Asia Cup Final 2025, India vs Pakistan :
दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड वर खेळवल्या गेलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर पाच गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्याचे खरे हिरो ठरले ते तिलक वर्मा आणि कुलदीप यादव. या दोघांनी अंतिम सामन्यात अफलातून कामगिरी करताना भारताला सहज विजय मिळवून दिला.

पाकिस्तानची दमदार सलामी
आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानची सलामी जोडी जास्त फॉर्म मध्ये नव्हती. परंतु या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या सलामी जोडी थोडासा बदल करून त्यांनी साहेबजादा फरहान आणि फकर जमान यांना सलामीला पाठवले. या दोघांनी हा निर्णय सार्थ ठरवताना 58 चेंडूत 84 धावांची सलामी दिली. यात फरहानने 38 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकाराच्याच्या सहाय्याने दमदार 57 धावा काढल्या. या दोघांच्या आक्रमक खेळीने पाकिस्तान मोठी धावसंख्या उभारू शकेल असे वाटू लागले होते.
कुलदीप यादव ची कमाल
एकीकडे पाकिस्तान च्या दोन्ही सलामीवीरांनी 84 धावांची दमदार भागीदारी केली होती. वरून चक्रवर्ती ने ही जोडी फोडताना फरहानला तिलक वर्मा च्या हाती झेल देण्यास भाग पाडले. नंतर सेट झालेल्या फकर जमान ला देखील कुलदीप यादवकरवी झेलबाद केले. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या कुलदीप यादव ने पाकिस्तानचे कंबरडे मोडताना 4 षटकात 30 धावा देऊन तब्बल चार बळी टिपले. कुलदीप यादव ने सॅम अयुब, शाहीन आफ्रिदी, सलमान आगा आणि अश्रफ यांना बाद केलं. कुलदीप यादव ला इतर भारतीय गोलंदाजांची ही उत्तम साथ लाभली. बुमराह, वरून चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 – 2 बळी घेतले. या सर्वांच्या सुरेख गोलंदाजी मुळे पाकिस्तानला 150 चा ही टप्पा गाठता आला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ फक्त 146 धावा करून ऑल आउट झाला.
भारताची आक्रमक फळी ठरली फेल
आशिया कपच्या अंतिम सामन्यात 147 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूप निराशाजनक झाली. आतापर्यंत तुफान फॉर्म मध्ये असणारा अभिषेक शर्मा अंतिम सामन्यात स्वस्तात बाद झाला. अभिषेक शर्माने फक्त पाच धावा बनवल्या त्याला फहीम अश्रफ ने बाद केले. अश्रफ ने शुभमन गिल ला सुद्धा बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव ला देखील शाहीन आफ्रिदी ने 1 धावेवर झेलबाद केले. भारताचे 3 भरवश्याचे फलंदाज फक्त 20 धावांवर बाद झाले. त्यामुळे भारताची आक्रमक फळी सपशेल फेल ठरली. पाकिस्तानकडून अश्रफ ने सर्वाधिक 3 बळी घेतले तर शाहीन आफ्रिदी ने 2 बळी घेतले.
सॅमसंग, तिलक आणि दुबे ने डाव सावरला
भारताचे 3 फलंदाज फक्त 20 धावांवर बाद झाल्याने भारत खूप मोठ्या अडचणीत सापडला होता.परंतु संजू सॅमसन ने 21 बॉल मध्ये 24 तर शिवम दुबे ने आक्रमक 22 बॉल मध्ये 33 धावांची खेळी केली. त्यात 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर सर्वात स्पेशल खेळी ही तिलक वर्माने केली. त्याने 53 बॉल मध्ये नाबाद 69 धावांची निर्णायक खेळी केली. त्यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
तिलक वर्मा ठरला सामनावीर
अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 69 धावांची निर्णायक कामगिरी करून तिलक वर्मा हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तिलक वर्मा ने भारताचा संघ संकटात सापडलेला असतानाही शांत आणि आक्रमक खेळी करत 53 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी केली. त्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.’ अभ्यास केला होता शर्माचा आणि पेपर आला वर्माचा ‘ अशी पाकिस्तानच्या संघाची अवस्था झाली होती.
अभिषेक शर्मा ठरला मालिकावीर

