WTC Final 2025 : आफ्रिकेने चोकर्स चा टॅग पुसत ऑस्ट्रेलियाला चारली धूळ.बनले टेस्ट चॅम्पियन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपच्या ( WTC final 2025 ) अंतिम सामन्यात साउथ आफ्रिकेने अफलातून खेळ करत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. साउथ आफ्रिकेने तब्बल 27 वर्षानंतर आयसीसी ची ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. याबरोबरच त्यांनी आपल्यावरील चोकर्स नावाचा डाग पुसून काढला. यापूर्वी साउथ आफ्रिकेने 1998 मध्ये वेस्ट इंडीज ला नमवत आयसीसी ची पहिली ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून आजपर्यंतचा त्यांचा हा संघर्ष आजच्या या विजयाने  सफल झाला असेल म्हणावे लागेल.

टेस्ट चॅम्पियनशिप ची रेस –

आयसीसी ने टेस्ट क्रिकेट जिवंत रहावे व त्यातील रंजकता टिकून राहावी यासाठी दर दोन वर्षांनी टेस्ट चॅम्पियनशिप आयोजित करण्याचे ठरवले. त्यात त्यांनी अव्वल 9 संघाचा समावेश केला. त्यानुसार 2021 मध्ये सर्वप्रथम न्यूझीलंड हा चॅम्पियन ठरला. तर सन 2022 23 या सालचा टेस्ट चॅम्पियन ऑस्ट्रेलिया ठरला.  त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला. यंदाच्या वर्षी साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळाली. आफ्रिकेने या दोन वर्षात एकूण 12 सामने खेळले व त्यात त्यांनी 8 विजय आणि 3 पराभव स्वीकारले.  त्यांनी 69.44 पॉइंट सह अव्वल स्थान राखले.  तर ऑस्ट्रेलियाने 19 सामन्यात 13 विजय व  4 पराभव स्वीकारले. परंतु त्यांचे 67.54 पॉईंट झाले. भारताचे 50 पॉईंट असल्याकारणाने साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला.

 चॅम्पियन साऊथ आफ्रिका ( This time for Africa)

WTC Final 2025 winner team South Africa
Imege credit source from Google.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना हा ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हा सामना 30000 प्रेक्षक क्षमता असलेल्या लॉर्ड्स च्या मैदानावर खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकी कॅप्टन बवूमा ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा त्याचा निर्णय सार्थ ठरवताना कगिसो रबाडाने 15 षटकात 51 धावा देऊन 5 बळी मिळवले. तर मार्को जान्सनने त्याला उत्तम साथ देताना तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांवर आटोपला. पेट कमिन्स च्या धारदार गोलंदाजीमुळे आफ्रिकेचा पहिला डाव फक्त 138 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने 74 धावांची महत्त्व पूर्ण आघाडी मिळवली होती.  पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात आहे रबाडाने सुरेख गोलंदाजी करताना चार गडी गारद केले. मिचेल स्टार्क च्या साहसी ५८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावावर आटोपला.  आफ्रिकेला जिंकण्यासाठी 282 धावांचे आव्हान मिळाले.  परंतु खडतर सुरुवातीनंतर एडम मारक्रम चे धमाकेदार शतक आणि टेंबा बवूमा ची झुंजार 66 धावांच्या खेळीमुळे आफ्रिकेने हा अविस्मरणीय सामना जिंकला. आणि पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियन बनले.

Vijay Pavale: The Sangli Express Biography

ॲडम मारक्रम आणि बवूमाची शतकी भागीदारी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 282 धावांचा पाठलाग  करत असताना आफ्रिकेचे  दोन फलंदाज स्वस्तात बाद झाले. परंतु मारक्रम ने  एक बाजू सांभाळून ठेवली होती.  तर त्याला बवूमाची उत्तम साथ मिळाली. या दोघांमध्ये 143 भागीदारी झाली. यात मारक्रम ने २०७ चेंडूंचा सामना करताना 136 धावांची खेळी केली.  त्यात त्याने 14 चौकार मारले. तर बवूमाने  134 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्यात त्याने पाच चौकार मारले. या दोघांच्या खेळी मुळे लॉर्ड्स वरील दुसरी सर्वोत्तम धावसंख्येचा पाठलाग करण्यात आफ्रिकेला यश आले. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मारक्रम ने एका  खास यादी स्थान मिळवले. सौरभ गांगुली आणि रिकी पाँटिंग सह त्याने आयसीसीच्या अंतिम  सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंची यादी स्थान मिळवले. यापूर्वी फक्त 7 खेळाडूंनीच अंतिम सामन्यात शेतकी खेळी केली आहे.  शिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात दुसऱ्या डावात शतक मारणारा तो एकमेव खेळाडू बनला आहे.

स्कोर कार्ड – ( WTC Final 2025 ) 

1st इनिंग

ऑस्ट्रेलिया –  212/10. (56.4)

बेस्ट बॅटमॅन –  1) स्टीव स्मिथ – 66(112) 4×10.

