वनडेत 277 धावांची वादळी खेळी, 25 फोर 15 सिक्स, रोहितचा महारेकॉर्ड मोडला गेला. 

 वनडेत 277 धावांची वादळी खेळी, 25 फोर 15 सिक्स, रोहितचा महारेकॉर्ड मोडला गेला.

Published by:

Ramesh gosavi official.com

वनडे क्रिकेटमध्ये जेव्हा रेकॉर्डबद्दल बोललं जातं, तेव्हा क्रिकेट रसिकांना रोहित शर्माने केलेल्या 264 धावांचा विक्रम आठवतो. रोहित शर्माचा हा विक्रम मागची बरीच वर्ष तुटला नव्हता.

मुंबई : वनडे क्रिकेटमध्ये जेव्हा रेकॉर्डबद्दल बोललं जातं, तेव्हा क्रिकेट रसिकांना रोहित शर्माने केलेल्या 264 धावांचा विक्रम आठवतो. रोहित शर्माचा हा विक्रम मागिल बरीच वर्षे तुटला नव्हता, पण आता एका भारतीय खेळाडूनेच हा विश्वविक्रम मोडून इतिहास घडवला आहे. तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीसनने हा रेकॉर्ड केला आहे. जगदीसनने  एका स्थानिक वनडे सामन्यात धमाका केला आहे.

 वनडेत 277 धावांची खेळी, 25 फोर्स आणि 15 सिक्स, रोहित चा महरेकॉर्ड मिळाला.

277 धावांची वादळी खेळी

जगदीसनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये फक्त 141 बॉलमध्ये 277 धावांची वादळी खेळी केली, यात त्याने 25 चौकार आणि 15 षटकार मारले, म्हणजेच जगदीसनने प्रत्येक ओव्हरमध्ये एक बाऊंड्री लगावली आहे. या धमाकेदार खेळीने जगदीसनने रोहित शर्माचं 264 धावांचा रेकॉर्डही मोडला आहे. जगदीसनने हा विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला नसला, तरी एवढा मोठा स्कोअर केल्यामुळे जगदीसन चर्चेत आला आहे.

टेनिस बॉल क्रिकेट आणि थेट सरकारी नोकरी

तामिळनाडूने केले 506 रन

या सामन्यात तामिळनाडूने तब्बल 506 रन केले, जो भारतीय स्थानिक क्रिकेट इतिहासातला विक्रम आहे. जगदीसनशिवाय साई सुदर्शनेही या सामन्यात 154 रनची खेळी केली, या दोघांमध्ये तब्बल 416 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे तामिळनाडू क्रिकेटचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये लिहिलं गेलं आहे.

खेळी एक आणि विक्रम अनेक 

जगदीसनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफी मध्ये चिनास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे अरुणाचल प्रदेश यांच्या विरुद्ध फक्त 141 चेंडूत 277 धावांची वादळी खेळी केली, यात त्याने 25 चौकार आणि 15 षटकार मारले. ह्या त्याच्या अद्भुत खेळीमुळे मात्र अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. ते पुढीप्रमाणे आपल्यासमोर मांडणार आहे.

1) सर्वोच्च धावसंख्या 

लिस्ट ए क्रिकेट मध्ये जगदीसन ने बनवलेल्या 277 धावा या  लिस्ट ए च्या इतिहासातील सर्वोच्च धावा ठरल्या. पूर्वी हा विक्रम एलिस्टर ब्राऊन च्या नावावर होता. त्याने 2002 मध्ये 268 धावांची खेळी केली होती.

2) सलग पाच शतके 

नारायण जगदीसन याने लिस्ट ए क्रिकेट मध्ये सलग पाच सामन्यात 5 शतके झळकावली आहेत. पूर्वी 3 फलंदाजांनी सलग 4 शतके झळकावली होती. कुमार संगकारा, अल्विरो पीटरसन आणि देवदत्त पडीकल यांनी हा कारनामा केला होता.