( Abhishek Sharma become man of the searise. )
आशिया कप 2025 मध्ये खोऱ्याने धावा करणारा भारताचा अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. अभिषेक शर्माने या आशिया कप मध्ये एकूण 314 धावा बनवल्या. त्याला बक्षीस म्हणून 15000 यूएस डॉलर मिळाले. शिवाय हावल एच 9 एसयूवी कार ( Haval H 9 SUV ) ही बक्षीस म्हणून दिली गेली. मालिकावीर पाठोपाठ आशिया कप मध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू म्हणूनही अभिषेक शर्मा ला पुरस्कार मिळाला.
कुलदीप यादवने घेतल्या सर्वाधिक विकेट

आशिया कप मध्ये कुलदीप यादव ने सर्वाधिक 17 विकेट घेतल्या. कुलदीप यादव हा या स्पर्धेतील ‘ मोस्ट व्हॅल्यू बल प्लेयर ‘ ठरला.
भारतीय टिमवर झाला बक्षीसांचा वर्षाव
भारताने 2025 च्या आशिया कप मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवत 9 व्या वेळेस चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. भारताने मागील सलग चार वेळा आशिया कप मध्ये चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. भारताला आशिया कप चॅम्पियन म्हणून 2.6 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस मिळाली. तर पाकिस्तानात उप विजेते म्हणून 1.3 कोटी रुपयाची बक्षीस मिळाले. BCCI ने भारतीय टीमला 21 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
भारताने पाकिस्तानला सलग तीन वेळा हरवले
अपेक्षेप्रमाणे आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार असे सर्वांना वाटत होते. 14 सप्टेंबरला खेळवल्या गेलेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गड्यांनी पराभव केला होता. तर 21 तारखेला खेळले गेलेल्या सुपर फोर मध्ये भारताने पाकिस्तानचा सहा गड्यांनी पराभव केला होता. तर 28 तारखेला फायनल मध्ये भारताने पाकिस्तानचा पाच गड्यांनी पराभव करत नवव्यांदा आशिया कप जिंकला. अशा रीतीने या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला सलग तीन वेळा हरवले आहे.
आशिया कप आणि भारत पाकिस्तान वादविवाद

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदुर यांचा निषेध असतानाही भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मैदानाबाहेर आणि मैदानात ही वातावरण हे बरेचसे तापले होते. पुढील काही अशा घटना मैदानामध्ये घडल्या ज्या की भारत पाकिस्तान यांच्यामध्ये वादविवाद होते हे स्पष्ट जाणवत होते.
- सर्वप्रथम भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान चा कर्णधार सलमान आगा याच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
- सामना संपल्यानंतरही भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन करण्यास टाळले.
- पाकिस्तानच्या संघाने याची तक्रार ACC कडे केली. याला कारणीभूत म्हणून एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.
- मैदानावर ही हॅरिस राउफ ने अश्लील आणि विक्षिप्त इशारे केले.
- भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हॅरिस राउफ ला सामना शुल्काच्या 30% दंड करण्यात आला.
- अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने त्यांना मिळालेला चेक फेकून दिला.
- बक्षीस समारंभाला पाकिस्तानच्या संघाने येण्यासाठी बराच विलंब लावला. भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय संघाला विजेतेपदाची ट्रॉफी आणि मेडल्स मिळालेच नाही. पाकिस्तान चे एसीसी चे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे आपल्यासोबत ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन हॉटेलला गेले.
- पाकिस्तानी खेळाडू गन सेलिब्रेशन आणि प्लेन क्रॅश सारखे हातवारे सतत करत होते. याचे उत्तर म्हणून बुमराहने देखील हॅरिस राउफ ला आउट केल्यानंतर तसेच प्लेन क्रॅश चे सेलिब्रेशन केले.
एकंदरीत भारतीय संघाने पाकिस्तानची चांगली जिरवत आशिया कप वर आपले नाव कोरले.
