Asia Cup 2025 Prize Money: जिंकणारा संघाला मिळणार 2.6 कोटी, तर उपविजेता ही कमावणार करोडो रुपये! जाणून घ्या बक्षीस रक्कम.
What is Asia Cup 2025 Prize Money: 2025 चा आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरूवात झाली. आठ संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. युएईमध्ये झालेल्या या T-20 स्वरूपातील स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन संघात फायनल खेळवली जाणार आहे.
Asia Cup 2025 Prize Money:
आशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेचा थरार अखेर शिगेला पोहोचला असून चाहत्यांचे लक्ष आता भारत आणि पाकिस्तान यांचा अंतिम सामन्यासह विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेवर केंद्रित झाले आहे. आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) धोरणानुसार यंदाच्या हंगामातील बक्षीस रक्कम मागील स्पर्धेपेक्षा अधिक ठेवण्यात आली आहे. यामागचा उद्देश म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा मिळवून देणे. आठ संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन संघ असतील.

विजेत्या संघाला जॅकपॉट
आशिया कप 2025 च्या विजेत्या संघाला तब्बल 2.6 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक बोनस देखील देण्यात येणार आहे. ही रक्कम थेट आशियाई क्रिकेटमधील सर्वात मोठ्या बक्षीसांपैकी एक ठरत आहे.
उपविजेत्या संघालाही मोठा फायदा
फायनलमध्ये पराभव झालेला उपविजेता संघ रिकाम्या हाताने जाणार नाही. त्यांना 1.3 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय उपविजेत्या संघातील खेळाडूंनाही वेगळा बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर राहूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ खेळाडूंना मिळणार आहे.
वैयक्तिक पुरस्कारालाही उत्तम बक्षीस
यंदा वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही उत्तम बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे सांघिक कामगिरी बरोबरच खेळाडूला आपली वैयक्तिक कामगिरी कडेही लक्ष्य द्यावे लागणार आहे आणि त्याचा मोबदलाही त्यांना मिळणार आहे. खेळाडूना मिळणारे बक्षीस पुढीलप्रमाणे –
- टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू (Player of the Tournament) : 12.5 लाख रुपये
- सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम गोलंदाज : प्रत्येकी 4.5 लाख रुपये
- फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच : 4.1 लाख रुपये
- स्मार्ट कॅच ऑफ द मॅच : 2.5 लाख रुपये.
यामुळे केवळ संघनिष्ठा नव्हे, तर वैयक्तिक चमक दाखवणाऱ्या क्रिकेटपटूंनाही त्याचा मोबदला मिळणार आहे.
बक्षीसवाढीमागील कारण
ACC ने यंदा बक्षीस रक्कमेत वाढ का केली, याचं उत्तर सोपं आहे की, आशिया कपला अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा, स्पर्धा अधिक रोमहर्षक व्हावी आणि खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळावं. आशियाई क्रिकेट नेहमीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय राहिलं आहे आणि प्रायोजकांकडून मिळणाऱ्या भरघोस मदतीमुळे ही रक्कम वाढवणं शक्य झालं आहे.
आशिया कप 2025 मध्ये विजेत्या संघाला मिळणारे 2.6 कोटी आणि उपविजेत्याला मिळणारे 1.3 कोटी हे आकडे दाखवतात की क्रिकेट आता फक्त खेळ नाही तर मोठं आर्थिक व्यासपीठ बनलं आहे. या बक्षीस रकमेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि चाहत्यांना अधिक चुरशीचे सामने पाहायला मिळतील, यात शंका नाही.
पहिल्यांदाच फायनल चा महामुकाबला

आशिया कप च्या इतिहासात पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर विरोधक आशिया कप च्या फायनल मध्ये एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. आशिया कप चे आतापर्यंत 16 पर्व झाले असून त्यात एकदाही भारत आणि पाकिस्तान हे फायनल मध्ये एकमेकांसमोर आले नाहीत. परंतु 2025 च्या आशिया कप मध्ये हा योग जुळून आला असून येत्या 28 सुप्टेंबर ला भारत विरुद्ध पाकिस्तान असा मेगा फायनल चा सामना खेळवला जाणार आहे.हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर रात्री 8.00 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे.
