Most Expensive Uncapped Indian Player in IPL Auction Prashant Veer.

Who is Prashant Veer : आयपीएल 2026 चे मिनी ऑक्शन 16 डिसेंबर 2025 रोजी झाले. या 2026 च्या लिलावात उत्तर प्रदेशच्या एका खेळाडूचे नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. चेन्नईने त्याच्यावर 14.2 कोटींची बोली लावल्याने सगळेच थक्क झाले आहेत. यंदाच्या मिनी ऑक्शनमध्ये उत्तर प्रदेशच्या एका तरुण अष्टपैलू खेळाडूने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. केवळ 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजसह लिलावात उतरलेल्या प्रशांत वीर नावाच्या खेळाडूवर चेन्नई सुपर किंग्सने थेट 14.20 कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला संघात सामील करून घेतले. या एका बोलीमुळे प्रशांत वीर चर्चेत आला आहे. एवढंच नाही तर तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ही ठरला आहे. उत्तर प्रदेशच्या या अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडूने लिलावात असा काही धुमाकूळ घातला की, मागील सर्व विक्रम मोडीत निघाले. १४.२० कोटी रुपयांची विक्रमी बोली लावत चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.प्रशांत वीरची मूळ किंमत अवघी ३० लाख रुपये होती. मात्र, त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे फ्रँचायझींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली.
प्रशांत वीर साठी पाच संघांमध्ये रंगली चुरस
प्रशांत वीरसाठीची बोली लखनऊ सुपर जायंट्सने सुरू केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने आक्रमक पवित्रा घेत बोली 1.10 कोटी रुपयांपर्यंत नेली. मुंबईने माघार घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स मैदानात उतरली आणि प्रशांतची बोली 4 कोटी रुपयांपर्यंत नेली. यानंतर लखनऊ ने पावले मागे घेतली, पण राजस्थान राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई यांच्यात जोरदार चढाओढ सुरू झाली. 6.40 कोटी रुपयांवर राजस्थान बाहेर पडला. त्यानंतर सनराइजर्स हैदराबादची एंट्री झाली. हैदराबाद आणि चेन्नई यांच्यातील दीर्घ लढतीनंतर अखेर 14.20 कोटी रुपयांवर सीएसकेने बाजी मारली. केवळ 20 वर्षांचा असलेला प्रशांत वीर उत्तर प्रदेशकडून खेळतो. छोट्याशा कारकिर्दीत त्याने स्फोटक फलंदाजी आणि डावखुर्या फिरकी गोलंदाजीचा प्रभावी संगम दाखवला आहे. त्याची ओळख एक आक्रमक ऑलराउंडर म्हणून झाली असून मधल्या फळीत सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. याच अष्टपैलू गुणांमुळे मोठ्या आयपीएलमधील पाच संघांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि कोट्यवधी रुपयांची बोली लावली.
का लागली एवढी मोठी बोली ?
प्रशांत वीर हा आता केवळ 20 वर्षाचा असून तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. छोट्याशा कारकिर्दीत त्याने स्फोटक फलंदाजी आणि डावखुर्या फिरकी गोलंदाजीने सर्वांना प्रभावीत केले आहे. त्याची ओळख एक आक्रमक ऑलराउंडर म्हणून झाली असून मधल्या फळीत सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.प्रशांत वीर ने घरगुती क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ७ सामन्यांत ११२ धावा आणि ९ महत्त्वाचे बळी घेतले होते. त्याचसोबत उत्तर प्रदेश टी२० लीग येथे प्रशांत खऱ्या अर्थाने चमकला. त्याने ३२० धावा कुटल्या आणि ८ बळीही घेतले. तो त्याच्या ‘पॉवर हिटिंग’ आणि चेंडू स्विंग करण्याच्या कौशल्यासाठी ओळखला जातो.
यूपी टी 20 लीग आणि U 23 स्टेट ए ट्रॉफी मध्ये वर्चस्व
उत्तर प्रदेश टी 20 लीग 2025 मध्ये प्रशांत वीर ला ‘एमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन’ म्हणून गौरवण्यात आले. नोएडा सुपर किंग्सकडून खेळताना त्याने 10 डावांमध्ये 64.00 च्या सरासरीने आणि 155.34 च्या स्ट्राइक रेटने 320 धावा केल्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश होता. गोलंदाजीतही त्याने 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय पुरुषांच्या U-23 स्टेट ए ट्रॉफीत तो ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला. या स्पर्धेत त्याने 7 सामन्यांत 94.00 च्या सरासरीने 376 धावा आणि 18 विकेट्स घेतल्या.
