” क्या बोलती पब्लिक ?, कसं काय मजेत.” मित्रांनो, आज मी तुम्हाला आशिया कपची सुरुवात कशी झाली याबद्दल एक रंजक अशी कहाणी सांगणार आहे जी आपण क्वचितच ऐकली किंवा वाचली असणार. चला तर मग आजच्या लेखाला प्रारंभ करू.
अशी झाली आशिया कप ची सुरुवात

१९८३ च्या वर्ल्डकप मध्ये भारतीय टीमने ६ पैकी ४ सामने जिंकून दिमाखात फायनल मध्ये प्रवेश केला होता. संपूर्ण देशाला आपणच फायनल जिंकणार अशी आस लागली होती . प्रत्येकजण फायनलचा तो क्षण प्रत्यक्ष अनुभवावा यासाठी प्रयत्नशील होता. त्यात सिद्धांत शंकर राय जे की त्यावेळी ‘ युनियन एज्युकेशन मिनिस्टर ‘ होते. त्यांनी आपले मित्र एन.के.पी. साळवे जे की त्यावेळी BCCI चे अध्यक्ष व युनियन मिनिस्टर होते त्यांना फायनल ची दोन तिकिटे मिळवण्यासाठी फोन लावला. साळवे साहेब त्या वेळी आयसीसी चे मेंबर ही होते. परंतु संयोजकांनी त्यांना दोन एक्स्ट्रा तिकीट देण्यास चक्क नकार दिला व पूर्वी दिलेल्या तिकिटावरच भागवण्यास सांगण्यात आले. साळवे साहेबाना तिकिटासाठी नकार दिल्याचा राग नव्हता पण ज्याप्रकारे नकार दिला गेला त्यामुळे मात्र त्यांना प्रचंड राग आला व त्यातूनच इंग्लंड मधून वर्ल्डकप चे आयोजन हलविण्याची चिंगारी पेट धरू लागली. कारण वर्ल्डकप चे आयोजन फक्त इंग्लंड मध्येच होत होते.
तथापि इंग्लंड ची टीम १९८३ च्या फायनल मधून बाहेर गेल्यामुळे बरेचसे बोर्ड मेंबर फायनल पाहण्यासाठी आलेच नाही. एन.पी.के. साळवे यांच्या लक्षात आले की, इंग्लंड मधून वर्ल्डकप इतरत्र हलविण्याची ही नामी संधी आहे. २६ जून १९८३ म्हणजेच वर्ल्डकप विजयाच्या दुसऱ्या दिवशी लंडन मध्ये लंचच्या वेळी साळवे साहेबांची मुलाखत पाकिस्तानचे एअर चीफ मार्शल नुर खान यांच्याशी झाली. त्यांनी नूर खान यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली . आशियाच्या ऐक्यासाठी पाकिस्तान सारखा मोठा संघ हातभार लावू शकतो याचे महत्त्व पटवून दिले. त्याकाळी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन टीम कडे वेटो पावर होती. तिच्या जोरावर ते त्यांना जर एखादा प्रस्ताव नामंजूर करायचा असेल तर तसे ते करू शकत होते. याचा विरोध करण्यासाठी साळवे साहेबांनी आशियातील मोठ्या संघाना एकत्र करण्यास सुरू केले.
Asian Cricket council ( ACC ) ची स्थापना

यासाठी BCCI व मोठ – मोठे उद्योगपती यांची साथ आवश्यक होती. हे पाहून कोलकात्याचे उद्योगपती जगमोहन दालमिया व पंजाबचे आय. एस. बिंद्रा पुढे आले. त्याच वर्षी लाहोरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात श्रीलंकेचे चीफ गामिनी दिस्नायके यांनाही आमंत्रण धाडण्यात आले. त्या दिवशी Asian Cricket council म्हणजेच ACC ची स्थापना करण्यात आली. यापूर्वी फक्त आयसीसी च आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत होता. मात्र यापुढे ACC ही अशा सामन्यांचे आयोजन करणार होता. एन.पी.के. साळवे हे ACC चे पहिले अध्यक्ष झाले. जगमोहन दालमिया यांनी एक प्रस्ताव तयार केला की ,ज्यात वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन फक्त इंग्लंडकडेच न राहता इतर देशांनाही आयोजनाची संधी मिळावी अशी संकल्पना होती. १९८३ च्या शेवटी आयसीसी समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु आयसीसी ने मात्र हा प्रस्ताव बरखास्त केला. साळवेनाही नेमके हेच हवे होते. आयसीसी चे असे म्हणणे होते की, आशियामध्ये ६० ओव्हरचे सामने खराब हवामान व लाईटच्या कमतरतेमुळे होवू शकत नव्हते . कारण यापूर्वी आशियामध्ये एकदिवसीय सामने हे ३६ किंवा ४० ओव्हरचेच खेळवले जात असत. परंतु असा कोणताच नियम नव्हता की, एकदिवसीय सामने हे ६० ओव्हरचेच खेळवले जावेत. म्हणूनच ACC ने आशियात किंबहुना भारतातही ६० ओव्हरचे सामने चांगल्या प्रकारे खेळले जावू शकतात हे जगाला ( ICC) दाखवून देण्यासाठी साळवे यांनी आशिया कप जे की ,५० ओव्हरचे असतील अशी संकल्पना मांडली. या स्पर्धेद्वारे आशियातील संघ व राष्ट्रे यातील संबंध सुधारण्याची ही नामी संधी होती.
