला आधीच 26.65 लाखाला रिटेन केले आहे. त्यामुळे ऑप्शन मध्ये विजय पावलेवर मोठी बोली लागणार हे आधीच भाकीत केले जातात होते. त्यामुळे ज्यावेळी विजय पावले चे नाव पुकारले गेले. त्यावेळी सर्वच संघांनी विजय पावलेवर बोली लावायला सुरुवात केली. ही बोली तब्बल 32.50 लाखापर्यंत पोहोचली होती. शेवटी माझी मुंबई आणि हैदराबाद यामध्ये चुरशीची चढाओढ पाहिली गेली.परंतु माझी मुंबईने यावेळी आर टी एम कार्ड चा वापर करत विजय पावलेला आपल्याकडेच ठेवले अशा रीतीने विजय पावले हा Ispl च्या इतिहासातील सर्वाधिक बोली मिळवणारा खेळाडूला ठरला.

RTM ( Right To Match ) Card साठी विजय पावले च का? 

RTM म्हणजेच ‘ राईट टू मॅच ‘ कार्ड एखादा संघ आपल्या एका खास खेळाडूसाठी वापरू शकतो. माझी मुंबई संघासाठी विजय पावले हा तो खास खेळाडू ठरला.पण विजय पावले हा माझी मुंबईसाठी खास खेळाडू का आहे हे पुढील काही कारणांमुळे आपल्याला दिसून येईल.

  • विजय पावले हा सध्याच्या घडीतील टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.
  • सध्या तो माझी मुंबईचा कर्णधार आहे.
  • Ispl च्या सीजन एक आणि दोन मध्ये  त्याने अफलातून कामगिरी केली होती.
  • खास करून सीजन दोन मधील फायनल मध्ये त्याने अफलातून फलंदाजी करताना आपल्या संघाला सामना एखादी जिंकून दिला आणि आपल्या संघाला चॅम्पियन बनवली होते.
  • सध्या विजय पावले तुफान फॉर्म मध्ये आहे.त्याने आपल्या गोलंदाजी बरोबर  फलंदाजीत ही जोर दाखवला आहे. BGPL 2025 मध्ये सागर अली सोबत त्याने 24 चेंडूत नाबाद 63 धावांची विस्फोटक खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.

 

Ispl auction 2025

Vijay Pavale : The Sangli Express Biography

ICC women’s world cup final 2025 : ‘भारत बनला विश्व चॅम्पियन. अंतिम सामन्यात दिली दक्षिण आफ्रिकेला मात. शेफाली आणि दिप्ती ठरल्या हिरो. ‘ 

ICC women’s world cup final 2025 : ‘भारत बनला विश्व चॅम्पियन. अंतिम सामन्यात दिली दक्षिण आफ्रिकेला मात. शेफाली आणि दिप्ती ठरल्या हिरो. ‘ 

ICC women's world cup final 2025

ICC women’s world cup final 2025 : डी वाय पाटील स्टेडियम मुंबई येथे खेळवले गेलेल्या आयसीसी विश्वचषक च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच चॅम्पियन्स होण्याचा मान मिळवला. पावसामुळे थोडा उशीर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु स्मृति मंधना  आणि शेफाली वर्माने शतकी भागीदारी करत भारताला दमदार सुरुवात करून दिली परंतु दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करताना भारताला 298 धावांवर रोखले. दक्षिण आफ्रिका कडून लोरा वोलवर्ड ने एकाकी झुंज देताना शतकी खेळी केली परंतु इतर इतर फलंदाजाची तिला साथ न मिळाल्याने दक्षिण आफ्रिका 246 धावांवर ऑल आउट झाली. अशा रीतीने भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकले.

Test Twenty Cricket Format

भारताची दमदार शतकी सलामी भागीदारी 

पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनल सामन्याला पावसामुळे थोडासा उशीर झाला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय भारतीय सलामीवीरांनी सपशेल व्यर्थ ठरवताना 111 चेंडूत 104 धावांची दमदार शतकी भागीदारी केली. त्यात स्मृती मांधना ने 58 चेंडूत 45 धावा बनवल्या. त्यात 8  चौकारांचा समावेश होता. तर शेफाली वर्मा ने दमदार 78 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 87 धावा बनवल्या. या दोघांच्या शतकी भागीदारीने भारताने मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.

