ISPL Season 3 Match No.3 : चेन्नई सिंघमची दमदार सुरुवात. कोलकत्ता विरुद्ध 44 धावांनी जिंकला सामना. 

ISPL Season 3 Match No.3 : चेन्नई सिंघमची दमदार सुरुवात. कोलकत्ता विरुद्ध 44 धावांनी जिंकला सामना. 

ISPL 2026 मधील तिसरा सामना हा चेन्नई सिंघम आणि टायगर्स ऑफ कलकत्ता यांच्या दरम्यान खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई सिंघम ने तब्बल 44 धावांनी विजय मिळवला. Ispl Season 3 Match 1 : Majhi Mumbai vs Shrinagar ke Veer

चेन्नई सिंघम ने केली शंभरी पार 

चेन्नई सिंघम हा संघ यावर्षीचा निर्धारित 10 षटकात शंभर धावा पूर्ण करणारा पहिला संघ ठरला आहे. चेन्नई सिंघमने आपल्या दहा षटकात आठ गडी गमावून 102 धावा बनवल्या होत्या. चेन्नई सिंघम तर्फे सरफराज खान ने 24 चेंडूत 4 चौकार 1 षटकार आणि 1 नवकार अशा एकूण 45 धावा कुठल्या. शेवटी संभाजी पाटील म्हणजेच बबलू पाटील यांनी दोन षटकार खेचून चेन्नई सिंघम ला शंभरी पार करून दिले.

सरफराज खान चमकला 

सरफराज खान

चेन्नई सिंघम तर्फे बाहुबली सरफराज खानला यावेळी पहिल्याच मॅचमध्ये वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले गेले. याचा पुरेपूर फायदा घेताना सर्फराज खानने दमदार फलंदाजी केली. सुरुवातीला सावधपणे खेळणाऱ्या सर्फराज ने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये भावेश पवार विरुद्ध 27 धावा बनवले. त्यात दोन चौकार एक षटकार आणि एक नवकार यांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे चेन्नई सिंघमने दहा षटकात 102 धावा बनवले. त्याच्या या खेळीमुळे सरफराज खान ला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

भावेश पवार ने दिल्या एकावर ओवर मध्ये 40 धावा 

चेन्नई सिंघमने फिफ्टी-फिफ्टी ओवर साठी लेफ्ट आर्म गोलंदाज भावेश पवार याची निवड केली होती. सातव्या षटकात फिफ्टी-फिफ्टी ओवर टाकण्यासाठी आलेल्या भावेश पवारने पहिला चेंडू सुंदर टाकला होता. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती. परंतु सरफराज खान ज्यावेळी फलंदाजीसाठी आला त्याने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्याने पुढील पाच चेंडूत तब्बल 27 धावा कुटल्या. त्यात एक षटकार दोन चौकार आणि एक नवकार यांचा समावेश होता. चेन्नई सिंघमने या षटकात तब्बल 27 धावा बनवल्या. शिवाय त्यात 13 धावांची भर पडून या षटकात तब्बल 40 धावा चेन्नई सिंघम ला मिळाल्या

विवेक शेलार ठरला कोलकत्याचा हिरो 

एकीकडे चेन्नई ने कोलकात्याच्या सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. परंतु त्यांचा प्रमुख गोलंदाज विवेक शेलार यांने उत्तम गोलंदाजी करताना आपल्या दोन षटकात 15 धावा खर्च करून तीन बळी मिळवले. शिवाय एक उत्कृष्ट कॅच ही पकडला. या कॅच साठी त्याला बेस्ट कॅच ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला.

कोलकात्याचे फलंदाज फेल 

10 षटकात 103 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजानी सपशेल नांग्या टाकल्या. त्यांनी आपल्या दहा षटकात फक्त 56 धावाच बनवल्या. त्यांचे बहुतेक प्रमुख फलंदाज या सामन्यात लयीत खेळताना दिसली नाहीत. सागर अली आणि सरोज परमानिक सारखे फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे टायगर ऑफ कोलकाता ने हा सामना तब्बल 44 धावांनी गमावला.

फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये ठरले विजयाचे अंतर 

ISPL मध्ये फिफ्टी-फिफ्टी ओवर हा गेम चेंजर म्हणून ओळखला जातो. याचाच उत्तम नमुना या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे सरफराज खानच्या बहारदार खेळीमुळे फिफ्टी फिफ्टी ओवर मध्ये चेन्नई ने 27 प्लस 13 अशा एकूण 40 धावा बनवल्या. तर दुसरीकडे कोलकत्ता ने फिफ्टी-फिफ्टी ओवर मध्ये फक्त 6 च धावा बनवल्या. त्यामुळे त्यांच्या 3 धावा कमी झाल्या. त्यामुळे फिफ्टी-फिफ्टी ओवर हे या मॅच मध्ये चेन्नईच्या विजयाचे कारण बनले.

Leave a Comment