IND vs Pak , Asiya Cup 2025
रविवारी खेळवल्या गेलेल्या ए ग्रुप मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ गड्यांनी चितपट करत पाकिस्तानला आसमान दाखवले व सामना आरामात जिंकला. भारतीय संघाने हा विजय पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि भारतीय सैनिकांना समर्पित केला. भारताने पाकिस्तान विरुद्ध मागील 14 सामन्यात पैकी एकूण 11 सामने जिंकले आहेत.
पाकिस्तानचा फुसका बार
या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधार सलमान आगा ने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय त्यांच्या चांगला च अंगलट आला. कारण भारतीय गोलंदाजांनी टीचून गोलंदाजी करत पाकिस्तानच्या सर्वच फलंदाजांना जखडून ठेवण्याचे काम केले. पाकिस्तानने आपले पहिले दोन गडी फक्त दहा धावांवर गमावले. भारताकडून बुमरा,हार्दिक पांड्या कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी सुंदर गोलंदाजी करताना पाकिस्तानच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला. पाकिस्तानकडून फरहान आणि शेवटी शाईन आफ्रिदी यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची धावसंख्या कशीबशी 127 धावापर्यंत पोहोचवली. फरहानने 44 चेंडूत सर्वाधिक 40 धावा बनवल्या. तर शाहीन आफ्रिदीने 16 चेंडूत 4 षटकाराच्या सहाय्याने नाबाद 33 धावा बनवल्या.
भारतीय गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी

पाकिस्तानला 127 धावांपर्यंत रोखण्याची मोठी कामगिरी भारतीय गोलंदाजांनी पार पडली. त्यात सर्वाधिक वाटा हा कुलदीप यादव चा होता. कुलदीप यादवने चार षटकात 18 धावा देत तीन बळी टिपले तर अक्षर पटेल ने चार षटकात 18 धावा देत दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराने चार षटकात 28 धावा देत दोन बळी घेतले. या तिघांना उत्तम साथ देताना हार्दिक पांड्या आणि वरून चक्रवती ने सुरेख गोलंदाजी केली.
भारतीय फलंदाजांची दमदार कामगिरी
128 धावांचा माफक आव्हान घेऊन मैदानात धरलेल्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी जोरदार सुरुवात केली. अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या दोन चेंडूवर एक चौकार एक षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले. अभिषेक शर्माने तेरा चेंडूत ताबडतोड 31धावा बनवल्या. तर शुभमन गिल 10 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरताना भारताला विजयासमीप नेले. तिलक वर्माने 31 चेंडू 31 हवा बनवल्या तर सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 47 धावांची बहारदार खेळी केली. अशा रीतीने भारताने हा सामना सहजरित्या जिंकला.
वाढदिवसाच्या दिवशी सूर्य कुमार ने दिले भारतीय टीमला रिटर्न गिफ्ट

काल खेळले गेलेल्या पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने 47 धावांची बहुमोल खेळी करून भारताला सहज विजय मिळवून दिला. काल त्याचा वाढदिवसही होता. ही खेळी त्याने भारताला रिटर्न गिफ्ट म्हणून खेळली होती. तसेच हा विजय पहलगाम मधील भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि भारतीय सैन्याला समर्पित केला असे त्याने नमूद केले.
मैदानात दिसला भारतीय संघाकडूनही विरोध
पहलगाम मधील भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता त्याचा विरोध म्हणून भारतीय संघाने आशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये व त्यांच्यावर बहिष्कार घालावा अशी भारतीय नागरिकांमधून मागणी होत होती. परंतु भारतीय सरकारने सर्व बाजूने विचार करून भारतीय संघाला इतरत्र ठिकाणी पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यास परवानगी दिली होती.त्यानुसार हा सामना दुबई मध्ये खेळवला गेला. या सामन्यात नेहमीप्रमाणे भारतीय संघाने विजय मिळवला सामना सुरू होण्याअगोदर टॉस च्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करण्याचे टाळले. शिवाय सामना झाल्यानंतरही भारतीय संघ मैदानावर आला नाही. सरळ त्यांनी दरवाजा लावून घेतला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने हा सामना पहलगाम मधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना व भारतीय सैन्याला समर्पित केला. संपूर्ण भारतीय संघ हा आपल्या पाठीशी आहे असे सांगितले.
पाकिस्तानचे माजी खेळाडू कडून पाकिस्तानची कानउघाडणी
पाकिस्तानचे माझी खेळाडू वसीम अक्रम यांनी पाकिस्तानच्या संघाची आणि त्यांच्या कर्णधार ची चांगलीच कान उघडणे केली. वसीम अक्रम यांच्या मते पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर खेळताना चाचपडत होते. खास करून कुलदीप यादव च्या फिरकी समोर तर त्यांनी नांग्या टाकल्या होत्या. कुलदीप यादव चा प्रत्येक बोलती स्वीप म्हणूनच खेळत होते. अशा तऱ्हेने ते आपली कमजोरी चे प्रदर्शन करत होते. शिवाय पावरप्ले नंतर त्यांनी खूप स्लो खेळ केला. चुकीच्या वेळी चुकीचा शॉट खेळून सर्व फलंदाज बाद झाले. शिवाय प्रत्येक फलंदाजांनी दीडशेच्या स्ट्राईक रेट ने खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाकिस्तान मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
पाकिस्तानने ही दर्शवला विरोध
भारताकडून झालेल्या प्रभावाने पाकिस्तान चा तिळपापड झाला आहे. सामना सूर्य होण्याआधी वरती कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधार सलमान आगा याच्याशी हस्तांदोलन करण्याचे टाळले तसेच सामना झाल्यानंतर हे भारतीय संघ पाकिस्तानच्या खेळाडूंची हस्तांदोलन करण्यासाठी मैदानात आला नाही. या घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सूत्रानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधाराच्या या वर्तणुकीविरुद्ध अधिकृतरित्या तक्रार नोंदवत निषेध व्यक्त केला आहे.
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यावर बडतर्फ ची कारवाई
भरती कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण भारतीय संघाने पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूशी हस्तांदोलन केले नाही हे प्रकरण चांगले तापले होते. अख्या जगासमोर पाकिस्तानची लाज निघाली होती. परिणाम म्हणून पाकिस्तानने पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला बडतर्फ केले. पाकिस्तानी बोर्डाने त्यांचा संचालक उस्मान वाहला याचे निलंबन केले आहे.
