AUS Vs SA 3rd ODI : 36 चौकार, 18 षटकार… 431 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या गोलंदाजांना फो फो फोडले.

ब्रेकिंग न्युज :

AUS Vs SA 3rd ODI : 36 चौकार, 18 षटकार… 431 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या गोलंदाजांना फो फो फोडले.

वनडेत 170 चेंडूत 404 धावा. सारे रेकॉर्ड उद्ध्वस्त

Australia vs South Africa 3rd ODI 2025

SA vs Aus 3rd ODI

Australia vs South Africa 3rd ODI : रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि कॅमरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेची धुलाई करत त्यांच्या अक्षरशः चिंधड्या केल्या. मॅकेच्या  ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत कांगारू संघाने फक्त दोन गडी गमावून तब्बल 431 धावा केल्या. यादरम्यान, त्यांनी 36 चौकार आणि 18 षटकार मारले. ही ऑस्ट्रेलियाची वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या   ठरली. केवळ 4 धावांनी ते त्यांच्याच सर्वात मोठ्या धावसंख्येच्या विक्रमापासून हुकले.

2006 मध्ये जोहानसबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 4 बाद 434 ही त्यांची आजवरची सर्वोच्च वनडे धावसंख्या उभारली होती. परंतु हर्षल गिब्ज च्या जादुई फलंदाजीने हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने आपली सर्वोच्च वनडे धावसंख्या उभारून ही त्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती.

इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं…

या सामन्यात सलामीवीर ट्रेवीस हेड, कार्यवाहक कर्णधार मिचेल मार्श आणि अष्टपैलू कॅमरून ग्रीन यांनी शतके  ठोकत इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाच्या वनडे इतिहासात प्रथमच तीन खेळाडूंनी एका सामन्यात शतके झळकावली. यापूर्वी हा पराक्रम केवळ दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने केला होता.

ट्रेविस हेड आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या चिंधड्या केल्या

Trevis head.
Credit: cricketadictor.in

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला हेड आणि मार्श या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून 250 धावांची भागीदारी केली. हेड ने 103 चेंडूत 142 धावा करताना 17 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याला केशव महाराजने आऊट केले. दुसरीकडे मार्शने 106 चेंडूत 100 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या दरम्यान त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतल्या 3,000 धावाही पूर्ण केल्या.

ग्रीन ठरला दुसरा सर्वात जलद शतकवीर

मार्श आऊट झाल्यानंतर ग्रीन ने जबरदस्त आक्रमक फलंदाजी करत पहिल्याच शतकाची नोंद केली. फक्त 47 चेंडूत शतक ठोकत त्याने वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात जलद शतकवीर होण्याचा मान मिळवला. सर्वात जलद शतक ग्लेन मॅक्सवेलने 2023 40 चेंडूमध्ये नेदरलँड्सविरुद्ध ठोकले होते. ग्रीनने अखेरपर्यंत 55 चेंडूत नाबाद 118 धावा ठोकल्या ज्यात 6 चौकार आणि 8 षटकार होते. ग्रीनला अलेक्‍स केरीने (37 चेंडूत नाबाद 50 धावा, 7 चौकार) अप्रतिम साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 चेंडूत 164 धावांची अखंड भागीदारी केली. यात  ग्रीन ने 105 धावा तर ॲलेक्स कॅरीने 50 धावांचे योगदान दिले.त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 431 धावांचा डोंगर उभारता आला.

ऑस्ट्रेलियाचा 276 धावांनी विशाल विजय.

ऑस्ट्रेलियाच्या 431 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ फक्त 155 धावा करू शकला. एकट्या डेवल ब्रेविस ने प्रतिकार करताना 49 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून कुपर कोनोलीने 6 षटकात 22 धावा देऊन 5 बळी टिपले. अशा तऱ्हेने ऑस्ट्रेलियाने तिसरा वनडे सामना 276 धावांनी जिंकला.

दक्षिण आफ्रिकेने जिंकली वनडे मालिका

SA won the ODI series against Aus by 2-1
Credit: Indiatime.com

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका खेळवली गेली. त्यात दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीचे दोन सामने जिंकले होते तर शेवटचा तिसरा सामना असलेल्याने जिंकला अशा तऱ्हेने दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 2 – 1 अशा फरकाने जिंकली.

तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड ने 142 धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला. तर या संपूर्ण मालिकेत जबरदस्त गोलंदाजी करणारा केशव महाराज हा मालिकावीर ठरला. याआधी ऑस्ट्रेलियाने टी-ट्वेंटी मालिका जिंकली होती. अशा तऱ्हेने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यातील मालिका ह्या खूप रोचक राहिले.

ऑस्ट्रेलियाची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या

 

  • 434/4 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2006

 

  • 431/2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मॅके, 2025

 

  • 417/6 विरुद्ध अफगाणिस्तान, WACA, 2015

 

  • 399/8 विरुद्ध नेदरलँड्स, दिल्ली, 2023

 

एका वनडे सामन्यात संघासाठी शतक करणारे तीन खेळाडू

संघ – दक्षिण आफ्रिका

खेळाडू – 1) हाशिम आमला 2) राईली रुसो 3) एबी                        डिव्हिलियर्स.

विरुद्ध – वेस्टइंडीज.

ठिकाण – जॉहानसबर्ग, दक्षिण आफ्रिका 2015.

 

संघ – दक्षिण आफ्रिका 

खेळाडू – 1) क्विंटन डिकोक 2) फाफ डुप्लेसी 3) एबी                   डिव्हिलियर्स.

विरुद्ध – भारत

ठिकाण – वानखेडे स्टेडियम, 2015.

संघ – इंग्लंड 

खेळाडू – 1) सॉल्ट 2) डेव्हिड मलान 3) जोश बटलर.

विरूद्ध – नेदरलँड.

ठिकाण – एमस्टेलविन, 2022.

संघ – दक्षिण आफ्रिका 

खेळाडू –1) क्विंटन डीकॉक 2) रॅसी 3) एडम मारक्रम.

विरूद्ध – श्रीलंका

ठिकाण – दिल्ली, 2023.

संघ – ऑस्ट्रेलिया 

खेळाडू – 1)ट्रेवीस हेड 2) मिचेल मार्श 3) ग्रीन.

विरुद्ध – दक्षिण आफ्रिका

ठिकाण – रिफ अरेना ,2025.

 

 

 

Leave a Comment