नमस्कार मित्रांनो, माझे नाव रमेश शंकर गोसावी आहे. मी महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव या गावचा रहिवासी आहे. मला पहिल्यापासून लिखाणाची आवड होती. आणि हीच आवड आता या ब्लॉगच्या रूपात आपल्यासमोर सादर करत आहे. माझ्या ब्लॉगचे नाव क्रिकेटची दुनियादारी असे आहे. हे नाव ठेवणे मागचे कारण असे की, क्रिकेट हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. पण क्रिकेट विषयी मराठी मध्ये माहिती ही फार कमी ब्लॉग आणि इतर माध्यमाद्वारे आपल्याला मिळत असते. क्रिकेट विषयी माहिती ही फक्त आपल्याला न्यूज चॅनलच्या स्वरूपातच पूर्णपणे मिळत असते. या ब्लॉगच्या माध्यमातून माझा असा प्रयत्न असणार आहे की, क्रिकेट विषयी सर्व काही माहिती हे आपल्या बोलीभाषेत आणि आपल्याला समजेल ,पटेल ,उमजेल अशाच शब्दात आपल्यासमोर मांडणार आहे. या ब्लॉगमध्ये आपल्याला लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि इतर सर्व प्रकारचे खेळले जाणारे क्रिकेटचे प्रकार व त्यांची माहिती वाचण्यास मिळेल. शिवाय क्रिकेटचे नियम, विविध स्पर्धा, लीग मॅचेस, सर्व खेळाडूंचे रेकॉर्ड्स आणि खेळाडूंची बायोग्राफी , प्रमुख खेळाडू यांची माहिती या आणि अशा बऱ्याच गोष्टी पाहावयास मिळतील. शिवाय क्रिकेट खेळाडूंचे खाजगी आयुष्य यांचाही लेखाजोखा या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. लेदर क्रिकेट मधील प्रमुख खेळाडू जसं की सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एम एस धोनी , क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा आणि यांसारखे जुने जाणते खेळाडू तसेच अपकमिंग स्टार यांची माहिती आपल्याला वाचण्यास भेटणार आहे. टेनिस क्रिकेटबद्दल जर बोलायचे झाले तर ग्रामीण क्रिकेट पासून ते ISPL पर्यंतचा प्रवास आपल्याला या ब्लॉगमध्ये अनुभवास मिळणार आहे. यामध्ये गल्लीबोळात खेळला जाणारा टेनिसचा क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाणारा टेनिस बॉलचा क्रिकेट याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला या ब्लॉगमध्ये वाचण्यास मिळणार आहे. टेनिस क्रिकेट मधील रथी महारथी जसे की कृष्णा सातपुते, विजय पावले, उस्मान पटेल, पवन केणे ,आकाश तारेकर ,करण अंबाला यांसारख्या खेळाडूंची माहिती आपल्याला वाचावयास मिळणार आहे. तसेच तसेच पाकिस्तान मधील टेप बॉल चे क्रिकेट याचीही माहिती आपल्याला या ब्लॉगमध्ये पहावयास मिळेल. आपल्याला माहिती नसेल की, क्रिकेटमध्ये एकूण क्रिकेटचे 21 प्रकार या जगात खेळले जातात याची थोडक्यात माहिती आपल्याला या ब्लॉगमध्ये वाचावयास मिळेल. याची सर्व माहिती आपल्याला पुढील लिंक द्वारे मिळेल.