3) सर्वोच्च धावसंख्या

क्रिकेट चे कोणत्याही वनडे फॉरमॅट मधील सर्वोच धावसंख्येचा विक्रम या सामन्यात मोडला गेला. कारण तामिळनाडू ने या सामन्यात तब्बल 506 धावा काढल्या. पूर्वी हा विक्रम इंग्लंड च्या नावावर होता. त्यांनी नेदरलँड विरुद्ध 498 धावांची खेळी केली होती.

4) सर्वात कमी चेंडूत द्विशतक

जगदीसन ने 114 चेंडूत आपले द्विशतक झळकावले. त्याने ट्रेविस हेड च्या विक्रमाची बरोबरी साधली. जे की लिस्ट ए मधील सर्वात कमी चेंडूत शतक झळकावले गेले.

5) सर्वाधिक सरासरी 

जगदीसन ने आपल्या द्विशतकी खेळी दरम्यान 196. 45 च्या सरासरीने धावा बनवल्या. ही सरासरी ही लिस्ट ए मधील आजवरची सर्वोच्च सरासरी ठरली . या पूर्वी फक्त ट्राविस हेड ने फक्त 181 च्या सरासरीने धावा बनवल्या होत्या.

6) सर्वोच्च भागिदारी 

लिस्ट ए च्या वनडे फॉरमॅट मध्ये 400 प्लस धावांची भागीदारी ही पहिल्याच पाहायला मिळाली. जगदीसन आणि साई सुदर्शन यांच्यात 416 धावांची भागीदारी झाली. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल च्या नावावर होता. त्यांनी 2015 मध्ये झिंबांबे विरुद्ध 372 धावांची भागीदारी केली होती.

7) सर्वात मोठा विजय 

तामिळनाडू ने या सामन्यात अरुणाचल प्रदेश चा तब्बल 435 धावांनी पराभव केला. एवढ्या मोठ्या फरकाने सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ असावी. यापूर्वी सॉमरसेट ने 346 धावांनी सामना जिंकला होता.

कोण आहे नारायण जगदीसन?

नारायण जगदिसन याचा जन्म 24 डिसेंबर 1995 रोजी कोइंबतूर तामिळनाडू येथे झाला. त्याचे वडिलांचे नाव सी.जे. नारायण आणि आईचे नाव जयश्री आहे. सध्या नारायण जगदीसन 29 वर्षाचा असून तो तामिळनाडूच्या संघाकडून खेळतो. तो एक स्टायलिश विकेट किपर फलंदाज आहे. त्याचे शिक्षण हे श्रीराम कृष्णा कॉलेज ऑफ सायन्स येथे झाले.

घरेलु कारकीर्द – 

प्रथम श्रेणी :

त्याने 2016-17 च्या हंगामात पदार्पण केले आणि 50.49 च्या सरासरीने 3686 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 11 शतके आहेत.

लिस्ट ए :

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम जगदीसनच्या नावावर आहे, त्याने 2022-23  विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध 277 धावा केल्या. लिस्ट ए फॉरमॅटमध्ये सलग पाच शतके करणारा तो पहिला क्रिकेटपटू देखील आहे. त्याने एकूण लिस्ट ए चे 64 सामने खेळले असून त्यात 2728 धावा बनवल्या आहेत.

टी 20 :

तो टी 20 स्वरूपात खेळला आहे आणि तमिळनाडूचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 66 टी  20 सामन्यात 1475 धावा काढल्या आहेत. तसेच आयपीएल मध्ये तो चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याकडूनही खेळला आहे.

जगदीसनने ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे 

जगदीसन स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जगदीसनने स्वत:ला सिद्ध करून निवड समितीला प्रभावित केलं आहे. या कामगिरीनंतर जगदीसनला भारताच्या टेस्ट टीममध्ये सामील करण्यात आलं, पण त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली नाही.

जगदीशनचं तंत्र, संयम आणि आक्रमकता यांचं मिश्रण त्याला भविष्यातला स्टार बनवू शकतं. त्याची लवकरच टीम इंडियात निवड होईल, असा विश्वास क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मोठ्या सामन्यांमध्ये संधी मिळाली, तर जगदीशन तिथेही असाच धमाका करेल, असा विश्वास भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Comment