वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सनसनाटी वर्ल्ड रेकॉर्ड; दक्षिण आफ्रिकेची धुळधाण, इतिहासातील सर्वात मोठा विजय
Published by: Rameshgosaviofficial.com
वन डे क्रिकेटच्या सामन्यात आपण बरेच चढ उतार पहात असतो. पूर्वी वनडे क्रिकेट हे 60 षटकांचे खेळवले जात असे. कालंंतराने ते 50 षटकांचे करण्यात आले. त्यात बरेचसे रेकॉर्डस हे बनवले गेले. परंतु दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद झाली आहे त्याची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या टीमने नवा इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडने वनडे क्रिकेटमधील सगळ्यात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 342 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडने दिलेलं 415 धावांचे आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा 20.5 ओव्हरमध्ये फक्त 72 धावांवर ऑलआऊट झाला आहे. या विजयासोबतच इंग्लंडने टीम इंडियाचा वनडे क्रिकेटमधील सगळ्यात मोठ्या विजयाचा विश्वविक्रम मोडला आहे. याआधी भारताने 2023 साली श्रीलंकेविरुद्ध 317 धावांनी विजय मिळवला होता.
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा नीचांकी स्कोर
इंग्लंड विरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिका फक्त 72 धावावर ऑल आउट झाली. दक्षिण आफ्रिकेचा वनडे क्रिकेटच्या इतिहासातला हा दुसरा नीचांकी स्कोअर आहे. 1993 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 69 धावांवर ऑलआऊट झाला होता.
इंग्लंडची दमदार बॅटिंग
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.पण दक्षिण आफ्रिकेचा हा निर्णय थोडासा चुकल्यासारखा वाटला. कारण इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून तब्बल 414 धावा केल्या. जेकब बेथलने 110 आणि जो रूटने 100 धावांची खेळी केली. याशिवाय जेमी स्मिथने 62, जॉस बटलरने नाबाद 62, डकेटने 31 आणि विल जॅक्सने नाबाद 19 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. या सामन्यात इंग्लंडने त्यांच्या इनिंग मध्ये तब्बल 50 चौकार षटकारांची आतिषबाजी केली.
जो रूट जेकब बेथल यांची दमदार शतके

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने पुन्हा षटकात पाच गड गमावून तब्बल धावा बनवल्या. त्यात जेकब बेथल आणि जो रूट यांनी शतके झळकावली. जे कप बेथन ने 82 चेंडू 110 धावा केल्या . त्यात त्याने 13 चौकार व 3 षटकार मारले. तर रूटने 96 चेंडू 100 धावा बनवल्या. त्यात 6 चौकारांचा समावेश होता. या दोघांनी 144 चेंडूत 182 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने 414 धावांचा डोंगर उभारला.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग गडगडली
इंग्लंडने दिलेलं 415 धावांचे आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग कोलमडली. त्यांचा फक्त 72 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याने 9 षटकात 3 निर्धाव षटके टाकून फक्त 18 धावा दिल्या. आदिल रशीदने 3 बळी टीपताना फक्त 13 धावा दिल्या. तर ब्रायडन कार्सला 2 विकेट मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फक्त 3 फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यांच्या डावात 20 हे सर्वाधिक धावसंख्या ठरली जे की बॉस ने बनवली होती.
जोफ्रा आर्चर ठरला सामनावीर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर ने घातक गोलंदाजी करताना 9 षटकात 3 निर्धाव षटके टाकून फक्त 18 धावा देऊन दक्षिण आफ्रिका चे 4 गडी गारद केले. त्याच्या या कामगिरी साठी त्याला सामनावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
केशव महाराज ठरला मालिकावीर
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्याच्या सिरीज मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनर केशव महाराज ने एकूण 202 धावा देऊन अकरा बळी घेतले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेने जिंकली मालिका

या सामन्यात जरी दक्षिण आफ्रिकेने नीचांकी धावसंख्येचा विक्रम केला असला तरी आणि इंग्लंडने वन डे मधील सर्वाधिक धावांनी विजय मिळवला असला तरी दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 2- 1 अशा फरकाने जिंकली.
इंग्लंडने तोडला टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड
इंग्लंडने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 342 धावांनी पराभव करत आजवरचा वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. पूर्वी हा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. 2023 साली श्रीलंकेविरुद्ध भारताने 317 धावांनी विजय मिळवला होता. हा आजवरचा वनडे इतिहासातील सर्वाधिक धावांनी मिळवलेला विजय होता. परंतु इंग्लंडच्या या विजयाने हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला.
400 प्लस धावा बनवण्यात इंग्लंडच भारी
2015 च्या वर्ल्ड कप नंतर आजवरच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडने तब्बल सात वेळा 400 प्लस धावा बनवलेले आहेत. तर त्यांच्या आसपास असलेले दक्षिण आफ्रिका आणि भारत यांनी अनुक्रमे तीन आणि दोन वेळा 400 पेक्षा जास्त धावा बनवलेल्या आहेत. शिवाय या यादीत ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे सारख्या संघाचाही समावेश आहे. त्यांनी प्रत्येकी एक वेळा 42 धावा बनवलेले आहेत.