दक्षिण आफ्रिकेचे दमदार कमबॅक 

स्मृती मांधना आणि शेफाली वर्माने शतकी भागीदारी करून भारताला एका मजबूत स्थितीत आणून ठेवले होते. एक वेळ भारत सहज साडेतीनशे चा टप्पा पार करेल असे वाटले होते. परंतु स्मृतीच्या  विकेट नंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी धावसंख्येवर अंकुश ठेवण्यात यश मिळवले. भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली परंतु मोठ्या सरासरीने त्यांना खेळता आले नाही. त्यामुळे भारताला आपल्या निर्धारित 50 षटकात 7 बाद 298 धावा बनवता आल्या. आफ्रिकेकडून खाका ने 9 षटकात 58 धावा देऊन 3 बळी टिपले. तर इतर गोलंदाजांची ही तिला उत्तम साथ लाभली.

दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरुवात 

भारताने दिलेल्या 299 गावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वुल्वर्त आणि ब्रिटस यांनी आफ्रिकेला सावध पण मजबूत सुरुवात करून दिली.या दोघींनी पहिल्या विकेटसाठी  9 षटकात 51 धावा जोडल्या.

भारतीय कर्णधाराची मास्टर खेळी 

दक्षिण आफ्रिकेची दोन्ही सलामीवीर सावध पण उत्तम  खेळत होती. भारताच्या प्रमुख गोलांदाजाना त्यांनी उत्तम रित्या खेळून काढत धावफलक हलता ठेवला. त्यामुळे भारतीय कर्णधार हरमन प्रीत कौर ने एक डाव खेळला. तिने शेफाली वर्माकडे चेंडू सोपवला. या संधीचे सोने करत शेफाली ने काप ला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर तिच्या दुसऱ्या षटकात ही तिने चांगली फलंदाजी करत असलेल्या लुस ला स्वतःच झेलबाद करून दक्षिण आफ्रिकेला बॅक फूट वर ढकलले. अश्या रीतीने भारतीय कर्णधाराची मास्टर खेळी यशस्वी झाली.

लोरा वोलवर्ड ची जिगरबाज शतकी खेळी व्यर्थ

लॉरा वोल्वर्ड

संपूर्ण विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा बनवणाऱ्या लॉरा वोलवर्ड हिने अंतिम सामन्यात जिगरबाज शतकी खेळी करून आपल्या संघाला विजया जवळ नेले होते.परंतु इतर फलंदाजांची साथ तिला मिळाली नाही. त्यामुळे तिची शतकी खेळी दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देवू शकली नाही. लॉरा ने 98 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारांचा सहाय्याने 101 धावांची खेळी केली.

दीप्ती शर्माची मॅजिक 

भारताची अव्वल दर्जाची फिरकीपटू दीप्ती शर्माने या सामन्यात 9 षटकात 39 धावा देत तब्बल 5 बळी टिपले. तिच्या या धारदार गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जकडून ठेवले.त्यामुळे लॉरा वोलवर्ड व्यतिरिक्त इतर कोणतीही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि भारताने हा सामना 52 धावांनी जिंकून इतिहास रचला. तिच्या या कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

दीप्ती शर्मा ठरली मालिकावीर

संपूर्ण विश्वचषकात आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी ने कमाल करणाऱ्या भारताच्या दीप्ती शर्माला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज घोषित करण्यात आले.दिप्ती ने फलंदाजीत 215 धावा काढल्या.तर गोलंदाजीत विश्वचषकात सर्वाधिक 22 विकेट्स मिळवल्या.

भारत पहिल्यांदाच बनला चॅम्पियन 

भारताने आतापर्यंत तीन वेळा फायनल प्रवेश केला होता परंतु त्याला चॅम्पियन बनता आले नाही. 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताला फायनल मध्ये पराभव स्वीकारला होता. तर 2017 मध्ये इंग्लंड कडून भारताने पराभव स्वीकारला होता.परंतु 2025 च्या विश्वचषकात भारताने मागील सर्व कसर भरून काढत पहिल्यांदाच फायनल जिंकत विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. आयसीसीलाही तब्बल 25 वर्षानंतर नवीन चॅम्पियन मिळाला.

भारतीय संघावर होणार बक्षिसांचा वर्षाव 

आपले पहिले पहिले विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर सर्व क्षेत्रातून बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. कारण आयसीसी ने विश्वचषक विजेत्या संघाला बक्षीस रुपी रक्कम ही  जवळपास 40 कोटीच्या घरात असणार आहे. कोणत्याही विश्वचषकातील ही सर्वाधिक बक्षीस आहे. शिवाय जर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तर Bcci  कडून भारतीय संघाला तब्बल 51 कोटी चे विशेष बक्षीस म्हणून दिले जाईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय संघावर जणू पैशाचा पाऊस पडणार आहे.