IPL ऑक्शनच्या इतिहासातील सर्वाधिक किमतीचे अनकॅप्ड खेळाडू

प्रशांत वीर – चेन्नई सुपर किंग्ज – ₹14.20 कोटी (2025)
कार्तिक शर्मा – चेन्नई सुपर किंग्ज – ₹14.20 कोटी (2025)
आवेश खान – लखनऊ सुपर जायंट्स – ₹10 कोटी (2022)
कृष्णप्पा गौतम – चेन्नई सुपर किंग्ज – ₹9.25 कोटी (2021)
शाहरुख खान – पंजाब किंग्ज – ₹9 कोटी (2022)
राहुल तेवतिया – गुजरात टायटन्स – ₹9 कोटी (2022)
कृणाल पांड्या – मुंबई इंडियन्स – ₹8.80 कोटी (2018)
आकिब नबी – दिल्ली कॅपिटल्स – ₹8.40 कोटी (2025)
वरुण चक्रवर्ती – किंग्स इलेव्हन पंजाब – ₹8.40 कोटी (2019 )
प्रशांत वीर चा आदर्श आहे युवराज सिंग.
प्रशांत हा डावखुरा फलंदाज असून भारताचा महान अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा त्याचा आदर्श आहे. मैदानात तो अनेकदा युवीच्या शैलीची नक्कल करताना दिसतो.
CSK ची रणनीती आणि अपेक्षा
चेन्नई सुपर किंग्स नेहमीच अशा युवा खेळाडूंवर गुंतवणूक करते जे भविष्यात ‘मॅच विनर’ ठरू शकतात. यापूर्वी ते आपल्या संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश करत आले होते. परंतु यावर्षी पासून त्यांनी भविष्याचा विचार करून संघ बांधणीला सुरुवात केली आहे.त्यामुळेच तर त्यांनी नवख्या खेळाडूंवर प्रचंड पैसा खर्च केला आहे. १४.२० कोटींची प्रचंड रक्कम ही प्रशांतवरील विश्वासाचे प्रतीक आहे. आता धोनीच्या छत्रछायेखाली या २० वर्षीय हिऱ्याला पैलू पाडले जाणार असून, आगामी हंगामात तो ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो.
रवींद्र जडेजा ची रिप्लेसमेंट ठरू शकेल का ?
प्रशांत वीर हा रवींद्र जडेजा सारखाच डावखुरा फलंदाज आहे. शिवाय तो उत्तमरीत्या ऑफ स्पिन गोलंदाजी ही करतो. शिवाय तो चपळ क्षेत्ररक्षक ही आहे. या सर्व गुणांचा विचार करता सी एस के ने रवींद्र जडेजा ची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसून येते. पण हे आपल्याला मैदानावरच प्रशांत वीरच्या कामगिरीने पाहता येईल.
प्रशांत वीर काय म्हणाला ?
“चेन्नईने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणे हेच माझे आता एकमेव ध्येय आहे. माही भाईंकडून शिकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” उत्तर प्रदेशातील बुलंदशहर सारख्या छोट्या शहरातून आलेल्या प्रशांतसाठी हा प्रवास स्वप्नवत आहे. “मला एकदा तरी धोनी सरांसोबत खेळायला मिळावे,” अशी इच्छा प्रशांतने एका मुलाखतीत व्यक्त केली होती. आता तो केवळ त्यांच्यासोबत खेळणारच नाही, तर त्यांच्याच नेतृत्वाखाली आयपीएल पदार्पण करेल.
FAQ –
1) प्रशांत वीर चे गाव कोणते ?
उत्तर – यूपी मधील बुलंद शहर.
2) प्रशांत वीर वर किती कोटी ची बोली लागली ?
उत्तर – 14.20 कोटी ( csk )
3) प्रशांत वीर सोबत csk ने कोणाला 14.20 कोटीला खरेदी केले ?
उत्तर – कार्तिक शर्मा .