आता प्रश्न होता तो स्पर्धा आयोजनाचा व ५० ओव्हरचे सामने खेळवले जाण्याचा .परंतु ही स्पर्धा पार पाडण्यासाठी पैशाची खूप आवश्यकता होती. त्यावेळी ACC मधील कोणत्याही बोर्डकडे एवढा पैसा उपलब्ध नव्हता. त्यासाठी पुढील मीटिंग ही दिल्ली येथे बोलावण्यात आली. ज्यात आयसीसी चे मेंबर असलेल्या देशांनाही आमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी अमीरात क्रिकेट बोर्ड ही अस्तित्वात नव्हते. त्या मीटिंग मध्ये एका खास पाहुण्याला आमंत्रण देण्यात आले होते व त्याचे कारणही तसे खासच होते. त्यांचे नाव होते शेख बुखाशिर. शेख बुखाशिर हे शारजा मधील एक मोठे उद्योगपती व क्रिकेट चे प्रचंड मोठे चाहते होते. ते पहिल्यापासूनच शारजा मध्ये अनधिकृत क्रिकेट सामन्यांचे आयोजन करत व प्रचंड मोठे बक्षीस ही देत असत. यावेळी मात्र त्यांना अधिकृत व आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्याची संधी मिळणार होती व ती त्यांनी आनंदाने स्वीकारलीही. व यातूनच आशिया कप ची सुरुवात झाली. या घटनेमुळेच शारजा क्रिकेट ग्राउंड नावारूपास आले.
असा खेळवला गेला पहिला आशिया कप
१९८४ मध्ये पहिल्यांदाच आशिया कप ची सुरुवात झाली. भारत, पाकिस्तान व श्रीलंका हे तीन संघ यात सहभागी झाले. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आली. यात विजेत्या संघाला ५० हजार डॉलर, उपविजेत्या संघास २० हजार डॉलर तर मॅन ऑफ द सिरीज साठी ५ हजार डॉलर अशी बक्षिसे लावण्यात आली. या स्पर्धेत भारतीय टीम वर प्रचंड दबाव होता. कारण १९८३ चा विजय हा काही हवेत मारलेला फुसका बार नव्हता हे लोकांना दाखवून द्यायचे होते. त्यात कपिल देव ज्यांनी संपूर्ण वर्ल्डकप गाजवलेला होता ते गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकले नाही. तरीही भारतीय टीमने जिगरबाज खेळ करून अंतिम सामन्यात पाकिस्तानला धूळ चारून पहिले-वहिले आशिया कप चॅम्पियन झाले. पुढे जावून १९८७ मध्ये भारत व पाकिस्तान यांनी संयुक्तपणे १९८७ वर्ल्डकप चे यशस्वी आयोजन केले व साळवे साहेबांचे स्वप्न सत्यात उतरले.
FAQ
१) आशिया कप ची संकल्पना मांडणारे कोण होते ?
उत्तर – एन. के. पी. साळवे
२) पहिला आशिया कप कोणी जिंकला ?
उत्तर – भारत
३) ACC चा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर – एशियन क्रिकेट कौन्सिल ( Asiyan Cricket Council.
चला तर मित्रांनो आशिया कप ची रंजक कहाणी कशी वाटली हे सांगायला विसरू नका व आपल्या ब्लॉग वर यायला तर अजिबात लाजायचे नाही. आपल्या मित्रांना व क्रिकेट प्रेमींना ही पोस्ट नक्की शेअर करा.