2) वेब्स्टर  – 72(92 ) 4×11.

दक्षिण आफ्रिका –

बेस्ट बोलर – 1) कागिसो रबाडा – 15-4-51-5

2) मार्को जान्सन – 14-5-49-3

1st इनिंग

दक्षिण आफ्रिका – 138/10. (57.1)

बेस्ट बॅटमॅन –  1) तेम्बा बावूमा – 36( 84 ) 4×4,6×1.

2) बेडीनहम – 45 ( 111 ) 4×6.

ऑस्ट्रेलिया –

बेस्ट बोलर –  1) पेट कमिन्स – 18.1 – 6 – 28 – 6

2nd इनिंग –

ऑस्ट्रेलिया – 207/10. ( 65 )

बेस्ट बॅटमॅन – 1) ॲलेक्स कॅरी – 43 (50 ) 4×5

2) मिचेल स्टार्क – 58 ( 136 ) 5×6.

दक्षिण आफ्रिका –

बेस्ट बॉलर – 1) कागीसो रबाडा – 18 – 1 – 59 – 4

2) लुंगी इंगिडी – 13 – 1 – 38 – 3

2nd इनिंग –

दक्षिण आफ्रिका – 282/5. ( 83.4 )

बेस्ट बॅटमॅन – 1) ऍडम मारक्रम – 136 ( 207 ) 4×14.

2) टेम्बा बवुमा  – 66 ( 134 ) 4×5.

ऑस्ट्रेलिया –

बेस्ट बॉलर  – 1) मिचेल स्टार्क – 14.4 – 1 – 66 – 3

साऊथ आफ्रिका संघ –

  • ॲडम मारक्रम
  • रियान रिकल्टन
  • ट्रिस्टन स्टब्स
  • तेंबा बावुमा (c )
  • डेव्हिड बेडीनघम
  • काईल वेरेन
  • मार्को जान्सान
  • केशव महाराज
  • लुंगी इंगीडी
  • टोनी जोर्जी
  • डेन पॅटरसन
  • सेनुरान मुत्थुस्वामी
  • कॉर्बीन बॉश.

ऑस्ट्रेलिया संघ –

  • उस्मान ख्वाजा
  • मारनस लाबुशेण
  • स्टीव स्मिथ
  • कॅमरान ग्रीन
  • ट्रेविस हेड
  • वेबस्टर
  • पेट कमिंनस ( c )
  • ॲलेक्स कॅरी
  • मिचेल स्टार्क
  • नाथन लायान
  • जोश हेजलवूड
  • सॅम कोंस्टांस
  • स्कोट बोलांड
  • जोश इंग्लिश
  • कुन्हेमान

दक्षिण आफ्रिकेवर पडला पैशांचा पाऊस – 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकणारा दक्षिण आफ्रिका हा तिसरा संघ ठरला असून त्यांनी WTC ची फायनल जिंकून कोट्यावधी रुपयांची बक्षीसे ही जिंकली आहेत. त्यांना सुमारे 30.7 कोटी म्हणजेच 3.6 दशलक्ष डॉलर्स बक्षीस म्हणून मिळाले. तर ऑस्ट्रेलियाला 18.53 कोटी रुपये म्हणजेच 2.16 दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम मिळाली आहे. तर तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या भारताला 12.30 कोटी रुपये मिळाले. पाकिस्तानला सर्वात कमी म्हणजेच चार लाख 80 हजार डॉलर्स मिळाले.

T20  वर्ल्ड कप पेक्षा WTC जिंकणाऱ्या संघाला मिळाली जास्त रक्कम 

2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताने T20 वर्ल्ड कप जिंकले. त्यावेळी त्यांना 20.4 कोटी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. तर 2025 ची IPL विजेता RCB चा संघ यांना वीस कोटी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. परंतु WTC च्या विजेत्या संघाला म्हणजे दक्षिण आफ्रिकेला 3.6 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 30.7 कोटी एवढी बक्कळ रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.

FAQ

1) डब्ल्यूटीसी फायनल सामन्यातील पंच कोण होते ?

उत्तर – मेन पंच – ख्रिस गफनी, रिचर्ड एलिंगवॉर्थ

3rd umpire – रिचर्ड कटलब्रो.

मॅच रेफ्री – जवागल श्रीनाथ.

2) WTC 2025 फायनल चे प्रक्षेपण कोठे करण्यात आले?

उत्तर – जिओ हॉट स्टार  आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.

3) WTC 2025 फायनल मधील सामनावीर कोण ठरले?.

उत्तर – ॲडम मारक्रम. (136 धावा आणि 2 बळी. )

4) साऊथ आफ्रिकेने पहिली आयसीसी ट्रॉफी केव्हाची दिली होती ?

उत्तर – 1998 विरुद्ध वेस्ट इंडीज.

5) WTC ची बक्षीस रक्कम दक्षिण आफ्रिकेला किती मिळाली आहे ?

उत्तर – 30.7 कोटी. ( 3.6 दशलक्ष डॉलर्स ) .

 

 

 

Leave a Comment