ब्रेकिंग न्यूज :
आशिया कप 2025 : भारत – पाक क्रिकेट वाद पुन्हा पेटला !
काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना ठार मारले. यामागे पाकिस्तानचा हात होता हे आधीच निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भारतीय सरकारने पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी केली होती.राहिली गोष्ट क्रिकेट ची तर, भारत हा आधीपासूनच पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका खेळत नाही. शिवाय अनेक खेळाडूंनीही भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये असे सांगितले आहे. ‘ आधी देश मगच क्रिकेट ‘अशी अनेक माजी खेळाडूंची भूमिका राहिली आहे. त्यामुळे भारताने फक्त द्विपक्षीय मालिकांमध्येच नव्हे तर आशिया कप आणि वनडे व टी-20 विश्वचषकावर देखील बहिष्कार टाकावा अशी क्रीडाप्रेमींकडून मागणी होत आहे. याचा परिणाम म्हणून भारत – पाक क्रिकेट वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
लेजण्ड क्रिकेट लीग मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास भारताचा नकार .
व्यवसायिक क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेल्या माजी खेळाडूंची लेजण्ड क्रिकेट लीग भरवली जाते. मागच्या महिन्यात झालेल्या या लीगमध्ये भारतीय लेजण्ड संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास साफ नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघ जरी सेमीफायनल गाठू शकला नसला तरी त्यांनी करोडो भारतीयांची मने मात्र जिंकली होती.
राजकीय मंडळींची आशिया कप मध्ये पाकिस्तानी बहिष्कार घालण्याची मागणी.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारतीय जनतेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय जनता आणि राजकीय मंडळी सुद्धा आगामी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच अनेक तर्क – वितर्क मांडले जात आहेत.
आशिया कप मध्ये भारत पाकिस्तान सामना होणार.

आशिया कप 9 सप्टेंबर पासून यूएई मध्ये सुरू होणार असून नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारत – पाकिस्तान कदाचित तीन वेळा आमने – सामने येण्याची शक्यता आहे. सर्व स्तरातून आशिया कपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा अशी मागणी असतानाही भारत सरकारने या स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच बहुराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास कोणतीही बंदी नाही असेही स्पष्ट केले आहे.
पहलगाम मधील भ्याड आल्यानंतरही भारत पाकिस्तान विरुद्ध आशिया कप मध्ये क्रिकेट खेळणार आहे याची काही प्रमुख कारणे समोर आलेले आहेत
1] ACC मधील भारताचा दर्जा कमी होऊ शकतो.
आशियन क्रिकेट कौन्सिल म्हणजेच ACC वर आतापर्यंत भारताचे वर्चस्व राहिले आहे. आशिया कप मध्ये भारतीय संघ आतापर्यंत अव्वल राहिला आहे.जर भारतीय संघाने पाकिस्तान वर बहिष्कार टाकला तर ही स्पर्धा अपयशी ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम या स्पर्धेच्या उत्पन्नावर ही होऊ शकतो. तसेच एशियन क्रिकेट कौन्सिल मधील भारताचा दर्जाही कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय पाकिस्तान कट कारस्थान करून इतर देशांना भारताविरुद्ध करण्याची योजना आखू शकतो.
2] बहिष्कार टाकल्यास पाकिस्तानला मोफत गुण मिळतील.
भारताने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किंवा स्पर्धा चालू असतानाच पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तानला नाहक मोफत गुण मिळतील. त्यामुळे कदाचित पाकिस्तान फायनल मध्ये पोहचून विजेता ही बनू शकतो. त्यामुळे पाकिस्तानात फुकटचा गुण न देता त्यांच्याशी खेळून त्यांना पराभूत करून वचपा काढावा हा उद्देश असू शकतो.
क्रिकेट मध्ये इतिहास घडला. एकाने ठोकल्या 1000 धावा आणि संघाने बनवल्या 1400 धावा.
3] आयसीसी मध्ये बीसीसीआयचे स्थान कमकुवत होऊ शकते.

पैशाच्या बाबतीत जगातील सर्व क्रिकेट बोर्ड खरेदी करण्याची ताकद बीसीसीआय कडे आहे त्यामुळे जगातील सर्वाधिक शक्तिशाली क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआय ओळखले जाते. शिवाय आशियाई गटाच्या एकतेमुळे आयसीसीच्या राजकारणात बीसीसीआय देखील मजबूत स्थितीत आहे. जर भारतीय संघाने पाकिस्तान वर बहिष्कार टाकला तर आशियाई गटाची एकता कमी होईल आणि आयसीसीच्या राजकारणात बीसीसीआयचे स्थान कमकुवत होऊ शकते.
4] भारत – पाक सामना आणि पैशांचा खेळ.
भारत आणि पाकिस्तान यांचा कोणताही सामना हा हाय व्होल्टेज असतो. तसेच जाहिरात आणि प्रसारमाध्यमे यांच्यामार्फत बराच पैसा ही या सामन्यावर लावला जातो. 2025 मध्ये होणाऱ्या आशिया कपचे प्रसारण हक्क आधीच सुमारे 1500 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तान या सामन्यामुळेच आशिया कप चे प्रसारणाचे हक्क इतक्या प्रचंड किमतीला विकले गेलेले आहेत. भारत-पाक सामन्याचे जाहिरातीचे स्लॉट प्रत्येक 10 सेकंदाला 25 ते 30 लाखांना विकले जातात. तर इतर सामन्याचे प्रसारण हक्काची रक्कम ही निम्म्यापेक्षाही कमी आहे. जर भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध खेळला नाही तर प्रसारकांना हे स्लॉट चांगल्या किमतीने विकता येणार नाहीत व प्रसारकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या सर्व कारणांमुळे कदाचित भारत सरकार आणि बीसीसीआयने पाकिस्तानसोबत बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सामना खेळण्यास परवानगी दिली आहे.
तुमच्यामध्ये भारताने पाकिस्तानसोबत बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळावे की संपूर्ण बहिष्कार टाकावा? हे कमेंट करून नक्की कळवा आणि शेअर करायला विसरू नका.
FAQ
1) आशिया कप 2025 ते यजमानपद कोणाकडे आहे?
उत्तर – युएई.
2) 2025 च्या आशिया कप चे प्रसारण माध्यमाचे हक्क सुमारे किती रुपयांना विकले गेले आहे ?
उत्तर – पंधराशे कोटी.
3) आशिया कप 2025 ची सुरुवात कधीपासून होणार आहे?
उत्तर – 9 सप्टेंबर 2025 पासून.
